बर्याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;)
चावल्यावर जे मुखी मी घोळले
तेच फिरता पाठ मागे थुंकले
पिंकलो न येथे एकटा मी कधी
सोबतीला हे जथे पण पिंकले
तू कशाला चुना निघताना दिला
तोंड रे माझे अशाने पोळले
मुखरसां, मी काय रे आता करू?
कोपरे सगळे जिन्याचे रंगले
यार माझे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती थुंकण्या हे चालले
हाय हा तांबूल मजला भावतो,
त्या तमाकूविण कुणाचे भागले?
तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी
थुंकण्याचे सुख मलाही लाभले!
हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी
त्यास पिचकारुन आता रंगले!
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे
काव्य नाही मुळिच त्याने सोडले!
चतुरंग
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 9:33 am | विसोबा खेचर
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे
काव्य नाही मुळिच त्याने सोडले!
हा हा! मस्त रे रंग्या...:)
तात्या.
30 Apr 2008 - 11:23 am | केशवसुमार
रंगाशेठ,
झकास विडंबन... चालू द्या..
प्रतिसादाला उशीर झाला क्षमस्व..
केशवसुमार.
30 Apr 2008 - 11:33 pm | चतुरंग
चतुरंग
1 May 2008 - 1:53 am | ब्रिटिश टिंग्या
पचकला 'रंग्याच' जाली हाय रे
काव्य नाही मुळिच त्याने सोडले!
हे हे हे....चतुरंगशेठ लै भारी!