मैत्रीमधे वजाबाकी
दोषांची करावी
मैत्रीमधे बेरीज ती
गुणांची करावी
मैत्रीत हवा गुणाकार
मैत्रीत नको भागाकार
मैत्रीच्या गणितांमधे
शून्याला नकोच आधार !
खेळता खेळता आकड्यांनी
मैत्रीचे धागे विणावे
विणता विणता धाग्यांनी
जाळे सुंदरसे बनवावे
मैत्रीच्या जाळ्यात
खूप खूप गुरफटावे
मैत्रीचे नंतर गणित
आयुष्यात ना सुटावे !!
प्रतिक्रिया
13 Feb 2011 - 12:40 pm | नरेशकुमार
मस्त. नाहीतरी मुक्ती कोनाला हवी आहे इथे ?
गुरफटलेला णकु.
13 Feb 2011 - 1:03 pm | विजय ढगे.
खुपच छान मित्रा..
16 Feb 2011 - 9:52 am | प्रकाश१११
मैत्रीमधे वजाबाकी
दोषांची करावी
मैत्रीमधे बेरीज ती
गुणांची करावी
मैत्रीत हवा गुणाकार
मैत्रीत नको भागाकार
वा ...मस्त !!