✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डीस्काउंट

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 04/05/2011 - 16:32  ·  लेख
लेख
११ वर्षाने भेटतोयस. चल जेवायला नेतो तुला. का पाडव्याचे जेवण घरी चे कंपल्शन? " लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय" शोध लागला की सांग हा. माय्ला काही बोल्लो की नावाला जागलच पाहीजे का? ----------------------------------------------------------------------------------------चल एसी त बसु. "नको. महाग असते" मी बील भरतो, काळजी करु नकोस. " उगाच कशाला खर्च"? असु दे. ---------------------------------------------------------------------------------------- काय मागवतोस? "सगळे महाग आहे रे" गप ए. मेनु बघ आणि ऑर्डर दे. " तुला आठवते कारे? कॉलेज मधे जात असताना तु आणि मी चपात्या गुंडाळुन न्यायचो. कँटीन मधे मित्रांच्या सांबार आणि चटणी बरोबर खायचो" बर मग? त्याचा आजच्या जेवणाशी काय संबंध. " मी ते कधी विसरु शकतच नाही रे. शाळेतला पहीला मी. कॉलेजमधे हरवलोच बघ. परिस्थिती मुळे इंजिनीयर होउ शकलो नाही. तुझे पण तसेच आहे की. तुला वाईट नाही वाटत?" नाही. मी काहीही झालो असतो तरी मी आज जे करतो आहे तीथेच परत आलो असतो. "खरच"? आयला इतक्या दिवसांनी भेटतो आहेस. वर्षाच्या पहील्या दिवशी झाल का सुरु तुझे. माझे पण बरेच काही हरवले आहे. पण त्याच्या आठवणीत मी माझा आज का वाईट करु? २००० मधे तुला फार मोठा झटका बसला होता ना? तुझा रिसर्च अपुरा राहीला. आर्थिक पण नुकसान झाले. चुकीच्या पॉलीसी मुळे. किती लाख म्हणाला होतास? १०० गेले. सोड रे. जेवण मागव. तुला आलु पालक आवडतो ना? मागव. "१०० रुपये." आता हाणु का? ---------------------------------------------------------------------------------------- खरबुड्याला शांत करणे आवश्यक होते. मी दोन मोठे ग्लास भरुन पाणी मागवले. लोणचे कांदा, लिंबु ट्रे मधले लिंबु ग्लासात पीळले. थोडेसे मिठ टाकले. वेटर कडुन थोडीशी साखर मागवली. झाले लिंबु सरबत तयार. मेनु वर लिंबु सरबत ला रुपये ३० होते. खरबुड्याला रेट दाखवला. आणि खरबुड्या हसला. ---------------------------------------------------------------------------------------- बुट पॉलिश वाल्यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर पॉलिशचे पाचाचे सात केले हे खरबुड्याला कळाले तर?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3966 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

थोडसा कळल... जे कळ्ल ते मस्त

पिलीयन रायडर
Tue, 04/05/2011 - 16:45 नवीन
थोडसा कळल... जे कळ्ल ते मस्त होतं....
  • Log in or register to post comments

खरबुड्या

VINODBANKHELE
Tue, 04/05/2011 - 16:50 नवीन
खरबुड्या हसला. ग्रेट प्रभु साहेब हसण्यावर आमच्या कडे १००% डीस्काउंट आहे......
  • Log in or register to post comments

हम्म्म्म आज एकदम विदाऊट

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/05/2011 - 17:02 नवीन
हम्म्म्म आज एकदम विदाऊट क्रिप्टिक ? नविन वर्षात काही लोकांनी बेक्कार बेक्कार संकल्प केलेले दिसतात.
  • Log in or register to post comments

आयला,

असुर
Tue, 04/05/2011 - 18:03 नवीन
आयला, हे विदाऊट क्रिप्टिक होतं काय? आम्हाला वाटला की प्रभूमास्तरांनी आज पाडव्यानिमित्त इतका जोरात क्रिप्टिक लिहीलाय की सगळा म्याटर डोक्यावरुन ग्येला, कायपण कळ्ळा नाय! हे साधं सरळ असेल तर फाऊल धरावा का? --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे वाचलं का?

धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 18:07 नवीन
लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अगदी अगदी!!

असुर
Tue, 04/05/2011 - 18:17 नवीन
अगदी अगदी!! म्हणूनच मला तूच आठवलास! आणि उगाच वाटायला लागलं की प्रभूमास्तरांच्या आजच्या निरुपणाचा विषय धमाल्या तर नै ना! पन परा तर म्हणतोय की सरळसोपे रसाळ किर्तन आहे म्हणून. किती हे कन्फ्युजन!! त्यापेक्षा मास्तरांनी एखादा क्रिप्टिक टाकला असता तर सोपं गेलं असतं! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ह्हंऽऽ?

धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 19:19 नवीन
ह्या भावना एका सुपात असलेल्याच्या, एका जात्यात असलेल्याप्रति आहेत हे लक्षात येतंय. ठीक आहे. याल तुम्हीही पंक्तीत तेव्हा बोलू...कसें????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

:-)

सहज
Tue, 04/05/2011 - 17:32 नवीन
वेल्कम बॅक!! पाडव्यापासुन दिग्गज लोक लिहू लागली आहेत!!! मस्त!
  • Log in or register to post comments

अगदी असच म्हणतो.

गणपा
Tue, 04/05/2011 - 18:28 नवीन
अगदी असच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मास्तर, आल इज वेल?

धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 18:00 नवीन
मास्तर, आल इज वेल?
  • Log in or register to post comments

वेल,

श्रावण मोडक
Tue, 04/05/2011 - 18:21 नवीन
वेल, वेलच आहे. म्हणून तर हे लेखन आलंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

या या, बरं झालं आलात ते,

५० फक्त
Tue, 04/05/2011 - 18:23 नवीन
या या, बरं झालं आलात ते, तुमच्या सारख्यांची कमतरता होती मिपावर.
  • Log in or register to post comments

केवढं आश्चर्य! सगळं समजलं.

रेवती
Tue, 04/05/2011 - 18:44 नवीन
केवढं आश्चर्य! सगळं समजलं.;)
  • Log in or register to post comments

क्रिप्टिक नसणे

चतुरंग
Tue, 04/05/2011 - 18:52 नवीन
म्हणजे मास्तरांचा 'दूसरा' आहे! ;) मला दूसरा समजला! :) -रंगा
  • Log in or register to post comments

आपल्याला काय नाय समजला ..

टारझन
Tue, 04/05/2011 - 19:05 नवीन
आपल्याला काय नाय समजला .. मास्तर च्या लेखाला ना मुंडकं असतंय ना हात पाय :) ते आपण आपले विमॅजिन करायचे असतात . मिपावरचा वाचकवर्ग अलिकडे ते इमॅजिन करतो .. आणि समजले असे करतो :) ते आमाला काय समजला नाय ... ज्याला समजला त्याने व्यनि करणे प्लिज .. खोटा कशाला बोला ?
  • Log in or register to post comments

नाही कळलं !!

सूड
Tue, 04/05/2011 - 19:06 नवीन
नाही कळलं !!
  • Log in or register to post comments

आम्हीही यांच्याच पंक्तीत

वपाडाव
Wed, 04/06/2011 - 12:01 नवीन
आम्हीही यांच्याच पंक्तीत बसतोय... भात कोरडा जात नाहिये वरण वाढा... ठसके लागतयेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे, कळ्ळं काय नाय कळ्ळ काय,

सुधीर१३७
Tue, 04/05/2011 - 22:28 नवीन
अरे, कळ्ळं काय नाय कळ्ळ काय, ......मास्तरांनी फक्त वाचण्यासाठी लिहिलय ................... ........................... समजण्यासाठी नाही..... :wink:
  • Log in or register to post comments

बरेच लोक समजलं समजलं करताहेत

शिल्पा ब
गुरुवार, 04/07/2011 - 08:39 नवीन
बरेच लोक समजलं समजलं करताहेत तर आम्हालापण समजून सांगा काय समजलं ते!!! इथे सगळंच डोक्यावरून गेलं.
  • Log in or register to post comments

मास्तर आपण सगळेच खरबुडे

विजुभाऊ
Fri, 04/08/2011 - 05:36 नवीन
मास्तर आपण सगळेच खरबुडे असतो. हाटेलात गेल्यावर उर्दू पद्धतीने ( अगोदर दर आणि नंतर पदार्थाचे नाव ) वाचतो. खरबुडेपण सोडून द्यायचे ठरवतोय.......बघु कधी जमणार आहे ते
  • Log in or register to post comments

>>लग्नाच्या नंतर दोन वर्षात

शाहरुख
Fri, 04/08/2011 - 21:15 नवीन
>>लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. पाडवा म्हणजे गुढी पाडवा असणार ;-) बाकी काही विशेष वाटले नाही.
  • Log in or register to post comments

लिंबू सरबत

स्मिता.
Fri, 04/08/2011 - 21:38 नवीन
हॉटेलमधे फुकटात लिंबू सरबत कसे बनवावे याहून जास्त काहिच कळले नाही :( ज्यांना कळलंय त्यांनी जरा समजावून सांगा ना.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा