गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Apr 2011 - 8:42 pm

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ||

मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||

त्याला नागपंचमीला दुध मी देते
त्याला लांबून नमस्कार करते
त्याला देवासमान मी मानते रं ||२||

त्याचा खेळ लई मजेदार असतो
पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो
खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३||

बघ एक सांगते मी आता तुला
मुका प्राणी हा जर का मेला
मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४||

मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं
त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं
दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०४/२०११

शांतरसकविता

प्रतिक्रिया

निनाव's picture

17 Apr 2011 - 8:57 pm | निनाव

पाभे : ४ || बद्दल : दंडवत :)

अवांतरः शांतरस ( :) )

प्रकाश१११'s picture

17 Apr 2011 - 8:57 pm | प्रकाश१११

पाषाणभेदा -

मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||

मस्त डुलायला होतेय ..!!

टारझन's picture

18 Apr 2011 - 12:16 am | टारझन

आरं तिच्यायचा नागोबा ...
=)) =)) =))

- (१० आकडी) भुजंग

आत्मशून्य's picture

18 Apr 2011 - 1:57 am | आत्मशून्य

एकदम अणूकूचीदार काव्य होते.

नरेशकुमार's picture

18 Apr 2011 - 8:36 am | नरेशकुमार

शब्द शब्द जपून फेकलेले आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Apr 2011 - 4:58 pm | प्रकाश घाटपांडे

ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला? मस्त रे पाभे गरिबोंका गुरु ठाकूर

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला?

च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत

मस्त हो पाभे. ख्याती जपणारे पद्य.

सुहास..'s picture

18 Apr 2011 - 7:25 pm | सुहास..

च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत >>>
हा ना राव !!

पाषा की भाषा आवडली !

गणेशा's picture

18 Apr 2011 - 10:22 pm | गणेशा

अप्रतिम

धनंजय's picture

18 Apr 2011 - 10:32 pm | धनंजय

आयत्या बिळावर नागोबा
छळू नका गं त्याला बा-
यांनो. ओवाळा, बिळात घ्या
डोलता आयता नागोबा

शांत रस! या चावर्‍या नागाकरिता "चावट रस" निवडायला हवा होता.

टारझन's picture

18 Apr 2011 - 10:38 pm | टारझन

छळू नका गं त्याला बा-
यांनो. ओवाळा, बिळात घ्या

ह्हा ह्हा .. ह्हा .. :) आता ऐन वेळी बायकांनी गर्दी केल्यावर खेचाखेचीत एक तर समुद्रमंथन होऊन रत्नद्रव्ये बाहेर पडतील किंवा नागोबा तुटायचे =)) नागोबा भला करे :)

- ( वारुळाच्या शोधात ) नागंजय

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2011 - 10:39 pm | मुक्तसुनीत

धनंजय कोंडके ! :)

चतुरंग's picture

18 Apr 2011 - 10:49 pm | चतुरंग

साक्षात धन्याशेठलाही नागोबाने प्रतिक्रिया द्यायला लावावी ना? :)

-रंगा

नितिन थत्ते's picture

18 Apr 2011 - 10:51 pm | नितिन थत्ते

नागोबावरून आठवलं. मागे पाभेंनी व्हायब्रेटर हवा असा पण काहीतरी धागा काढल्याचे स्मरते.

टारझन's picture

18 Apr 2011 - 10:56 pm | टारझन

अलिकडे पाभेंची टेस्ट बदलली आहे :)

- वारुळभेद

प्रभो's picture

18 Apr 2011 - 11:02 pm | प्रभो

सहमत आहे ..

-नागोबा म्हणे.

चतुरंग's picture

18 Apr 2011 - 10:40 pm | चतुरंग

सध्या स्व.दादा कोंडके यांच्या काव्याचा भरपूर अभ्यास सुरु आहे असे दिसते! ;)
बाकी सध्या नागपंचमी वगैरे जवळ आलेली नसूनही अचानक नागोबाची कविता स्फुरावी ह्याचे अंमळ आश्चर्य वाटते आहे!

-रंगोबा

ज्ञानेश...'s picture

18 Apr 2011 - 11:05 pm | ज्ञानेश...

टारझणचा प्रतिसाद वाचायला धागा उघडला, इकडे तर लै दिग्गज डोलतांना दिसून र्‍हायले राव.

हहपुवा हेवेसांनल.