एकच प्याला आज रिता झाला-भाग १

मनराव's picture
मनराव in जे न देखे रवी...
10 Feb 2011 - 10:36 am

मित्रहो,

गेल्या काही दिवसात मी आणि माझा एक मित्र नविन काहीतरी लिहायच्या प्रयत्नात होतो आणि आम्हाला एक पंचलाईन सापडली आणि ती म्हणजे " एकच प्याला आज रिता झाला". मग विचाराना शब्दात बांधुन काहीतरी नविन लिहायचा प्रयत्न केलाय. कितपत जमलं आहे ते तुम्हीच सांगा,पण हे सगळं करताना आम्हा दोघाना फार आनंद मिळाला,आणि तोच आनंद तुम्हाला मिळु शकेल अशी आशा व्यक्त करतो. इथे निदान मुलगे तरी स्वत:ला कुठे ना कुठे तरी ह्या सगळ्याशी "कनेक्ट" करतील हे मात्र नक्कीच. आज पहिला भाग टाकतोय.

आजपर्यंत आपण संगितकार जोडी बघितली,लेखकांचीही जोडी आहे पण गीतकार जोडी आम्ही तरी प्रथमच आमच्याच रुपात बघत आहोत :D. तुम्ही कुणी ऐकली असेल तर आम्हाला ठाऊक नाही.

एकच प्याला आज रिता झाला-भाग १

करतो आयुष्याचे आज मोजमाप
कधी केलं पुण्य कधी केलं पाप
सांगण्यासारखं तुम्हाला आहे अमाप
एकच प्याला आज रिता झाला॥१॥

करितो बालपणापासुन सुरुवात
निरागसता कुटुन भरली त्यात
ती शोधण्या गेली सारी हयात
एकच प्याला आज रिता झाला॥२॥

निरागस चेहर्यात होता खट्याळपणा
वागण्यात होता माझ्या खोड्याळपणा
सगळे म्हणायचे पुरे तुझा नाठाळपणा
एकच प्याला आज रिता झाला॥३॥

वर्गात पहिला नंबर येण्याची
असे कायम इच्छा आईबाबांची
साथीला होती त्यांच्या, नेहमी छडी वेताची
एकच प्याला आज रिता झाला॥४॥

एकीकडे त्यांचा असायचा तो अट्टाहास
मी कसा बसा व्हायचो काठावर पास
त्या दिवसा पुरता घडायचा उपवास
एकच प्याला आज रिता झाला॥५॥

एकदा नमिला मी धाडलं लव-लेटर
तिच्या बापाचा मार पडला लेटर
नमि म्हणाली, "ट्राय अगेन लेटर"
एकच प्याला आज रिता झाला॥६॥

नमि गेली शाळा सोडून दुसर्या गावात
चावट आठवणी तरळल्या डोळ्यात
सारं काही माफ असतं त्या कच्च्या वयात
एकच प्याला आज रिता झाला॥७॥

क्रमश:

मौजमजा

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

10 Feb 2011 - 11:29 am | कच्ची कैरी

पहिला भाग मस्तच जमुन आलाय ,आता दुसर्या भागाची वाट बघेल .
भगवान तुम दोनो की जोडी सलामत रखे !

गणेशा's picture

10 Feb 2011 - 1:37 pm | गणेशा

येवुद्या आनखिन

विद्याधर३१'s picture

11 Feb 2011 - 11:46 am | विद्याधर३१

छान आहे कविता......

पु, भा. प्र.

प्रीत-मोहर's picture

11 Feb 2011 - 12:54 pm | प्रीत-मोहर

मस्त रे ...:)

sneharani's picture

11 Feb 2011 - 1:22 pm | sneharani

छान कविता!