कामापुरता नर

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
11 Feb 2011 - 1:28 pm

एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय?
कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा. तिने हल्लाबोल केल्यावर तो प्रतिकार करूच शकत नाही. जिच्याशी समागम झाला तीच त्याची वैरीण होते, भक्षक होते. त्या अल्प बळाच्या कोळ्याला काही सेकंदात गट्टम करून टाकते. खरे तर त्या नराचा जन्मच फक्त फलन कार्यासाठी झालेला असतो. त्याचे आयुष्य एखादी मादी भेटली की काही क्षणांचेच उरते. ते माहीत असूनही तो नर निसर्ग नियमानुसार तिच्याशी रत होऊन केवळ वंश वृद्धीसाठीसाठी बलिदान देतो.
वाघ, चित्ता, बिबट्या यांच्या माद्या पंधरा ते वीस वर्षे जगतात, नर मात्र फार फार तर पाच ते दहा वर्षेच तगू शकतात. एकदा का पिल्ले झाली की माद्यांच्या दृष्टीने नर अडगळ बनून राहतात. मग त्या आपल्या बछड्यांना, छाव्यांना वाढवण्यातच मश्गुल होतात. पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते. ते भटकत राहतात. नरांचे ‘उमेदीचे’ वय गेले की त्यांना कोणतीच मादी पुसत नाही. मग मात्र त्यांची उपासमार होऊन ते मृत्युपंथाला लागतात.
वरील उदाहरणे काय दर्शवितात? माद्यांचा आपमतलबीपणा, स्वतःचा स्वार्थ, मी अन् माझी पिलावळ, आत्मोन्नती, अहंभाव किंवा नराला दुय्यम ठरवण्याची आंतरिक प्रेरणा. आपण भले, आपले पोटाचे गोळे भले अन् आपली जिंदगी भली. हीच ती आत्मसंतुष्टता. नराचे तिकडे काहीही वाईट झाले तरी आपण कशाचेच देणे घेणे लागत नाहीत अशी माद्यांची एकंदर पद्धत दिसून येते.
मनुष्य प्राण्याच्या बाबतीत असे घडते का? नर केवळ ‘कामा’पुरताच वापरला जातो का?
उत्तर नक्कीच होय येऊ शकते. परंतु त्या ‘कामा’चा इथे अर्थार्थी फारसा संबंध आढळत नाही. इथे मुले बाळे झाल्यावर चित्तरकथा घडतांना दिसते. इथे वेगळ्याच कामासाठी नराचा उपयोग करून घेतला जातो. एकदा का मुले झाली की नराच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागतेच, लावले जाते, काही नर आपोआप ते जोखड अंगावर वागविण्याचे स्वीकारतात.
पुढील काही प्रश्न उपस्थित केल्यास भयंकर उत्तर मिळू शकते...
‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का?
‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का? किंवा मग अमूक तमूक मिळेपर्यंत ‘जवळ’ यायचे नाही असे प्रेमळपणे(?) धमकावून त्याची संयम परीक्षा घेतली जाते?
‘मुलं झाली की दोघांत अंतर पडतं, ती तिच्या मूल संवर्धनाच्या कार्यात व्यग्र होते तर तो त्याच्या बिझनेसमध्ये अधिक लक्ष घालू लागतो.’ ही वाक्ये दोहरून नक्की काय साध्य करायचे असते? स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय समजायचं? स्त्रियांची मनमानी की पुरुषांविरुध्द रचलेले षडयंत्र? स्त्री-मुक्ती चळवळीची उद्दिष्ट्ये कुणाच्या फायद्याची ठरतात?
मान्य आहे अबलेला आजवर फार सोसावं लागलंय. पुरुषी वर्चस्वाचं जोखड तिनं आजवर पेललं आहे. आज ती जाचक बंधन ती झुगारु पाहतेय ही स्तुत्य गोष्ट जरूर आहेच. तिलाही तिचं विश्व मनासारखं जगू द्यायलाच पाहिजे. परंतु हा सूड ठरता काम नये. स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषाला तुरुंगवास नसावा. तिलाही मन आहे, भावना आहेत. म्हणजे तिनं वाट्टेल तसे वागावे का? तिनं तिचं अवकाश प्राप्त करणं म्हणजे नरावर मादीचा वरचढपणा ठरतो काय?
किंवा उपरोक्त काही सत्य घटनांचा बारीक निरीक्षणांती योग्य अन्वयार्थ लावून आद्य मानवाने निसर्गातील नराची कामापुरती गोष्ट ध्यानात घेतली असेल का? आपल्याला तसे काही भोगावे लागू नये यासाठीच त्याने पुरुष प्रधानता जाणून बुजून प्रसृत केली असावी का? असे असेल तर स्त्रीच्या नैसर्गिक स्वभावातील ज्वालामुखी आत्ता या घडीला धुमसून उफाळला असेल का? पूर्वी पतीला परमेश्वर मानणाऱ्या स्त्रिया आता पुरुषाला नोकरासारखे वागवून घेतांना का आढळतात? यामागे तिने दमन केलेली उपरोक्त माद्यांचीच नैसर्गिक प्रेरणा असू शकते का?
काही कळायला मार्ग नाही...
("भिन्नावतरण" मधून..)

जीवनमानविचारलेखवाद

प्रतिक्रिया

टारझन's picture

11 Feb 2011 - 1:34 pm | टारझन

"अखिल अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा " च्या सदस्यांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक :)
गेला बाजार युयुस्तुंचा पण प्रतिसाव वाचण्यास थोडा उत्सुक :)

ऑनेस्टली पहायला गेलं तर लेखातले बरेच मुद्दे खरेही आहेत :) पण आता महिला मुक्ती मोर्चा कसे उत्तर देतो ते पहाणे रोचक ठरेल . . :) चला .. आज च्या टाइमपासाची सोय झाली ; )

जाता जाता : तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली हो :)

- संबंध तोडक

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 1:58 pm | नगरीनिरंजन

पाशवी शक्तीला आव्हान देणारे मुद्दे मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा :-)
आजकाल माजलेल्या विवाहसंस्थेबद्दल बरेच नासूर निघू लागलेले आहेत असे समाजजीवनाचा आरसा असलेल्या मिपावरच्या काही लेखांवरून दिसून येते. स्त्री स्वतंत्र झाल्यामुळे पुरुषांच्या पोटात दुखतंय की स्त्रीमुक्तीची भाषणं ऐकून खरे गुलाम आपणच हे पुरुषांच्या लक्षात आलंय यावर छान वाद झडावा अशी अपेक्षा. :-)

स्पंदना's picture

11 Feb 2011 - 2:01 pm | स्पंदना

नगराचे निरंजन शेकोटीला आलेऽऽऽऽ

टारझन's picture

11 Feb 2011 - 2:12 pm | टारझन

आत्ता गं बया ?? ?

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 1:44 pm | मुलूखावेगळी

‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का?
‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का?

ज्याना नुसती मज्जाच हवीये त्यानी लग्न न करता लिव्ह इन रिलेशन हा ओप्शन निवडला पाहिजे
हे प्रश्न तुमचेच का तुमच्या मागच्या लेखातील मित्राचे?
- कंपाउंडर आराम पावटे

स्पंदना's picture

11 Feb 2011 - 1:45 pm | स्पंदना

अय्य्या! तुम्ही डिस्कव्हरी बघता? तुमच्या कडे केबल टीव्ही आहे? मग त्या डिस्कव्हरी वा अ‍ॅनिमल प्लानेट मध्ये तुम्ही 'सी-हॉर्स ' ची मादी त्याच्या झोळीत अंडी टाकुन निघुन जाते हे नाही बघीतल?

मी तर बाबा आम्च्या 'नरावर??????'(काय भयानक शब्द आहे हा! घाम आला मला लिहिताना) खुप खुप ... करते. आणी अम्ही चिमणा चिमणीच्या धर्तीवर दोघे मिळुन घर चालवतो.

मला तुमच फार वाईट वाटत हो 'दिवटे' तुम्ही तर एक सोडुन बर्‍याच जणींना तारखे सकट सर्व करता ना? अर्थात हे तुम्च्या मागिल लेखावरुन.

बाकि बर्‍याच प्रतिसादांच्या अपेक्षेत असाल नाही तुम्ही?

कै च्या कै
तुम्हाला सासुरवास आहेव(पत्निचा)
कळ्ळ, भा.पो.
बाकि सगळ्या महिलाना एका पारड्यात तोलन्याचि चुक करु नका ह!
" नारि आहेत कोमल ,नाहित अत्याचारि"
"तुम्हि का काधताय घरातलि (वय्क्तिक)समस्या चव्हटयावरि"

असो.............................

गणेशा's picture

11 Feb 2011 - 2:08 pm | गणेशा

लेख आवडला ....
मस्त लिहिले आहे.
१-२ मुद्दे सोडले तर सगळे पटते आहे.

मला तर कधी कधी वाटते
स्त्री -मुक्ती मोर्चा म्हणजे मुक्त असलेल्या स्त्रीयांनी त्या कश्या मुक्त नाहिये हे ठासुन सांगणे ...

जोक अपार्ट ..
स्त्री आता मुक्त आहे, तीच्या विचारांना स्वतंत्रता मिळाली आहे..
मी माझ्या अनुभवावरुन लिहितो आहे, माझय घरात .. मित्र मैत्रीणीमध्ये पाहुन मला जाणवते की आम्ही सर्वानुमते मते घेत आहे, सर्वांच्या स्वतंत्रेला स्विकार करतो आहे..
परंतु अशी गोष्ट असली तरी स्त्रीकदुन उत्तरे येतात गावाकडे बघा.. तिकडे काय चालु आहे..

गावाकडची परिस्थीती बदलते आहे, नवरा शेतात --कारुकुनी मधेय राबतो आहे, महिलांना ही त्यांच्या पेक्शा जास्त जोखमीची कामे .. स्वयपाक मुले सुद्धा पहावे लागत आहे..
पण म्हणुन स्त्री ला हलकी कामे देने बंद झाले आहे,
अबला म्हणुन तीच्यावर अत्याचार बंद झाला आहे.
आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.

परंतु पुरुषांचे म्हणने ही ऐकुन घेतले पाहिजे .. उद्या राणीने राजाला दास केले नाही म्हणजे मिळवले अशीही परिस्थीती निर्मान होत आहे...
कोणी पुरुषाने मुद्दे मांडले की .. तुमची बायको त्रास देत असेल .. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल अशी जर उत्तरे येत असतील तर अवघड आहे.. मग अशी उत्तरे येत असतना तो पुरुषच बिच्चारा अबला टाईप वाटु लागत नाहिये का ?

स्त्रीयांनी ज्या जखडलेल्या स्त्रीया आहेत त्यांच्या साठी मुक्तीमोर्चा जरुर काढावा .. पण म्हणुन समस्त पुरुष जातच अशी आहे असे नाही.
या उलट पुरुषांनी ही समस्त स्त्री विषयी जाहिर बोलु नये ... नाहितर पुरुष मोर्चा तर त्याला त्याच्या प्रतिष्ठे खातर काढता येत नाहिच .. पण बंधनात जखडलेल्याला आनखिनच टोच दिले जातात.

हे माझे प्रामाणिक मत

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार

आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.

+ १ सहमत आहे.
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.

वानर

आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.

+ १ बरोबर आहे,

म्हणुनच मग अत्याचार पिडीत पुरुष पुढे येतच नाहि .. एकत्र तर डोंबल्याचा होतोय मग तो.
आणि मग अत्याचार करणार्या पुरुषांची उदाहरणे घेवुन अत्याचार पिडीत स्त्रीयांसाठी स्त्री मुक्ती मोर्चा धावुन येतो..
बिच्चारे अत्याचार पिडीत पुरुष तसेच गप्प गार असतात आपल्या घरात ..
आणि जो अत्याचार करतो त्याला काही होत नाही पण जो पुरुष सहन करतो त्यालाच ह्या मुक्ती मोर्चाचा जास्त धसका लागुन राहतो ना भाउ..
आमच्या बाबतीत पण असेच होणार आहे असे वाटुन राहिले ना आता.

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 2:28 pm | मुलूखावेगळी

जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.

हे पटले
पण हे महिलाना पण लागु
मेल्या नंतर मिळते तीच - मुक्ती असे मानणारी.
हा शब्दच सर्व वादाचे कारण आहे .
मुळात घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणुन ठेवल्या तर त्यचे असेच भजे होनार

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 2:11 pm | आजानुकर्ण

छान. चांगला लेख. सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.

टारझन's picture

11 Feb 2011 - 2:18 pm | टारझन

सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.

अरे लेका हे तर वैश्विक सत्य :) णव्हे , ब्रम्हज्ञाण आहे .. .असं एका लायणित सांगितलंस :)

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 2:21 pm | आजानुकर्ण

हॅ हॅ हॅ

निवांत पोपट's picture

11 Feb 2011 - 2:33 pm | निवांत पोपट

पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते
हे काय घेऊन बसला,विंचवाची मादी तर काम झाल्यावर नर विंचवालाच खाऊन टाकते म्हणे!

पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते

मादीने त्याला शिकार मिळते की नाही याची काळजी का करावी? "काम" करण्याएवढा मोठा टोणगा झालाय ना? मग शिकार पण स्वतःची स्वतः कर..पण नाही....आयते गिळायची सवय लागली की असे होते!

योगप्रभू's picture

11 Feb 2011 - 2:44 pm | योगप्रभू

पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’

अरे देवा! यात जाच काय वाटायचा? उलट चांगली संधी आली की शहाण्या माणसाने ती सोडू नये. अशी कामे आपुलकीने करत जावीत. सब्र का फल ऑलवेज मीठा होता है. त्यातून या सेवेचा वैताग येत असेल तरीही चेहर्‍यावरचा आनंद आणि उत्साह मावळू देऊ नये. लक्षात ठेवा. प्रतिपक्ष तुम्हाला जोखत असतो. काम तुम्हाला आवडंतय असं दिसलं की बॉस काही दिवसांनी आपणहून ते सांगायचे बंद करतो.

तीच गोष्ट बाहेर पिटाळले जाण्याची. सारखे काय घरात बसून राह्यचे? बाहेर जावे. हिरवळ - फुलांचे ताटवे बघावेत. निसर्गाच्या समृद्धीचे कौतुक करावे. साधी कोपर्‍यावरुन कोथिंबीर आणायला सांगितली तरी चांगले अर्ध्या-पाऊण तासाने घरी परत जावे. उशिराचे कारण विचारले तर शाळा-कॉलेजमधील मैत्रिण भेटली होती, असे बिनधास्त सांगून टाकावे. प्रतिपक्षाला टेन्शन द्यायचे असल्यास काही वाक्ये मधून-अधून सहजपणे फेकावीत. जसे.
१) मला मुलांची खूप आवड आहे. मुले म्हणजे देवाची फुले.
२) तुझी मैत्रिण शर्वरी दिसली नाही गं बरेच दिवसात?
३) मित्रांना पार्टी द्यायचीय घरी. कधी जमवावं बरं
४) पेरेंट्स मीटिंगमध्ये प्राजक्ताची मम्मी खूप छान बोलली.
५) सोने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हिर्‍याला तर रीसेल व्हॅल्यूच नाही.
६) पेट्रोल, टोल या खर्चाचा विचार करता घरच्या गाडीपेक्षा एस. टी. परवडतेय. (सासुरवाडीला जाताना हे वाक्य हमखास म्हणावे)

भडकमकर मास्तर's picture

11 Feb 2011 - 2:48 pm | भडकमकर मास्तर

वा... सूपर उत्तर...
आवल्डे....

चिगो's picture

11 Feb 2011 - 4:58 pm | चिगो

ब्बोत बढीया... आवडले. वेळ आल्यावर (आलीच तर) वापरायला बरं आहे..

(अद्याप वेळ न आलेला) चिगो

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 2:44 pm | llपुण्याचे पेशवेll

वा! जाणकार लेखक व जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचून असे वाटू लागले आहे की माझा लग्नं न करण्याचा निर्णय योग्य आहे. अगदीच वाटलं एखाद्या वेळेला तर एखाद्या मुक्त स्त्री शी मैत्री करायची.
(ब्रम्हचारी) पेशवे

टारझन's picture

11 Feb 2011 - 3:02 pm | टारझन

श्री पेशवे , तुम्हाला (ब्राम्हचारी ) अपेक्षित आहे की ( अविवाहीत ) ? नाही मुक्त स्त्री शी मैत्रीचे विचार घोळवताहात म्हणुन विचारले .. बाकीकैनै :)

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 3:13 pm | llपुण्याचे पेशवेll

ब्रम्हचारी हे सध्याचे स्टेटस आहे. आणि भावनांना आवर घालता आला तर पुढेही तसेच राहील. :)
नाही जमलं तर मुक्त मैत्रिणीच्या योगे अविवाहीत होऊन राहीन. असो.

टारझन's picture

11 Feb 2011 - 3:17 pm | टारझन

पुपे , तुमच्यात चांगलं जगण्याची ताकद दिसली :)

- सिंगल लोदक

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्हाला जिथे जिथे जिद्दी लोक दिसतात तिथून आम्ही लगेच जगण्याची ताकद घेतो.
-खाईन (हत्तीछाप) अस्सल पंढरपुरी

टारझन's picture

11 Feb 2011 - 3:29 pm | टारझन

हाहाहाहाहा... लय भारी. त्यांची जिद्द आणि तुम्हाला लगेच आलेली ताकद. आवडेश...

- जिंदगी हुडक

कवितानागेश's picture

11 Feb 2011 - 2:56 pm | कवितानागेश

'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता असते' असे कुठेतरी वाचले होते मी.

( अवांतरःकृपया क्षण कोण आणि अनंतकाल कोण असे कुजके प्रश्न इथे गंभीर चर्चेत विचारु नयेत.)

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर वाक्य अत्र्यांच्या एका नाटकातले होते असे वाचल्याचे स्मरते.

अप्पा जोगळेकर's picture

12 Feb 2011 - 10:23 am | अप्पा जोगळेकर

उदयाचा संसार किंवा घराबाहेर मधलं वाक्य आहे.

मदनबाण's picture

11 Feb 2011 - 3:07 pm | मदनबाण

ह्म्म... वर काही प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत्,त्यामुळेच टंकण्याचे कष्ट घ्यावेसे वाटले... ;)

१) सिंह - सिंहीण == सुंदर कोण ? === सिंह !!! ( आयाळ ही त्याची शान, आता सिंहीण टकली असते असे म्हणायचे काय ? ;) असो... )
२) मोर - लांडोर == सुंदर कोण ? === मोर ( पिसारा फुलवुन्... नाचुन दाखवणारा तोच. ;) )
३) कुठलाही इतर पक्षी घ्या... त्यात नर आणि मादा यांची तुलना करा... त्यात बहुधा नरच सुंदर सापडेल. (मादीच काम नराने बनवलेल्या घराचे सर्व्हे इं करणे असे असते... ;) )

आता मला काय वाटतं बरं....

-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
इतर सर्व प्राण्यांमधे मादी इतकी सुंदर नसताना... मायला मनुष्य प्राण्याच्या निर्मीतीतच झोल कसा बरं झाला ? ;)
मोठे मोठ्या ॠषी मुनींची विकेट सुद्धा रंभा-उर्वशीच्या काही ठुमक्यातच उडाली होती म्हणे !!!
असो... तुम्हाला माझा मुद्दा समजलाच असेल... ;)

नारायण !!! नारायण !!! ;)

बाकी चालु द्या...

टारझन's picture

11 Feb 2011 - 3:10 pm | टारझन

बरोबर आहे मदन्याचं ,... कुत्रा आणि कुत्री मधे सुद्धा कुत्रा कसा डौलदार किंवा राजबिंडा वगैरे दिसतो ... याउलट कुत्री म्हणजे पोट बाहेर निघालेली , विचित्र चाल असलेली , अजिबात चमक नसलेली ... पळायला लागली की तिची सडं सुद्धा अशी डावीउजवीकडे हलतात .. इइइइइइइइइइइ ... फार वाईट .. :)

योगप्रभू's picture

11 Feb 2011 - 3:44 pm | योगप्रभू

टारुशेठ,
हलके-फुलके विनोद करण्याऐवजी इतका घाणेरडा प्रतिसाद का हो दिलात?

.. इइइइइइइइइइइ ... फार वाईट ..

गणेशा's picture

11 Feb 2011 - 3:28 pm | गणेशा

मदनबाण आणि टारझन
आपल्या रिप्लायमुळे मनसोक्त हसुन घेतले

मस्त रिप्लाय्ज

चर्चा अपेक्षेप्रमाणे योग्य मार्गावर असल्याचे पाहून डॉ. दिवटेंचे 'झेंडे' अटकेपार लागले असतील....

हॅहॅहॅ

माझं मतः

सध्ध्या मि.पा. वर सारखे हे "स्त्री विरुद्ध पुरूष" अशा चर्चा का चालू आहेत. नीट डोळे उघडून पहा, समाजात अजूनही ७०/८० % कुटूंबात काय चालले आहे, रोज पेपर मध्ये आपण वाचतच असतो, स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, दारूसाठी किंवा माहेराहून पैसे आणण्यासाठी केला जाणारा छळ/खून, स्त्री भ्रूण हत्या, समाजात वावरताना दिवसेंदिवस वाढत जाणारी स्त्री ला वाटणारी असुरक्षितता असे असंख्य इश्यू आहेत. एकदा खरचं या गोष्टीचे चिंतन-मनन नक्की करा. या अत्याचारग्रस्त, भयग्रस्त महिलांना आपली आई-बहिण समजून त्यांची दु:ख समजून घ्या. आणि आपण सर्व सुशिक्षित/सुविचारी स्त्री-पुरूषांनी एकत्र येउन त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते काही तरी करू या.
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
या आपल्या भांडणात ज्या ८०/९० % स्त्रियांना थोडा तरी न्याय मिळण्याची, त्यांच्या समस्यांवर उत्तरं मिळण्याची आवश्यकता आहे त्यांचे प्रश्न दुर्ल़क्षिले जात आहेत. At least त्यांना तरी स्त्री-(छळ)-मुक्ती ची आवश्यकता आहे हे मान्य आहे की नाही. आणि ही मुक्ती त्यांच्यासाठी करणार कोण हा प्रश्न सोडवला पाहिजे.

-----------------------------------------------------------------------------------------

आणि राहिली गोष्ट शिकले सवरलेल्या/ अर्थार्जन करणार्‍या/ स्त्री-मुक्ती हवी म्हणणार्‍या स्त्रियांची. त्यांची तरी काय अपेक्षा आहे. खूप साधी अपेक्षा आहे हो. यापैकी कोणत्याही स्त्रीला आता पुरुषांनी गुलामगिरी करावी, आता फक्त स्त्रियांचेच ऐकले जावे / त्यांची हुकूमशाही चालावी असं वाटतं नसावं.
मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे.
संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे.
दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी असं जर शिकल्या सवरलेल्या आणि म्हणून विचार करू शकणार्‍या मुलींना/स्त्रियांना वाटलं तर त्यात काय चूक आहे हे कोणी सांगू शकेल का.

-----------------------------------------------------------------------------------------

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 3:43 pm | आजानुकर्ण

सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.

सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.

शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.

Pearl's picture

11 Feb 2011 - 3:57 pm | Pearl

मी काय म्हणते आहे ते समजून घ्या

मी असामान्य हा शब्द वापरला नव्हता.
सामान्य चा अर्थ अशिक्षित असा घेउ नये.
जाउ दे.

माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या महिलांना मदतीची गरज आहे, ज्यांचा शारिरीक /मानसिक छळ होत आहे अशा ९०% महिला. हवं तर आकडेवारीत जाउ नका. तो माझा अंदाज आहे. पण शब्दांचा किस पाडण्याऐवजी मुद्दा लक्षात घ्या. विरोधासाठी विरोध करू नका ही विनंती.

>> भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 3:59 pm | आजानुकर्ण

मुळात ज्यांचा छळ होतो आहे त्यांचे तौलनिक संख्याबळच माहीत नसेल तर मदतीची गरज स्त्रियांना आहे की पुरूषांना हे अगोदरच कसे ठरवता येईल?

आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.

मान्य. अशिक्षित बायकांना अधिक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असतो हे निरीक्षण आहे.

आजानुकर्ण,

तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे.

कारण झोपलेल्याला जागं करणं शक्य असतं. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अशक्य असतं.

टारझन's picture

11 Feb 2011 - 4:07 pm | टारझन

पण मी तर आज डब्ब्यात शिंगुळ्याची भाजी आणि णाचणीची भाकरी आणली होती ...

- हार्बर

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 4:17 pm | आजानुकर्ण

गुरूजीः मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ?
राजूः १६
गुरूजीः कसे काय?
राजूः कारण मी आज डब्यात पोहे आणले आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

12 Feb 2011 - 9:11 pm | अप्पा जोगळेकर

फ्लॅटचे भाव कैच्या कैच वाढलेत राव.

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 4:09 pm | मुलूखावेगळी

सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.

सुशिक्षित आनि निरक्षर ह्याचा इथे काही संबंधित नाहीय.
घरी कामवाली नाही आलि तर सुशिक्षित असो निरक्षर असो बाईलाच फरक पडतो.
कोनता शिक्षित, निरक्षर नर घरी लवकर येतो अशा वेळेस?तुम्ही तरी येता का हो?
फक्त जोक्स मधेच नर भांडे घासतो
तुम्ही तरी येता का हो? ते अपेक्षित आहे असेही नाहीये.
पण हा फरक अजुनही आहे हे मान्य करायची पन तयारी नसते हा मुद्दा आहे.

शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.

अशा टवाळक्या आनि हा विषय रवंथ करुन परिस्थितीत कधीच बदल होत नाही.

Pearl's picture

11 Feb 2011 - 4:14 pm | Pearl

>>शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.

'मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया' असं मी कधीच म्हणाले नव्हते. ''मिपावर भांडत बसलेले आपण शिकले सवरलेले स्त्रि-पुरूष' असच मला म्हणायचं होतं. तरीही लोकं सोयीनुसार अर्थ काढतात हे पाहून खेद वाटला

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 4:15 pm | आजानुकर्ण

स्त्री-पुरूष असा उल्लेख केल्यावर त्यात स्त्रिया येत नाहीत काय? मिपावरील काही पुरूष मला असामान्य वाटतात. धनंजय, रामदास, गणपा ही वानगीदाखल काही उदाहरणे. त्यातुलनेत मिपावरील स्त्रियांचे विशेष कर्तृत्त्व पाहावयास मिळाले नसल्याने मी मिपावरील स्त्रिया असामान्य वाटत नाहीत असे म्हटले.

गणेशा's picture

11 Feb 2011 - 3:45 pm | गणेशा

मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे.
संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे.
दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी .

हे एकदम बरोबर आहे ...

समस्त समाजातील स्त्रीयांचा नाहि पण निदान स्वताच्या बायकोबद्दल असे विचार प्रत्येकाच्या मनात आले पाहिजे हे मनापासुन वाटते ..
आपोआप समाज सुधारेल.

मला मात्र आनखिन वेगळाच प्रश्न विचारायचा आहे,
पण हा धागा योग्य वाटत नाहि त्यासाठी.

बघु चर्चासत्रात काढावे म्हणतो धागा.. बघु ..
पण तो स्त्री समानतेविषयीच आहे. पण वेगळाच आहे ..
काधतोच शक्यतो..
वाद होनार नाही याची काळजी घेतो

सूर्यपुत्र's picture

11 Feb 2011 - 7:33 pm | सूर्यपुत्र

>>ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.

आपल्यातील एनर्जी नीट चॅनेलाईज कशी करायची, हे नीट न उमजल्याने आपल्यातील शक्त्तीचे नक्की काय करावे, हे न कळाल्याने स्त्री-पुरुष आपापसात भांडत असावेत. मग या जास्तीच्या शक्तिला काहीतरी वाट करून द्यावी, या उद्देशाने एकमेकांना डॉमिनेट करणे चालू होते.(?)
आपल्यातील शक्तीचे जर नीटपणे नियमन आपल्याला जमले तर आपण भांडणार नाही का?
आणि हे चॅनेलायजेशन आपण कसे करु शकू?
(किंवा हे चॅनेलायजेशन करण्यासाठीच स्त्री-पुरुष एकत्र येत असावेत का??)

-सूर्यपुत्र.

गोगोल's picture

11 Feb 2011 - 5:06 pm | गोगोल

टी आर पी खूपच वाढलेला आहे. मिपा ची नसच सापडलिये जणू.

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 5:09 pm | आजानुकर्ण

नाडी हा शब्द योग्य असावा.

गोगोल's picture

11 Feb 2011 - 5:12 pm | गोगोल

हे पावटे हायेत राव .. ओक नव्हं.

शिल्पा ब's picture

11 Feb 2011 - 11:36 pm | शिल्पा ब

म्हणजे बायकांनी घरातली कामं करायची, बाहेरची करायची, हापिसात जायचं, पोरं काढायची अन सांभाळायची, नवर्याच्या घरातल्या लोकांना सांभाळून घ्यायचं आणि हा टग्या मात्र हापिसात पाट्या टाकून जसं काय जग जिंकून आलाय या अविर्भावात घरात वागणार? केली जरा कामं तर काय भोकं पडणारेत का? आणि स्वताच्याच घरत मदत करणार ना? वर तोंड करून अशे लेख / प्रतिक्रिया लिहिणार!!!

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 11:52 pm | आजानुकर्ण

पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना. सामान्यतः ज्या घरातल्या बायका हापिसात जातात त्या घरात घरकामाला बाया असतात असे वाटते. त्यामुळे घरातली नक्की कोणती कामे बायका करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक बायकांची हापिसातली नोकरी ही जोडधंदा स्वरूपातली असते. बहुतेक नोकऱ्यांमध्ये (भेदभावपूर्वक प्राधान्य देणारे जाचक नियम व अटी यांमुळे) धोकादायक स्वरुपाची, किंवा अधिक ताण निर्माण करणारी कामे बायकांना दिली जात नाहीत. हापिसात उशीरापर्यंत राबणारे बहुदा पुरूषच असतात. अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात. त्यामुळे पुरूष हापिसात पाट्या टाकतात याला काही आधार नसावा.

पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना....लेख सोडला तर..

पैसा's picture

12 Feb 2011 - 12:02 am | पैसा

शि बै! अगदीच पाशवी प्रतिसाद!
(मला एक शंका आहे, अजूनपर्यंत युयुत्सु नी या धाग्यावर काही अमूल्य भर घातली नाही. ते दुसर्‍या कोणत्या डु आयडीने तर लिहित नाहीत ना?)

एखादं महाभारतातलं नाव घेऊन तर नाही ना वावरत ते? आजकाल काय सांगता येतंय!!

अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात
हम्म...
वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत.
काहीकाही बायका तर लंच टाईमला बिले भरणे, पत्रं लिहिणे, सामानाच्या याद्या यामध्ये वेळ वाया घालवतात.
नवर्‍याच्या शर्टाचे तुटलेले बटण असो वा पाळणाघरातून उचलायचे मूल असो.....कसल्या फालतू काळज्या.

अजाणुकर्ण आणि रेवती शी सहमत. प्रतिसादांमुळे ज्ञाणात मोलाची भर पडली ... अजुन येऊन द्यात :)

आजानुकर्ण's picture

12 Feb 2011 - 9:40 am | आजानुकर्ण

वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत.

पुण्यात अनेक बायका नियमितपणे हे करताना दिसतात. त्यामुळे केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. बिले भरणे वगैरे कामे तर माझ्या माहितीत पुरुष कामगारच करतात. बहुतेक वेळा पैसेही त्यांचेच असतात ;). माझ्या तीनचार कंपन्यांमधील मित्रांशी या विषयावर माझी नियमित चर्चा होते. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनाकडून अनौपचारिक सूचना आल्या होत्या की स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर कार्यालयात थांबवू नये. थांबवल्यास त्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी त्यांच्या सुपरवायझरची आहे. त्यामुळे झक मारत पुरूष कामगारांनाच सर्व वेळा उशीरापर्यंत थांबावे लागते. मात्र कामात भेदभाव केला तरी पगारामध्ये असा भेदभाव करून चालत नाही. :)

शिल्पा ब's picture

12 Feb 2011 - 9:49 am | शिल्पा ब

उशीरा थांबले तर ते फुकटात का?
आणि
<<केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. याचा अर्थच समजला नाही...कोणी असा दावा केलाय जरा दाखवुन द्या बरं..बाकी हापिसात बायकांना त्यांचे घरकाम पूर्ण करण्याचा पगार मिळतो हे पाहून अंमळ असूया जाहली..

आजानुकर्ण's picture

12 Feb 2011 - 10:09 am | आजानुकर्ण

उशीरा थांबले तर ते फुकटात का?

उशीरा थांबण्याचे वेगळे पैसे मिळत नाहीत.

रेवती's picture

12 Feb 2011 - 7:54 pm | रेवती

स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर
खरंतर ही वेळ का आली. उशिरापर्यंत काम करत थांबलेल्या स्त्रियांवर स्रियांनीच अत्याचार केले म्हणून का?
आणि घरी जावून टिव्हीसमोर बसून राहणार्‍या किती? हापिसात निवडलेली गवार, मेथी धुवायची आणि फोडणीला टाकायची. घरी गेल्यावर आराम बसून राहणार्‍या बायकांची संख्या अजूनही कमीच आहे. म्हणूनच अश्या चार स्त्रियांची बरीच चर्चा होते. नविनच प्रकार आहे हा आपल्या समाजासाठी. त्याऐवजी हापिसात निवडलेली भाजी फोडणीला टाकणे, मुलांचे अभ्यास घेणे, दुसर्‍या दिवशीची तयारी, नेहमी वाजणार्‍या फोनला उत्तरे देणे हे करताना दिसली तर फारसे वेगळेपण जाणवणार नाही.

सारखे स्वतःसाठी आणि मुलांसाठी लोकांच्या घरी धुण्याभांड्याचे काम करत असते.
बिचारा गलितगात्र नवरा "दारूची आणखी एक बाटली आण" असे सांगतो, तर हिडीसफिडीस करते.
अजून नवर्‍याला हाणामारी करण्याइतपत शक्ती आहे, म्हणून बिचारा तगून राहिला आहे.
पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे. मधुशालेला पारखा होऊन तृषार्त नवरा मरून जाईल बिचारा.

माहितीपटामधल्या मधमाशासारखा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2011 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कवितानागेश's picture

12 Feb 2011 - 6:41 pm | कवितानागेश

+१

रेवती's picture

12 Feb 2011 - 7:48 pm | रेवती

पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे
नै तर काय!;)
छान प्रतिसाद.

अडगळ's picture

12 Feb 2011 - 9:18 am | अडगळ

काही कळायला मार्ग नाही...
("भिन्नावतरण" मधून..)>>

लेखाचा शेवट काळजाला हात घालणारा आहे.

- नराधम

अप्पा जोगळेकर's picture

12 Feb 2011 - 9:18 pm | अप्पा जोगळेकर

नराधम (नर + अधम) हा समास म्हणजे नरांना सिंगल औट करण्याचा प्रकार आहे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

13 Feb 2011 - 9:27 am | डॉ.श्रीराम दिवटे

फारच चर्चा झाली या विषयावर..
आता पुरे..