मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वय

शुचि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

वाचने 5168 वाचनखूण प्रतिक्रिया 32

प्रकाश१११ गुरुवार, 03/17/2011 - 21:16
शुची -फक्त अप्रतिम .!! नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? एकदम +1

मीली Fri, 03/18/2011 - 00:24
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं? ह्या ओळी जास्त भावल्या!

अरुण मनोहर Fri, 03/18/2011 - 06:02
प्रश्न छान मांडले आहेत. प्रत्येक प्रश्न अनेक प्रश्नांची झड लावून जातो. उरते शून्य!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

शुचि Fri, 03/18/2011 - 19:19
मला हे मन्डल जालावर सापडले. मी श्रेयाव्हेर विसरले. आत्ता संपादित करते.

मस्तं कविता. काही लहान मुलांना आई किंवा वडील गेल्यामुळे अकाली प्रौढत्व आले असे म्हणतात. आता ते चांगले का वाईट हे मला माहीत नाही. पण आम्हाला जाण फार उशीरा आली याचे राहून राहून वाईट वाटते.

In reply to by चित्रा

पैसा Fri, 03/18/2011 - 20:09
चांगली कविता. आवडली.

स्पंदना Fri, 03/18/2011 - 21:37
अग! आजच एक कविता रुंजते आहे पण वाढत्या वयाबद्दल, अन ही कविता समोर आली? आता थोडा अँगल बदलेल माझ्या कवितेचा. अरे आवडली कविता हे सांगायच राहुन जात होत बघ.

चतुरंग Sat, 03/19/2011 - 00:16
वाढत्या वयाबरोबर नात्याच्या येत जाणार्‍या निराळ्या आकलनाबद्दल भावना चांगल्या व्यक्त झाल्या आहेत. -रंगाकाका

मृगनयनी Sat, 03/19/2011 - 11:39
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? हे खूपच टची आहे गं शुची! छान :) :)

ज्ञानराम Sat, 03/19/2011 - 12:11
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? प्रत्येक ओळ आवडली , पण वरील ओळ्या सर्वात जास्त.......