डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले!
तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे
हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे
प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो
त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे
बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला
जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे
आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास
प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे
हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही
दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे
हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही
फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे
चतुरंग
प्रतिक्रिया
22 Apr 2008 - 8:57 am | अजय जोशी
बघा की राव ...
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी