मित्रहो,
वसंत बहरला पानोपानी ।
लाली धरली गुलमोहरांनी ।।
कंठ आला कोकिळेला ।
रुंजलेकवि शब्द गंधाला ।।
कविराजांनो अणि राणींनो,
आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्....
आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer
आपण फक्त इतकेच करायचे आहे -
जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा -
जेणे करून आपला परिचय त्यात व्हावा.
जसे आपले, आपल्या आई- वडिलांचे, पती किंवा पत्नीचे (विवाहित असल्यास ) नाव, जन्मदिनांक, वार, महिना, साल, भावा-बहिणींची मुलाबाळांची संख्या - (नावे नकोत), आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदीचा उल्लेख काव्यमयरित्या केला गेला असावा.
वर्णन स्वतःचे असावे. म्हणजे त्यातील कथन कट्टयावरील मित्रपरिवारात व्यक्ती परिचयात कामाला येईल.
काव्यकुसुम कट्टा सर्वांच्या सोईने पुण्यात करायची कल्पना आहे. कविवर्यांच्या खिशाची कल्पना असल्याने आपल्या खिशाला फार ताण पडणार नाही. त्याची चिंता नको.
विदेशातील मित्र परिवारांनी देखील यात सामील व्हावे. त्यांनी स्काईप किंवा अन्य नेटच्या साधनांनी कट्ट्यावरील मजा - गप्पाटप्पांत सहभागी व्हावे अशी विनंती.
विशेष सूचना - "नाडी" हा विषय आऊट ऑफ बाऊंड ठेवला जाईल.
शशिकांत ओक.
प्रतिक्रिया
17 May 2011 - 8:43 pm | शशिकांत ओक
चला,
मी सुरवात करतो -
शशिनामधारी असे कांत अलकाचा ।
मंगलाचरणी नमी तो पुत्र जनार्दनाचा ।।
जीवनी असे जो रत सततोद्योगी ।
आधी नाट्यसेवा नंतरी कूटकोडी।।
होता वार रवी उदेला एकतीस वेळा ।
सप्त मासी वरुषे ४० वर नऊ मिसळा।।
पावाल त्यात मजला उत्पन्न जेष्ठपुत्राला ।।
नसे बंधु विवाहिता दोन बहिणी व पुत्र-पुत्री ।
पदवी वाणिज्य धरली कास देशरक्षणाची।
चढलो पायरी विंग कमांडर पदाची ।।
गतीशीघ्र वाहने घेती घोट अरिचा ।
त्रिशूल वायुसंगे मम धर्म गणिताचा।।
हे दयानिधे, अल्पमतिस काव्यस्फुरण दे ।
जमतील जे काव्यकुजनी तयांना आत्मसंतोष दे।।
18 May 2011 - 1:20 am | नरेशकुमार
छान सुरुवात.
18 May 2011 - 5:15 am | गणेशा
चांगला प्रयत्न ...
---------
स्वतावरच काव्य करणे चांगले असले तरी ,
आपल्या आई- वडिलांचे, पती किंवा पत्नीचे (विवाहित असल्यास ) नाव, जन्मदिनांक, वार, महिना, साल, भावा-बहिणींची मुलाबाळांची संख्या - (नावे नकोत), आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदीचा उल्लेख कवितेत बंधनकारक तो ही फक्त भेटल्यावर व्यक्ती परिचयासाठी हे कळले नाही..
स्वताच्या सवयीचा. स्वभावाचा उल्लेख ठिक पण.... असो ...
18 May 2011 - 2:31 pm | शशिकांत ओक
करा मुक्त कल्पनेला ।
बरसतील मेघ शब्दमाला ।।
छंदसाधा स्वभावावर नको निराशा।
संकोच सोडा करा श्री गणेशा ।।
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर .. स्वछंदी जीवन
18 May 2011 - 6:14 am | रमताराम
इथे फक्त नाव द्यावे. बाकीची माहिती नाडीपट्टिवरून ओकसाहेब काढतीलच नि तेच एक कविता लिहून देतील. कसं म्हणता?
18 May 2011 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा
ओक साहेबांची नाडी तुम्ही मस्त पकडली....लगे रहो....हुय्या
18 May 2011 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा
मी परिचय देतो माझा
घ्या काढला घाणा ताजा
लई तिखट लागलं तरं प्या
तो रंग केशरी "माझा" ॥ध्रु॥
आईचे नावं कायं?
बाबांचे नावं कायं?
आईचे नावं कला ही,
बाबांचे तेचं होय.
अर्धांगिनी चाही पत्ता
ना अजुन आंम्हा कळतो
ती सीटं मागची भरता
सायलेन्सर कुजका जळतो.
कवि सारे बंधु अमुचे
अन भगिनी असती...काही
कोणाचे नावं लिहू मी
कळले तरं ओढतील बाही
शिक्षणात कधिही आंम्हा
सापडला नाही रामं
उपयोगही तितुका त्याचा
ते मस्तकं दुखि चे बामं
काय सांगु माझे नावं?
काय सांगु माझे गावं?
अहो,अंबापेटी जैशी
मिळतोच तसाही भावं
अता राहिला माझा धंदा
कमवितो रुपाया बंदा
कधी कमविणार मी एक
कधी गमविणार मी एक
पराग दिवेकर........
19 May 2011 - 1:45 am | मुलूखावेगळी
मस्त कविता केलीत.
19 May 2011 - 6:16 am | शशिकांत ओक
संकोच सोडा करा श्री गणेशा ।।
19 May 2011 - 1:56 am | प्रकाश घाटपांडे
गुरुजी येउं द्यात अजुन कविता तुमच्या सुर्यकांत खोकले च्या! हायेत हित लोक दाद देनारे!
बाकी चालू द्यात
19 May 2011 - 1:53 am | प्रकाश घाटपांडे
मला अगोदर वाटले कि वसंत व्याखानमालेत नाडी विषयावर पुष्प गुंफायला निमंत्रण मिळाले कि काय?
भाकित : येईल एक दिवस तो ही येईल
19 May 2011 - 6:20 am | शशिकांत ओक
संकोच सोडा करा श्री गणेशा ।।
19 May 2011 - 11:56 am | विदेश
निमंत्रणाबद्दल आनंद वाटला.
आभार.
शुभेच्छा.
19 May 2011 - 7:01 pm | धनंजय
धन न माझे जयहि नामीं फ़कत आहे मिसळपावीं ।
बघच हा द्वादशक बिल्ला मिरवि मी या सुरस गावीं ॥ १ ॥
सन सहस्रे द्वि अन सातीं इकडच्याला प्रथम आलो ।
महिन साती दिन दहा-पाच नि दुपारी कवन केलो ॥ २ ॥
जनक तात्या, प्रसवि नीळ्या, भगिनि बंधू मिसळप्रेमी ।
शिकवताती गमभनांना शिकुनि मीही टकक टंकी ॥ ३ ॥
बरिच खाज्गी दिलि मि म्हाय्ती कुणि न द्यावी कधि अशी ही ।
परवलीचे शबद आणी पिन-क्रमांका कधि कुणा ही ॥ ४ ॥
20 May 2011 - 3:16 am | शशिकांत ओक
कुणि न द्यावी कधि अशी
ही दिलि मि म्हाय्ती
परिचयाचे निमित्त केवळ घडण्या गाठी भेटी ।
काव्यप्रसव वेदनातुनी मिळती भावना - आपुलकी ।।
20 May 2011 - 5:08 am | मृगनयनी
शशिकान्त'जी खूपच छान उपक्रम!!!
आपली काव्यप्रतिमा खरंच अगाध आहे!!
मी असे काव्य लवकरच बनवून इथे टंकेन!!!!
:)
20 May 2011 - 5:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वसंत काव्य कट्ट्यास मन:पूर्वक शुभेच्छा......!!!
>>>>>"नाडी" हा विषय आऊट ऑफ बाऊंड ठेवला जाईल.
हाहा :) धन्यवाद.......!
-दिलीप बिरुटे
22 May 2011 - 9:10 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
मी पुढाकार घेऊन पुण्यात काव्यमालेच्या निमित्ताने मित्रकट्याचे आयोजन करू इच्छितो. २९ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ वेळ असावी. स्थळ सर्वांना पोहोचायला सोईचे असावे.
विषय- कोणताही मनोरंजक. चहापाणी व स्नॅक्स आणि गप्पाटप्पा.
ज्या मित्र-मैत्रिणींना यात सामिल व्हायचे असेल त्यांनी (काव्य परिचय न केलेलेल्यांनी देखील) मला संपर्क करावा. (मो. ९८८१९१०१४९ ) त्याप्रमाणे जागा ठरवता येईल. २९ मे ऐवजी दुसरी तारीख सर्वांच्या सोईची होत असेल तर त्यावरही विचार करता येईल.
त्या नंतर ज्या कोणाला जेवायसाठी एकत्र यायचे असेल तर तशाही सोय करता येईल आपापल्या खर्चाने.
24 May 2011 - 8:04 am | नरेशकुमार
पन नक्की कुठे ? पुन्याजवळ कि मुंबईजवळ ?
लवकरात लवकर स्थळ ठरवा मग विचार करता येईल.
कट्ट्यास मनापासुन शुभेच्छा !
23 May 2011 - 10:48 pm | गणेशा
२९ तारखेला थोडे जमणे कठिन वाटत असले तरी प्रयत्न नक्कीच करेन येण्याचा.
मुंबईत असतो यावेळेस घरी आलो नाही.. आणि २९ नंतरच्या दोन्ही शनिवार्-रविवार ट्रेक आहेत.. त्यामुळे काही वेळ घरी द्यावा लागणार आहे..
१२-१३ जुन ला फ्री आहे. बाकीच्यांप्रमाणे बघा., नाहितर या नंतरच्या वेळेस नक्की
28 May 2011 - 12:42 am | शशिकांत ओक
यावर वसंत काव्य कट्ट्य़ावर प्रकाश टाकावा असे मनात आहे.
नुकतीच सारसबागेची पहाणी करून ती जागा नक्की केली आहे. त्यासाठी त्याबागेत यायला तेथील चौपाटीकडील दरवाज्याने आत यावे आणि उताराच्यावाटेवरून आले की डाव्याहाताला असलेल्या झाडांखाली कट्टात सामील व्हावे.
चहा व अन्य डीशची सोय ही झाली आहे. तेंव्हा बिगीबिगी यावे. कारणे असतील तर बाजूला ठेवून रविवारी सायंकाळी ५पर्यंत हजेरी लावावी. ही विनंती.
आपण येत असल्याची वर्दी आधी मला ९८८१९०१०४९ वर दिलीत तर आनंद वाटेल.
आपला नम्र,
28 May 2011 - 6:00 am | गोगोल
देण्यात येणार आहे का?