आला पहा कवी तो -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
30 Apr 2011 - 2:07 pm

आला पहा कवी तो - आला पहा कवी तो -
उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो !
इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो
सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो !
का वाटते कवीचे भय फार सज्जनाला
वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो !
जखमी कधी कुणाला ना वार करि कुणावर
अध्यात ना कुणाच्या मध्यात तोच नसतो !
आली जरी त्सुनामी ; लाटांवरी तियेच्या
हळुवार तो मनाने कविता करीत असतो !
ती एक ठेच साधी जखमी तुम्हांस करते
डोळ्यात अश्रु कविच्या - कवितेतुनी टपकतो !!

शांतरसकवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

30 Apr 2011 - 6:40 pm | चिरोटा

सही कविता."टपकतो" ऐवजी पर्यायी शब्द?

राजेश घासकडवी's picture

1 May 2011 - 3:42 am | राजेश घासकडवी

गमतीदार.

का वाटते कवीचे भय फार सज्जनाला
वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो !

कवीविषयी सहानुभूती चांगली मांडली आहे. कवी लोक तसे बऱ्यापैकी निरुपद्रवी असतात...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 May 2011 - 11:30 am | मिसळलेला काव्यप्रेमी

हम्म!!

गणेशा's picture

2 May 2011 - 4:48 pm | गणेशा

छान

नरेशकुमार's picture

3 May 2011 - 11:02 am | नरेशकुमार

ल्हान मुलांचि कविता वाटलि. छान छान आहे.

एके दिवशी काय जाहाले ...
एके दिवशी काय जाहाले ...
विदेश म्हणतो देशी ला .. विदेश म्हणतो देशीला ..
अग किती चढशील ?
देशी म्हणे विदेश ला .. करशील का आता कविता करशील ?

लिखाळ's picture

3 May 2011 - 8:19 pm | लिखाळ

अरे वा ! कविता आवडली