भज्जी पार्टी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
17 Jan 2011 - 7:15 am

कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती
सुर्याने कापसाची रजाई ओढली होती
हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती
ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती

नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून
पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून
पेय ओरडले भजी! आणि तेही गुंगून
कमरेवर हात, झाऱ्याने ऐकले लांबून

बाहेर हवा थंड, आत पेटले होते बंड
झारा विचार करी, काय करावा दंड
सगळे टुन्न झालेले जमवलेले पुंड
नाकांनाही सुटला, भज्यांसाठी कंड

भ...ज्जी-भ...ज्जी उंचावले गेले पेले
यजमान टल्ली, तरी ओळखे सारे मेले
आली ज्वाला बाहेर, काही होरपळले
झारा मारा चुकवित पळाले उरलेले

भज्यांचा वास नाकांमधेच विरला
डोक्यावर उपडा यजमानाचा पेला
दुलई झटकली सुर्याने, पळणारे थांबले
मस्त पहिल्या धारेचा पाउस पिऊ लागले

कथाकविताआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 7:24 am | नरेशकुमार

बाहेर हवा थंड, आत पेटले होते बंड

बरोब्बर वेळ-काळ बघुन बंड पेटले होते.

छान आहे