मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वय

शुचि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
Image removed. वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

वाचन 5164 प्रतिक्रिया 0