विजय तेंडुलकरांना आदरांजली.

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
19 May 2008 - 11:12 am

मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते.

त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो.

मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत.

समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.

नाट्यवाङ्मयसाहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

19 May 2008 - 11:22 am | आनंदयात्री

>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत.

या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

नीलकांत's picture

19 May 2008 - 11:37 am | नीलकांत

तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल.
खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms

छोटा डॉन's picture

19 May 2008 - 11:43 am | छोटा डॉन

या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस ..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आर्य's picture

19 May 2008 - 11:48 am | आर्य

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली !

राजे's picture

19 May 2008 - 11:57 am | राजे (not verified)

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव's picture

19 May 2008 - 12:33 pm | प्रमोद देव

विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली.
कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर's picture

19 May 2008 - 1:12 pm | भडकमकर मास्तर

आमचीही श्रद्धांजली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी's picture

19 May 2008 - 1:52 pm | मनस्वी

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक पद्मभूषण विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .

धोंडोपंत's picture

19 May 2008 - 2:22 pm | धोंडोपंत

श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.

आपला,
(खिन्न) धोंडोपंत

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे.

श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील.

आपला,
(स्पष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हेरंब's picture

19 May 2008 - 4:57 pm | हेरंब

धोंडोपंतांशी सहमत. तरीही त्या थोर लेखक्,नाटककाराला आदरांजली!

मन's picture

19 May 2008 - 2:50 pm | मन

आमचीही आदरांजली.

आपलाच,
मनोबा

विसोबा खेचर's picture

19 May 2008 - 5:39 pm | विसोबा खेचर

नाटककार तेंडुलकरसाहेबांना माझाही सलाम...!

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 May 2008 - 5:50 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे.

श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील.

१००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम..
ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

शितल's picture

19 May 2008 - 5:57 pm | शितल

ते॑डुलकरा॑ना माझी ही विनम्र आदरा॑जली.

आनंद's picture

19 May 2008 - 6:05 pm | आनंद

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते.
त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते
लक्शात येते.
नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती.
-आपला आनंद

देवदत्त's picture

19 May 2008 - 7:00 pm | देवदत्त

माझीही आदरांजली...

स्वाती राजेश's picture

19 May 2008 - 7:07 pm | स्वाती राजेश

विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .

खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम.

चतुरंग

आम्ही बारामतीकर's picture

25 May 2008 - 9:48 pm | आम्ही बारामतीकर

अशी मोठी माणसं पुन्हा पुन्हा व्हायला हवीत, एवढंच म्हणणं आता आपल्या हातात .

वाचक's picture

26 May 2008 - 2:55 am | वाचक

तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

केशवराव's picture

26 May 2008 - 6:41 am | केशवराव

या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो."
' तें ' ना विनम्र आदरांजली.