वय

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
17 Mar 2011 - 9:09 pm

वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आपली आई आपल्याला उमजते?
नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा
जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते?
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते?
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई ,
आई न रहाता आपली मुलगी बनते?
आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं?
का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

17 Mar 2011 - 9:16 pm | प्रकाश१११

शुची -फक्त अप्रतिम .!!
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आपली आई आपल्याला उमजते?
नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा
जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते?
एकदम +1

इंटरनेटस्नेही's picture

17 Mar 2011 - 10:00 pm | इंटरनेटस्नेही

ह्म्म विचारप्रर्वतक कविता. छान आहे.

मीली's picture

18 Mar 2011 - 12:24 am | मीली

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते?
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई ,
आई न रहाता आपली मुलगी बनते?
आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं?
का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

ह्या ओळी जास्त भावल्या!

अरुण मनोहर's picture

18 Mar 2011 - 6:02 am | अरुण मनोहर

प्रश्न छान मांडले आहेत.
प्रत्येक प्रश्न अनेक प्रश्नांची झड लावून जातो. उरते शून्य!

नरेशकुमार's picture

18 Mar 2011 - 6:47 am | नरेशकुमार

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई ,
आई न रहाता आपली मुलगी बनते?

स्रुष्टिचक्र बस्स, बाकी काही नाही.
कविता भावली.

विनायक बेलापुरे's picture

18 Mar 2011 - 8:54 am | विनायक बेलापुरे

नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा
जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते?

जगाचा थोडासा अनुभव आल्यावर.

मुलूखावेगळी's picture

18 Mar 2011 - 10:58 am | मुलूखावेगळी

छान ग
प्रत्येक ओळ आवड्ली . अर्थपुर्ण आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2011 - 11:05 am | श्री गावसेना प्रमुख

शुची -जी पिक्चर क्वालीटी छान आहे घेउ का?

शुचि's picture

18 Mar 2011 - 7:19 pm | शुचि

मला हे मन्डल जालावर सापडले. मी श्रेयाव्हेर विसरले. आत्ता संपादित करते.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Mar 2011 - 12:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं?
का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

भन्नाट thought process!!! __/\__

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2011 - 12:42 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं कविता. काही लहान मुलांना आई किंवा वडील गेल्यामुळे अकाली प्रौढत्व आले असे म्हणतात. आता ते चांगले का वाईट हे मला माहीत नाही. पण आम्हाला जाण फार उशीरा आली याचे राहून राहून वाईट वाटते.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Mar 2011 - 12:50 pm | अविनाशकुलकर्णी

खुप सुंदर कविता

भीडस्त's picture

18 Mar 2011 - 5:39 pm | भीडस्त

आवड्लं.

भीडस्त's picture

18 Mar 2011 - 5:46 pm | भीडस्त

कविता आवडली.

यशोधरा's picture

18 Mar 2011 - 5:52 pm | यशोधरा

छान लिहिलंस शुचि. आवडलं.

चित्रा's picture

18 Mar 2011 - 6:41 pm | चित्रा

असेच म्हणते, शुचि. छान लिहीलेस.

पैसा's picture

18 Mar 2011 - 8:09 pm | पैसा

चांगली कविता. आवडली.

अवलिया's picture

18 Mar 2011 - 6:48 pm | अवलिया

फारच छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2011 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फारच छान !

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

18 Mar 2011 - 8:40 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. कविता आवडली.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

प्राजु's picture

18 Mar 2011 - 9:20 pm | प्राजु

छान लिहिले आहेस.. आवडले.

स्पंदना's picture

18 Mar 2011 - 9:37 pm | स्पंदना

अग! आजच एक कविता रुंजते आहे पण वाढत्या वयाबद्दल, अन ही कविता समोर आली? आता थोडा अँगल बदलेल माझ्या कवितेचा.

अरे आवडली कविता हे सांगायच राहुन जात होत बघ.

चतुरंग's picture

19 Mar 2011 - 12:16 am | चतुरंग

वाढत्या वयाबरोबर नात्याच्या येत जाणार्‍या निराळ्या आकलनाबद्दल भावना चांगल्या व्यक्त झाल्या आहेत.

-रंगाकाका

कवितानागेश's picture

19 Mar 2011 - 12:22 am | कवितानागेश

छान.
आवडली.

शुचितै कविता आवडली, पण कविता आणि फोटोचा संबंध नाही समजला, सांगाल का जरा समजावुन. ?

मृगनयनी's picture

19 Mar 2011 - 11:39 am | मृगनयनी

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते?
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई ,
आई न रहाता आपली मुलगी बनते?

हे खूपच टची आहे गं शुची!
छान :)

:)

ज्ञानराम's picture

19 Mar 2011 - 12:11 pm | ज्ञानराम

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात
आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते?
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई ,
आई न रहाता आपली मुलगी बनते?

प्रत्येक ओळ आवडली , पण वरील ओळ्या सर्वात जास्त.......

sneharani's picture

19 Mar 2011 - 12:23 pm | sneharani

चांगली कविता!
:)

वारकरि रशियात's picture

19 Mar 2011 - 12:58 pm | वारकरि रशियात

छान कविता !
अ त्यंत मोजक्या शब्दात भावनेचे प्रकटीकरण

>> का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?
याबद्दल थोडे अधिक स्पष्ट कराल का?

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 2:19 pm | अप्पा जोगळेकर

काही कळलंच नाही. जाउदे. रांगोळी मात्र खूपच छान आहे.

हर्षद प्रभुदेसाई's picture

21 Mar 2011 - 10:30 pm | हर्षद प्रभुदेसाई

खरच अप्रतिम....
शब्दच नाहीत व्यक्त करायला की ही कविता किती आवडली....
फक्त अप्रतिम.......तोडलस.........................