आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms
त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे
' आप किसको लाये है ये मराठी से?'
कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ? तेही इथे मराठी मुलुखात राहुन, यशस्वि होउन ?
पुढे बासुदानी असे म्हटले आहे कि
"मला न जुमानता त्यांनी परांजपेंचं डबिंग कुणा हिंदी भाषिक कलाकाराकडून करून घेतल"
मराठी भाषिकांच्या हींदी उच्चारणा बद्दल आक्षेप घेणार्यांना येसुदास आणि एस पी बालसुब्रमण्यम चे हींदी उच्चार कसे चालतात ?
त्याच लेखात बासुदांनी चीत्रपटातील नायकासाठी सुचवलेल्या अमोल पालेकर ला डावलुन ताराचंद बडजात्यानी अनिल धवन (काय पण ठोकळा) ला घेतले असल्याचे म्हटले आहे. ही तर ही तुलनाच होउ शकत नाही . हा तर अमोल पालेकरचा अपमान आहे (ईथेही मराठी बद्दलचा द्वेष कारणीभुत आहे का ?)
त्या लेखाच्या शेवटी बासुदांनी असे म्हणले आहे
"ही अत्यंत खेदाची गोष्ट होती की, अनेक मराठी कलाकार गुणी असूनही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी कदर केली जात नसे. "
वरील वाक्य हे एका अमराठी (बासुदा) माणसाचे आहे त्यामुळे कोणीही त्याला पुर्वग्रह दुषीत असल्या बद्दल आरोप करु शकत नाही.
हे सर्व वाचुन , एक मराठी माणूस म्हणून खुप चीड आली आणि दु:ख झाले.
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 2:21 pm | चिरोटा
मला नाही वाटत चित्रपटस्रूष्टीत असा काही आकस असेल मराठी माणसाबद्दल. संबंध नाही आला कधी पण हिंदी चित्रपट स्रूष्टीत टिकायचे प्रचंड गुणवत्ता आणि कठोर परिश्रम करायची तयारी हवी.असे तिकडे नावाजलेले (मराठी) लोकच सांगतात.
शोभना समर्थ्,दुर्गा खोटे,सी.रामचंद्र,नूतन्,ललिता पवार्,लक्ष्मीकांत्(प्यारेलाल),माधुरी दीक्षित ही माणसे कोण आहेत? नाना पाटेकर कोण आहेत? ह्याहून अधिक लोक आहेत, सध्या जेवढे आठवले ते लिहिले.संगित क्षेत्रात तर गायकीत तर मराठी गायिकाच होत्या.
अहो पैसा बडजात्याचा, तोच ठरवणार ना कोणाला घ्यायचे किंवा नाही घ्यायचे ते?चित्रपट म्हणजे काही विज्ञान नाही. तुमचा चेहरा,शरीर्,अभिनय सेलेबल वाटला तर घेणार चित्रपटात्.(मग गुणवत्ता असो वा नसो).
30 Jan 2011 - 2:38 pm | कच्ची कैरी
मी सहमत आहे चिरोटा यांच्याशी कारण चित्रपटसृष्टीत आणखीही काही मराठी नावे आहेत(वर उल्लेख केलेल्या नावांशिवाय) ती म्हणजे-स्मिता पाटील्,सोनाली बेन्द्रे ,ममता कुलकर्नी ,श्रेयस तळपदे,मुग्धा गोडसे,अमृता राव्,उर्मिला मातोंडकर्,मंजिरी फडणीस्,सायली भगत्,अनुषा दांडेकर्,विद्या मालवदे,सागरिका घाटगे-(चक दे गर्ल्स्),सोनाली कुलकर्णी,अम्रूता खानविलकर आणि अजुन अशी बरीच नावे घेता येतील्.आणि टेलीव्हिजनवर तर बरीच मराठी मंडळी आहे तेव्हा मला इथे मराठी माणसाबद्दल आकस दिसुन येत नाही .
30 Jan 2011 - 6:48 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या मते महागुरू ह्यांनी त्यांच्या सिनेमात काम केले आहे .
किंवा माधुरीचा पहिला सिनेमा अबोध त्यांच्या राजश्री चा होता .
लक्ष्याचा पहिला हिंदी सिमेमा मैंने प्यार किया (त्यांचा मुलगा सुरज )
ताराचंद ह्यांची मुलगी एस कुमारच्या घरात सून म्हणून गेली आहे .
त्यांनी मिकानोज म्हणून वरळीत एस कुमारची बंद पडलेली श्रीराम मिल आहे .तेथे हा डिस्को ओपन केला होता ( २००१ ते २००३ ).तो एवढा प्रशस्त आहे कि तेथे दिवसा बॉलीवूड च्या गाण्यांचे शुटींग होते .
तेथे खुपदा मोठ्या खाजगी फिल्मी पार्ट्या व्हायच्या ( सदर जागा मिलच्या खूप आता असल्याने तेथे कितीही गोंधळ घातला तरी कोणालाही पत्ता लागत नाही .म्हणून हि जागा सोयीची होती .(घाला किती पण धिंगाणा )
आम्हाला अश्या प्रसंगी तेथे बार टेंडर म्हणून खास बोलावले जायचे .तेथे अनेक मराठी कलाकार (हिंदीतले यायचे .पण बद्जात्यांकडून त्यांचा कधीही अपमान झाला नाही .एवढेच नाही तर नोंवेज हे तेथे वर्ज्य होते .
वडिलांची परंपरा सुरज व्यवस्थित पणे पुढे नेत होता .( बाकी मैने प्यार किया ची गाणी लता दीदीने म्हटली आहेत बहुतेक .)
ता क - प्रत्येक गोष्टीत स्वताचा किस्सा सांगून स्वताची लाल करायची कला मी महागुरू ह्यांना त्यावेळी पार्ट्यांमध्ये पाहून व नंतर छोट्या पडद्यावर पाहून अवगत केली आहे .
मी एकलव्य स्वताला समजतो व गुरु दक्षिणा म्हणून त्यांचे नवरा माझा नवसाचा / आयडीच्या कल्पना हे सिनेमे राजाभाऊ ह्या त्यांच्या गुरूंच्या जगाच्या पाठीवर ह्या सिनेमा पेक्ष्या उत्कृष्ट आहेत असे माझे मत व्यक्त करीत आहेत .
30 Jan 2011 - 9:48 pm | योगी९००
मी एकलव्य स्वताला समजतो व गुरु दक्षिणा म्हणून त्यांचे नवरा माझा नवसाचा / आयडीच्या कल्पना हे सिनेमे राजाभाऊ ह्या त्यांच्या गुरूंच्या जगाच्या पाठीवर ह्या सिनेमा पेक्ष्या उत्कृष्ट आहेत असे माझे मत व्यक्त करीत आहेत .
_/\_
30 Jan 2011 - 7:12 pm | रेवती
चित्रपटसृष्टी, उद्योगधंदे यांच्यामध्ये मराठी माणसाची कुचेष्टा केली जाते हे खरे आहे.
वरवर पाहता मराठी लोक या क्षेत्रांमध्ये कमीही दिसतात पण नीट पाहिले तर बरेच जण आहेतही.
काही पडद्यावर कलाकार म्हणून तर काही पडद्यामागे तंत्रज्ञ म्हणून.
हळूहळू ही प्रतिमा बदलेल असेही वाटते.
कुचेष्टा करायला मराठी माणूसच लागतो असंही काहीनाही.
इतर राज्यातून आलेल्यांचे अपमान होत नाहीत काय?
त्यांचे अपमान करताना लोक वेगळे शब्द वापरत असतील.
30 Jan 2011 - 8:30 pm | गवि
Rajashri Production- maine pyar kiya heroine
-Bhagyashri Patwardhan. Debut.
Madhuri Dixit debut.. Abodh- Rajashri Production
काही लोकांना कुठे थांबावे कळत नाही.राजा परांजपे कितीही गुणी असतील.कवळी सावरत बोलणं नीट कळत नाही अशा फेजमधे असतील तर कदाचित निर्मात्याचं म्हणणं समर्थनीय आहे.
मराठी पुरुषांना,सचिन वगळता,मेनस्ट्रीम हिरोचा चान्स मिळत नाही.त्यासाठी कदाचित लूक्स कारणीभूत असतील.मुलींना मेनस्ट्रीम चान्सआहे.
30 Jan 2011 - 10:49 pm | इन्द्र्राज पवार
मुळात बासू चटर्जी यानी मुलाखतीमध्ये वा लेखामध्ये श्री.बरजात्या यांचे असे जे मत जाहीर केले आहे त्याला पुष्टी द्यायला आज श्री.ताराचंद बरजात्या हयात नाहीत (व्यक्ती मृत झाल्यावर तिच्याबाबत असे जाहीर उल्लेख करून अनादर निर्माण करणे हेच खरेतर शिष्टसंमत नाही) . त्यामुळे श्री.चटर्जी म्हणतील त्यावर विश्वास ठेवायचा म्हटले तर बासूदा म्हणजे विवेकानंद यांचे अवतार नव्हेत. त्यानीही याच हिंदी चित्रपट सृष्टीत काळ्याचे पांढरे केले असले तर उद्या आणखी एखादा हर्यानार्या त्यांच्याविषयीदेखील आडवीतिडवी विधाने करू शकतो, इतके निसरडे वातावरण आहे फिल्म इंडस्ट्रीजचे.
राहता राहिला मुद्दा ताराचंद बडजात्या यांच्या 'त्या' मताचा. असेल त्याना वाटले की श्री.परांजपे यांचे हिंदी उच्चार नीट नाहीत म्हणून डबिंगचा वापर केला गेला (मुळात त्यांचा राजा परांजपे यानी जया भादुरीच्या वडिलांची भूमिका करायला त्यांचा विरोध नसणार, कारण शेवटी राजाभाऊनीच ती भूमिका साकारली आहे). स्वच्छ हिंदी उच्चार पाहिजेच असा एक नावाजलेले वितरक म्हणून त्यांचा जर आग्रह असेल (त्यांच्या चित्रपटांची श्रेय नामावली हिंदीतच असायची) तर त्यानी राजाभाऊंच्या उच्चाराबाबत हरकत घेतली असेल तर त्यात त्यांचा 'मराठी माणसाबद्दलचा आकस' कुठे दिसून येतो. [लताच्या हिंदी/उर्दू उच्चाराबाबतही सुरुवातीला दुसरेतिसरे कुणी नसून दस्तुरखुद्द दिलीपकुमार यानीच आक्षेप घेतला होता....पण दिदीनी ते आव्हान खेळीमेळीने स्वीकारून थोड्याच महिन्यात दिलीप कुमारना कान पकडायला लावले, हा इतिहास आहे.]
'पिया का घर' मध्ये घेतले असेल अनिल धवनला...पण पुढे 'चितचोर' मधून अमोल पालेकर यानाच घेतले होते ना? रामलक्ष्मण हे संगीतकार, 'मैने प्यार किया' ची नायिका भाग्यश्री पटवर्धन, माधुरी दिक्षित, सचिन आदी कलाकार मराठीच आहेत.
चित्रपट व्यवसाय हा शेवटी दोन गुंतवून चार मिळवावेत आणि त्या चारातील दोन परत तिथेच गुंतवावेत असे साधेसरळ गणित असते. ते मांडताना धंद्याचा दृष्टीकोण हा ठेवावाच लागतो. दक्षिणेकडील 'सुपरस्टार' म्हटले गेलेले कमल हासन, चिरंजिवी, हेमामालिनी, श्रीदेवी, जयाप्रदा, व्यंकटेश आदी कलाकारांनी हिंदीतील सुरूवात 'डबिंग' चा आधार घेऊनच केली होती, त्यात त्यांच्या प्रांतातील लोकाना तो त्यांच्या भाषेचा अपमान वाटला नव्हता.
असतील बासू चटर्जी एक नामवंत आणि कल्पक दिग्दर्शक...पण म्हणून त्यांच्या वक्तव्यावरून प्रतिवादासाठी उपलब्ध नसलेल्या व्यक्तीबाबत सरसकट प्रतिकूल मत बनवू नये असे म्हणतो.
इन्द्रा
30 Jan 2011 - 11:19 pm | विकास
वर सर्वांनी बरेच काही माहितीपूर्ण लिहीले आहे आणि त्याच्याशी अर्थातच सहमत आहेच.
मात्र असे बडजात्या म्हणले असतील का? तर कदाचीत म्हणले असतीलही. असे वाटायचे कारण इतकेच की एकदा मला वाटते आशाच्या मुलाखतीत ऐकल्याचे आठवते की दिलीप कुमार म्हणाला होता की, या घाटी बहीणी काय हिंदीत गाणे म्हणणार म्हणून! त्यावर त्यांना कसा राग आला हे तिने सांगितले. अर्थातच नंतरचा इतिहास सांगावा लागणार नाही...
त्याच बरोबर एकदा याच आशाला मुलाखतीत विचारले होते की तुम्ही बहीणी (लता-आशा) इतर कोणा गायिकेस येऊन देत नाही असा आरोप आहे म्हणून. त्यावर तिने अर्थातच तो आरोप अमान्य केला. पण पुढे असे म्हणाली की आम्ही जेंव्हा उमेदीच्या काळात होतो तेंव्हा आम्हाला देखील सुरैय्या, शमशाद बेगम सारख्यांकडून स्पर्धा होतीच आणि पार्श्वगायिका होणे तितकेसे सोपे नव्हते. तरी देखील आम्ही कष्ट केले आणि वर आलो. थोडक्यात कष्टेवीना फळ नाही... ज्या ज्या मराठी माणसांनी ते केले त्यांची नावे आजही लोकं विसरताना दिसत नाहीत. नाहीतर चित्रसॄष्टीतून पूर्ण बाहेर पडलेल्या नेनेमॅडमना घेऊन चोप्रांना चित्रपट काढावासा वाटला असता का?
31 Jan 2011 - 6:11 am | गुंडोपंत
हे सर्व वाचुन , एक मराठी माणूस म्हणून खुप चीड आली आणि दु:ख झाले. प्रत्येक ठिकाणी लॉबी असली तर फायदा होतो. तेथे लॉबी नव्हती... कोण विचारतो मग?
31 Jan 2011 - 11:30 am | कुंदन
>>हे सर्व वाचुन , एक मराठी माणूस म्हणून खुप चीड आली आणि दु:ख झाले
+१
म्हणुन म्हणतो मराठी माणसाला त्याच्या धंद्यात आपल्या परीने मदत करा.
31 Jan 2011 - 11:36 am | अवलिया
>>>म्हणुन म्हणतो मराठी माणसाला त्याच्या धंद्यात आपल्या परीने मदत करा.
सहमत आहे. कूंद्या माझा आर्थिक भागीदार होतोस का?
31 Jan 2011 - 11:42 am | टारझन
कुंद्या ला काल मी गाडी ला पैसे कमी पडतात म्हणुन काही पैसे मागितले तर सरळ शिव्या ओकायला लागला.
आणि माझे पिंग येणार नाही अशी चॅट वर सेटिंग करुन ठेवली .. आता मी "ही मुस्काटदाबी का ? " म्हणुन एक धागाच काढतो कुंद्यावर गरळ ओकणारा .
- पिन्गोप राव
31 Jan 2011 - 11:46 am | llपुण्याचे पेशवेll
टार्याला कुंद्यानी मदत न करून लॉबी तयार मदत न केल्याबद्द्ल कुंद्याचा निषेध.
गुंडोपंतांच्या भावनांशी सहमत.
31 Jan 2011 - 3:35 pm | कुंदन
तु मला पैसे मागायचे नाहीत , मी तुला पैसे मागणार नाही.
31 Jan 2011 - 3:39 pm | टारझन
ए पुरोगाम्या , आपलं असं ठरलं होतं ... मी तुला पैसे मागेन .. पण तु ते परत मागायचे नाहीस ..
जल्ला ... शाब्दिक हुशार्या नाय पायजेल !!
बाकी हल्ली तु "व्यवहार" कसा करतो रे ?
31 Jan 2011 - 11:12 am | हुप्प्या
दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात वाचली. ह्यातून सिनेमा व्यवसायातील बिगरमराठी लोकांची मराठी लोकांविषयीची असणारी एक तुच्छतेची भावना दिसून येते.
१९७१ च्या सुमारास सोंगाड्या हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मुंबईतील कुठल्यातरी नामवंत थेटराच्या मालकाने (अमराठी) तो त्याच्या थेटरात लावण्याचे मान्य केले होते. त्या भरवशावर राहून दादांनी मुंबईत अन्य कुठे प्रयत्न केला नाही. ऐनवेळी त्या मालकाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्याला देव आनंदचा तेरे मेरे सपनेच लावायचा होता. पहिलाच चित्रपट असल्याने दादा गडबडले. त्यांनी सामोपचराने समजावले पण तो मालक अत्यंत उर्मटपणे वागला. सुदैवाने दादांची बाळासाहेब ठाकर्यांशी ओळख होती. त्यांनी त्या मालकाला सांगितले की आता तू ऐकणार नसलास तर मी बाळासाहेबांना हे सगळे सांगीन. त्यावेळेस ठाकरे इतके प्रसिद्ध नसल्यामुळे ह्या मालकाने त्यालाही दाद दिली नाही. मै किसी बालासाब को नही जानता. तुझे जो करना है वो कर. अशी बढाईखोर भाषा करुन त्याने दादांना वाटेला लावले. दादा कोंडके थेट ठाकर्यांकडे गार्हाणे मांडायला गेले. ठाकर्यांनी हे ऐकल्यावर आपली माणसे पाठवून त्या उन्मत्त मालकाला असा काही धुतला की तो थेट हॉस्पिटलमधे पोचला! त्यानंतर त्याने चुपचाप दादांची माफी मागितली आणि सोंगाड्या त्या थेटरात लागला. पुढे तो जोरदार चालला. तो मालक नंतर चांगलाच सरळ झाला. आणि त्यानंतरचे दादांचे सिनेमे त्याने आग्रहाने आपल्याच थेटरात प्रदर्शित केले.
त्यामुळे मराठी लोकांना तुच्छ लेखायची वृत्ती इथेही दिसली आणि सीधी उंगली से घी नही निकलता हेही कळले.
31 Jan 2011 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll
त्यामुळे मराठी लोकांना तुच्छ लेखायची वृत्ती इथेही दिसली आणि सीधी उंगली से घी नही निकलता हेही कळले.
31 Jan 2011 - 11:39 am | विजुभाऊ
लक्ष्याचा पहिला हिंदी सिमेमा मैंने प्यार किया (त्यांचा मुलगा सुरज )
लक्ष्या त्यावेळेस मराठीत सुपरस्टार होता. त्याने हिन्दी चित्रपटात मुख्य हीरोची भूमीका घ्यायला हवी होती. त्या ऐवजी त्याने साईड हीरोसुद्धा नव्हे तर घर गड्याची भूमिका केला.
मराठी कलाकार अभिनयाच्या बाबतीत फारच वरच्या पातळीवरचे असतात. ते बहुतेक वेळेस रंगभूमीवरून पुढे आलेले असतात. पण लूक्स च्या बाबतीत ते थोडे कमी पडतात. तसे दक्षिणीतले कलाकारदेखील लूक्स च्या बाअबतीत थोडे मागेच पडतात. गोरा चिकणा चुपडा हीरो जर पटकथेला आवश्यक असेल तर तेथे अशोक सराफ/ लक्ष्या कसे चालतील?
मराठी अभिनेते ( पुरुष ) यांच्या दिसण्याबाबतीत मराठी माणसाचे काही विशेष निकष नसतात.
दात पुढे आलेला सिद्धार्थ जाधव हीरो म्हणून चालु शकतो. त्याचा अभिनय उत्त्तम अभिनय मराठी माणासाला रंजवतो.
तसेच काहीसे इतर पुरुष मराठी कलाकारांचे. अजिंक्य देव सारखा उंच स्मार्ट हीरो मराठीत देखील फारसा चालला नाही.
तरी हल्ली त्यात थोडे बदल होत आहेत.
31 Jan 2011 - 11:53 am | टारझन
डॅम्मीट्ट्ट .. विज्जुभाउ ... मला विचाराल तर महेश कोठारे सोडुन आजवर कोणता मराठी अभिनेताच झाला नाही ... तुमचा सुपरष्ट्रार लक्ष्या त्याच्या पिक्चर हागल्यामुतल्या गोष्टींवर पण " मेश .. मेश .. " म्हणुन मदत मागत फिरायचा त्याची ..
- टारेश गटारे
31 Jan 2011 - 3:29 pm | सुधीर काळे
आपण मराठी लोक महाराष्ट्रातही सगळ्यांशी हिंदीत बोलतो, त्यांना खूप समजवून घेतो, त्यांना योग्य सन्मान देतो म्हणून असं होतं असं मला वाटतं.
कधी-कधी इतर प्रांतीय दाखवितात तसा बडगा दाखवायला हवा!
जवळ-जवळ सगळ्या हिंदी वाहिन्यांचे मुंबई-महाराष्ट्रातील वार्ताहार अमराठी असतात. पण कललत्त्याचे बंगाली असतात. ते हिंदीच्या व्याकरणाचा खून पाडतात तरीही तिथे बंगालीच असतो. इतकेच काय पण BBC च्या दोन वार्ताहार मुलीही अमराठी आहेत!
आपण हट्ट धरत नाहीं मग आपल्यावर अन्याय होतो.
काका आणि पुतण्या, दोघांनीही, याबद्दल कधीही लढा दिलेला नाहीं. द्यायला हवा.