अब्दुल खान - २

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
29 Apr 2008 - 7:44 am

(पूर्वसूत्रः आम्ही दोघंही १९४७ नंतर जन्म झालेले! त्यामुळे तो त्याच्या देशाचा नागरीक आणि मी भारताचा! आम्ही दोघंही परस्परांबद्दल बरंच काही नवीन शिकत होतो. आमचे दोघांचेही काही पूर्वग्रह होते, आपापल्या समाजाने करून दिलेल्या समजुती होत्या. माझ्या दृष्टीने त्याचा देश पाकिस्तान आणि माझा हिंदुस्तान! पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! सुट्टीच्या दिवशी क्वचित कुराणेशरीफही वाचायचा!! मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!! तरीसुद्धा गोंधळ हे व्हायचेच!! एकदा अशीच गंमत झाली....)

एकदा अशीच गंमत झाली!

हिवाळ्यात थंडीचा कडाका पडला होता. बाहेर बर्फाचे डोंगर साठले होते. हिमवृष्टीमुळे हायवेज बंद होऊन ट्राफिक जाम होणार असे वाटत होते. तशात मला भयानक सर्दी झाली होती. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून ऑफिसातून लवकर घरी आलो. पहातो तर अब्दुलखान आपला घरी बसलेला! हिमवृष्टीचे लक्षण बघूनच त्याने सिक लीव्ह टाकली असावी. मी अंगावरचा बर्फ झटकत, खोकत-शिंकत, बाथरूम मध्ये गेलो. गरम शॉवर घेऊन बाहेर येईपर्यंत खानने कपाटातून बाटली काढून दोन ग्लासात दोन पेग तयार करून ठेवले होते. काही न बोलता त्याने एक ग्लास माझ्या हातात दिला. मी ही काही न बोलता तो तोंडाला लावला.

त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!

पठाण हे मूलतः अतिकठोर आणि प्रसंगतः क्रूर असतात हे माझं स्टिरिओटाइप भंग पावलं होतं...

आम्ही दोघेही न बोलता खिडकीतून बाहेर चाललेलं हिमवादळाचं तांडव बघत आपापले ग्लास रिकामे करत राहिलो. तीनएक पेग संपवल्यानंतर तो म्हणाला,

"अब तेरे चेहरेपे रंग आया, सुलेशके बच्चे!!" मी हसलो...
"घरमें डबलरोटी है. मैने मेरे लिये गोश्त बनाया है. तुम क्या खाओगे?" त्याचा प्रश्न.
"अगर इनफ है तो मैं भी वही खाऊंगा"
तो गडगडाटी हसला, "गुड जोक!! लगता शराब तुम्हे घुमा रही है. लेकिन सच्ची बोलोना, कुछ बनायें तुम्हारे लिये?"
"नही, मैं सचमुच डबलरोटी-गोश्त खाऊंगा"
"अच्छा! तो ये बात है? अबे तू तो खाकर ही दिखा!! मेरी तर्फसे तुम्हे सौ डॉलर इनाम!!"
"ठीक है!" मी उठलो. दोन प्लेटस घेतल्या. दोन्हीतही गोश्त आणि पाव वाढून घेतला. एक प्लेट त्याच्या हातात दिली.

तो छद्मीपणे हसत माझ्याकडे पहात होता. जणू माझी मजल कुठपर्यंत जातेय याचा अंदाज घेत होता....

मी पावाचा तुकडा काढून गोश्तच्या रश्श्यात बुडवला. आता मी तो तोंडात घालणार इतक्यात अब्दुलखान कडाडला,

"अबे तेरा दिमाग फिर गया है क्या रे, काफीर?" त्याच्या ओरडण्यानेच मी दचकलो.
"क्यों? क्या हुवा?"
"अबे वो गोश्त है, बीफ!!"
"पता है!"
"अबे लेकिन तू तो हिन्दू है ना!"
"मतलब?"
"फिर गोश्त कैसे खाता है? बीफ खानेसे तेरा मजहब मिट नही जायेगा? ये ले तेरा सौ डॉलर, मगर ये गुस्ताखी मुझे नही करनी बाबा!!"

आता छद्मीपणे हसण्याची पाळी माझी होती...

"खानसाहब, आपको सचमुच लगता है की बीफ खानेसे मेरा हिन्दू मजहब खत्म हो जायेगा?"
"हमने तो ऐसाही सुना है, की हिन्दुओंको बीफ मना है, जैसे हम मुसलमानोंको पोर्क!! इसलिये हम पोर्क नही खाते!!"
"तो आप पाक मुसलमान है?"
"बिल्कुल! इसमें कोई शक है?"
"तो आप अभी शराब कैसे पीते थे मेरे साथ? क्या इस्लामको शराब मंजूर है?"

आता त्याच्या चेहर्‍यावर स्माईल उमटलं, नजर निवळली!! "वो बात अलग है!!"
"खानसाब, बुरा मत मानिये! मेरा मतलब ये रहा की उस उपरवाले को पाने के लिये खाने-पीने जैसी चीजोंपर पाबंदी लगानेकी जरूरत नही. और ना ही ऐसी चीजोंपर पाबंदी लगाकर उसको पाया जा सकता है"
"हां बाबा, सही है!" तो हसला...

पण त्याचं आश्चर्य विरलेलं नव्हतं. त्याने धडाधडा त्याच्या पाकिस्तानी मित्रांना फोन फिरवले. फोन स्पीकरवर लावून सगळ्यांना हेच सांगत होता,
"अरे भाई, हमे बचपनसे सिखाते आये है ना कि हिन्दू गोश्त नही खाते? वो मेरा रूममेट सुलेश है ना, वो तो गोश्त खाता है और उपरसे बोलता है कि मै फिरभी हिन्दू हूं"
आणि त्याचे सगळे पाकिस्तानी मित्रही चाट पडत होते. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकुन आम्हाला इथे हसू आवरत नव्हते...

आपण जन्मभर उराशी बाळगलेले स्टिरिओटाईप्स किती पोकळ आणि फोल आहेत ते आता त्यांना कळत होतं.....

त्यानंतर त्याचे मित्रही कधी मी फोन उचलला तर मोकळेपणे माझ्याशी बोलायचे, घरी यायचे. येतांना माझ्यासाठी पाकिस्तानी खासियत खाऊ घेऊन यायचे. त्या प्रसंगानंतर अब्दुल खानवरचंही दडपण दूर झालं असावं. निरनिराळ्या विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या पण मुख्य विषय म्हणजे निरनिराळ्या देशांतले लोक इथे येऊन अमेरिकेला कसे 'चुत्या' बनवतात हा असायचा. तो शब्दही त्याला माहिती होता. एकदा आम्ही असेच गप्पा मारत बसलो होतो. विषय होता बिर्याणी! अर्थातच तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. नुकतेच आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवून आलो होतो. अब्दुल खान त्यांच्या बिर्याणीला शिव्यांची लाखोली वहात होता. त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. बोलता बोलता नकळत म्हणाला,

"एक बात बताऊं सुलेश! इन लोगोंको अच्छी बिर्यानी बनाने क्यों नही आती पता है? ये इंडियाका बासमती राईस इस्तेमाल करते है! सस्ता होता है ना, इसलिये!! हमारे पाकिस्तान के इंडस बासमती राईसके जैसा राईस अलम दुनियामें पैदा नही होता." त्याच्या चेहर्‍यावरून अभिमान ओसंडत होता...

अनुभवाअंती माझंही तेच मत झालं आहे. भारताचा देशाभिमान वगैरे ठीक आहे पण पाकी सिंधूच्या खोर्‍यात होणार्‍या बासमतीला पर्याय नाही!! महाग असतो पण पैसा वसूल!!! जसा त्यांचा कोणताही आंबा आपल्या हापुसची बरोबरी करू शकत नाही तसा आपला बासमती त्यांच्या इंडस बासमती तांदळाशी मुकाबला करू शकत नाही!!!

बोलता-बोलता त्याची नजर माझ्या मनगटाकडे गेली...

"घडी नयी ली है क्या सुलेश!"
"नही तो! पुरानीही है!!"
"दिखा, दिखा!!" मी मनगटावरचं घड्याळ काढून त्याच्या हातात दिलं.
"बहुत बढिया है!" त्याने घड्याळ बारकाईने न्याहाळलं. डायलवरची अक्षरं वाचायचा प्रयत्न केला...
"हेच्...हेम्...टी...! ये क्या है?"
"हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स! घडी बनानेवाली कंपनीका नाम है!!"

त्याने तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहिले.

"तुम्हारा क्या मतलब, ये इंडियामें बनी है?"
"हां!! हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स, बंगलोरमें फॅक्टरी है"

अब्दुल खान एकदम गप्प झाला. बराच वेळ हातातल्या घड्याळाकडे बघत राहिला. नंतर घड्याळ माझ्या हातात देत गंभीरपणे स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला,

"पाकिस्तान और इंडिया! दोनो एकसाथ इन्किलाब हुवे!! लेकिन तुम लोगोने कितनी तरक्की कर ली!! हम वहीं के वहीं रहें!! ऐसी खूबसूरत घडियां पाकिस्तानमें नही बनती!!!"
"लेकिन खानसाब, आपके पास इंडस राईस तो है!" मी त्याला खुलवण्याचा प्रयत्न केला. तो हसला...
"हां, इंडस राईस हमें भूखा नही रखेगा, चाहे टेक्नॉलॉजीमें हम कितनेंभी पीछे क्यों न रह जायें!!!" तो उपरोधिकपणे म्हणाला. मला त्याची वेदना जाणवली, मी विषय बदलायचा प्रयत्न केला. पण अब्दुलखान विषय सोडायला तयार नव्हता....

"तुम्हें पता है सुलेश, उस टाईमपर हमारे पठान लीडर गफ्फारखानने मांग की थी की जैसे ईस्ट और वेस्ट पाकिस्तान बनाया है वैसे नॉर्थ्-वेस्ट फ्रंटियरको अलग रखके उसे वेस्ट इंडिया बनाओ! लेकिन किसीने उनकी नही सुनी!! अभी शायद कभी कभी लगता है कहीं वे सही और हम गलत तो नही थे?"

मला काय बोलावे ते कळेना!! मग त्यानेच विषय बदलला,

"खैर! छोडो इन पुरानी बातोंको!! चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. मग आम्ही आपले कुठलातरी हिन्दी सिनेमा बघत राहिलो.....

त्याला हिंदी सिनेमे खूप आवडायचे! त्यातही प्रत्यक्ष सिनेमापेक्षा गाणी छायागीत सारखी बघायला आवडायची. या बाबतीत त्याची आणि माझी आवड सारखी होती.

"पूरी फिलम क्या देखनी, सबकी स्टोरी तो एकही होती है!!" हे त्याचं मत मला पूर्ण मान्य होतं!!! पण त्याची इतर काही काही मतं एकदम भन्नाट होती. एकदा काय झालं....

(क्रमशः)

अब्दुल खान - १

कथादेशांतर

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

29 Apr 2008 - 7:53 am | पिवळा डांबिस

पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:)
http://www.misalpav.com/node/1582
संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!

चतुरंग's picture

29 Apr 2008 - 8:06 am | चतुरंग

छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;(
अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:)
वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका!

चतुरंग

मदनबाण's picture

29 Apr 2008 - 8:10 am | मदनबाण

चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला.
>> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!!

पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :)

(वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा.....
मदनबाण

सहज's picture

29 Apr 2008 - 8:11 am | सहज

धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले.

क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात.

पुढचा भाग लवकर येऊ द्या.

पिवळा डांबिस's picture

29 Apr 2008 - 11:29 pm | पिवळा डांबिस

कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!!

नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:))
कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:))

हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय?
जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))

सहज's picture

30 Apr 2008 - 4:46 am | सहज

पुढच्या प्रतिक्रियेत :))

थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-)

हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 10:01 am | मनस्वी

एकदा काय झालं....

क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका.
हा पण भाग खूपच छान.

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 10:44 am | आनंदयात्री

>>एकदा अशीच गंमत झाली....)
>>एकदा काय झालं....

ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी.
दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.

नंदन's picture

29 Apr 2008 - 12:34 pm | नंदन

म्हणतो :). हा भागही आवडला. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

30 Apr 2008 - 1:51 am | धनंजय

तुमच्या अनोख्या शैलीचा परिचय होतो आहे.

डांबिसकाका!
उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच.
पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी.

तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :)
एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल.
पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत ..............
"अनामिका" ;;)

स्वाती दिनेश's picture

29 Apr 2008 - 11:53 am | स्वाती दिनेश

खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान!
स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र!
'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :)
अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही.
स्वाती

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!!

क्या बात है...

पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता.

वा वा वा!

डांबिसा, सुंदर लेखन रे!

औरभी आने दो...

आपला,
(गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.

विवेक काजरेकर's picture

29 Apr 2008 - 12:10 pm | विवेक काजरेकर

हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे.
इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2008 - 12:54 pm | प्रभाकर पेठकर

मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट...
पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.

भोचक's picture

29 Apr 2008 - 1:34 pm | भोचक

'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.

भडकमकर मास्तर's picture

29 Apr 2008 - 2:31 pm | भडकमकर मास्तर

मजा आ गया...
.अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......

गणपा's picture

29 Apr 2008 - 5:00 pm | गणपा

डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा.
अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे.
तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग.
-गणपा

इनोबा म्हणे's picture

29 Apr 2008 - 8:39 pm | इनोबा म्हणे

डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव.
च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय.

एकदा काय झालं....(क्रमशः)
~X(

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2008 - 8:26 am | मुक्तसुनीत

....असेच म्हणतो !

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 11:01 am | धमाल मुलगा

डांबीसकाका....
मस्त जमली आहे भट्टी!
अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...

त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!

च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात...

बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही?
आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने?

अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे....
साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का?

- मुर्तज़ा अर्जाई धमालखान

लिखाळ's picture

30 Apr 2008 - 4:01 pm | लिखाळ

हा भाग सुद्धा फार मस्त !
खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :)
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
-- लिखाळ.

ब्रिटिश टिंग्या's picture

1 May 2008 - 1:13 am | ब्रिटिश टिंग्या

हा भाग सुद्धा फार मस्त !

संजय अभ्यंकर's picture

30 Apr 2008 - 7:39 pm | संजय अभ्यंकर

गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने!
च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते.

भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला.
हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते.

बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Apr 2008 - 10:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा
मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:)
(हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2008 - 11:35 pm | भडकमकर मास्तर

(हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद
अरे बाप रे ...छान
मला उगीचच वाटलं मी ओळखतो की काय आपल्याला...

पिवळा डांबिस's picture

1 May 2008 - 2:24 am | पिवळा डांबिस

आणि कधी कधी अ॑गात माजही..
(हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद

हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))

वरदा's picture

1 May 2008 - 2:35 am | वरदा

आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...

अभिज्ञ's picture

1 May 2008 - 2:53 am | अभिज्ञ

डांबिसकाका,
लेख फार आवडला.(दोन्हि भाग)
फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय.
अभिनंदन.

बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का?
जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
:) ह.घ्या.

अबब.

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 12:07 pm | धमाल मुलगा

"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......

अबबशेठ,
त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! "
समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!!
एकदा करुन बघाच हा प्रयोग!

सन्जोप राव's picture

1 May 2008 - 6:38 am | सन्जोप राव

जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा.
देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले!
सन्जोप राव

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 3:26 pm | भडकमकर मास्तर

देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले!

सन्जोप राव, +१

=D> =D>