एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश;
सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश.
बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर;
घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर.
झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका;
तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका.
सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग;
शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
प्रतिक्रिया
29 Jan 2011 - 4:54 am | शहराजाद
छान, गमतीदार कविता.
माझ्या लहानपणीची एक कविता आठवली :
शाळेमधल्या नाटकातली
मर्दानी ती झाशीवाली
बांधुनि फेटा सुंदर मोठा
कंबरेला तलवार लटकती
ढाल छातिशी पुत्र पाठिशी
घेउन लढण्या सिद्ध जाहली
अंगरख्याच्या आत राणिच्या
लांब मिशांचे झुरळ निघाले
कुठले नाटक कुठली झाशी
राणीचे अवसान गळाले
(कवी माहित नाही)
29 Jan 2011 - 5:29 am | गणपा
ढेकुण डास आणि झुरळ, तिनही कविता एका दमात वाचल्या. सगळ्याच मस्त आहेत.
:)
29 Jan 2011 - 6:09 am | रेवती
हे बालगीतही आवडले हो डॉक्टरसाहेब!:)
मिसळपाववर स्वागत!
29 Jan 2011 - 9:28 am | कच्ची कैरी
बालगीत म्हणुन छान आहे कविता ! बाकी तुम्ही मला माझ्या झूलॉ़जीच्या लॅबची आठवण करुन दिलीत तिथे खूप झुरळांना डिसेक्ट केले आहे .ईईईईईईईईई
29 Jan 2011 - 10:11 am | llपुण्याचे पेशवेll
छान आहे बालगीत.
29 Jan 2011 - 10:28 am | नरेशकुमार
मस्त आहे.