नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
28 Apr 2011 - 7:00 pm

नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-

असे काय घडले की ज्यामुळे आज अनुकूल हॉस्पिटलात जखमी होऊन पडला आहे? अपघाताच्या आधी त्याला कोणताही शुभ-अशुभ शकून समजला नाही? की त्याने शकूनांतून मिळणार्‍या संदेशांकडे दुर्लक्ष केले?

नाव - अनुकूल
शिक्षण - बी.ई. सॉफ्टवेअर (फर्स्ट क्लास)
पेशा - सॉफ्टवेअर इंजीनिअर (उच्चपदस्थ)
कौटुंबिक स्थिती - सुस्थित
आई - उच्चशिक्षित,वास्तुशास्त्री
वडिल - उच्चशिक्षित नोकरदार

आज बाईकवरुन जाताना वळणावर अपघात होऊन अनुकूलच्या उजव्या अंगाला मार बसला आहे. तो आज हॉस्पिटलात जखमी अवस्थेत आहे. याला कारण काय? दैवाच्या संकेतांकडे लक्ष न दिल्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळावी का?

बुद्धीमान अनुकूल भराभर यशाच्या पायर्‍या चढत गेला. प्रयत्नांबरोबरच डोळसपणे दैवाची साथ घेतल्याने तो समवयस्कांमध्ये नक्कीच उजवा आहे. 'सवयी बदला - जीवन यशस्वी करण्याचा सोपा मार्ग' हा मेंदूच्या आरोग्याबद्दलचा लेख वाचून विज्ञानवादी अनुकूल फारच भारावला. आपण रोज सवयीने जे करतो ते जाणीवपूर्वक बदलून पाहणे आणि मेंदू सतेज करणे हा उपाय त्याला फारच आवडला. उजव्या हाताने दात घासत असू तर कधीतरी डाव्या हाताने घासावेत. रोज त्याच त्या मार्गाने ऑफिसला जात असू तर मार्ग बदलून पाहावा. पण यामध्ये रोज नियतीकडून मिळणार्‍या संकेतांकडे लक्ष द्यायचे राहून जाईल हे त्याच्या लक्षातच आले नाही. लहान सहान गोष्टींमध्ये शकून पाहून पाऊल टाकणार्‍या यशस्वी अनुकूलने इथेच चूक केली.

रोजचा ऑफिसला जायचा रस्ता बदलायचा अनुकूलने निश्चय केला. खरेतर असे बदल पटकन होत नाहीत. पण एके दिवशी ऑफिसच्या शेवटच्या चौकात नेहमी डावीकडे वळून पश्चिमेच्या पर्किंगमध्ये गाडी लावण्याऐवजी उजवीकडे वळून पूर्वेच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याचे त्याने ठरवले. पण....
नियतीने दिलेला संकेत १ - वळणावरती त्याला उजवीकडे जाणारी अँब्यूलन्स दिसली. हा अपशकून आहे असे समजून त्याने जुनाच डावा रस्ता प़कडला.
नियतीने दिलेला संकेत २ - काही दिवसांनी आज उजवीकडे वळायचे असे ठरवले असताना त्याला उजव्या वळणावर पत्ता विचारणारा माणूस दिसला. पत्ता सांगणारा हातवारे करून त्याला सांगत होता की उजवीकडे जाऊ नका. डावीकडेच जा. हा संकेत आहे समजून अनुकूलने त्याही दिवशी डावाच रस्ता पकडला.
याचा अर्थच असा की अनुकूलने उजवा रस्ता पकडू नये म्हणून नियती त्याला सुचवित होती. मग अपघाताच्या दिवशी अनुकूलने रस्ता बदलला तर नियतीने त्याला काहीच संकेत कसा दिला नाही ?

काय त्या दिवशी वेगळे असे काहीच घडले नाही?

नियतीने दिलेला संकेत ३- अपघाताच्या दिवशी अनुकूल उजवीकडे वळत असताना एक कावळा त्याच्या आधी उजव्या रस्त्यावरून पुढे उडत गेला. तो त्याला पुढल्या धोक्याची कल्पनाच देत होता. अनुकूलने ते पाहिले पण सवय बदलायचीच या भावनेच्या भरात त्याने कावळ्याच्या संकेताकडे दुर्लक्ष केले आणि अपघात घडला.

असे काय झाले की अनुकूलला त्याच दिवशी रस्ता बदलण्याचा मोह झाला? अनुकूलच्या दु:खी माता-पित्यांकडून कळालेल्या माहितीने गूढ उकलायला मदत झाली.

वास्तूशास्त्री आईचा अनुकूल नेहमी उजव्या पाऊलानेच उंबरठा ओलांडायचा. त्या दिवशी तो बाईकवर बसला पण त्याच्या कपाळावर थोडा घाम आला म्हणून त्याने उजव्या खिशातला रूमाल बाहेर काढला. तेव्हा त्याचा अभिमंत्रित स्फटिक खिशातून बाहेर पडला. हा त्याचा रक्षणकर्ता स्फटिक होता. यशस्वी अनुकूल नेहमीच प्रयत्नांबरोबर दैवाची सुद्धा साथ घ्यायचा. त्याने तत्परतेने खाली उतरून तो स्फटिक उचलला. पण! सवय बदलण्याच्या नादात त्याने तो स्फटिक शर्टाच्या वरच्या खिशात म्हणजेच डाव्या खिशात ठेवला.

आमचे विज्ञानवादी ज्योतिषी या सर्वांचे विश्लेषण करताहेत. त्यांच्या मते शरीराची उजवी बाजू धनभारीत तर डावी ऋणभारीत असते. स्फटिक स्वतः धनभारीत असतान तो ऋणभारीत अश्या डाव्या खिशात ठेवला गेला. इथेच मोठी चूक झाली. डावी बाजू मेंदूच्या उजव्या भागाशी संलग्न असते. त्यामुळे कावळ्याचा संकेत दिसूनही स्फटीकाने भारलेली डावी शरीरबाजू उजव्या मेंदूगोलार्धाला चालना देती झाली आणि भावनावेगात चुकीचा मार्ग निवडला गेला.

काय तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? आम्हाला तुमची कथा लगेच कळवा.
काय तुम्ही अनुकूलला स्वास्थ्यशुभेच्छा देऊ इच्छिता? त्वरित प्रतिसाद लिहा अश्या मोड मध्ये जा. आणि लिहा 'स्वास्थ्यशुभेछा' अनुकूलचे संकेताक्षर आहे 'अनु'. आणि पाठवून द्या लगेच.
काय तुम्ही अनुकूलच्या दु:खी मातापित्याचे सांत्वन करू इच्छिता? त्वरित प्रतिसाद लिहा अश्या मोड मध्ये जा. आणि लिहा 'सांत्वन' मातापित्याचे संकेताक्षर आहे 'मापी'. आणि पाठवून द्या लगेच.

आपलाच
- (सांकेतिक) लिखाळ.

बालकथाविडंबनविज्ञानविरंगुळा

प्रतिक्रिया

आजतक ची एखादी न्युज पाहतोय असेच वाटले

किसन शिंदे's picture

29 Apr 2011 - 10:24 am | किसन शिंदे

गणेशा आज तक नाही...तर इंडिया टीवीचा स्पेशल न्युज रिपोर्ट पाहतोय असं वाटलं..;)

भडकमकर मास्तर's picture

28 Apr 2011 - 7:40 pm | भडकमकर मास्तर

जबरदस्त लेखन...
फार आवडले...
... भल्याभल्यांची विकेट उडवणारे वि़ ज्ञा नवादी धनभारित ऋणभारित तर झकास...

भडकमकर मास्तर's picture

29 Apr 2011 - 1:46 am | भडकमकर मास्तर

तो प्रातःदवणीय लेख आणि हा लेख.. समर्थकांना आणि टवाळांना दोन्ही लोकांना आपल्याच बाजूचा वाटेल...

या दोन्हींची गंमत अशी की लेखात नक्की उपरोध आहे की नाही, यावर दोन्ही पार्ट्यांमध्ये वाद व्हावा... आणि ल्येखक गंमत पहायला मोकळा... पण हेच तर लेखकाचे कौशल्य.... आपण तर नतमस्तक आहोत...

लिखाळ's picture

29 Apr 2011 - 10:50 pm | लिखाळ

कस्सं कस्सं ;)

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2011 - 8:13 pm | टवाळ कार्टा

काळजी घ्या म्हणावे....

पण bike वळवताना उडणारा कावळा बघायचा कि दुसर्या बाजुने जाणार्या गाड्या???

श्रावण मोडक's picture

28 Apr 2011 - 8:22 pm | श्रावण मोडक

काय झालंय काय तुला हल्ली? पण जे काही झालंय, त्याचा परिणाम मात्र चांगला होतोय. तेव्हा हे असंच होत राहूदे.
व्हायवाची तारीख आलीये का रे? ;)

कदाचित त्या दिवशी अनुकूल चड्डीची नाडी बांधायला विसरला असावा , तीच नाडी लोंबत लोंबत , त्याच्या पायात अडकली असणार , आणि समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक ला बघून सुद्धा अनुकूल ब्रेक दाबू शकला नसावा

---स्पाशिकांत चोख

धमाल मुलगा's picture

28 Apr 2011 - 10:21 pm | धमाल मुलगा

आमचे मित्र श्रीयुत लिखाळ हे बहुधा फडताळाखाली उभे असताना, त्यांचे माथ्यावर फुलदाणी पडली असावी की काय अशी शंका येत आहे. :D

अरे भल्या मनुक्षा,
काय? नक्की काय होतंय तुला? इतकं खत्तर्रनाक लिहायची ही स्फुर्ती, ही प्रेरणा कोणती म्हणायची? ;)

विजुभाऊ's picture

29 Apr 2011 - 11:10 am | विजुभाऊ

आमचे मित्र श्रीयुत लिखाळ हे बहुधा फडताळाखाली उभे असताना, त्यांचे माथ्यावर फुलदाणी पडली असावी की काय अशी शंका येत आहे
त्या कारणामुळे हे सद्गृहस्थ डोक्यावर पडले होते.
अर्थात फडताळाखाली उभे असताना डोक्यावर काहीतरी पडेल असा संकेत त्याना सकाळीच मिळाला होता.
बेसीनचा नळ चालू केल्यानन्तर पाणी बेसीनच्या पायपातून जायच्या अगोदर डावीकडून वळसा मारून गोल फिरत होते ( इथे बेसीन हाच शब्द वापरलाय.कमोडसाठी वेगळे नियम आहेत)
त्यानी सकाळी दात घासताना ब्रश तोम्डाच्या उजव्या बाजुने प्रथम फिरवायच्या अगोदर तो डाव्या बाजूने फिरवला होता
तसे बिचान्यावरुन उठताना त्यानी उजवा पाय अगोदर खाली टेकवला होता.
हे सारे संकेत दुर्लक्षीले गेल्यामुळे फडताळाखाली उभे रहाण्याचा योग आला

प्राजु's picture

28 Apr 2011 - 10:36 pm | प्राजु

चांगलीच उडवलीये..!
मस्त!

हा हा हा!
'मापि' आवडले.
आजकाल लिखाळभाऊजी धाग्यावर धागे जोडतायत.;)

सुधीर१३७'s picture

29 Apr 2011 - 1:02 am | सुधीर१३७

"लिखाळभाऊजी" मुळे रेडिओवरील जुने "टेकाडे" भाऊजी आठवले..................... :wink:

............बाकी लेखन झकास........... :)

विजारीच्या खिशात विभूती असती ...आणि भालप्रदेशावर भस्मलेपन केले असते तर ! ? मांजरही कदाचित आडवे न जाता बाजूने गेले असावे.

लिखाळ गुर्जींनी गार्ड बदला की काय? ;)

आत्मशून्य's picture

29 Apr 2011 - 2:27 am | आत्मशून्य

"अनुकूल" असे त्याचे नाव न ठेवता जर ते फक्त "कूल" असं ठेवल असतं तर कदाचीत रामायण थोडं वेगळं घडल असतं ;)

अवांतर :- अटळ मृत्यूचे शकून अपशकूना सोबत थैमान बघायचे असेल तर "फायनल डेस्टीनेशन" या चीत्रपटाचे पहीले तीन भाग तर नक्कीच पहा (वीशेषतः तीसरा भाग पहाच, त्यानंतरचे भाग जाम बकवास वाटले होते), तीतकच अजून इनपूट मीळेल सर्वांना चर्चेला.

विनायक बेलापुरे's picture

29 Apr 2011 - 1:37 am | विनायक बेलापुरे

रोजच्या रोज ऑफिसला जायची घातुक सवय बदलायला पाहिजे बिचारया अनुकूलची.
असे अपघात आणि नियतीने दिलेले बरेचसे संकेत टाळता येउ शकतील त्यामुळे.
त्याच्या उच्चशिक्षीत मापिना भेटायला हवे एकदा.

राजेश घासकडवी's picture

29 Apr 2011 - 7:39 am | राजेश घासकडवी

गालाला भोक पडण्याची भीती वाटावी इतकं टंग इन चीक लेखन. आवडलं.

लिखाळभाऊंना त्यांच्या शब्दांच्या वहीबरोबरच कोणाची टिंगल करायची यादीदेखील सापडलेली दिसते आहे.

चालूद्यात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2011 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे आपल्याला का सुचत नाही या जळजळीमुळे मुद्दामच हा प्रतिसाद डाव्या हाताने लिहीला आहे.

लिखाळा, तुझा कीबोर्ड क्वर्टीऐवजी य्त्रेव॑ आहे काय? ;-)

लिखाळ's picture

30 Apr 2011 - 10:03 pm | लिखाळ

हल्ली इथे कीबोर्डच्या प्रकारांचा इतका उल्लेख का होतो आहे.. माहितीपूर्ण जालस्थलांवर बरेच वाचन चालू आहे का? असो. की तंत्रज्ञानाविषयी मी उदासीन न राहण्याचा हा एक संकेतच म्हणावा?

'टिंगलीची यादी' हा प्रकार आवडला. तशी यादी करण्याची गरज नाही. एखाद्या दिवशी कोपर्‍यावर उभे राहावे आणि उजवीकडे वळणार्‍यांचे नुसते वर्णन करावे. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2011 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळशेट, तुम्ही डावे काय? ;-)

सहज's picture

29 Apr 2011 - 7:56 am | सहज

अनुकूल व त्याच्या मापि तिघांनीही त्वरीत जवळच्या ना*केंद्राला भेट द्यावी असे सुचवतो. अर्थात कर्मसिद्धांत खरा ठरवायला काही गोष्टी मुद्दाम चुकीच्या लिहल्या असणार पण शिवउपासनेने त्याला यापुढे नक्कीच अजुन चांगला अंदाज येणार.

कोलिती लेखन!!

प्यारे१'s picture

29 Apr 2011 - 9:26 am | प्यारे१

अनु . : स्वास्थ्यशुभेच्छा!

मापि : सान्त्वन.

लिखाळ ने आवाहन केल्याप्रमाणे

मला आठवणारे नियतीचे संकेत :

१) सरु कट्ट्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. बराच वेळ बस आली नाही.

२) आलेली बस दुसर्‍या मार्गाने जाणारी निघाली.

३) तरी त्याच बसमध्ये चढताना बसच्या मागच्या दारापाशी बाहेर आलेला पत्रा मला लागला.

४) महामार्गावर ५० फक्त माझ्यासाठी गाडी घेऊन थांबले होते.

ह्या सगळ्या संकेतांना डावलून मी निघालो.

परिणाम : टारझन, पुपे, इ. महामहाभागांची झालेली भेट, ' पक्षीनिरीक्षणात' वाया गेलेला वेळ, बळी पडलेले कोंबडी मासे , ५० फक्त, वल्ली इ. च्या ट्रेक्सची वरण्णं (चुकला का काय शब्द), गणेशाची कविता, मनरावाचा कन्याकुमारी प्रवास (जुना आणि नवीन मुंबई पुणे महामार्गातून) याचंही वरण्णं, होतकरु वपाडावचं रहआणि, आत्म'शून्य'ची 'अपरिमितता'.

का डावलले मी नियतीचे संकेत????

श्रावण मोडक's picture

29 Apr 2011 - 9:58 am | श्रावण मोडक

तर 'इथून पुढे हाईंडसाईटनं (जी नेहमीच परफेक्क्ट सायन्स सदरात मोडते) संकेत समजून घेण्याऐवजी फो(अ)रसाईटनं (जे सायन्स नाहीच) संकेत ओळखा. बरंच भाग्य पदरी येईल,' असंच सांगायचं आहे ना? ;)

मृत्युन्जय's picture

29 Apr 2011 - 10:54 am | मृत्युन्जय

महान लेखन आहे. च्यायला उपरोध समजायला पण पहिले दोन परिच्छेद खर्ची पडले. नंतर ही आतिशबाजी सुरु झाली. मी वेडा झालो वाचुन. च्यायला कसे सुचते एवढे भारी लिहायला लोकांना देव जाणे.

नरेशकुमार's picture

29 Apr 2011 - 11:21 am | नरेशकुमार

मी कधी डाव्या तर कधी उजव्या हाताने लेख देतो.
जेव्हा उजव्या हाताने लेख देतो त्यावेळेस १००+ प्रतिसाद येतात पन लेख मात्र डिलीट होतो.
जेव्हा डाव्या हाताने लेख देतो त्यावेळेस ० प्रतिसाद येतात तरिपन लेख डिलीट होतो.

मी मग कोनत्या हाताने लिहावे ? मंजे लेख डीलीट होन्याचा अपघात होनार नाय.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Apr 2011 - 11:34 am | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

_||_

आदिजोशी's picture

29 Apr 2011 - 11:48 am | आदिजोशी

तुमच्या विनोदबुद्धीला सलाम

प्रास's picture

29 Apr 2011 - 12:42 pm | प्रास

काल पासून विचार करतोय की लिखाळजींच्या लेखनाचा स्रोत काय असावा बरं? आणि अचानक मला लोणावळ्याच्या 'मनशक्ती'चा अंक दिसला. त्यातच या महिन्यात डाव्या मेंदूला उजव्या हाताने मालीश करण्याचा उपाय सांगितलाय. त्याच प्रमाणे रोजच्या रोज करण्याच्या कामातला बदल सांगितलाय. उजव्या हाताऐवजी डाव्या हातात ब्रश घेऊन दात घासणे, रोजच्या ऑफिसात जायच्या मार्गात बदल करणे असे मेंदूचे व्यायाम सांगितले आहेत.

मला वाटतंय की मे महिन्यात करायला सांगितलेले मेंदूचे व्यायाम लिखाळरावांनी आत्ताच सुरू केल्यामुळे त्यांच्या डाव्या मेंदूला प्रचंड तरतरी येऊन त्यांची सृजनशक्ती पराकोटीने वाढल्याचे समजत आहे.

यासगळ्याचा परीणाम म्हणून अत्यंत ज ब री लेख इथे प्रकाशित झालाय हे नमूद करायला कोणाचाही प्रत्यवाय नसावा.

लिखाळलेखनप्रेमी -

:-)

हा हा हा .. मनशक्तीचा संदर्भ बरोबर आहे पण खरे निमित्त ते नव्हेच :)
सत्यसाई गेल्यानंतर टिव्हीवाल्यांना जो ऊत आला आहे, त्यामध्ये परवा त्यांच्या समाधीच्यावेळेस जे दाखवत होते ते मी चुकून पाच मिनिटे बघितले.
१. भर दुपारी चंद्रदर्शन झाले. हा चमत्कार
२. अचानक दुपारी काही लोकांना झाडावर वटवाघुळे दिसली. हा सुद्धा चमत्कार
३. एका महिन्यापूर्वी सत्यसाईंनी दर्शनाच्यावेळी हात जोडून अभिवादन केले. हा मृत्यूसंकेत होता.

प्रेरणा स्रोत हा आहे ;)

चतुरंग's picture

29 Apr 2011 - 10:50 pm | चतुरंग

दोन्ही डोळ्यांनी वाचून लेख आधी नीट समजलाच नाही म्हणून मग नंतर फक्त डाव्या डोळ्याने वाचला, मग समजला! ;)
<=०()8=<

-(संकेतप्रेमी)चतुरंग

लिखाळ's picture

29 Apr 2011 - 10:58 pm | लिखाळ

ही ही ही !! हे मस्त !

माझ्या उजव्या बाजूच्या अक्कलदाढा काढल्यापासून माझी तर्कबुद्धी कार्यरत झाली आहे.

तर्कबुद्धी काही जागृत झाली नाही. मग दंतशल्यविशारदाने डावी दाढ काढून बघूयात का असा सल्ला दिला. म्हटले नको त्यानेही तर्कबुद्धी जागृत झाली नाही तर दाढाही गमावायचो आणि तर्कबुद्धीही नाही, त्यापेक्षा जे आहे ते ठीक आहे. सध्या माझे बरे चालू आहे! ;)

-(तर्कशुद्ध्)रंगा

Nile's picture

29 Apr 2011 - 11:34 pm | Nile

मागे एकदा ( दुर्दैवी वेळा आयुष्यात काय सांगुन येतात का. काय करणार?) आज तक वर लांबून वाकलेला (बेंट) अन जवळ गेल्यास सरळ अशा दिसणार्‍या खांबावर एक तास कार्यक्रम ऐकला होता त्याची आठवण झाली. (शेवटचे इनमिन दोन मिनिट आयआयटी कानपूरातील प्रोफेसरने येउन व्यवस्थित कारण सांगितले होते उरलेला वेळ, सुपर नॅचरल इ. सुरु होतं.)

(काही नुकतीच घटना वगैरे असेल तर कुठेतरी प्रेरणेचा दुवा दिलात तर दुवा देउ, सद्ध्या दिवस चांगले जात असल्याने सकाळ, मटा, टीओआय पासून कुठल्याच हिंदी चॅनेलला बघायची वेळ सहसा येत नाही)

विनायक बेलापुरे's picture

29 Apr 2011 - 11:37 pm | विनायक बेलापुरे

आज राजपुत्र विल्यम आणि केट बग्गीतून जात असताना अचानक सूर्यदर्शन झाले. त्याबरोबर सीएनएन वरचे वार्ताहर ओरडले.... चांगला शुभशकून झाला, गेला आठवडाभर सूर्यदर्शन झाले नव्हते ते आत्त्ता झाले.
कुणाचे काय तर कुणाचे काय ?

चांगला शुभशकून झाला, गेला आठवडाभर सूर्यदर्शन झाले नव्हते ते आत्त्ता झाले.

अ र र्र .. हे वाचून डोळे पाणावले. आठवडभार सूर्य दर्शन नाही ?!! डि-विटॅमिनच्या कमतरतेमुळे डिप्रेशन येते असे कुठेतरी वाचलेले स्मरते.

ऋषिकेश's picture

30 Apr 2011 - 12:36 pm | ऋषिकेश

__/\__

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

लिखाळ शेठ कुठल्या मुहुर्तावर लिहिलात हा लेख ? तुमचा लेख आला आणि मिपा गंडायला सुरुवात झाली.

मी हा प्रतिसाद गोद्रेजच्या कळफलकाने टंकत आहे. त्याने प्रतिसाद टंकला की मिपा गंडत नाही आणि प्रतिसाद देखील ४/४ वेळा पोस्ट होत नाही.

हम्म.. मलाही तोच अनुभव येतो आहे.
हा कसला संकेत आहे याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.

स्वाती२'s picture

1 May 2011 - 1:30 am | स्वाती२

लै भारी!