(राया मला अनफ्रेंड करू नका)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
1 Sep 2011 - 9:27 pm

एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं. त्याने आपल्याच मित्र मैत्रिणींनी तिला लिहिलेली पत्रं वाचली, चॅट लॉग्ज बघितले आणि त्याचे डोळे पांढरे झाले. ताडकन त्याने तिला अनफ्रेंड केलं...
आपल्या दुरावलेल्या मित्राला परत बोलावण्यासाठी वसंत सबनीसांची क्षमा मागून ती म्हणते....

लाईक नेहमी तुम्हास केलं
इग्नोरू नका फुका
अन् राया मला, अनफ्रेंड करू नका॥

वॉल वाचली इन्फो पाहिलीत
कॉमन फ्रेंडही किती निघालेत
आल्बम फोटो चेकही केलेत
फ्रेंड रिक्वेस्ट अन् मला धाडलीत
ऍक्सेप्ट केली मी, नैका?
आता राया मला अनफ्रेंड करू नका॥

विश्वासाने दिला तुम्हा जरी
अकाउंट पासवर्ड माझा मी तरी
फ्रेंड्सचे अपुल्या मेसेज वाचलेत
लॉग्ज पाहुनी डोळे पांढरे
भवल्या भलत्या चुका
पण राया मला, अनफ्रेंड करू नका॥

सदर धाग्यासाठी माझे गुर्जी आणि फेसबुकमित्र राजेश घासकडवी यांचे आभार.

शृंगारइतिहासविडंबनजीवनमान

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

विजुभाऊ's picture

2 Sep 2011 - 8:06 pm | विजुभाऊ

एक बाळबोध मार्लीश ( मराठी+ इंग्लीश ) कविता.

प्रयत्न करण्याचा बरा प्रयत्न केलेला आहे. पुलेशु.
आवांतरः दुशली ब च्या ग्यादरिंगला चालेल का विचारायल पाहिजे हेडमास्तरीणबैना.
अतीआवांतर : प्रवर्तक धाग्यात प्रतिक्रीया देणार......
वाद वाढवणार.....टी आर पी घेणार.

प्रियाली's picture

1 Sep 2011 - 9:37 pm | प्रियाली

बाबौ!

चिंतामणी's picture

1 Sep 2011 - 9:40 pm | चिंतामणी

:bigsmile:

चतुरंग's picture

1 Sep 2011 - 9:42 pm | चतुरंग

घासुगुर्जी आणि अदिती यांच्या संयुक्त विद्यमाने आलेले विडंबन वाचून ड्वाले पाणावले! ;)

(फ्रेंडली)रंगा

श्रावण मोडक's picture

1 Sep 2011 - 9:43 pm | श्रावण मोडक

मेलो...

आत्मशून्य's picture

1 Sep 2011 - 10:13 pm | आत्मशून्य

कूल...

फ्रेंड रिक्वेस्टवरून असाच एक किस्सा आठवला त्या काळचा*. एका मूलीचे अकऊंट क्याफेत तसच ओपन राहीले होते. लगेच त्यावरून मित्राने स्वतःला फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तिला उलटी खरड पाठवली होती हायु नो मी म्हणून :)

* हे ऑर्कूटवरती घडलं होतं.. सबब तो काळ आता इतीहास जमा झालाय.

नगरीनिरंजन's picture

1 Sep 2011 - 9:58 pm | नगरीनिरंजन

=)) =))

प्रीत-मोहर's picture

1 Sep 2011 - 10:05 pm | प्रीत-मोहर

खी खी खी =)) =))

कविता वाचून अदितीला एवढेच विचारावेसे वाटते "मज्याशी मय्त्री कर्नार कं?"

प्रियाली's picture

1 Sep 2011 - 10:16 pm | प्रियाली

मला अन्फ्रेंद कर्नार क? असे विचारायला हवे. ;) की नंतर अन्फ्रेंद कर्न्यासाती आधी फ्रेंद करून घेताय? ;)

अनामिक's picture

1 Sep 2011 - 10:26 pm | अनामिक

आम्ही नै ब्वॉ कुणाला अन्फ्रेंद करत!

गणपा's picture

1 Sep 2011 - 10:21 pm | गणपा

=)) =))
_/\_ धन्य आहेस.

Nile's picture

1 Sep 2011 - 10:32 pm | Nile

पूढील आवाहन: "राया चला चेपूवरी, अनफ्रेंड करू चला"... ;-)

पुढल्या म्हराटी पिच्चरमदे यावर एक नाच असायला हरकत नाही.

आळश्यांचा राजा's picture

1 Sep 2011 - 10:46 pm | आळश्यांचा राजा

_/\_ !

(पण या पोरी लोक लगेच असे फ्रेण्डांना पासवर्ड देतातच कशाला!)

पिंगू's picture

1 Sep 2011 - 10:58 pm | पिंगू

पहिलं आमचं आमंत्रण तर स्वीकारा दुर्बिटनैताई... मग पुढे बघू अनफ्रेंड करायचं की नाही ते..

- (चेपुमित्र) पिंगू

पुष्करिणी's picture

1 Sep 2011 - 11:30 pm | पुष्करिणी

जोरदार टाळ्या :) :) :)

कवितानागेश's picture

2 Sep 2011 - 12:01 am | कवितानागेश

:D
भलतीच दारुण कथा आहे!
:D

सुहास झेले's picture

2 Sep 2011 - 1:34 am | सुहास झेले

हा हा हा .. जबरदस्त !! :D

प्राजु's picture

2 Sep 2011 - 2:05 am | प्राजु

काय दुर्बिटणे बाई... !
मी नाही हो तुम्हाला अन्फ्रेन्ड केलं...! :)

स्पंदना's picture

2 Sep 2011 - 6:32 am | स्पंदना

'स्सुरेख' वगैरे म्हणन जरा उचित वाटत नाही पण 'डोक्केबाज गो अदिती!' अस मात्र म्हणु शकते, अन आता हात सोड त्या गुर्जींचे , कायम काय त्यांची मदत, एकदा शिकवल्क की पुढ आपन सुरु करायच असत.

प्यारे१'s picture

2 Sep 2011 - 9:20 am | प्यारे१

>>>>अन आता हात सोड त्या गुर्जींचे , कायम काय त्यांची मदत, एकदा शिकवल्क की पुढ आपन सुरु करायच असत.

निनाद's picture

2 Sep 2011 - 6:46 am | निनाद

मस्त!

मनीषा's picture

2 Sep 2011 - 8:00 am | मनीषा

पथदर्शक (विडंबन) कविता ...

(पुढच्यास ठेच ...इ.इ. )

(- नॉट सो फ्रेन्डली) मनीषा

वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली.

हा हा!! लै भारी :D

मृत्युन्जय's picture

2 Sep 2011 - 11:27 am | मृत्युन्जय

_/\_ प्रणाम _/\_ :)

सदर धाग्यासाठी माझे गुर्जी आणि फेसबुकमित्र राजेश घासकडवी यांचे आभार.

पैकी कोणाच्या फेबु चे आहे ?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2011 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

धाग्यामागची प्रेरणा सांगीतली असती तर अजून बहार आली असती ;)

वाहीदा's picture

2 Sep 2011 - 4:11 pm | वाहीदा

GREYSON CHANCE चे "Unfriend You" गाणे आठविले =))

You come on to everybody
Everybody all the time
You give up to anybody
What I thought was only mine

So it's over now we're through, so I'll unfriend you
You're the best liar I ever knew, so I will unfriend you
'Cause I should have known, right from the start
That you didn't have a human heart
Yeah it's over my last move is to unfriend you
Unfriend you

So I'll unfriend you! Unfriend you !

पण आम्ही नाही हो तुला कधीच अन्फ्रेंड करणार :-)

नंदन's picture

2 Sep 2011 - 4:11 pm | नंदन

नावाच्या चित्रपटातल्या

'तारुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
तालुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा'

ह्या ओळी आठवल्या :)

गणपा's picture

2 Sep 2011 - 7:38 pm | गणपा

लाईक केल्या गेले आहे. ;)

ही ओळ पण आठवली.

शुचि's picture

2 Sep 2011 - 8:19 pm | शुचि

मस्त.

नितिन थत्ते's picture

2 Sep 2011 - 6:14 pm | नितिन थत्ते

डबलप्लस अनगुड

अनफ्रेण्ड करायलाच पायजेलाय आता.

प्रभो's picture

2 Sep 2011 - 6:33 pm | प्रभो

=)) =)) =))

मस्त विडंबन...

पण त्या पोरीने आपल्या अकाउंटचा पासवर्ड शेअर करण्याचा वायझेडपणा का बरे करावा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2011 - 8:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सांगोवांगीच्या गोष्टी अशा की या मुलीला तिच्या फेसबुक खात्यात काही फिल्टर टाकायचे होते, जे करणं तिला जमत नव्हतं. या तरूणाने आपल्याला हे जमेल असं सांगितलं. म्हणून तिने विश्वासाने फक्त काही तांत्रिक कामांसाठी त्याला पासवर्ड दिला तर हे मेसेज-गेट प्रकरण झालं.

अपर्णा अक्षय आणि प्यारे१ यांजप्रती:
शिकवणार्‍याने शिकवलं, आपण शिकायचा प्रयत्नही केला. पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही म्हणून थोरामोठ्यांची मदत घेतलेली बरी असते. कोणाची मदत घेऊन आपण लहान होत नाही. बरं लिखाणात मदत घेणं, करणं म्हणजे काय पासवर्ड वाटणं नव्हे!

नंदन आणि रामदासकाका यांजप्रती:
होय, काही ओझी काढून टाकल्या जात आहेत, काही गोष्टी "खूबसूरत" दिसेपर्यंतच सोडून दिल्या जात आहेत.

अनामिक, मी मयत रि क्रेन पन ए.एस.एल?
परा, प्रेरणा काय ते समजलं असेलच.

>> (- नॉट सो फ्रेन्डली) मनीषा <<
आवडलं.

>>पैकी कोणाच्या फेबु चे आहे ? <<
फेसबुक एकच आहे, मार्क झुकरबर्गचं.

शिल्पा ब's picture

2 Sep 2011 - 9:49 pm | शिल्पा ब

पाचकळ (नेहमीप्रमाणेच)

अनामिक's picture

2 Sep 2011 - 11:49 pm | अनामिक

पाचकळ (नेहमीप्रमाणेच)

ही तुमची सही आहे की कवितेवरचा प्रतिसाद? (ह.घ्या.)

जाई.'s picture

2 Sep 2011 - 11:13 pm | जाई.

I Like it. :)