९४ टक्के मुस्लिम वस्तीच्या इंडोनेशियात त्यातही जावा बेटावर इदुलफित्रीला सर्वांनी आपापल्या आई-वडिलांकडे किंवा आजी-अजोबांकडे जायचा प्रघात आहे. जकार्तात नोकरी करून आपले ऐश्वर्य मिरवायलाही कांहीं लोक जातात असे माझे कांहीं इंडोनेशियन मित्र म्हणतात. स्वतःचे नोक-झोकवाले कपडे, घरच्यांना द्यायला विकत घेतलेल्या भेटीं वगैरेमुळे बरेच लोक कर्जबाजारीही होतात.
असो. एरवी अॅक्सिलरेटर ऐवजी ब्रेकवर पाय ठेवून गाडी चालविणार्या आम्हा लोकांना हे चार दिवस म्हणजे "फॉर्म्यूला-१"चेच दिवस वाटतात. अगदी तुफान वेगात गाड्या चालविता येतात.
मुंबईच्या कारखानदारीच्या क्षेत्रातून जाणार्या व नेहमी bumper-to-bumper रहदारी असलेल्या आग्रा रोडच्या तोडीचा इथला रस्ता म्हणजे "जालान राया बकासी" (Bekasi Main Road). याच रस्त्यावर मी जिथे काम करतो तो कारखाना आहे. तिथल्या रहदारीची ही चित्रे गंमत म्हणून टाकली आहेत!
=======================================================
प्रतिक्रिया
31 Aug 2011 - 10:17 pm | रामदास
सगळ्याच देशात एकसारखेच दिसतात का ?
आणि हे काय रस्त्यावर एकही खड्डा नाही ?
1 Sep 2011 - 7:12 am | सुनील
जाकार्तातील नेहेमीच्या (रहदारीने भरलेलेल्या) रस्त्याचे फोटोदेखिल टाकले असतेत तर, तुलना करता आली असती!
1 Sep 2011 - 7:18 am | सुधीर काळे
सोमवारपासून ते दृश्य दिसू लागेल व मी इथे ते फोटोही टाकेन.
1 Sep 2011 - 10:48 am | अर्धवट
असेच म्हणतो. नेहेमीचे पण फोटो टाका
1 Sep 2011 - 7:17 am | सुधीर काळे
जकार्तातील हमरस्ते खूपच चांगले आहेत. शहराच्या ऐन मध्यातून जाणारा टोल रोड तर लाजवाब आहे. कमाल वेगमर्यादा पाळताना त्रास होतो आणि चुकून ती मर्यादा ओलांडलीही जाते! पण पोलिसांचे तिकडे विशेष लक्ष नसल्यामुळे दंड वगैरे होत नाहीं.
अलीकडेच कांहीं रस्त्यांचे काँक्रीटीकरणही झाले आहे. शिवाय सर्व वस्तू व्यवस्थित सांभाळण्याकडे इंडोनेशियन लोकांचा खूप कटाक्ष असतो.
1 Sep 2011 - 7:34 am | सहज
एन्जॉय इट व्हाईल इट लास्ट्स! :-)
1 Sep 2011 - 1:59 pm | सुधीर काळे
http://www.misalpav.com/node/14551
माझ्या वरील लेखातील छायाचित्र क्र. २ पहा!
1 Sep 2011 - 7:40 pm | रेवती
आपला पूर्वीचा लेख आणि छायाचित्रे पाहिली.
गाड्यांच्या गर्दीपेक्षा एकदठ्ठा माणसांचा फोटू पाहून कसेसे झाले.
आजकाल पुण्यात लक्ष्मी रस्त्यालाही असाच प्रकार आहे असे वाटते.
ही अशी गर्दी जर रोज रस्त्यांवर दिसत असली तर मोकळ्या रस्त्याचे फोटू काढून ठेवणं हे पटतं.
मोकळ्या लक्ष्मी रस्त्याचे फोटू काढून ठेवावेत म्हटलं तरी शक्य होणार नाही असा अंदाज.
2 Sep 2011 - 9:16 pm | सुधीर काळे
रेवतीताई,
"एकदठ्ठा" हा शब्द अपरिचित असल्यामुळे अर्थ कळला नाहीं.
कुठला फोटो म्हणालात तुम्ही?
3 Sep 2011 - 1:22 am | रेवती
लोकांमुळे खचाखच भरलेला एक फोटू आहे त्याबद्दल म्हणत होते.
खालच्या प्रतिसादातील सुरबाया (ज्याला चुकीने मी सरबाया असे म्हणत असे.) बद्दलची माहिती फारच इंटरेस्टींग आहे.
कृपया अजून लिहा. फोटूही चढवा. कित्येकदा मुस्लिम समाजाच्या राहणीमानाबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. माझी एक पाकिस्तानी मैत्रिण तिचं घर प्रचंड स्वच्छ ठेवायची. त्याची आठवण आपण दिलेल्या सुरबायाच्या माहितीवरून झाली.
1 Sep 2011 - 10:34 pm | आशु जोग
तिकडे शहर आणि खेडे यात काय फरक आहे
लोकांच्या जीवनामधे
2 Sep 2011 - 9:12 pm | सुधीर काळे
मी लक्ष्मी मित्तल यांच्या सुरबायाजवळच्या देसा (खेडे) केडुंगतुरी या अगदी छोट्या खेड्यातल्या कारखान्यात सुमारे ६ वर्षे काम केले. आमच्या भारतीयांना रहायला दिलेल्या जागाही केडुंगतुरी व कतेगान या खेड्यातच होत्या. त्यामुळे त्यावेळचा अनुभव थोडक्यात सांगतो.
खेड्यात रहाणारे बहुतेक सारे लोक शेतकरी होते. शेती होती मुख्यतः भाताची व उसाची. कालव्याचे पाणी उपलब्ध होते. (वर्षात ३ पिके काढत असे ऐकले होते) मित्तलांच्या कारखान्यामुळे आता त्या खेड्यातले बरेच लोक आमच्या कारखान्यात नोकरीही करत व त्यामुळे आमच्या चांगल्या ओळखीचे झाले होते.
सकाळी जॉगिंगला जाताना रोज त्या खेड्यातल्या 'मेन रोड'ने आम्ही जायचो. दोन्हीकडे मोठी अंगणे असलेली पण शाकारलेली कच्ची घरे होती. पण सकाळी ६ वाजतासुद्धा स्वच्छ झाडलेली असायची. जनता मुस्लिम धर्मीय असल्यामुळे सकाळच्या नमाजासाठी चार वाजल्यापासून जाग असायची व सारे लोक सहाच्या सुमारास घराबाहेर पडायचे. आम्ही कधी-कधी रात्री ८-८|| वाजता 'after-dinner-stroll'साठी बाहेर पडायचो तेंव्हां 'शुभं करोति'च्या तोडीचे मुस्लिम स्तोत्र म्हणून इंडोनेशियन खेडूत गुडुप्प झोपलेले असायचे. एकही दिवा दिसत नसे अख्ख्या खेड्यात.
पण या खेडुतांची तरुण मुले मात्र दुचाकीवर हिंडायची, अगदी १३-१४ वर्षाच्या किशोरीही दुचाकी चालवायच्या. पण गाड्या मात्र क्वचितच पाहिल्या.
केडुंगतुरीचा मेन रोड व इतर रस्ते कच्चे असले तरी अगदी स्वच्छ असायचे. प्रत्येक रहिवासी आपल्या घरासमोरचा रस्ताही झाडायचा.
आम्ही इथली भाषा शिकलो असलो तरी आम्ही परदेशी असल्यामुळे आम जनता आमच्याशी बोलायला आपणहून यायची नाहीं पण आमच्या कारखान्यातले कर्मचारी येता-जाता दिसले तर चार शब्द बोलायचे.
खेडे असले तरी साधारण रोजच्या जीवनोपयोगी वस्तू विकत मिळण्याची सोय चांगली असायची. त्यामुळे सुरबाया या जवळच्या शहरात (१५ किमी) आठवड्यात एकादे वेळीच जायला लागायचे.
मला वाटते सध्या इतके पुरे! यावर एक स्वतंत्र लेखसुद्धा होऊ शकेल.
2 Sep 2011 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
@-यावर एक स्वतंत्र लेखसुद्धा होऊ शकेल.
स्वतंत्र लेख जरूर लीहा,,,हे वर्णनही वाचताना खूप बर वाटत होत :-),नवीन माहीती कळत होती. पण फोटो हवेतच,,,नाहीतर खायाला मिळाल,पन पाजली नाय राव असं होइल ;-)
3 Sep 2011 - 12:40 am | आशु जोग
खूप चांगली वाटली ही माहीती.
>> मला वाटते सध्या इतके पुरे! यावर एक स्वतंत्र लेखसुद्धा होऊ शकेल
यु एस, जापान, इंग्लंड, जर्मनीची माहीती लोकांना बर्यापैकी असते
पण तुमच्या देशाची नसते.
अजून खूप आठवणी, निरीक्षणे असतील तर मराठीत पुस्तकही लिहायला हरकत नाही.
वाचकांना ते आवडेल (सोने आणि सोनार दोन्हीसाठी)
2 Sep 2011 - 9:17 pm | सुधीर काळे
दोनदा दिसल्यामुळे एका प्रतिसादाला उडविले आहे!
2 Sep 2011 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
दोनदा दिसल्यामुळे एकाला उडविले आहे!........................... खिक्क :bigsmile:
रहस्यकथेतील वाक्य वाट्ट्य ;-)
2 Sep 2011 - 6:05 pm | नितिन थत्ते
>>मुंबईच्या कारखानदारीच्या क्षेत्रातून जाणार्या व नेहमी bumper-to-bumper रहदारी असलेल्या आग्रा रोडच्या
कारखानदारीने आगरा रोडशी केव्हाच फारकत घेतली आहे.
रिकामा रस्ता कधीतरीच दिसला तर त्याचं अप्रूप वाटतं हे खरंच.
2 Sep 2011 - 9:23 pm | सुधीर काळे
नितिन,
तू म्हणतो आहेस ते खरे असावे कारण मुकुंदची कुर्ल्याची फॅक्टरीही कळव्याला हलविलेली आहे. मीही अलीकडे आग्रा रोडवर गेलेलो नाहीं. माझ्या आठवणी १९६०-१९८० च्या दरम्यानच्या आहेत!
पण पुण्याहून मुंबईच्या विमानतळावर जाताना आग्रा रोडच्या २००-४०० मीटरचा पट्टा वापरावा लागतो त्यावरून रहदारी मात्र पूर्वीपेक्षा जास्त असावी असे वाटते.
3 Sep 2011 - 12:56 am | आशु जोग
पहिल्या फोटोतल्या डिव्हायडरच्या दोन्ही बाजुच्या गाड्या एकाच दिशेने कशा
3 Sep 2011 - 10:12 am | मदनबाण
काका खड्डा मुक्त रस्त्याचे फोटो दाखवुन समस्त हिंदुस्थानी जनतेवर "इमोशनल अत्याचार" केल्या बद्धल तुमचा निषेध करतो. ;)
आमचे मंत्री फुकटची घोषणा देत फिरत राहतात की,मुंबईचं सिंगापूर करु,शांघाय करु ! च्यामारी मुंबई निदान मुंबई सारखी ठेवता येते का बघा म्हणांव !
जिकडे बघावं तिथे खड्डॅ,ही महासत्ता होउ घातलेल्या देशाची स्थिती ! सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डांबर्,डांबराच्या रस्त्यात असलेल्या खड्ड्यात सिमेंट्,माती/दगड.
सर्वात डोक्याला ताप म्हणजे पेव्हर ब्लॉकचे रस्ते.हे रस्ते कसे बांधावे याचे ज्ञान नसलेल्याच कंत्राटदाराला कंत्राट दिले जात असावे,कारण न-खचलेला,खिळखिळा न झालेला पेव्हर ब्लॉकचा रस्ता अजुन तरी माझ्या नजरेत आला नाहीये,पण या रस्त्यांमुळे जनतेचे हाल झाले असुन अपघात आणि ट्रॅफिकच्या प्रमाणात मात्र त्यामुळे नक्कीच भर पडली आहे.पेव्हर ब्लॉकमुळे नक्कीच काही जणांचे उखळ पांढरे होत असावे असे वाटते.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-07-28/mumbai/29824562_1...
माहितीचा अधिकाराचा वापर करुन प्रसारमाध्यमांनी या पेव्हरब्लॉकचे सत्य जनते समोर आणले पाहिजे,उत्तम रस्ते ज्या दिवशी या देशातील नागरिकांना मिळतील्,तो दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवुन ठेवावा लागेल.
जाता जाता :--- करोडो रुपये खर्च करुन रस्ते बनवले जातात ? मग आपल्या नशिबात खड्डेच कसे येतात ?
(भंगार रस्त्यांना आणि भ्रष्ट प्रशासनाला वैतागलेला)
3 Sep 2011 - 10:40 am | सुधीर काळे
या दिवसात कित्येकदा एका दिशेला जाणारी वाहने इतकी जास्त होतात कीं पोलीसच बरेच रस्ते एक-दिशा-मार्ग करतात. कधी कधी एकादी लेन उलट्या दिशेने जाणार्या वाहानांसाठी ठेवून बाकीच्या लेन्स मुख्य दिशेने जाणार्या वाहानांसाठी ठेवतात. बर्याचदा "बळी तो कान पिळी"सुद्धा होते. म्हणजे सर्व नियम वार्यावर सोडून वाहाने दोन्ही बाजूने घुसतात. पण साधारणपणे असे व्हायच्या आधीच पोलीस योग्य ती कारवाई करतात.
मुंबईलासुद्धा वीर सावरकर मार्ग सकाळी एका दिशेने तर संध्याकाळी दुसर्या दिशेने एक-दिशा-मार्ग असायचा. आताही असेल पण नक्की माहीत नाहीं.
जाता-जाता आठवण करून देतो कीं इंडोनेशियन भाषेतील Wahana या शब्दाचा अर्थ 'तस्सा'च आहे! आमच्या शेजारच्या कंपनीचे नांव चक्क "वाहाना गारुडा" होते. अलीकडे मालक बदलल्यावर ते बदलण्यात आले.
3 Sep 2011 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही फटू काढायला येणार हे कळाल्याने सगळे पसार झाले होते का काय ? ;)
3 Sep 2011 - 1:39 pm | सुधीर काळे
नाय, नाय! एकदम गाडी चालवता-चालवता 'स्टियरिंग व्हील'वर कॅमेरा धरून चोरून काढलेत दोन्ही फोटो!
3 Sep 2011 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
'स्टियरिंग व्हील' वरती बसून 'स्टिंयरिंग व्हील' केले म्हणा की.
9 Sep 2011 - 9:36 pm | सुधीर काळे
नेहमीची "आग्रा रोड" रहदारी
(आमच्या फॅक्टरीकडे जाणारी वहातूक)
(आमच्या फॅक्टरीकडे जाणारी वहातूक)
(आमच्या फॅक्टरीकडे जाणारी वहातूक)
(आमच्या फॅक्टरीकडे जाणारी वहातूक)
(आमच्या फॅक्टरीकडे जाणारी वहातूक)
(उलट्या दिशेने जाणारी वहातूक)
(उलट्या दिशेने जाणारी वहातूक)
(उलट्या दिशेने जाणारी वहातूक)
9 Sep 2011 - 11:39 pm | गणपा
या एकदा आमच्या गरिबांच्या नायजेरियात मग कळेल की ट्रॅफिक जॅम काय चीज आहे. ;)
३-४ किमी चा जॅम म्हणजे एकदम नॉर्मल असतो इकडे. :)
10 Sep 2011 - 1:01 am | बहुगुणी
12 Sep 2011 - 1:42 pm | सुधीर काळे
असे ऐकले होते कीं पूर्वी बँकॉकमध्ये असाच जॅम असायचा आणि लोक गाडीत सर्व "सोयी" घेऊनच प्रवास करायचे. नायजेरियाचे चित्र पाहून त्याची आठवण झाली.