एकच प्याला आज रिता झाला- भाग २
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
पहिलीच भेट आपली स्मरते
काळीज त्याच क्षणी विरघळते
अन प्रेमाची उभारी उसळते
एकच प्याला आज रिता झाला॥१४॥
सुगंध दरवळला अत्तराचा
त्यातुन गंध मोगर्याचा
अन उभार तव यौवनाचा
एकच प्याला आज रिता झाला॥१५॥
मग सुरु झाल्या नियमित भेटीगाठी
जुळु लागल्या भविष्यातल्या रेशिमगाठी
आता का प्रेमास तुझी आडकाठी ???
एकच प्याला आज रिता झाला॥१६॥
तुझं ते माझ्यावर रुसणं
गाल फ़ुगवुन रागवुन बसणं
अन त्यावर माझं मिश्किल हसणं
एकच प्याला आज रिता झाला॥१७॥
साजणे लवकर ये मज पाशी
खेळू नकोस असं काळजाशी
राहू नकोस लांब, तू हि अशी
एकच प्याला आज रिता झाला॥१८॥
आज तुझी खुप वाट पाहिली
पण वाट शेवटी रिती राहिली
ती रात्र तुझ्या आठवणीना वाहिली
एकच प्याला आज रिता झाला॥१९॥
क्रमश:
प्रतिक्रिया
15 Feb 2011 - 3:27 pm | गणेशा
कविता छान आहे ..
मात्र "एकच प्याला आज रिता झाला" ही लाईन चपलख पणे सगळी कडे फिट बसलेली नाहिये असे वाटते