ज्योतीने तेजाची आरती..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 Nov 2010 - 4:00 pm

राम राम,

माझ्याकडे काही दुर्मिळ चित्रसंग्रह आहे, त्यातला हा फोटू. कुणी कुणी दिलेली, कधी कुणाकडे मी मागितलेली. मग कधी ललीमावशी, तर कधी वत्सलाकाकू, तर कधी गजाननबुवांच्या घरातून, तर कधी कुणी जुनाजाणता रसिक.. अश्या अनेकांकडून काही जुनी चित्र हाती आली, पाहायला मिळाली.

आजचं हे चित्र म्हणजे 'ज्योतीने तेजाची आरती..' म्हणावं असं...

बाबूजी गजाननबुवा जोश्यांच्या पाया पडत आहेत तो हा क्षण...!

आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही. थोडंफार इथे वाचता येईल. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर गायकीवर हुकुमत असलेले गजाननबुवा अनेकांचे श्रद्धास्थान होते तसेच बाबूजींचेही होते. स्वत: बाबूजींनाही ग्वाल्हेर घराण्याची उत्तम तालीम मिळालेली पं वामनबुवा पाध्यांकडून. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे बुजुर्ग गजाननबुवा हे बाबूजींचे अगदी आदरस्थान..!

हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्‍या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. :)

आपला,
(ग्वाल्हेर प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2010 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है!!!

बाकी वाद नको तर मग ते शेवटचे वाक्य लिहायचेच कशाला? ;) तात्यासाहेबांची समस बद्दलची मतं माहित आहेतच. (आणि सहमतही आहेच. :) )

रणजित चितळे's picture

16 Nov 2010 - 4:20 pm | रणजित चितळे

बाबुजींचे पाया पडणे पाहुन वाटते - त्यावेळची लोकं किती ग्रेट होती. हल्लीच्या एकदिवसाच्या सेलेब्रेटीस हाय - बाय बोलतात

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2010 - 4:52 pm | बिपिन कार्यकर्ते

एक शंका... आता काय ग्रेट वगैरे लोकं नाहीतच का?

माझे मत... अजून २०-२५ वर्षांनी अश्याच एखाद्या फोटोत असेच एखादे त्यावेळेपर्यंत (खरोखरीच) थोर झालेले व्यक्तिमत्व दुसर्‍या एका ऑलरेडी थोर असलेल्या व्यक्तिमत्वाच्या पाया पडताना माझी मुलगी असेच काहीसे म्हणेल... 'काय ग्रेट लोकं होती ना त्यावेळी'.

श्रावण मोडक's picture

16 Nov 2010 - 4:58 pm | श्रावण मोडक

अरारारारा... तुम्ही प्रतिसादाला खो देताय की...? ;)

५० फक्त's picture

16 Nov 2010 - 5:35 pm | ५० फक्त

ग्रेट्नेस / मोठेपणा हा कालातीत असतो, जसा आत्मा मरत नाही तसांच मोठेपणा आणि सद्गुण, आणि दुर्गुण सुद्धा एक शरीर सोडुन दुसर्या शरीरांत प्रवेश करतांत.

फक्त आपल्याला आपल्या बरोबरची मोठी माणसं ओळखताना संकुचित पणा वाटतो, अवघडलं जातं म्हणुन नेहमी ' त्या काळाची / वेळेची माणसं '' मोठी वाटायला लागतात.

श्री. बाबुजींना मोठे न म्हणणारे काल हि होते, आज आहेत आणि उद्या ही असतील, हिच गोष्ट शिवाजी महाराजांची, तिच श्रीक्रुष्णाची, सावरकरांची, गांधीची.

पण कधी काळी वर उल्लेखलेली माणसंहि एक दिवसांची सेलिब्रिटी होतीच, त्यांनी तो सेलिब्रिटी पणा डोक्यांत जाउ न देता वाटचाल केली म्हणुन मोठेपणा त्यांना मिळाला, आजची एक दिवसांची सेलिब्रिटी जर तसेच वागतिल तर त्यांना हि तो मिळेलच.

आणि माझ्या मुलाला, बिपिनदांच्या मुलीला , एकुणच पुढच्या पिढीला त्यांच्या मागच्या पिढितिल अशी ग्रेट माणसं दिसत राहतील आणि वाट दाखवत राहतील.

हर्षद

बिका मला असं वाटतं आहे की मला चितळे यांना काय म्हणायचय ते कळलं आहे - त्यांना ग्रेट्पणाबद्दल नाही म्हणायचय :)
त्यांना पाया पडण्याबद्दल म्हणायचय. आताच्या सेलिब्रीटीज (जे पुढे ग्रेट होतील) ते जुन्या लोकांच्या पाया न पडता हाय्-बाय करतात, ते त्यांना खटकतं आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

18 Nov 2010 - 8:51 am | अप्पा जोगळेकर

आताच्या सेलिब्रीटीज (जे पुढे ग्रेट होतील) ते जुन्या लोकांच्या पाया न पडता हाय्-बाय करतात, ते त्यांना खटकतं आहे
त्यात खटकण्यासारखं काय आहे. उठल्यासुटल्या नमस्कार करण्याची की भारतीय प्रथा आहे ती काही फार चांगली नाही. उद्या सचिन तेंडुलकर पेक्षाही श्रेष्ठ खेळाडू किंवा त्याच्याइतकाच श्रेष्ठ खेळाडू भविष्यात घडलाच तर त्याने लगेच तेंडुलकरला नमस्कार केलाच पाहिजे या अपेक्षेला काही अर्थ नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2010 - 5:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चितळेसाहेब, एक दिवसाच्या सेलेब्रिटीजची तुलना आपण नक्की कोणाशी करता आहात? किंवा सुधीर फडक्यांची तुलना एक दिवसाच्या सेलेब्रिटीजशी होत आहे का?

श्रावण मोडक's picture

16 Nov 2010 - 5:17 pm | श्रावण मोडक

एक दिवसाच्या सेलेब्रिटीजची तुलना आपण नक्की कोणाशी करता आहात? किंवा सुधीर फडक्यांची तुलना एक दिवसाच्या सेलेब्रिटीजशी होत आहे का?

अहो, तसं नाही. लेखकाच्या सुरात सूर मिळवण्याचा प्रयत्न करताना कोमलगंधाराची जागा ऋषभानं घ्यावी तसं झालं हे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2010 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे गल्ली चुकलं का वो ते ...? (श्रेय: भाईकाका)

श्रावण मोडक's picture

16 Nov 2010 - 5:35 pm | श्रावण मोडक

हां. तो साथीचाच सूर. तरीही पंडित जसराज यांच्या एका मैफिलीतला एक किस्सा सांगतोच. त्यांच्या भजनात साथ देताना त्या पोरसवदा गायिकेनं काही करामत केली. जसराजही चमकले. मग म्हणाले तिला, बेटा परत गा! पण ते शक्य नव्हतं. जसराज म्हणाले, "ही (साथ देणारी) मंडळी चुकतात, पण कधीतरी अशी काही करामत करतात की बोलता येत नाही."
तात्पर्य - मूळ सूर नेमका असताना साथीचा सूर चुकू शकतो आणि रागाचा काष्टा सुटू शकतो... (पुन्हा श्रेय - भाईकाकाच).

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2010 - 7:03 pm | बिपिन कार्यकर्ते

कोण जसराज?

धन्यवाद.

- सौजन्य ... जाऊ द्या, तो विषय परत केव्हा तरी. :D

श्रावण मोडक's picture

16 Nov 2010 - 7:15 pm | श्रावण मोडक

"हल्लीच्या... " ;)
श्रेय: असो. तूर्तास वाद नको... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2010 - 9:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाद नको तर विषय का हो उकरता श्रामो? तुमच्या जुन्या पिढीचा हाच प्रॉब्लेम आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Nov 2010 - 7:19 pm | लॉरी टांगटूंगकर

ओ भौ
जसराजजी लई भारी काय!!!
उगाचच काहीही बोलायचे नाही.प्रचंड उच्च आहेत ते

हा प्रसंग प्रत्यक्ष बघीतला होता,सवाईत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2010 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ.

असलेले गजाननबुवा अनेकांचे श्रद्धास्थान होते तसेच बाबूजींचेही होते. >>>

होते आणी राहतील , गजाननबुवांविषयी तुमच्याकडुनच थोडेफार एकले असल्याने लेखन-सीमा !!

बाबुजींचे एक ग्रेट गाणे.

हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्‍या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. >>>

तात्या ईतकी पण बिघडलेली नाही हो पिढी आमची ...त्याच मोबाइलमध्ये , यमन , मारवा डाउनलोड करून एकणारी मंडळी पण आहेत.

विसोबा खेचर's picture

16 Nov 2010 - 9:54 pm | विसोबा खेचर

एकवार पंखावरुनी..

सुहासराव, या निमित्ताने माझं फार आवडतं गाणं ऐकवलंत..

धन्यवाद..

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

18 Nov 2010 - 8:57 am | अप्पा जोगळेकर

हे गाणं तात्यांनी मुख्पॄष्ठावर टाकलं होतं मागे एकदा. जब्राट आहे.

तात्या ईतकी पण बिघडलेली नाही हो पिढी आमची ...त्याच मोबाइलमध्ये , यमन , मारवा डाउनलोड करून एकणारी मंडळी पण आहेत.
जाउंद्या सुहासराव. आमच्या वेळेला अमुक ढमुक होतं असं सांगणारे फार भेटतात हल्ली. आमचे तीर्थरुप तर वारंवारच ऐकवतात हे वाक्य. आणि एवढ्या मागे तरी कशाला जा. मला पास ऑट होउन फक्त तीन वर्षं झाली तरी माझे कित्येक मित्र 'छ्या. आपण शाळेत असताना असं नव्हतं ब्वॉ' असा सूर लावतात. चालायचंच.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Nov 2010 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

परवा मी केसुगुर्जींच्या पाया पडलो तो फोटु हाय काय कुणाकडे ?

श्रावण मोडक's picture

16 Nov 2010 - 6:35 pm | श्रावण मोडक

खऱंच की.
परा, तू भाग्यवान. अशा लोकांच्या पाया पडण्याची संधी तुला मिळते. ;)
तो फोटो इथं टाकून आम्हालाही केसुगुर्जींच्या पददर्शनाची सधी द्यावी ही विनंती. :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Nov 2010 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार

परा, तू भाग्यवान. अशा लोकांच्या पाया पडण्याची संधी तुला मिळते.

पाया पडेपर्यंत मला पण असेच वाटत होते ;) पाया पडलो तर गुर्जी म्हणाले 'दारु सोड !'

मी गुर्जींचे पाय सोडले आणि घरी गेलो.

तो फोटो इथं टाकून आम्हालाही केसुगुर्जींच्या पददर्शनाची सधी द्यावी ही विनंती.

मध्ये दिला होता ना त्यांनी समस्त मिपाकरांसाठी पावलांचा फोटू. भवतेक त्यांच्या 'परिकथेतील राजकुमारा' ह्या धाग्यावर होता. शोधतो आणि देतो.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2010 - 7:09 pm | धमाल मुलगा

>>पाया पडेपर्यंत मला पण असेच वाटत होते Wink पाया पडलो तर गुर्जी म्हणाले 'दारु सोड !'

आता एकदम तू केसुगुर्जींच्या काष्टाला का हात घातला म्हणे? :D

तिमा's picture

16 Nov 2010 - 7:20 pm | तिमा

पण आमचेही दैवत असलेले हे सुधीर फडके एकदा बाळ ठाकर्‍यांच्या पाया पडले होते. ते आम्हाला अजिबात नाही आवडलं.

अप्पा जोगळेकर's picture

18 Nov 2010 - 9:00 am | अप्पा जोगळेकर

अहो तो जुलमाचा राम्राम असणार. मी ऐकलंय की मातोश्रीवर गेलं की मुजरा करावा लागतो (तो नॄत्यवाला मुजरा नाही हां. म्हणजे मी कुर्निसात वाल्या मुजरा बद्दल बोलतोय. अवांतरपणा नाय करायचा उगाच.)

निवेदिता-ताई's picture

16 Nov 2010 - 8:00 pm | निवेदिता-ताई

बाबुजींचे एक ग्रेट गाणे.......................अतिशय सुंदरच.....ऐकतच रहावे...

अवलिया's picture

17 Nov 2010 - 12:35 pm | अवलिया

ज्योतीने तेजाची आरती...

वा ! तात्या ! ग्रेट !
तुझ्याकडचा खजिना असाच दाखवत जा रे मधुन मधुन !
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि जीव सुखावतो !
अरे काय गाणी होती एकेक... हिमालयाएवढी माणसं ही !

आजकाल पर्वती चढुन कांचन गंगा सर केल्याचे आव आणणारे पाहिले की कीव वाटते ! असो ज्याची त्याची हेच खरे... !

विसोबा खेचर's picture

17 Nov 2010 - 2:03 pm | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..

तात्या.

अर्धवटराव's picture

17 Nov 2010 - 10:29 pm | अर्धवटराव

तात्या.. तुमची हि "औपचारीक आभार" मानायची स्टाईल आपल्याला लई आवडते... म्हणजे कसं.. प्रतिसादी आहेस का रे तू? यांना कांदा भजी आणि चहा आणा रे. कोण म्हणालास? वाचनमात्र काय? पानसुपारीवर बोळवण करा रे याची...

(कांदा भजी, चहा आणि पानसुपारी घेतलेला) अर्धवटराव

विसोबा खेचर's picture

18 Nov 2010 - 1:31 pm | विसोबा खेचर

मस्त.. :)

अर्धवट's picture

17 Nov 2010 - 2:11 pm | अर्धवट

मस्त फोटो आहे.. अमुल्य..

तात्या.. ते गाणिगिणी इस्कटुन सांगायचं काढलं होतं ते काय बंद केलं का... आमाला आडाण्याला बरी सोय होती की..

चांगभलं's picture

17 Nov 2010 - 2:22 pm | चांगभलं

तात्या या फोटू बद्दल.. अनेक आभार........

सध्याच्या " शेफार्लेल्या नव गायकांसाठी" उत्तम शिकवण

सुप्रिया's picture

29 Nov 2010 - 3:04 pm | सुप्रिया

धन्यवाद तात्या. तुमच्या खजिन्यातून बाकिचे फोटो पण येऊ देत.

-सुप्रिया