११ वर्षाने भेटतोयस. चल जेवायला नेतो तुला. का पाडव्याचे जेवण घरी चे कंपल्शन?
" लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय"
शोध लागला की सांग हा. माय्ला काही बोल्लो की नावाला जागलच पाहीजे का?
----------------------------------------------------------------------------------------चल एसी त बसु.
"नको. महाग असते"
मी बील भरतो, काळजी करु नकोस.
" उगाच कशाला खर्च"?
असु दे.
----------------------------------------------------------------------------------------
काय मागवतोस?
"सगळे महाग आहे रे"
गप ए. मेनु बघ आणि ऑर्डर दे.
" तुला आठवते कारे? कॉलेज मधे जात असताना तु आणि मी चपात्या गुंडाळुन न्यायचो. कँटीन मधे मित्रांच्या सांबार आणि चटणी बरोबर खायचो"
बर मग? त्याचा आजच्या जेवणाशी काय संबंध.
" मी ते कधी विसरु शकतच नाही रे. शाळेतला पहीला मी. कॉलेजमधे हरवलोच बघ. परिस्थिती मुळे इंजिनीयर होउ शकलो नाही. तुझे पण तसेच आहे की. तुला वाईट नाही वाटत?"
नाही. मी काहीही झालो असतो तरी मी आज जे करतो आहे तीथेच परत आलो असतो.
"खरच"?
आयला इतक्या दिवसांनी भेटतो आहेस. वर्षाच्या पहील्या दिवशी झाल का सुरु तुझे. माझे पण बरेच काही हरवले आहे. पण त्याच्या आठवणीत मी माझा आज का वाईट करु?
२००० मधे तुला फार मोठा झटका बसला होता ना? तुझा रिसर्च अपुरा राहीला. आर्थिक पण नुकसान झाले. चुकीच्या पॉलीसी मुळे. किती लाख म्हणाला होतास?
१०० गेले. सोड रे. जेवण मागव. तुला आलु पालक आवडतो ना? मागव.
"१०० रुपये."
आता हाणु का?
----------------------------------------------------------------------------------------
खरबुड्याला शांत करणे आवश्यक होते.
मी दोन मोठे ग्लास भरुन पाणी मागवले.
लोणचे कांदा, लिंबु ट्रे मधले लिंबु ग्लासात पीळले.
थोडेसे मिठ टाकले.
वेटर कडुन थोडीशी साखर मागवली.
झाले लिंबु सरबत तयार.
मेनु वर लिंबु सरबत ला रुपये ३० होते.
खरबुड्याला रेट दाखवला.
आणि खरबुड्या हसला.
----------------------------------------------------------------------------------------
बुट पॉलिश वाल्यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर पॉलिशचे पाचाचे सात केले हे खरबुड्याला कळाले तर?
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 4:45 pm | पिलीयन रायडर
थोडसा कळल... जे कळ्ल ते मस्त होतं....
5 Apr 2011 - 4:50 pm | VINODBANKHELE
खरबुड्या हसला.
ग्रेट
प्रभु साहेब हसण्यावर आमच्या कडे १००% डीस्काउंट आहे......
5 Apr 2011 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म
आज एकदम विदाऊट क्रिप्टिक ?
नविन वर्षात काही लोकांनी बेक्कार बेक्कार संकल्प केलेले दिसतात.
5 Apr 2011 - 6:03 pm | असुर
आयला,
हे विदाऊट क्रिप्टिक होतं काय? आम्हाला वाटला की प्रभूमास्तरांनी आज पाडव्यानिमित्त इतका जोरात क्रिप्टिक लिहीलाय की सगळा म्याटर डोक्यावरुन ग्येला, कायपण कळ्ळा नाय!
हे साधं सरळ असेल तर फाऊल धरावा का?
--असुर
5 Apr 2011 - 6:07 pm | धमाल मुलगा
;)
5 Apr 2011 - 6:17 pm | असुर
अगदी अगदी!!
म्हणूनच मला तूच आठवलास! आणि उगाच वाटायला लागलं की प्रभूमास्तरांच्या आजच्या निरुपणाचा विषय धमाल्या तर नै ना! पन परा तर म्हणतोय की सरळसोपे रसाळ किर्तन आहे म्हणून. किती हे कन्फ्युजन!!
त्यापेक्षा मास्तरांनी एखादा क्रिप्टिक टाकला असता तर सोपं गेलं असतं!
--असुर
5 Apr 2011 - 7:19 pm | धमाल मुलगा
ह्या भावना एका सुपात असलेल्याच्या, एका जात्यात असलेल्याप्रति आहेत हे लक्षात येतंय.
ठीक आहे. याल तुम्हीही पंक्तीत तेव्हा बोलू...कसें????
5 Apr 2011 - 5:32 pm | सहज
वेल्कम बॅक!!
पाडव्यापासुन दिग्गज लोक लिहू लागली आहेत!!!
मस्त!
5 Apr 2011 - 6:28 pm | गणपा
अगदी असच म्हणतो.
:)
5 Apr 2011 - 6:00 pm | धमाल मुलगा
मास्तर,
आल इज वेल?
5 Apr 2011 - 6:21 pm | श्रावण मोडक
वेल, वेलच आहे. म्हणून तर हे लेखन आलंय. :)
5 Apr 2011 - 6:23 pm | ५० फक्त
या या, बरं झालं आलात ते, तुमच्या सारख्यांची कमतरता होती मिपावर.
5 Apr 2011 - 6:44 pm | रेवती
केवढं आश्चर्य!
सगळं समजलं.;)
5 Apr 2011 - 6:52 pm | चतुरंग
म्हणजे मास्तरांचा 'दूसरा' आहे! ;) मला दूसरा समजला! :)
-रंगा
5 Apr 2011 - 7:05 pm | टारझन
आपल्याला काय नाय समजला .. मास्तर च्या लेखाला ना मुंडकं असतंय ना हात पाय :) ते आपण आपले विमॅजिन करायचे असतात . मिपावरचा वाचकवर्ग अलिकडे ते इमॅजिन करतो .. आणि समजले असे करतो :) ते आमाला काय समजला नाय ...
ज्याला समजला त्याने व्यनि करणे प्लिज ..
खोटा कशाला बोला ?
5 Apr 2011 - 7:06 pm | सूड
नाही कळलं !!
6 Apr 2011 - 12:01 pm | वपाडाव
आम्हीही यांच्याच पंक्तीत बसतोय...
भात कोरडा जात नाहिये वरण वाढा...
ठसके लागतयेत..
5 Apr 2011 - 10:28 pm | सुधीर१३७
अरे, कळ्ळं काय नाय कळ्ळ काय,
......मास्तरांनी फक्त वाचण्यासाठी लिहिलय ...................
........................... समजण्यासाठी नाही..... :wink:
7 Apr 2011 - 8:39 am | शिल्पा ब
बरेच लोक समजलं समजलं करताहेत तर आम्हालापण समजून सांगा काय समजलं ते!!! इथे सगळंच डोक्यावरून गेलं.
8 Apr 2011 - 5:36 am | विजुभाऊ
मास्तर आपण सगळेच खरबुडे असतो.
हाटेलात गेल्यावर उर्दू पद्धतीने ( अगोदर दर आणि नंतर पदार्थाचे नाव ) वाचतो.
खरबुडेपण सोडून द्यायचे ठरवतोय.......बघु कधी जमणार आहे ते
8 Apr 2011 - 9:15 pm | शाहरुख
>>लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला.
पाडवा म्हणजे गुढी पाडवा असणार ;-)
बाकी काही विशेष वाटले नाही.
8 Apr 2011 - 9:38 pm | स्मिता.
हॉटेलमधे फुकटात लिंबू सरबत कसे बनवावे याहून जास्त काहिच कळले नाही :(
ज्यांना कळलंय त्यांनी जरा समजावून सांगा ना.