आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस.
हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत.
एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील. मात्र हुतात्मा आजाद त्यांच्यावर संतापले आणि म्हणाले की इथे ते स्वतः आले आहेत, त्यांचे आई वडील नाही. जो संबंध असेल तो त्यांच्यापुरता. आणि समजा जर बरे-वाईट झाले तरी आई वडीलांना भेटायची गरज नाही, ते निपुत्तत्रिकांसारखेखे दीवस काढतील, त्यांची चिंता नको. त्यांना इतके रागावलेले पाहुन हुतात्मा भगतसिंह आश्चर्यचकित झाले. मग राग शांत झाल्यावर आजादांनी त्यांना असे समजावले की जर आपण एकमेकांना अशी आपली सर्व माहिती देत राहिलो व एकाकडुन दुसर्याकडे वाच्यता झाली तर गुप्तता कशी राहणार? पकडले गेल्याचे दु:ख नाही पण कार्य अधुरे राहणे त्यांना मान्य नव्हते.
भूमिगत असतना झाशी मुक्कामी एकदा आजादांनी आपले लाडके माउझर पिस्तुल त्यांचे सहकारी भगवानदस माहौर यांना ठेवायल दिले व म्हणाले 'जपून ठेव'. माहौरांना विलक्षण आश्चर्य वाटले. माउझर म्हणजे हुतात्मा आजादांचा जीव की प्राण. ते आपले लाडके पिस्तुल कधीही अंगावरुन दूर करत नसत. आणि आज त्यांनी ते स्वतःच आपल्याला का दिले असावे या विचरात ते असतांना हुतात्मा आजादांनी कारण सांगितले. हुतात्मा आझादांनी बाजारात काही इंग्रज सोजीरांना बाजारात हवेत गोळ्या झाडुन लोकांना धाक दाखवत दंगा केला व बायकां मुलींची छेड्छाड केली आणि ते पाहुन हुतात्मा आजादांचे रक्त खवळले आणि त्यांचा हात आपोआप माउझरवर गेला, मात्र इथे आपले खरे रुप प्रकट झाले तर आपण आणि आपले सर्व सहकारी संकटात सापडतील हे लक्षात घेत त्यांनी गपचुप रस्ता बदलला. मात्र पुन्हा असा प्रसंग घडला आणि ते स्वतःला आवरु शकले नाहीत तर अनर्थ होइल तेव्हा ते टाळण्यासाठी त्यांनी आपला क्रोध आवरुन आपले पिस्तुल माहौरांकडे ठेवायला दिले होते.
दिनांक २७ फेब्रुवारी १९३१ रोजी आल्फ्रेड पार्क येथे झालेल्या शर्थीच्या एकाकी संग्रामात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. हुतात्मा चंद्रशेखर आजाद ८० व्या हौतात्म्यदिनी त्या महान क्रांतिकारकास प्रणाम
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 2:45 am | स्वाती२
आदरांजली!
27 Feb 2011 - 11:33 am | अवलिया
महान क्रांतीकारकास भावपूर्ण आदरांजली !
27 Feb 2011 - 4:28 pm | पैसा
महान क्रांतिकारकाला शतशः प्रणाम!
27 Feb 2011 - 4:41 pm | चिंतामणी
काकोरी कट, सॉन्डर्स वध इत्यादी घटनेचा भागीदार, वयाच्य अवघ्या २५ व्यावर्षी देशासाठी देह ठेवणा-या महान क्रांतीकारकास भावपूर्ण आदरांजली !
27 Feb 2011 - 4:59 pm | निनाद मुक्काम प...
@काकोरी कट, सॉन्डर्स वध इत्यादी घटनेचा भागीदार, वयाच्य अवघ्या २५ व्यावर्षी देशासाठी देह ठेवणा-या महान क्रांतीकारकास भावपूर्ण आदरांजली !
सहमत
''अब तक जिसका खून न खौला खून नाही वो पाणी हे ,जो देश के काम न आये वो बेकार जवानी है''
27 Feb 2011 - 7:19 pm | ramjya
आल्फ्रेड पार्क आज आझाद उद्यान म्हणुन ओळखले जाते....माझी भावपूर्ण आदरांजली
27 Feb 2011 - 9:17 pm | उल्हास
महान क्रांतीकारकास भावपूर्ण आदरांजली !
27 Feb 2011 - 9:31 pm | अनामिका
निर्भिड क्रांतीकारकास भावपूर्ण आदरांजली!
28 Feb 2011 - 1:32 pm | वाहीदा
चंद्रशेखर आझाद यांनी इलाहाबादच्या आल्फ़्रेड पार्क येथे एका इंग्रज अधिकार्र्यावर गोळ्या झाडता झाडता स्वत:वरच गोळी झाडली व मॄत्यूला कवटाळले होते .
स्वातंत्र्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या या साहसी विरांना प्रणाम !!
28 Feb 2011 - 1:20 pm | पुण्याचे वटवाघूळ
आदरांजली
28 Feb 2011 - 1:21 pm | प्राजक्ता पवार
भावपूर्ण आदरांजली !
28 Feb 2011 - 1:43 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रणाम!