नवे धडे २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
2 May 2011 - 8:24 pm

शासनाने शिक्षणाला स्कीलबेस्ड करायचा विचार चालू केला आहे.
त्या नुसार अभ्यासक्रम येतील धडे येतील
नव्या धोरणानुसार इयत्ता पहीलीच्या भाषा शिक्षणाच्या पुस्तकातील काही धडे.
धडा दुसरा : उद्देश इकार /ईकार शिकणे
मुलानो मागील पाठात http://www.misalpav.com/node/17291 आपण आकार आणि अकार यांची ओळख करून घेतली
शिक्षकानी तुमची प्रात्यक्षीकांसह उजळणी करुन घेतलीच असेल
आता पाहू या काही नवी उदाहरणे.
तर मागच्या पाठात आपण काय शिकलो हे डाम्बीस काका तुम्ही सांगा
डाम्बीस : गुरुजी आमच्या मास्तरानी यकडाव आमच्या कडून परत्याक्शीक करून घ्येत्ले आन सारकं सारकं त्येच त्येच करायला सांगतात. प पोपटाचा असे म्हणाच्या ऐवजी प पापडाचा आन पा पापलेटचा आसे म्हन्त्यात. च चमच्यातला म्हनायच्या ऐवजी च चखन्यातला आसं म्हन्त्यात.
ग गाईचा ऐवजी ग गल्लासातला म्हन्त्यात.
मग म्या बी हा हा हातभट्टीचा म्हनत त्याना न न नवटाकतला पाजला त्यामुळे त्यांची अवस्था त त तलवारीतला ऐवजी त त तर्राटातला अशी जाली. त्यानी मला उ उ उलटीतला शिकवयच्या आदुगर म्या क क कल्टीतला मारली.आन आ आ आकड्यातला लावयला गेलो.
वा वा छान छान.... आज आपण इ कार शिकुया
गुर्जी इकार की इजार नक्की काय म्हनायचं
धमाल्या तू जी खिशाखिशाची चड्डी घालतोस ना त्याला इजार म्हणायचे .
पन गुर्जी मी तर त्याला प्यान्ट म्हन्तो. इ इ प्यान्टीतला कसा म्हनायचा?
धमाल्या ते मी तुला थोड्या वेळात सांगतो. तोवर प्यान्टीत काहीच म्हणू नको.
तर मुलानो आज आपण इकार अणि ईकार शिकणार आहोत.
मुलानो एखाद्या पोरीला आपण पसन्द अस्लो आणि तिला फ्रेन्डशीप देनार का आसे विचारल्यावर ती आनन्दाने जे काही म्हणते तो र्‍हस्व इ . आणि एखाद्या पोरीला आपण आपडत नसू आन तीला जर लाईन देतेस का आसे विचारल्यावर ती जे काही बोलते तो दीर्घ ई. त्यानन्तर जे आवाज येत्यात ते या पाठात आपण विचारात घ्येनार न्हाई.

वाचा बर खालील वाक्ये

विलास बीडी वळ
बाबी बीडी आण.
विडीत विडी विल्स ची विडी
विलस ची बीडी वडायला चिकणी
विडी चिमटीत पकड

चिमटीत धरली विडी , शिलगावली काडी.
विलासने दिली बनीला साडी

विडी पेटली बनी पटली
गोठ पाटली अंगावर घातली

बनी आणी पाणी
विलास ताडी हाणी

गडी ताडीत , बसला गाडीत
गाठली माडी , अडकला नाडीत

विडी , ताडी ,आणि माडी
संसाराची निजवी गाडी

शिक्षकांसाठी सूचना : शिक्षण हे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचावे तसेच शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्याला रोजच्या आयूष्यात व्हावा यासाठी स्कीलबेस्ड शिक्षण या धोरणांतर्गत शक्य तेथे शिक्षकानी प्रात्यक्षीकांवर भर द्यावा.
कार्यानुभव : या पाठावर आधारीत नाट्यछटा करा

डीस्क्लेमरः हे लिखाण एक स्वैर कल्पना आहे. यातील नावांचेआणि कल्पनांचे कोण्या जिवंत वा मृत वा पुढे येणार्‍याआयडीशी साधर्म्य आढळू शकते. लेखकाचे त्यावर नियन्त्रण नसते. लेखकाला जबाबदार धरू नये.

वावरसंस्कृतीशिफारस

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

3 May 2011 - 12:35 am | पाषाणभेद

एकदम जबरदस्त धडे आहेत गुरूजी तुमचे.
अवांतर: माझ्या असल्याच काही कवीता (येथे नसलेल्या) तुमच्या या पाठ्यपुस्तकात लावता का? काय सेटींग असेल ती करून टाकू. :-)

च्च! आयुष्य वाया गेल आमच 'अ अ अननस 'म्हणुन. विजुभाऊंची शाळा घ्यायला पाहिजे होती.

किसन शिंदे's picture

3 May 2011 - 9:37 am | किसन शिंदे

मुलानो एखाद्या पोरीला आपण पसन्द अस्लो आणि तिला फ्रेन्डशीप देनार का आसे विचारल्यावर ती आनन्दाने जे काही म्हणते तो र्‍हस्व इ . आणि एखाद्या पोरीला आपण आपडत नसू आन तीला जर लाईन देतेस का आसे विचारल्यावर ती जे काही बोलते तो दीर्घ ई. त्यानन्तर जे आवाज येत्यात ते या पाठात आपण विचारात घ्येनार न्हाई. :D

मस्तच आहे ओ तुमची शाळा विजुभाऊ.:)