क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 6:44 pm

कालच्या सकाळच्या Today पुरवणीत एक बातमी होती. क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी बद्दल.

त्यात म्हणले होते की "ह्या जमीनी ४० वर्षापासुन पडीक आहेत. हे संशोधकांसाठी आव्हान आहे."

सविस्तर बातमी येथे वाचा.

http://72.78.249.107/Sakal/2Jan2011/Enlarge/PuneCity/PuneToday/page2.htm

काही दिवसांपुर्वी लोकप्रभामधे एक लेख आला होता. त्यात गुजराथमधल्या एका गावाने, कोडिनार त्याचे नाव, या क्षाराच्या समस्येला कसे तोंड दिले याची सविस्तर माहिती दिली आहे.

त्यातील काही भाग.

गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या क्षारग्रस्त ३०० गावांनी विकासाचं एक नवं मॉडेल उभं केलं. लोकांचे कार्यगट, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, पाटबंधारे विभागाची सरकारी यंत्रणा आणि उद्योग समूह यांनी मिळून पिण्यायोग्य पाण्याची भागिरथी कोडिनारमध्ये खेचून आणली.

ही गोष्ट कोडिनार तालुक्याची. सौराष्ट्रातल्या जुनागढ जिल्ह्याचा हा समुद्रतटालगतचा भाग. गेल्या दोन दशकांपासून आधुनिक शेतीचे दुष्परिणाम या भागात दिसायला लागले. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळायला लागली होती. विहिरींवर पंप लागले. दुबार-तिबार पिकांची स्वप्नं सत्यात येऊ लागली. कापूस, तूर, भुईमूग या पिकांबरोबर केसर आंबा, चिकू ही फळं आणि पाणी खाणारा ऊसही घेतला जाऊ लागला. पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला आणि इथेच कोडिनारचा निसर्ग उफराटा वागू लागला. निसर्गत: ही खारजमीन. त्यामुळे पावसाचं मुरलेलं पाणी अवघं पंधरा-वीस फूटच. त्याच्या खाली गेलं की जमिनीला खार लागलीच समजा. पाण्याचा उपसा प्रचंड वाढल्यामुळे समुद्राची खार जमिनीखालून खेचली जाऊ लागली. त्यामुळे इथल्या साऱ्या विहिरी खाऱ्या होऊ लागल्या. पाणी आहे, पण पिता येईना अशी गत.
या सगळ्या खारेपणाचा इथल्या लोकांवर भीषण परिणाम होऊ लागला. पाण्यातल्या क्षारांमुळे मूत्रपिंडाचे विकार तिपटीने वाढले. त्वचारोगांचं प्रमाण वाढलं. आजारपणावरचा खर्च वाढू लागला. पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या स्त्रिया मैलभर लांब जाऊ लागल्या. सोबत पाण्याचे हंडे घेऊन मुलींना घेऊन जाऊ लागल्या. त्यामुळे मुलींच्या शाळा सुटल्या. त्यात खारेपणामुळे शेती ओस पडू लागली. जनावरं दूध देईनाशी झाली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. लोक स्थलांतर करू लागले. जमिनी विकायला काढल्या तरी घ्यायला कुणी येईना. एक दुष्टपर्व सुरू झालं.
..
पण ते दुष्टपर्व आता संपलंय.

सविस्तर माहिती आणि माहितीपुर्ण स्केचेस साठी इथे टिचकी मारा.

http://www.loksatta.com/lokprabha/20101210/desktop.htm

या कामी त्यांना एका सिमेंट कंपनीने मदत केली. कोडिनार हे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचं उत्तम उदाहरण आहे.

या लेखातुन जमीनी पांढ-या का पडतात याची माहिती मिळते. परन्तु पाण्याचा अती उपसा एव्हढेच कारण आहे का या समस्येचे या बद्दल माहीतगारांनी लिहावे. कारण पश्चीम महाराष्ट्रात ह्या प्रकारची जमीन अनेक ठिकाणी बघण्यात आली. तेथील कारणे काय असावीत???

माहीतगारांनी त्याबद्दल लिहावे.

विज्ञानअर्थकारणप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jan 2011 - 5:54 am | निनाद मुक्काम प...

माहिती मिळवण्यास उत्सुक

धनंजय's picture

4 Jan 2011 - 9:22 pm | धनंजय

चांगली माहिती आहे. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2011 - 6:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी कुठल्याशा डॉक्युमेंटरीमधे हे पाहिलं होतं पण एवढी माहिती आठवत नव्हती. लिंक आणि लेखाबद्दल धन्यवाद.