डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा?
माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा?
डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो
जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो
फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं
लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं
ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट
सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट
भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई
पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
प्रतिक्रिया
29 Jan 2011 - 5:00 am | शुचि
हाहा :)
29 Jan 2011 - 5:27 am | गणपा
तिनही कविता एका दमात वाचल्या. सगळ्याच मस्त आहेत.
:)
29 Jan 2011 - 6:07 am | रेवती
ज्यु. डास आपल्या करियरचा बराच विचार करतो आहे.;)