मिल्या चे 'जीवघेणे' बोल वाचून आमच्या काही दुखर्या आठवणी जाग्या झाल्या. ;)
चालणे की ते मटकणे! जीवघेणे
वेधती का नेत्र, सजणे! जीवघेणे
रंग ओठांवर कशाचा येत आहे?
बायको घाली उखाणे जीवघेणे
एक 'ती' फिरवायची बाहेर आणी
त्यात प्रेमाचे बहाणे जीवघेणे
'अंगवसने' तारणारे कोण आता?
रात होता वाटे दिवाणे जीवघेणे
काल केले म्यान सगळे कुशलतेने
आज श्वशुरांचे 'घराणे' जीवघेणे
मेव्हण्याची दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे 'बाहेर जाणे' जीवघेणे
पाकिटाच्या अंतरंगी पण मिळाले
दाखले सारे पुराणे जीवघेणे
शब्द सारे संपल्यावर मत्सरांचे
तिंबणे अन् मारणे जीवघेणे
नाद सारे सोड रे 'रंग्या' अता तू
बायकोचे ऐक म्हणणे जीवघेणे
चतुरंग
प्रतिक्रिया
15 May 2008 - 10:14 pm | वरदा
मस्त आहे....
काल केले म्यान सगळे कुशलतेने
आज श्वशुरांचे 'घराणे' जीवघेणे
मेव्हण्याची दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे 'बाहेर जाणे' जीवघेणे
पाकिटाच्या अंतरंगी पण मिळाले
दाखले सारे पुराणे जीवघेणे
ही ३ कडवी जास्त आवडली...
मूळ कविता न वाचताच ही वाचली....आवडली :)