'आहो, मधुमेह झालाय न? सगळी साखर बंद करा!' ' मी सध्या काही गोड किंवा तळलेले पदार्थ खात नाही- वजन कमी करायला हो!' 'उत्कृष्ट आरोग्याची गुरुकिल्ली- कुठलाही स्वरूपात साखर टाळणे'.
हे आणि असे अजून बरेच समज/गैरसमज- साखर, तूप, तेल, वनस्पती, फॅट - विषयी आपण वाचून किंवा ऐकून असतो. आपल्याला जमेल तेवढं आपण आरोग्य जपण्याचा आणि आहारात फेरफरक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीला बळी जातो. उ.दा. शुगर फ्री चॉक्लेट. ह्या चॉक्लेट मधे पांढरी साखर कमी प्रमाणात असते पण त्या ऐवजी रासायनिक स्वीट्नर आणि नेहमीच्या चॉक्लेट पेक्षा जास्त प्रमाणात फॅट असते - कारण जर काहीच बदल केला नाही तर ते चॉक्लेट चविष्ट लागणार नाही. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी तर ह्या शुगर फ्री पदार्थांपासून लांबच राहावे कारण 'शुगर फ्री' म्हंटल की आपोआप एक लहान तुकडा खाण्या ऐवजी, अर्धं किंवा पूर्ण चॉक्लेट खाणं होतं आणि अश्यावेळी त्या चॉक्लेट मधल्या साखरेपेक्षा त्यातील फॅट जास्त हानिकारक ठरतं.
असंच काही बटर/क्रीम च्या वापरात पण होतं. बटर मधून खूप फॅट मिळतं म्हणून ते टाळायला हल्ली लोकं 'नॉन-डेरी लो फॅट' बटर आणतात. आता हे बटर म्हणजे लोण्याचा अंश कमी करून, त्यात तेलाचा वापर करून, त्यावर भरपूर रासायनिक प्रक्रिया करून त्या तेलाचे बटर सारख्या लागणाऱ्या पदार्थात रूपांतर करतात. त्यामुळे त्यातील सॅच्युरेटेड फॅट जरी (नावाला) कमी झाले तरी एकूण फॅट कमी होत नसते. दुसरं म्हणजे - 'जास्त बटर नको' म्हणून कमी किंवा बटर न खाणारे व्यक्ती 'अरे हे लो फॅट बटर आहे' असं म्हणून नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात ते खातात. आणि मग म्हणतात - 'मी तर काहीच हाय कॅलरी खात नाही, तरी माझं वजन कमी होत नाही'. म्हणून आज तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या खाद्य पदार्थात लपून बसलेली साखर, फॅट आणि तत्सम पदार्थ कसे शोधायचे, हे सांगते.
१००% किंवा त्याहून थोडंच कमी फॅट असलेले पदार्थ
लोणी, बटर, तेल, तूप, डालडा, लो फॅट बटर किंवा ब्रेड स्प्रेड, मार्जरीन, मेयोनेझ, रेडी मेड सलाड ड्रेसिंग
खूप जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ
बीफ, पोर्क, बदकाचे मांस, चीझ, म्हशीचे दूध, क्रीम, साय, मलई पनीर, तेल युक्त दाणे, पीनट बटर, चॉक्लेट, नारळाचे दूध/पावडर, टोफू, बकरीचे मांस, हॉट डॉग, सॉसेज, सलामी, बेकन, रेडी मेड कबाब ई.
साखर व त्याची 'टोपणनावे' ( कुठल्याही पदार्थात हे घटक पहिल्या तीन घटकांमध्ये लिहिलेले असतील, तर ते पदार्थ हेल्दी नाहीत असे समजावे)
शुगर, शुगर सोलीड्स, डेक्स्ट्रोझ, सुक्रोज, कॉर्न स्वीट्नर, कॉर्न स्टार्च (२ मिनिट नूडल्स मधे असतो), हाय फ्रक्तोज कॉर्न सिरप (एच. एफ. सी. एस) (हे फ्रूट ज्यूस, सोफ्ट ड्रिंक मधे असते), गोल्डन सिरप (हे बेकरीत वापरतात), लिक्विड ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन ( हे ग्रनोला बार मधे असते), कॉर्न सिरप, मध, मेपल सिरप
नेहमीच्या पदार्थात लपलेले फॅट
- केक, बिस्कीट, कुकीज, मफिन्स, पफ, पेस्ट्री, पॅटीस
- फ्रोजन योघर्ट आणि आईस्क्रीम
- फ्रायीड किंवा बेक्ड स्नॅक्स किंवा चिप्स
- रेडी-टू ईट फ्रोझन पदार्थ.
म्हणून माझा नेहमी आग्रह असतो की घरच्या, पारंपारिक स्वयंपाका सारखा दुसरं आरोग्यपूर्ण पर्याय नाही.
प्रतिक्रिया
11 Jun 2011 - 6:58 pm | रेवती
छान लेख.
सामनातही आलाय का?
लोणी, बटर, तेल, तूप, डालडा, लो फॅट बटर किंवा ब्रेड स्प्रेड, मार्जरीन, मेयोनेझ, रेडी मेड सलाड ड्रेसिंग
काही दिवसांपासून अगदी हेच विचारायचे होते. व्हेजिटेबल ऑइल स्प्रेड वापरू की नको?
भारतात घरी साय विरजून लोणी काढता येते तशी सोय माझ्याइथे नाही. एकतर ब्रेड खाणे कमी असतेच पण कधीतरी खाताना त्याला अमूलचे बटर लावू की नको? माझ्याकडे हे उत्पादन आहे. हे बरे कि अमूल बरे?
24 Jun 2011 - 5:51 pm | खादाड अमिता
हे वापरा पण त्यात पण बरेच फॅट असते ह्याचि जाणीव असु द्या.
11 Jun 2011 - 7:25 pm | चिरोटा
माहितीपूर्ण लेख्. फॅट शरीरात गेल्यावर ते पचवायचे असेल तर व्यायाम करणे/जास्त चालणे ह्यांनी काही उपयोग होतो का?
घरी बनवलेले लाडू वा ईतर गोड पदार्थ ह्यात किती प्रमाणात फॅट असते? (म्हणजे समजा रोज २ बेसनलाडू खाल्ले तर त्याचे काही दुष्परिणाम संभवतात का?!!)
चिरोटा!!
11 Jun 2011 - 7:29 pm | प्राजु
म्हणजे ते बटर सदृश काही खाण्यापेक्षा अगदी थोड्या प्रमाणात बटर खाल्लेलं चांगलं का? आणि स्प्लेंडा, इक्वल हे खूप खाण्याऐवजी एखादा चमाचा साखर चांगली का? म्हणजे नो शुगर वालं पूर्ण चॉकलेट पेक्षा छोटासा टुकडा नेहमीचं चॉकलेट चांगलं का? असे सगळे पडलेले प्रश्न आहेत..
छान लेख.
तुला एकदा भेटून खरच डायट प्लॅन बनवून घ्यायचा आहे.
11 Jun 2011 - 9:12 pm | रेवती
अगदी हेच विचारायचं होतं. असं ऐकलय की स्वीटनर वापरण्यापेक्षा साखर बरी तसंच कृत्रीम बटर वापरण्यापेक्षा (घरचे लोणी मिळत नसताना) अमूलचे बटर बरे?
11 Jun 2011 - 9:13 pm | रेवती
अगदी हेच विचारायचं होतं. असं ऐकलय की स्वीटनर वापरण्यापेक्षा साखर बरी तसंच कृत्रीम बटर वापरण्यापेक्षा (घरचे लोणी मिळत नसताना) अमूलचे बटर बरे?
24 Jun 2011 - 5:53 pm | खादाड अमिता
म्हणजे ते बटर सदृश काही खाण्यापेक्षा अगदी थोड्या प्रमाणात बटर खाल्लेलं चांगलं का? हो
आणि स्प्लेंडा, इक्वल हे खूप खाण्याऐवजी एखादा चमाचा साखर चांगली का? हो
म्हणजे नो शुगर वालं पूर्ण चॉकलेट पेक्षा छोटासा टुकडा नेहमीचं चॉकलेट चांगलं का? हो
:)
11 Jun 2011 - 7:42 pm | वेताळ
एकाद्या लेखात तु जरा परिपुर्ण आहार कसा व कोणता? व आहारा संबंधी इतर माहिती देखिल द्यायचा प्रयत्न कर. कारण लो कॅलरी किंवा फॅटफ्री आहार घ्यायचा म्हणुन कित्येक वेळा जेवन नीट होत नाही.तसेच वजन आटोक्यात ठेवण्याकरिता केले जाणारे डायट देखिल खुप चुकीचे होते.त्याबद्दल देखिल जरा माहिती द्या.
24 Jun 2011 - 5:56 pm | खादाड अमिता
हे घ्या
11 Jun 2011 - 7:55 pm | JAGOMOHANPYARE
म्हातारपणी डोळे पांढरे होऊ नयेत म्हणून खालील पांढर्या वस्तू टाळाव्यात...
१. मैदा
२. मीठ
३. साखर
४. अम्डे
५. दूध
६. लोणी
:)
14 Jun 2011 - 10:45 pm | शैलेन्द्र
"४. अम्डे
५. दूध
६. लोणी"
चुक....
तुमची लाइफस्टाइल कशी आहे यावर हे पदार्थ किती व कसे खायचे हे ठरत.. उकडलेल्या अंड्यातील पांढरा भाग म्हणजे फक्त प्रोटीन असतात. रोज तीन तरी खावेतच(पिवळा बलक काढुन..) एक-दोन चमचा लोणी(किंवा न तापवलेल कोणतही फॅट) रोज पोटात जायलाच हव, जीवनसत्व विरघळवण्यासाठी ते आवश्यक असते.
अगदी मीठसुध्धा किनारपट्टीच्या भागात, जिथे भरपुर घाम येतो तेथे पुरेसे खाल्ल्च पाहिजे..
11 Jun 2011 - 8:50 pm | स्वाती२
चांगला लेख !
14 Jun 2011 - 8:30 pm | आनंदयात्री
आयला .. खायला कायंच उरलं नाय !!
:(
24 Jun 2011 - 6:00 pm | गणपा
आंद्याशी सहमत :(
24 Jun 2011 - 6:35 pm | शैलेन्द्र
उलट हा लेख वाचुन लोकांनी हे पदार्थ खाणे बंद करावे, जेणे करुन त्यांचे भाव उतरतील व लेखीकेला त्यांचा मनोसोक्त समाचार घेता येइल, हाच या लेखणाचा अंतस्थ हेतु दिसतोय.. ;)
14 Jun 2011 - 10:24 pm | स्मिता.
संदर्भः स्वरालि यांचा बटर-तूपावाला धागा
अमेरिकेत किंवा राणीच्या देशात राहणार्यांना इंडियन स्टोअरमध्ये मिळणारे 'देसी घी' हा सोपा विकल्प असूनही बरेच जण बटर आणून त्याचे घरी तूप बनवतात असे त्या धाग्यावरील प्रतिक्रियांवरून दिसतेय.
त्याचे कारण काय? बटर शिजवून बनवलेले तूप 'देसी घी' पेक्षा चांगले असते का? त्यातल्या सॅच्युरेटेड/नॉन सॅच्युरेटेड फॅट्स च्या प्रमाणात काही फरक आहे का?
14 Jun 2011 - 10:34 pm | शैलेन्द्र
न तापवलेले फॅट खाणे कधीही चांगल... म्हणुनच तुपाएवजी लोणी खायची सवय करावी.
25 Jun 2011 - 8:00 am | स्वानन्द
असं म्हणण्यामागे काही विशेष कारण?
माझ्या माहितीप्रमाणे तर योग्य प्रमाणात खाल्ले तर तूप आरोग्याला चांगले असते. आयुर्वेदात सुद्धा तुपाचे फायदे सांगितले आहेत. ( न तापवणे या मागचा फंडा नाही समजला )
25 Jun 2011 - 9:33 am | शिल्पा ब
जे काही खाल ते प्रमाणात खा. भाजी पोळी- वरण भात यासारखा आहार नाही. काही शारीरीक तक्रारी असतील तर डॉक्टरचा सल्ला घेउन सोडा , धरा वगैरे. हे माझं मत.