धडपडत ठेचकाळत थोडा मोठा झालो
स्पर्धेच्या युगात लढाई लढुन आलो
यशापयशाची गोळा-बेरीज करुन आलो
एकच प्याला आज रिता झाला॥८॥
कॉलेजमधे कट्ट्यावर असायचो चारचौघात
शिट्या मारणे,छेड काढणे व्हायचेच ओघात
त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात
एकच प्याला आज रिता झाला॥९॥
भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात
पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात
एखादी खायचो ही कानशिलात
एकच प्याला आज रिता झाला॥१०॥
आयुष्यात एका वळणावर थांबलो
वाटले इथपर्यंत विनाकारण रांगलो
अरे माझ्या अस्तित्वासाठी झुंजलो
एकच प्याला आज रिता झाला॥११॥
आता स्पर्धा संपली प्रगतीपुस्तकाची
चढाओढ सुरु झाली अस्तित्वाची
किंमत कळली तेव्हा आयुष्याची
एकच प्याला आज रिता झाला॥१२॥
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
क्रमश:
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 3:20 pm | कच्ची कैरी
त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात
एकीच्या कि दोघांच्या ?
भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात
पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात
एखादी खायचो ही कानशिलात
खर सांगा एखादी कि जास्ती ?
शेवटच कडव एकदम मस्त !
11 Feb 2011 - 4:49 pm | मनराव
>>>एकीच्या कि दोघांच्या ? <<<
दोघांच्या..... :o, अरे क.कै. एक ६-७ वर्षा पुर्वी असा काही प्रकार सर्वसामान्य न्हवता...... :P
>>खर सांगा एखादी कि जास्ती ?<<<
एखादीच खाल्ली.....जास्तीच्या भेट म्हणून दिल्या..... :D
12 Feb 2011 - 7:04 am | प्रीत-मोहर
ह्या ह्या ह्या :)
12 Feb 2011 - 12:45 pm | पिवळा डांबिस
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
पण बाटली अजून अर्धी भरलेली आहे...
तोवर काळजी करु नका...
:)