डीस्काउंट
लेखनप्रकार
११ वर्षाने भेटतोयस. चल जेवायला नेतो तुला. का पाडव्याचे जेवण घरी चे कंपल्शन?
" लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय"
शोध लागला की सांग हा. माय्ला काही बोल्लो की नावाला जागलच पाहीजे का?
----------------------------------------------------------------------------------------चल एसी त बसु.
"नको. महाग असते"
मी बील भरतो, काळजी करु नकोस.
" उगाच कशाला खर्च"?
असु दे.
----------------------------------------------------------------------------------------
काय मागवतोस?
"सगळे महाग आहे रे"
गप ए. मेनु बघ आणि ऑर्डर दे.
" तुला आठवते कारे? कॉलेज मधे जात असताना तु आणि मी चपात्या गुंडाळुन न्यायचो. कँटीन मधे मित्रांच्या सांबार आणि चटणी बरोबर खायचो"
बर मग? त्याचा आजच्या जेवणाशी काय संबंध.
" मी ते कधी विसरु शकतच नाही रे. शाळेतला पहीला मी. कॉलेजमधे हरवलोच बघ. परिस्थिती मुळे इंजिनीयर होउ शकलो नाही. तुझे पण तसेच आहे की. तुला वाईट नाही वाटत?"
नाही. मी काहीही झालो असतो तरी मी आज जे करतो आहे तीथेच परत आलो असतो.
"खरच"?
आयला इतक्या दिवसांनी भेटतो आहेस. वर्षाच्या पहील्या दिवशी झाल का सुरु तुझे. माझे पण बरेच काही हरवले आहे. पण त्याच्या आठवणीत मी माझा आज का वाईट करु?
२००० मधे तुला फार मोठा झटका बसला होता ना? तुझा रिसर्च अपुरा राहीला. आर्थिक पण नुकसान झाले. चुकीच्या पॉलीसी मुळे. किती लाख म्हणाला होतास?
१०० गेले. सोड रे. जेवण मागव. तुला आलु पालक आवडतो ना? मागव.
"१०० रुपये."
आता हाणु का?
----------------------------------------------------------------------------------------
खरबुड्याला शांत करणे आवश्यक होते.
मी दोन मोठे ग्लास भरुन पाणी मागवले.
लोणचे कांदा, लिंबु ट्रे मधले लिंबु ग्लासात पीळले.
थोडेसे मिठ टाकले.
वेटर कडुन थोडीशी साखर मागवली.
झाले लिंबु सरबत तयार.
मेनु वर लिंबु सरबत ला रुपये ३० होते.
खरबुड्याला रेट दाखवला.
आणि खरबुड्या हसला.
----------------------------------------------------------------------------------------
बुट पॉलिश वाल्यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर पॉलिशचे पाचाचे सात केले हे खरबुड्याला कळाले तर?
वाचने
3981
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
थोडसा कळल... जे कळ्ल ते मस्त
खरबुड्या
हम्म्म्म आज एकदम विदाऊट
In reply to हम्म्म्म आज एकदम विदाऊट by परिकथेतील राजकुमार
आयला,
In reply to आयला, by असुर
हे वाचलं का?
In reply to हे वाचलं का? by धमाल मुलगा
अगदी अगदी!!
In reply to अगदी अगदी!! by असुर
ह्हंऽऽ?
:-)
In reply to :-) by सहज
अगदी असच म्हणतो.
मास्तर, आल इज वेल?
In reply to मास्तर, आल इज वेल? by धमाल मुलगा
वेल,
या या, बरं झालं आलात ते,
केवढं आश्चर्य! सगळं समजलं.
क्रिप्टिक नसणे
आपल्याला काय नाय समजला ..
नाही कळलं !!
In reply to नाही कळलं !! by सूड
आम्हीही यांच्याच पंक्तीत
अरे, कळ्ळं काय नाय कळ्ळ काय,
बरेच लोक समजलं समजलं करताहेत
मास्तर आपण सगळेच खरबुडे
>>लग्नाच्या नंतर दोन वर्षात
लिंबू सरबत