(बापाचे) मुलास पत्र.

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
19 May 2011 - 6:56 am

बाळ्या,
"बघता बघता तू किती मोठा झालास. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं आज नोकरीनिमित्ताने दुसरीकडे भुर्र उडून गेलं आहे.", असं बोलत डोळे टिपून तुझी आई मला बोर करत असते. पण होईल नीट हळूहळू. तुझा प्रवास चांगला झाला असेलच. जायच्या आधी तुझ्या आईच्या बडबडीमुळे काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या लिहितोय.

मानापमान - नोकरीत बॉसच्या मानापमानाच्या भावना फार तीव्र असतात, पण बॉसने दिलेल्या शिव्यांनी आपला अपमान होत नसतो हे लक्षात ठेव.
संस्कार -एखाद्या दिवशी पार्टीत जास्त प्यालास तरी जेवण करायला चुकू नकोस.
फेरविचार - कुठल्याही मैत्रिणीबरोबर खरेदी करायला जायच्या आधी हजारदा फेरविचार कर आणि तरीही गेलास तर पाकीट घरी ठेवून जा.
स्तुती - जो पर्यंत हातात काही पडत नाही तोपर्यंत कोणी कितीही कौतुक केले तरी काहीही उपयोग नाही हे तुला माहितीच आहे.
कष्ट - ऑफिसमधल्या कामाव्यतिरिक्त चार-सहा महिन्यांतून तुझ्या राहत्या जागेत एखादा झाडू मारत जा. कपडे धुवायला बाई लावलीस तर कपडे धुवायला टाकायचे कष्ट घे.
वाचा -शिवीला उत्तर शक्यतो शिवीनेच दे. उगाच हाणामार्‍या करू नको. तुझ्या आईला महिन्या-दोनमहिन्यांनी तरी फोन करत जा.

बाबा.

ता.क.: तुझी आई मागं लागली म्हणून पत्र लिहीले. चिडू नको. फाडून टाक.

समाजजीवनमानराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2011 - 6:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्र्याक्टीकल ... पत्र आवडलं.

सूड's picture

19 May 2011 - 7:02 am | सूड

बाकी तो स्तुतीवाला प्वॉईंट आवडला आणि पटलादेखील. :D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 May 2011 - 7:02 am | मिसळलेला काव्यप्रेमी

काका, काकु, आजोबा, आज्जी, मामा, मामी इ.इ. सगळ्यांची पत्रे येऊद्यात ;)

ता.क.: तुझी आई मागं लागली म्हणून पत्र लिहीले. चिडू नको. फाडून टाक.

ठिक, फाडा म्हणाताय तर फाडतो ;)

कवितानागेश's picture

19 May 2011 - 7:10 am | कवितानागेश

ता.क. आवडले.

किसन शिंदे's picture

19 May 2011 - 7:22 am | किसन शिंदे

शीर्षक वाचून वाटलं टारझनने एखादं विनोदी विडंबन लिहलं आहे. :)

ता.क. आवडलं

मृत्युन्जय's picture

19 May 2011 - 8:16 am | मृत्युन्जय

नीलकांता वाचतो आहेस ना रे? आता एक वेगळा पत्र विभाग टाक.

बाकी मैत्रिणीबरोबर बाहेर जाताना पाकीट न घेउन जाण्याची कल्पना काही पटली नाही . पाकिटात बर्‍याच महत्वाच्या वस्तु असु शकतात (अर्थात हे पुज्यांना माहिती असण्याची शक्यता नाही. कार्टी बापाच्या पाकिटात पैसे चोरण्यासाठी हात घालतात तसे बाप घालत नाहीत). वाटल्यास असे लिहा की पाकीट घेउन गेल्यास पैसे आणि क्रेडिट कार्ड घरीच ठेव.

बाकी काही गोष्टी देखील राहिल्या. जास्त पोरी फिरवु नकोस (जास्त पोरींकडुन फिरवुन घेउ नकोस). रोज २०च बिड्या पी. चरस, गांजा प्रमाणात असु देत. अधुनमधुन रात्री लवकर झोपत जा. शक्यतो सभ्य माणसासारखे वाग नपेक्षा कधीमधी तसा आव आणत जा.

चिंतामणी's picture

21 May 2011 - 12:15 am | चिंतामणी

नीलकांता वाचतो आहेस ना रे? आता एक वेगळा पत्र विभाग टाक.

अगदी बरोबर. आता वेगळा पत्र विभाग पाहीजेच.

शुचिच्या एका पत्राने किती जण प्रेरीत झाले आहेत हे बघून अमंळ हळवा झालो. :(

:)

पंगा's picture

21 May 2011 - 12:20 am | पंगा

शुचिच्या एका पत्राने किती जण प्रेरीत झाले आहेत हे बघून अमंळ हळवा झालो.

हो ना! प्रकरण आधी फक्त 'धारदार' होते, आता 'धारावाहिक' होऊ घातलेय...

विनायक प्रभू's picture

19 May 2011 - 8:33 am | विनायक प्रभू

संस्कार मधे महत्वाची सुचना राहीलीच की.
असो.
फेरविचाराचा फेरविचार व्हावा. पाकीटाशिवाय बाहेर जाणे धोक्कादायकच(पहा चित्रपट पा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2011 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन's picture

19 May 2011 - 10:52 am | नगरीनिरंजन

=)) =))
हे प्रभो!
त्यासाठी पाकीट कशाला? मैत्रिणीच्या पर्समध्ये बक्कळ जागा असते. नसलीच तर आजकाल अगदी सगळ्या कपड्यांना खिसे असतात. पण मुख्य प्रश्न असा आहे की तो खर्चतरी पोराने का करावा? शेवटी त्रास कोणाला होतो? पाहा पा. :)

धमाल मुलगा's picture

19 May 2011 - 10:54 am | धमाल मुलगा

ह ल क ट!

बर्‍याच दिवसांनी निर्‍या सुस्साट सुटलाय. :D

गोगोल's picture

19 May 2011 - 12:58 pm | गोगोल

साष्टांग नमस्कार .. दोघही महान आहात :):)

विनायक प्रभू's picture

20 May 2011 - 3:10 am | विनायक प्रभू

ह्या खर्चाला सुद्धा कंजुषी?
हे राम.
युजर शुड बाय इट.
नाही का?

शैलेन्द्र's picture

20 May 2011 - 11:47 am | शैलेन्द्र

नो, धीस शुद गो तु बेनिफिशिअरीस अकांउन्त...

शाहरुख's picture

19 May 2011 - 11:49 am | शाहरुख

=)) =)) =)) =))

'पा' मध्ये असा काही विनोद आहे काय? मला म्हणणे समजले नाही.
सगळेजण पोट धरून हसतायत म्हणून उत्सुकता आहे.
माझ्या माहितीप्रमाणे 'पा' म्हणजे शेवटापर्यंत रडारडी आहे.
शिवाय तो फेरविचारावर फेरविचारही समजला नाही.

प्रियाली's picture

19 May 2011 - 1:55 pm | प्रियाली

!!! ;)

स्मिता.'s picture

19 May 2011 - 2:08 pm | स्मिता.

अहो, रेवतीताई........ आता काय, जाऊ द्यात ;)

माझीही शॅम्पेन's picture

19 May 2011 - 2:57 pm | माझीही शॅम्पेन

मलाही कळेना इतके हास्याचे फुगे का फुटत आहेत

"पा" न पहिलेली पापी शॅम्पेन !

'पा' शिनेमा मलाही आठवत नाहिये त्यामुळे विनोद कळणे शक्य नाही. तेवढ्यासाठी 'मिल्कशेक बच्चनचा' सिनेमा पाहण्याचे धाडस माझ्यात नाही त्यामुळे ठिक आहे.
फेरविचारावर फेरविचार मात्र समजला..........उशिराच समजला.
समजावून सांगण्याजोगा विनोद नाही तो!;)

आनंदयात्री's picture

19 May 2011 - 4:34 pm | आनंदयात्री

कोटाकोटी बंद करा होत काकु लोक्स .. उगाच अर्थाचा अनर्थ होउन राहिलाय !!

धमाल मुलगा's picture

20 May 2011 - 10:36 am | धमाल मुलगा

अनर्थ नाय, अर्थच लावण्याचे प्रयत्न चाललेत. कळंना काय तुला?

तुमचं चालू द्या हो. :D
त्या परभू मास्तराला नाय काय काम, दिला एक किडा सोडून...अता बसलेत सगळे खुळावून. :D

हो, कोटाकोटी बंद करते पण काकू कोणाला म्हणतोस रे?:)
मिपावरच्या सगळ्याजणी फक्त १६ वर्षाच्या आहेत ..........कायम!;)

आनंदयात्री's picture

20 May 2011 - 2:25 pm | आनंदयात्री

सोळ्ळा !!!! मग सगळे 'जणं' आजपासून २ वर्षे वय सांगायला लागतील.

प्रियाली's picture

19 May 2011 - 10:20 am | प्रियाली

फेरविचार - कुठल्याही मैत्रिणीबरोबर खरेदी करायला जायच्या आधी हजारदा फेरविचार कर आणि तरीही गेलास तर पाकीट घरी ठेवून जा.

फेरविचार असा असावा - कुठल्याही मैत्रिणीबरोबर खरेदी करायला गेलास तर खरेदी केलेली गोष्ट परत करता येईल का (रिटर्न पॉलिसी) याचा विचार कर. वस्तूबरोबरच मैत्रिणही परत करता येईल का ही शक्यताही ध्यानात घेच.

आज पत्रदिन आहे की काय?
अजून मोठं पत्र चाललं असतं.

निल्या१'s picture

19 May 2011 - 5:52 pm | निल्या१

झकास आहे पत्र !

नारयन लेले's picture

20 May 2011 - 4:45 am | नारयन लेले

एखाद्या दिवशी पार्टीत जास्त प्यालास तरी जेवण करायला चुक नकोस !

एखाद्या दिवशी च का?
रोज प्यावयाचा संस्कार -केलानाहितकी काय. शिवाय जास्त प्याल्यावर जेवावयाचा आग्रह करण्याचा हेतु कळवला आसता तर
बाळास उपयुक्त झाले आसते ना!

बकी पत्र झकास.

विनित

डावखुरा's picture

21 May 2011 - 2:21 am | डावखुरा

चांगलीय संकल्पना....

नाना बेरके's picture

21 May 2011 - 4:43 am | नाना बेरके

पत्रातले बाप-लेक आमच्या पुण्यातले दिसत नाहीत. जास्त पिऊन...,वगैरे, उगाच हाणामार्‍या न करणे इ. उपयुक्त सूचना वाचल्यावर वाटले.

हल्ली पुण्यातली मुलं पिण्यात तरबेज झाली आहेत. आणि नुसते पाकीटच नाही तर बेल्टपण घेऊन जातात बरोबर.

खूपच आटोपत घेतलात पत्र.मी आमच्या ह्यांना लिहितेना तेव्हा १० पान पुरत नाहीत.आणि निघायच्या आदल्या दिवशी दिवसभर माझ्या सुचानांचाच आवाज घरभर घुमत असतो.
- कपडे धुवायचा टाकायचे कष्ट घे .
हे अगदी पटल बरका! ;)