वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;)
वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
बघा थेरडा मेला 'घोडा'
शिव्या हासडून मारा जोडा
लाज संस्कृती सारी सोडा
उगा वाटतं खूप लिहावं
नकाच काही पुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
काढिल खोडी नव्या दमाच्या
पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या
स्टोरी सांगिल वेताळाची
जरा मोकळ्या ह्या जालावर
खविस नागरी हसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
तीन गटांची थेरी मांडा
जुन्या दुव्यांची घेउन खांदा
हलक्या हाताने काड्या घाला
अता खातरी ही शतकाची
पब्लिक लागं फसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
-केसुरंगा
प्रतिक्रिया
15 Jun 2011 - 8:44 pm | चेतन
प्रासंगिक का काय ते पण चांगल जमलयं ;)
झाडावरतीच्या ऐवजी कुंपणावरती पण चाललं असतं
चेतन
15 Jun 2011 - 9:46 pm | टारझन
ह्या आयडीतुनही तेच चाळे ? :)
- मुसुपंगा
16 Jun 2011 - 1:59 pm | JAGOMOHANPYARE
झाडामागं बसलात तरी चालेल