CBFC कडून दिलेल्या जाणार्या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.
असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.
त्यातील काही नावे म्हणजे:
'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता. दुसर्या चित्रपटात दिपक तिजोरीने आणि जितेंद्र ने त्याच्या वडिलांची भुमिका केली होती.
'दिवार' - कलाकार अमिताभ बच्चन. पहिला आला होता १९७५ मध्ये. सह कलाकार शशी कपूर (भाऊ). दुसरा २००४ मध्ये. सह कलाकार अक्षय खन्ना (मुलगा).
'बरसात' - कलाकार बॉबी देओल. पहिला चित्रपट आला होता १९९५ मध्ये. ग्रीक देवतेच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा बॉबी देओल (असे मी ’गुप्त’ चित्रपटाच्या परीक्षणात वाचले होते :) ) नंतर फार चमकला नाही, पण त्याचे चित्रपट मधे मधे येत राहिले. २००५ मध्ये त्याच्या पुन्हा 'बरसात' नावाच्या चित्रपटाचे नाव पाहिले तेव्हा वाटले होते, की ह्याचा पहिला आणि शेवटचा दोन्ही चित्रपट एकाच नावाचे असतील की काय? ;) पण तसे झाले नाही.
मला सध्या तरी आठवत असलेल्या तीन चित्रपटांची ही नावे. तुम्हाला आणखी माहीत असल्यास जरूर सांगा. तेवढीच आपल्या गंमतीशीर ज्ञानात थोडी भर :)
जाता जाता- १९९९ मध्ये आलेल्या 'संघर्ष' ह्या सिनेमात अमन वर्मा ह्या कलाकाराने काम केले होते. त्याचे नाव चित्रपटात दुसरेच होते. पण अक्षय कुमारचे नाव त्या चित्रपटात अमन वर्माच होते. हा योगायोग होता का?
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 11:21 am | आत्मशून्य
हि हि हि
23 Nov 2010 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेराफेरी - जुन्या पिक्चरमधे (१९७६) अमिताभ आणि विनोद खन्ना होते; नव्यात (२०००) ... सांगायची गरज आहे. मला नवीन पिक्चर तुफान आवडतो.
गोलमाल - जुन्या क्लासिकमधे (१९७९) उत्पल दत्त आणि अमोल पालेकर होते; नव्यात (२००६) अजय देवगण, अर्शद वारसी आणि कंपू आहे.
23 Nov 2010 - 12:08 pm | मस्त कलंदर
गुगलायचा कंटाळा आलाय, गरजूं*नी स्वतःचं सालं शोधावीत.
१. आँखे- धरमेंढरं आणि माला शिन्हा बैंचा. मिलती है जिंदगीमें मोहोब्बत कभी कभी वाला.
२. आँखे:-माकड आणि झालंच गोविंदाचा. पहिल्या पिक्चरमध्ये आणि याच्यात दहा वर्षाचं अंतर असेल.
३. आँखे- अमिताभ आणि सुष्मिताचा. बाकीचे लोक लक्षात ठेवले नाहीत पण आंधळ्यांना घेऊन बँक लुटायची असते त्यात.
*- हा गरजू आणि गणपाचा गरजू येगळा.
टीप- आज लहर आल्याने मराठीची कै च्या कैच करायचा मूड आलाय त्यामुळं मधून मधून शब्द सटकतायत...
23 Nov 2010 - 12:26 pm | बेसनलाडू
खुद्दार (१९८२) मध्ये अमिताभ, संजीवकुमार, परवीन बाबी ...
खुद्दार (१९९४) मध्ये गोविंदा, करिष्मा कपूर..
अर्थात, देवदत्तांना हे अपेक्षित नाही. कारणा या दोन्ही खुद्दारांमध्ये सामाईक कलावंत नाही.
(अनपेक्षित)बेसनलाडू
23 Nov 2010 - 12:29 pm | देवदत्त
तसे नाही हो. बहुधा प्रश्न विचारायचा चुकला. बेसनलाडूंनी ओळखले ते.
एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट आणखी असतील तर.. :)
23 Nov 2010 - 12:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी एकाच नावाचे नाहीत पण अक्षय कुमारने 'खिलाडी सिरीज'मधे काम केलं आहे. पण हे अपेक्षित नसावं.
23 Nov 2010 - 3:33 pm | समीरसूर
जितेंद्रने 'औलाद' नावाच्या दोन सिनेमांमध्ये (१९८७ आणि १९६८) काम केले होते.
23 Nov 2010 - 3:34 pm | समीरसूर
मिथून चक्रवर्तीने गुरु मध्ये काम केले होते श्रीदेवी सोबत आणि नंतर अभिषेक/ऐश्वर्या सोबत..
23 Nov 2010 - 3:37 pm | समीरसूर
मिथुनने ३ गुरुं मध्ये काम केले...
२००७ - अभिषेक बच्चन सोबत
२००५ - रचना बॅनर्जी सोबत
१९८९ - श्रीदेवी सोबत