गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
लेखनविषय:
काव्यरस
गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ||
मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||
त्याला नागपंचमीला दुध मी देते
त्याला लांबून नमस्कार करते
त्याला देवासमान मी मानते रं ||२||
त्याचा खेळ लई मजेदार असतो
पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो
खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३||
बघ एक सांगते मी आता तुला
मुका प्राणी हा जर का मेला
मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४||
मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं
त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं
दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०४/२०११
वाचने
2802
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
पाभे : ४ || बद्दल : दंडवत
पाषाणभेदा - मी बाई भित्री
आरं तिच्यायचा नागोबा ... =))
ओहो
शब्द शब्द जपून फेकलेले आहेत.
जापानी तेल
In reply to जापानी तेल by प्रकाश घाटपांडे
ह्यो नागोबा जापानी तेलानी त
ही ही
अप्रतिम
आयत्या बिळावर नागोबा
In reply to आयत्या बिळावर नागोबा by धनंजय
__/\__
In reply to आयत्या बिळावर नागोबा by धनंजय
अरे बाप रे
In reply to आयत्या बिळावर नागोबा by धनंजय
अगायायाया!!
In reply to अगायायाया!! by चतुरंग
नागोबावरून आठवलं. मागे
In reply to नागोबावरून आठवलं. मागे by नितिन थत्ते
सहमत आहे ..
In reply to सहमत आहे .. by टारझन
सहमत आहे
काय पाभे?
बाब्बौ...