✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

प — पाषाणभेद, Sun, 04/17/2011 - 20:42
गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ|| मी बाई भित्री नाजूक माझी काया डसला तर जाईल जीव माझा वाया त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१|| त्याला नागपंचमीला दुध मी देते त्याला लांबून नमस्कार करते त्याला देवासमान मी मानते रं ||२|| त्याचा खेळ लई मजेदार असतो पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३|| बघ एक सांगते मी आता तुला मुका प्राणी हा जर का मेला मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४|| मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
2796 वाचन

💬 प्रतिसाद (18)

पाभे : ४ || बद्दल : दंडवत

निनाव
Sun, 04/17/2011 - 20:57 नवीन
पाभे : ४ || बद्दल : दंडवत :) अवांतरः शांतरस ( :) )
  • Log in or register to post comments

पाषाणभेदा - मी बाई भित्री

प्रकाश१११
Sun, 04/17/2011 - 20:57 नवीन
पाषाणभेदा - मी बाई भित्री नाजूक माझी काया डसला तर जाईल जीव माझा वाया त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१|| मस्त डुलायला होतेय ..!!
  • Log in or register to post comments

आरं तिच्यायचा नागोबा ... =))

टारझन
Mon, 04/18/2011 - 00:16 नवीन
आरं तिच्यायचा नागोबा ... =)) =)) =)) - (१० आकडी) भुजंग
  • Log in or register to post comments

ओहो

आत्मशून्य
Mon, 04/18/2011 - 01:57 नवीन
एकदम अणूकूचीदार काव्य होते.
  • Log in or register to post comments

शब्द शब्द जपून फेकलेले आहेत.

नरेशकुमार
Mon, 04/18/2011 - 08:36 नवीन
शब्द शब्द जपून फेकलेले आहेत.
  • Log in or register to post comments

जापानी तेल

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/18/2011 - 16:58 नवीन
ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला? मस्त रे पाभे गरिबोंका गुरु ठाकूर
  • Log in or register to post comments

ह्यो नागोबा जापानी तेलानी त

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/18/2011 - 17:12 नवीन
ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला?
च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत Image removed. मस्त हो पाभे. ख्याती जपणारे पद्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ही ही

सुहास..
Mon, 04/18/2011 - 19:25 नवीन
च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत >>> हा ना राव !! पाषा की भाषा आवडली !
  • Log in or register to post comments

अप्रतिम

गणेशा
Mon, 04/18/2011 - 22:22 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

आयत्या बिळावर नागोबा

धनंजय
Mon, 04/18/2011 - 22:32 नवीन
आयत्या बिळावर नागोबा छळू नका गं त्याला बा- यांनो. ओवाळा, बिळात घ्या डोलता आयता नागोबा शांत रस! या चावर्‍या नागाकरिता "चावट रस" निवडायला हवा होता.
  • Log in or register to post comments

__/\__

टारझन
Mon, 04/18/2011 - 22:38 नवीन
छळू नका गं त्याला बा- यांनो. ओवाळा, बिळात घ्या
ह्हा ह्हा .. ह्हा .. :) आता ऐन वेळी बायकांनी गर्दी केल्यावर खेचाखेचीत एक तर समुद्रमंथन होऊन रत्नद्रव्ये बाहेर पडतील किंवा नागोबा तुटायचे =)) नागोबा भला करे :) - ( वारुळाच्या शोधात ) नागंजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अरे बाप रे

मुक्तसुनीत
Mon, 04/18/2011 - 22:39 नवीन
धनंजय कोंडके ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अगायायाया!!

चतुरंग
Mon, 04/18/2011 - 22:49 नवीन
साक्षात धन्याशेठलाही नागोबाने प्रतिक्रिया द्यायला लावावी ना? :) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

नागोबावरून आठवलं. मागे

नितिन थत्ते
Mon, 04/18/2011 - 22:51 नवीन
नागोबावरून आठवलं. मागे पाभेंनी व्हायब्रेटर हवा असा पण काहीतरी धागा काढल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत आहे ..

टारझन
Mon, 04/18/2011 - 22:56 नवीन
अलिकडे पाभेंची टेस्ट बदलली आहे :) - वारुळभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत आहे

प्रभो
Mon, 04/18/2011 - 23:02 नवीन
सहमत आहे .. -नागोबा म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काय पाभे?

चतुरंग
Mon, 04/18/2011 - 22:40 नवीन
सध्या स्व.दादा कोंडके यांच्या काव्याचा भरपूर अभ्यास सुरु आहे असे दिसते! ;) बाकी सध्या नागपंचमी वगैरे जवळ आलेली नसूनही अचानक नागोबाची कविता स्फुरावी ह्याचे अंमळ आश्चर्य वाटते आहे! -रंगोबा
  • Log in or register to post comments

बाब्बौ...

ज्ञानेश...
Mon, 04/18/2011 - 23:05 नवीन
टारझणचा प्रतिसाद वाचायला धागा उघडला, इकडे तर लै दिग्गज डोलतांना दिसून र्‍हायले राव. हहपुवा हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा