ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती. परवाच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकार कडून मदतीबद्दलची बातमी वाचली तेव्हाच मन चरकले होते.
अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली.
त्यांच्या नाना भूमिकांबद्दल अधिक माहिती इथेच द्यावी ही विनंती.
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 10:17 pm | बिपिन कार्यकर्ते
श्रद्धांजली.
13 Jan 2011 - 10:24 pm | उपेन्द्र
पंतांना लखोबा ची भूमिका करताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे हे मी माझं भाग्य समजतो..
13 Jan 2011 - 11:36 pm | बेसनलाडू
पंतांना लखोबा ची भूमिका करताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे हे मी माझं भाग्य समजतो..
(सहमत)बेसनलाडू
पंतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
(नतमस्तक)बेसनलाडू
13 Jan 2011 - 10:25 pm | असुर
विनम्र श्रद्धांजली!
--असुर
13 Jan 2011 - 10:29 pm | यशोधरा
विनम्र श्रद्धांजली..
13 Jan 2011 - 10:30 pm | यकु
अरेरे! वाईट झाले.
गेल्याच वर्षी त्यांची "तो मी नव्हेच" आणि " इथे ओशाळला मृत्यू " ही दोन्ही नाटकं लागोपाठ पाहाण्याचा योग आला होता..
तो मी नव्हेच सारखे नाटक आणि त्यातल्या पणशीकरांच्या लखोबांसारखा लखोबा दहा हजार वर्षात होणार नाही असेच प्रत्येक जण म्हणेल...
तो मी नव्हेच मधला राधे:श्याम महाराजांचा प्रवेश मला भलता आवडतो.. आणि त्यांचे सुस्पष्ट,स्वच्छ शब्दोच्चार भलतेच रंगवून सोडतात...
७७ / ७८ व्या वर्षीही ते तेवढ्याच ताकदीनं नाटक उभं करीत.. वयोमानामुळं त्यांना स्वाक्षरी करायला जमले नव्हते.. पण फोटो मात्र भरपूर काढू दिले होते..
प्रभाकरपंत पणशीकरांना विनम्र आदरांजली !
14 Jan 2011 - 6:30 am | सहज
त्यांचे सुस्पष्ट,स्वच्छ शब्दोच्चार भलतेच रंगवून सोडतात..
सहमत.
13 Jan 2011 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रद्धांजली.
अनेक वर्षांपूर्वी त्यांचं 'तो मी नव्हेच' पाहिलं होतं, नाटक प्रभाकर पणशीकरांचं होतं हे अजूनही ठळकपणे आठवतं.
13 Jan 2011 - 10:38 pm | चिगो
मला पणशीकरांची नाटके पाहण्याचे भाग्य लाभले नाही... पण त्यांच्याबद्दल बरेच ऐकले, वाचले आहे.
ह्या श्रेष्ठ रंगकर्मीला माझी आदरपुर्वक श्रद्धांजली...
13 Jan 2011 - 10:50 pm | सुनील
त्यांची अनेक नाटके प्रत्यक्ष पाहिली आहेत. श्रद्धांजली!
13 Jan 2011 - 11:00 pm | जोशी 'ले'
विनम्र श्रद्धांजली!
13 Jan 2011 - 11:07 pm | प्राजु
तो मी नव्हेच.. आणि प्रभाकर पणशीकर... ! असंच समिकरण डोळ्यांपुढे येतं.
या विलक्षण रंगकर्मीस माझी विनम्र श्रद्धांजली.
13 Jan 2011 - 11:10 pm | डावखुरा
........................................................(नि:शब्द)
13 Jan 2011 - 11:10 pm | विकास
विनम्र श्रद्धांजली...
"तो मी नव्हेच" हे नाटक कायमच स्मरणात राहील.
13 Jan 2011 - 11:10 pm | ५० फक्त
विनम्र श्रद्धांजली, असा माणुस लाखांत एक
हर्षद.
13 Jan 2011 - 11:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
विनम्र श्रद्धांजली !!!
तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे आणि अश्रूंची झाली फुले मधील प्रोफेसर विद्यानंद विसरता येत नाही.
अश्रूंची झाली फुले चा जुन्या संचातील शेवटचा प्रयोग (क्र ११११) आटापिटा करून पाहिला होता. पंतांनी अख्खे नाटक त्या वयातही तितक्याच ताकदीने सादर केले होते. उत्कृष्ट अभिनेता आणि माणूस.
13 Jan 2011 - 11:27 pm | चिंतामणी
तिसवर्षापुर्वी तो मी नव्हेच प्रथम पाहीले. त्याकाळातर पंत फुल फॉर्मात होते. (त्यानंतर अजून दोन-तीन वेळा थिएटरमधे बघीतले).
अश्रुंची झाली फुले म्हणजे डॉ.काशीनाथ घाणेकर आणि पंताच्या अभीनयाची मेजवानीच होती.
जास्त काय लिहू.
ज्येष्ठ रंगकर्मी, नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना विनम्र श्रद्धांजली!
13 Jan 2011 - 11:28 pm | स्वाती२
विनम्र श्रद्धांजली!
13 Jan 2011 - 11:57 pm | इन्द्र्राज पवार
आयुष्यभर 'रंगभूमी हीच कर्मभूमी' सर्वार्थाने सत्य करून दाखविणार्या या नटश्रेष्ठास विनम्र श्रद्धांजली. एकदोन महिन्यापूर्वीच अगदी योगायोगाने त्यांचे आत्मचरित्र 'तोच मी' विकत घेतले होते. आज बातमी आणि हा धागा पाहिल्यानंतर पंतांनी त्या पुस्तकाचा शेवट किती चटका लावणारा केला आहे ते स्मरले आणि आता पुन्हा ते पान वाचले...
"....मला मनापासून वाटतं, की माझं आयुष्य मी जगलोय, कृतार्थपणे जगलोय. माझा जीवनरसाचा हा प्याला रिता झाला की पुन्हा भरला जाणार आहे - कुणासाठी तरी ! मी या जीवनावर प्राणापलीकडे प्रेम केलंय. माझी वेळ भरली की परमेश्वरा मला घेऊन जा. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. "पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्' हे चक्र कुणा शंकराचार्यांना मान्य नसेलही. मला मात्र ते शंभर टक्के मान्य आहे. मी माझ्या परमेश्वराकडे एकच मागणं मागेन की - 'मला पुन्हा नटाचाच जन्म दे - आणि तोही या मराठी भूमीतच दे !"
~ परमेश्वर असेलच तर प्रभाकर पणशीकरांची ही प्रार्थना तो नक्की ऐकेल.
इन्द्रा
14 Jan 2011 - 12:18 am | शिल्पा ब
श्रद्धांजली.
14 Jan 2011 - 1:22 am | मेघवेडा
प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं नाही मात्र टीव्हीवर वा घरी कॅसेट आणून पाहिलेली आहेत. आज औरंगजेब म्हटला की माळ ओढत दाढी कुरवाळणारे पंतच दिसतात डोळ्यासमोर आणि केवळ पंतांनी रंगवलेल्या या भूमिकेमुळे लहानपणी औरंगजेब आवडायचा! :)
या नटवर्यास विनम्र श्रद्धांजली.
14 Jan 2011 - 1:38 am | पिंगू
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर पणशीकरांना भावपुर्ण श्रद्धांजली.
- पिंगू
14 Jan 2011 - 2:34 am | गणपा
आधिच्या पिढीकडुन आणि प्रसारमाध्यमातुनच पंताविषयी ऐकलं आहे. त्यांच काम प्रत्यक्ष पहाण्याचा कधी योग आला नाही आणि आता येणारही नाही.
या श्रेष्ठ कलाकारास अखेरचा मानाचा मुजरा.
14 Jan 2011 - 4:39 am | चतुरंग
'तो मी नव्हेच'चा प्रयोग बघणे म्हणजे स्वर्गसुख. ते मला अनुभवायला मिळाले. पहिल्या अंकानंतर रंगपटात जाऊन त्यांची स्वाक्षरी देखील मिळवली होती. 'राधेश्याम महाराजांच्या' प्रवेशातला अभंग ते कसलेल्या गायकाच्या तोडीचा म्हणत. स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार, अप्रतिम संवादफेक, कायिक आणि मुद्राभिनयाचा मूर्तिमंत आविष्कार अशी चौफेर मेजवानी असे.
'इथे ओशाळला' मधला औरंगजेब म्हणजे तर कमालच होती. त्यात नमाज पढताना जातिवंत मुसलमानही लाजेल इतक्या अचूकपणे ते नमाज पढत.
अश्रूंची फुले मधला विद्यानंद ही देखील त्यांच्या कारकीर्दीतली अविस्मरणीय भूमिका होती. पंत आणि डॉ. घाणेकर अशी जुगलबंदी पाहण्याचे भाग्य मला लाभले.
आज नटसम्राट गेला त्यांना माझी श्रद्धांजली.
(साश्रू)चतुरंग
14 Jan 2011 - 4:43 am | रेवती
'तो मी नव्हेच' मधले त्यांचे काम आवडले होते.
श्रद्धांजली.
14 Jan 2011 - 7:03 am | मदनबाण
विनम्र श्रद्धांजली...
अश्रूंची फुले मधली विद्यानंदांची त्यांनी साकारलेली भूमिका मी कधीच विसरु शकणार नाही.
14 Jan 2011 - 7:47 am | हंस
एका प्रतिभासूर्याचा अस्त......ज्येष्ट आणि श्रेष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांना माझी श्रद्धांजली.......
14 Jan 2011 - 8:09 am | स्वानन्द
मला प्रभाकर पणशीकर आठवतात ते त्यांच्या तो मी नव्हेच मधल्या लखोबा लोखंडेच्या भूमिकेत. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार आणि कोर्टात उभे असताना चाललेला ती बोटांची हालचाल.. अगदी डोळ्यासमोर उबं राहतंय. शिवाय शाळेत असताना, दूरदर्शनवर पाहिलेली त्यांची मुलाखतही आठवली. अगदी स्पष्ट आठवत नाही, पण पंतांनी, ते रंगभूमीवर कसे काम करू लागले हे अगदी सविस्तर सांगितलं होतं. आपण रंगभूमीवर काम करतो, तर मग नुसता अभिनय नाही, तर रंगभूमीची अगदी इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असे त्यांचे मत असे. त्यामुळे रंगभूमीची लांबी रुंदी, लाईट्स, पडदा यांच्या इंचाइंचाबद्दल अगदी खडान्खडा माहिती त्यांनी स्वतःहून मिळवली होती.
त्यांना प्रत्यक्ष रंगभूमीवर आणि तेही उमेदीच्या काळात ज्यांना पहायला मिळाले, ते खरोखरच भाग्यवान. अश्रुंची फुले मधील काशिनाथ घाणेकर व पंत यांची जुगलबंदी याबद्दल आईकडून बरंच ऐकलं आहे.
पंताना मनःपूर्वक धन्यवाद!!
14 Jan 2011 - 8:19 am | अवलिया
विनम्र श्रद्धांजली !
14 Jan 2011 - 8:39 am | अप्पा जोगळेकर
काही वर्षांपूर्वी पंतांनी स्वतः भूमिका केलेलं 'तो मी नव्हेच' सीडीवर पाहिलं होतं. फारच प्रभावी नाटक आहे. पंतांनी ज्या पद्धतीने ते सादर केलंय त्याला तोड नाहीच पण त्या नाटकाचं खरं यश त्याच्या लेखनात आहे. त्याबद्दल अधिक लिहित नाही कारण आचार्य अत्र्यांबद्दल लिहिले तर ते या धाग्याच्या विषयाला सोडून होईल. त्या नाटकातलं 'कानात सांग माझ्या मी आवडे तुला का' हे फारच सुंदर गाणं आहे. एक पेटीची साथ सोडली तर त्या गाण्याट अन्य कुठल्याही वाद्याचा वापर नाही तरीही कानांना फारंच गोड वाटतं. आणि प्रभाकरपंतांच्या कन्या जान्हवीताई (ज्यांनी याच नाटकात एका फसवल्या गेलेल्या स्त्रीची भूमिका केली आहे) त्यांनी ते फारच सुंदर गायलं आहे. पुढेमागे तात्या कधीतरी या गाण्याचं छानसं रसग्रहण लिहितील अशी अपेक्षा करतो.
फसवणूक झालेली आणि कोर्टात साक्षीसाठी उभीअसलेली एक स्त्री लखोबाला विचारते,"माझं तुमच्याशी लग्नं न झाल्यामुळे असं काय मोठं आक्रीत घडलं असतं?"
लखोबा म्हणतो,'''चारचौघात सांगू का काय झालं असतं ते?''
स्त्री,''हो. सांगा सांगा काय झालं असतं?"
लखोबा,"मूल".
हा डायलॉग ऐकल्यावर लखोबाच्या नीचपणाचा इतका राग येतो की त्याला जाउन मारावंसं वाटतं. मला वाटतं प्रभाकरपंतांच्या अभिनयाचं यश ते हेच आहे.
प्रभाकरपंतांना आदरांजली.
14 Jan 2011 - 9:10 am | ऋषिकेश
त्यांचे काम प्रत्यक्ष बघितलेले नाहि.
त्यांना श्रद्धांजली
14 Jan 2011 - 9:53 am | sneharani
विनम्र श्रध्दांजली!!
14 Jan 2011 - 10:26 am | खडूस
विनम्र श्रद्धांजली!
14 Jan 2011 - 10:32 am | वसईचे किल्लेदार
पन्ताच्या भुमिकाच काय मुलाखतिहि आवडीने पहायचो!
त्याना विनम्र श्रद्धांजली!
14 Jan 2011 - 10:46 am | सुधीर काळे
पणशीकरांनी जबरदस्तपणे सादर केलेल्या नौदलातील एका देखण्या आणि तडफदार अधिकार्यापासून ते लखोबा लोखंडे या बेरकी पण मुद्दाम बावळट 'बनलेल्या' निपाणीच्या तंबाखूच्या व्यापार्यापर्यंतच्या प्रत्येक पात्रातील लकबी आम्हाला पहायला मिळाल्या हे आमच्या पिढीचे भाग्यच!
सादर श्रद्धांजली!
14 Jan 2011 - 10:59 am | राजेश घासकडवी
तो मी नव्हेच चा प्रयोग फार फार जुन्या काळी बघितला. प्रयोगांची हजारी ओलांडली होती. त्यावेळीही ते वयस्क दिसत होते - टेनिस खेळाडूचे कपडे घातलेले असताना पाय दिसू नयेत म्हणून चटकन सोफ्यामागे गेल्याचं अजूनही आठवतंय. पण लखोबा लोखंडेचा बेरकीपणा मात्र भूमिकेत मुरलेला होता...
श्रद्धांजली.
14 Jan 2011 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
विनम्र श्रद्धांजली!
नाट्यसृष्टी पोरकी झाली.
14 Jan 2011 - 11:36 am | प्यारे१
विनम्र श्रद्धांजलि....!!!
अत्यंत उचित असा धागा.
तरीही 'लखोबा लोखंडे हरपले' हे हेडींग वाचताना थोडं वेगळं वाटलं/खटकलं.
जरी पंतांनी ती व्यक्तिरेखा अत्यंत समर्थपणे साकारली असली तरी 'लखोबा' म्हटले की अत्यंत बेरकी, लबाड आणि संधीसाधू इसमाची आठवण होते. ( बाळासाहेब- छगन भुजबळ वादही आठवतो)
पंत अर्थातच तसे नव्हते. अत्यंत समर्थ अभिनेता असल्याने त्यांनी वटवलेल्या अनेक भूमिकांपैकी लखोबा ही 'फक्त' एक भूमिका होती.
इतकंच.
14 Jan 2011 - 11:45 am | अमोल केळकर
भावपुर्ण श्रध्दांजली
अमोल
14 Jan 2011 - 11:48 am | नन्दादीप
विनम्र श्रद्धांजली!.....
मी "तो मी नव्हेच" बघीतल पण सी.डी. वर.....जबरदस्त अभिनय.
"ईथे ओशाळला म्रुत्यु" याची देही याची डोळा बघितल....धन्य झालो...त्याच वेळी "मा. बाबासाहेब पुरंदरे" यांना देखील भेटलो....."मणिकांचन योग" होता तो...खरच...
14 Jan 2011 - 11:53 am | मी ऋचा
"तो मी नव्हेच" चा प्रत्यक्ष प्रयोग अम्ही दिडेक वर्षापूर्वी पाहिला होता आणि प्रयोगानंतर पणशीकरांशी मस्त गप्पा मारल्या होत्या. अगदी जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा झाल्या. बोलता बोलताच ते मेकप, विग वगैरे काढत होते..मज्जा वाटत होती मला ते पाहून, हे त्यांच्या लक्षातही आले, चार पाचच लोकं होतो आम्ही. मला म्हणाले, "अगं असा मेकप वगैरे काढुन बसलो ना की लोकं मलाच येउन विचारतात "पंत कुठेत?" म्हणून" आणि अगदी लहन मुलासारखे खळ्खळून हसले होते.. आज आठवतय ते दिलखुलास हसू....त्या गप्पांमध्ये त्या हसण्यात कुठेही "नटसम्राट" नव्हता जस्ट एक सामान्य माणूस स्वच्छ मनाचा...
विनम्र श्रद्धांजली!!
14 Jan 2011 - 11:56 am | अनामिका
ज्येष्ठ व श्रेष्ठ असा प्रतिभावान व असामान्य रंगकर्मी हरपला!
भावपुर्ण श्रद्धांजली!
14 Jan 2011 - 12:01 pm | मितान
श्रद्धांजली.
14 Jan 2011 - 12:01 pm | योगी९००
खुप वाईट वाटले..
विनम्र श्रद्धांजली..
14 Jan 2011 - 12:45 pm | वाहीदा
या मजेशिर नटसम्राटाला भावपूर्ण श्रध्दांजली
त्यांच्या जन्मतारखेच्या घोळाविषयी त्यांनी अगदी मजेशिर शब्दात त्यांच्या आत्मचरित्रात लिहीले आहे
बारीकसारीक गोष्टींतून मजा घेण्याच्या त्यांच्या ताकदीला सलाम !!
‘माझा शाळेतला दाखला हातातली छडी उगारून सांगतो की, माझा जन्म १३ मार्च १९३१चा आहे. माझ्या कुंडलीतले एकमेकांशी कधीच न पटणारे शनी-मंगळादी ग्रह मात्र माझा जन्म १४ मार्चला झाल्याचं एकमतानं जाहीर करतात आणि काही ज्योतिष्यांचं असं ठाम म्हणणं आहे की, सूक्ष्म ग्रहांच्या अभ्यासानुसार माझा जन्म १५ मार्चपूर्वी होणंच शक्य नाही. मी मात्र १३, १४, १५ मार्च या दिवशी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीतली नावं वाचतो आणि ज्या दिवशी सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती जन्माला आल्या, तीच माझी जन्मतारीख ठरवतो. परंतु पुढे-मागे माझ्या कुणा हौशी नातेवाईकानं माझी जन्मशताब्दी साजरा करण्याचं ठरवलं तर तारखेच्या घोळामुळे ती रद्द व्हायला नको म्हणून मीच अधिकृतपणे माझी जन्मतारीख १४ मार्च १९३१ असं नमूद करून ठेवतो.’
- प्रभाकर पणशिकर
14 Jan 2011 - 12:55 pm | विनायक बेलापुरे
पंताना अश्रूंची झाली फुले मधील प्रा.विद्यानंद, तो मी नव्हेच , इथे मधील औरंग , बेईमान मधील सतीश दुभाषीं बरोबरची चंदरची जुगलबंदी पाहायला मिळाली हे भाग्य.
श्रद्धांजली .
14 Jan 2011 - 1:06 pm | छत्रपति
आयुष्यात पहिल्या॑दा और॑गजेब गेल्याच दु:ख झाल॑.
14 Jan 2011 - 1:08 pm | विनायक बेलापुरे
वाह ! छत्रपति तुम्हाला (पण) मुजरा
14 Jan 2011 - 4:18 pm | गवि
औरंगजेब अगदी कधीच न विसरण्यासारखा रंगवला होता त्यांनी.
वाईट वाटलं.
त्यांना सद्गती लाभो ही इच्छा..
15 Jan 2011 - 1:16 am | सर्वसाक्षी
पंतांनी केलेल्या भूमिकेवर आपला असा काही ठसा उमटविला की त्या भूमिकांमध्य आपण अन्य कुणाला पाहु शकत नाही.
इथे ओशाळला मधला औरंगजेब
अश्रूंची झाली फुले मधले प्रा. विद्यानंद
तो मी नव्हेच मधला लखोबा, दिवाकर / दाजीशास्त्री दातार,कॅप्टन अशो परांजपे, राधेश्याम महाराज
आणि
थँक यू मिस्टर ग्लॅड मधला बडा साब
असा नट होणे नाही
18 Jan 2011 - 1:14 am | निनाद मुक्काम प...
गिरगावकर पंत म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ .त्यांची नाटके प्रत्यक्ष पाहण्याचा योग बालपणी आला होता .
त्यांच्याविषयी लहानपणी काही वाचलेले आज अचानक स्मृती पटलावर आले .ह्या निम्मिताने खरडतो .
पंतांनी मराठी नाटकाला अभिनयाचीच नव्हे तर निर्मिती मुल्ये व सादरीकरण ह्यांची सुध्दा श्रीमंती दाखवली .
तो मी नव्हे साठी फिरता रंगमंच हि त्यांची अभिनव कल्पना भारतात पहिल्यांदा सदर झाली.
तो रंग मंच मनी वासून पंत थेट कोल्हापुरात गेले नि कसबी कारागिराला आपली कल्पना सांगितली .
त्या अनामिक कारागिराने अवध्य एका रात्री हा रंगमंच उभा केला
.
आणि एक आठवण म्हणजे अश्रुची झाली फुले मधील विमानतळाचा प्रसंग साधण्यासाठी विमानतळाचा आभास प्रत्यक्ष रंगमंचावर आणतांना त्यांनी कुठेही कसूर केली नाही .कारण स्वताची नाट्य संस्था त्यांनी सातच्या मुलासारखी जपली व पित्याच्या भूमिकेतून नाटकातील निर्मिती नेपथ्य व सादरीकरण येथे स्वत जातीने लक्ष दिले .
त्यांच्या अश्रुची झाली फुले ह्या नाटकावर यश चोप्रा ने मशाल बनवला ( जो दिलीप कुमार व अनिल ने गाजवला )
तेव्हा अभिनय सम्राट दिलीप ह्या नाटकाच्या प्रयोगावेळी विंगेत उभे राहून पंतांचे अभिनय पाहायचे विशेतः लाल्या नि प्रोफेसरांचा शेवटचा प्रसंग
पुढे दिलीप कुमार ह्यांना लखोबा साकारायचा होता .पण काही काळ विंगेत उभे राहून अभिनयाचे दशावतार पहिला आणि ते थक्क होऊन म्हणाले कि ये मुजसे नही होगा .
अजून पावती हवी पंताच्या अभिनयाबद्दल
त्यांच्या नाटकात पल्लेदार मराठी शब्दांनी नटलेली गर्भ श्रीमंत मायमराठी कानावर पडायची तेव्हा मन तृप्त व्हायचे .
त्यांचे बंधू दाजी पणशीकर संस्कृत चे ह्या शतकातील पहिल्या पाचात असणारे गाढे विद्वान
त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे पंतांचे कर्तुत्व
अश्या लखोबाला लक्ष लक्ष प्रणाम
(बाकी लखोबा हि व्यक्तिरेखा महाराष्टारील खेड्यापाड्यात शहरात एवढी लोकप्रिय झाली होती म्हणून तिचे नाव ठाकरे ह्यांनी वापरले .हे नुसते नाव नसून मराठी नाटकाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे .
आज ठाकरे भुजबळ वाद जवळ जवळ मिटला आहे .व त्याच बरोबर लखोबा नव्या ताकदीने ओक साकारात आहेत .
पंताना ह्याहून चांगली श्रद्धंजली काय असेल .