मूर्तीपूजा - १

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
2 Nov 2010 - 8:30 am

निर्गुण आणि निराकार ईश्वराची उपासना करणे ही सामान्य माणसांच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे हे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी जाणलं होतं. अनादि, अनंत ईश्वर जरी चराचरामध्ये वास करून असला तरी त्याच्या निर्गुण रूपाला भजणं मोठं कठीण काम आहे. यावर त्यांनी तोडगा काढला तो म्हणजे सगुण ईश्वरोपासना. अर्थात मूर्तीपूजा.

या भागा मध्ये रामचरीतमानसमधील मूर्तीपूजेवरील काही श्लोक पाहू.

सीतास्वयंवराचे आधी, शिवधनुष्य भंग होण्यापूर्वी , सीता ही पार्वतीच्या मूर्तीसमोर प्रर्थना करत असताना, पार्वतीची मूर्ती प्रेमाने स्मितहास्य करते असा प्रसंग तुलसीदासजींनी रामचरीतमानसमध्ये रंगविला आहे.

"बिनय प्रेम बस भई भवानि| खसी माल मूरती मुसकानी||
सादर सियँ प्रसाद सिर धरेऊं| गौरी हरषी हिअँ भरेऊ||"

दुसरा प्रसंग रामरावण युद्धाच्या आधीचा आहे. लंकेत अनेक अपशकुन घडू लागतात. मंदोदरीचे हृदय भयकंपीत होते. पैकी एक अपशकुन हा होतो की मूर्तींच्या डोळ्यामधून अश्रूधारा वाहू लागतात.

"असुभ होने लागे तब नाना|रोवहि खर सृकाल बहु स्वाना||
बोलहि खग जग आरति हेतु| प्रकट भए नभ जहँ तहँ केतु||
दसदिस दाह होने अति लागा| भयऊ परब बिनु रबि उपरागा||
मंदोदरी ऊर कंपीत भारी| प्रतिमा स्त्रवहि नयन मग भारी||"

मान्य की मूर्तीपूजा ही कर्मकांडामध्ये येते. मूर्तीची पंचोपचारे नित्योपासना करणे याला आपल्या संस्कृतीत महत्व आहे. पण त्यामागेदेखील कारण आहे. प.पू. टेंबेस्वामींचा पुढील श्लोक पाहू या -

स्थूलाक्षराल्लीपीज्ञानं शिशोरीव परात्मन:|
गुरुक्तार्चाकल्पनया हृत्स्थैर्यात्बोध्भवेत||
सतोम्बाद्येपि बिंबस्य प्रतितिर्न मलन्विते||

अर्थात ज्या रीतीने बालकाला मोठ्या अक्षराच्या रीतीने लीपीज्ञान होते त्याचप्रमाणे गुरुक्त (स्थूल मूर्ती) च्या सहायाने चित्त स्थिर होऊन मनुष्यास सूक्ष्म (ईश) तत्वाचा बोध होतो. आरसा अथवा जल अस्वच्छ असेपर्यंत ज्याप्रमाणे बिंब स्पष्ट दिसत नाही त्याचप्रमाणे वासनांचा मळ साठलेल्या चित्ताची शुद्धी झाल्याखेरीज ईश्वराचे ज्ञान होत नाही.

षोडषोपचारांमध्ये पुढील कर्मकांडांचा अंतर्भाव होतो - आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य,स्नान, वस्त्रधारणा, यज्ञोपवित्,पुष्प, धूप, दीप, नेवैद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, विसर्जन. तर पंचोपचारी पूजेमध्ये यातील फक्त पुढील विधींचा समावेश होतो - गंध, पुष्प, धूप, दीप, नेवैद्य.

पुढील आणि अंतिम भागात - काही तीर्थस्थळांच्या मूर्ती आणि त्यांची वैशिष्ट्ये, आख्यायिका पाहू.

संस्कृतीधर्मलेख

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 9:18 am | llपुण्याचे पेशवेll

जरा मोठे मोठे लेख लिहा ना. लेख चालू होत नाही तोच संपून जातो.

http://www.misalpav.com/node/8389
या धाग्याची आठवण येऊन गेली उगाच.

कोणता धागा वर काढलास :) वाचून खूप मजा वाटली.
शुचि, खरच इतके त्रोटक का लिहितेस. लिहिलेल्याला लेख म्हणावे इतके तरी लिही की गं :)

ह्म्म त्रोटक होतं खरं.

ए.चंद्रशेखर's picture

2 Nov 2010 - 12:36 pm | ए.चंद्रशेखर

निर्गुण आणि निराकार ईश्वराची उपासना करणे ही सामान्य माणसांच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे

हा शोध प्रस्तुत चर्चाविषयाच्या लेखिकेने कोठून लावला? ते कळत नाही. हिंदु धर्म सोडला तर बाकी सर्व धर्म परमेश्वराला निर्गुण व निराकारच मानतात. बौद्ध धर्मातील महायान पंथ व कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माच्या प्रेषिताची मूर्तीपूजा करतात. परमेश्वराची नाही. इस्लाम व प्रॉटेस्टन्ट तेही करत नाहीत.

निराकाराला भजणं हे सगुणाला भजण्यापेक्षा कठीण आहे हे सत्य आहे. हा शोध लवलेला नाहीये, जे काही संतांनी सांगीतलं आहे तेच इथे मांडलं आहे. माझा फोकस हिंदू धर्मावर आहे. अन्य धर्मामधील मूर्तीपूजा, निराकार पूजा यावर आपण वेगळा धागा काढू शकता.

ए.चंद्रशेखर's picture

2 Nov 2010 - 3:10 pm | ए.चंद्रशेखर

धाग्याच्या मथळ्यात हा धागा हिंदू धर्माबद्दलच आहे असे आपण लिहिले असतेत तर माझा प्रतिसाद मी दिलाच नसता.
एक शंका
बाकीच्या धर्मातील सर्व सामान्यांना जर निर्गुण व निराकार ईश्वराला भजणे इतके सोपे जात असले तर हिंदू धर्मिय सर्वसामान्यांना मात्र ते इतके अवघड का जात असावे? किंवा संताना तसे का वाटत असावे?

मूकवाचक's picture

2 Nov 2010 - 3:59 pm | मूकवाचक

प्रतिकात्मकता सगळ्यानाच लागते. निर्गुण, निराकार वाले ज्या देशात राहतात तिथेही राष्ट्रध्वज असतोच. ठराविक चिन्हे (चान्दतारा, क्रॉस, लाल झेन्ड्यावरचा विळा हातोडा) असतात. ठराविक रन्ग, पशु, अन्न, वस्त्र इ. बाबतीत पावित्र्याच्या सन्कल्पना असतातच. निर्गुण, निराकार सर्वव्यापी असूनही ठराविक पवित्र तीर्थस्थळे आणि प्रार्थनास्थळे असतातच. प्रतिकात्मकता टाळणे आणि मूळ गोष्टीला थेट भिडणे इतके सोपे असते तर हा सगळा पसारा कशाला?

बाकीच्या धर्मातही प्रतिके वापरली जातात. फरक एवढाच की एक निर्गुण निराकार देव आणि त्याचा एक प्रेषित. ख्रिश्चन लोकांमधे या जोडीला ढिगभर सेंटस असतात. पॅट्रन सेंट प्रकार असतो. म्हणजे तुमच्या विशिष्ठ अडचणीसाठी तुम्ही विशिष्ठ सेंटची प्रार्थना करता. कॅथोलिक मासमधे ही भरपूर कर्मकांड चालते.

विसोबा खेचर's picture

2 Nov 2010 - 1:11 pm | विसोबा खेचर

निर्गुण आणि निराकार ईश्वराची उपासना करणे ही सामान्य माणसांच्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे हे ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी जाणलं होतं

असहमत.. आमचा यमन, आमचा हमीर हेही निर्गुण निराकार ईश्वरच..! त्याची उपासना करणे हा आमच्या कुवतीबाहेरचा विषय नसून उलटपक्षी आनंदाचाच भाग आहे..

शिवाय एखादी गोष्ट कोणाच्या कुवतीबाहेर आहे की नाही हे जाणणारे ऋषिमुनी कोण? शिवाय कोण सामान्य, कोण असामान्य हे देखील ठरवणारे ऋषिमुनी कोण??

आरसा अथवा जल अस्वच्छ असेपर्यंत ज्याप्रमाणे बिंब स्पष्ट दिसत नाही त्याचप्रमाणे वासनांचा मळ साठलेल्या चित्ताची शुद्धी झाल्याखेरीज ईश्वराचे ज्ञान होत नाही.

शुचिजी, अलिकडे तब्येत ठीक नाही का? काही होतंय का? नका उगाच असला काहितरीच विचार करत जाऊ..! :)

तात्या.

--
" आत्म्याची केली चांगली वाटून घोटून गोळी आणि मग बं भोले..! " :)

" मिठाईलासुद्धा आत्मा असतो ना काकाजी?! " :)
(-- नाटक - तुझे आहे तुजपाशी)

शुचि's picture

2 Nov 2010 - 3:01 pm | शुचि

तात्या अलिकडेच नाही "अध्यात्म" माझा पूर्वीपासूनचा आवडीचा विषय आहे. माझी तब्येत अगदी खणखणीत आहे. आपण काळजी करू नये :)

मूकवाचक's picture

2 Nov 2010 - 4:46 pm | मूकवाचक

प.पू. तात्या, तानपुर्यातून स्वयम्भू गन्धार ऐकू यावा तसे निराकारचे आहे. तो असाच हवेतून ऐकू येत नाही. तसा तानपुरा जुळवण्यासाठी आधी खुन्ट्या पिळाव्या लागतात आणि त्या बिनचूक पिळता येण्यासाठी आणि नेमके स्वरज्ञान होण्यासाठी गायकाला पण बरीच घासावी लागते. गुरूगिरू करावा लागतो. असो.

अध्यात्मात इन्टरेस्ट असणारे सगळे काकाजी, मामाजी असे सरसकटपणे ठरवणार्याला आणि कृष्ण आणि ज्ञानदेव यान्च्यापेक्षा पु.ल., व.पु. आणि जी.ए. यान्चा अध्यात्मिक अभ्यास आणि अधिकार मोठा होता असे पुन्हापुन्हा अधिकारवाणीने सान्गणार्याला सामान्य कोण म्हणेल? तेव्हा सन्त सामान्य लोकान्बद्दल जे काही म्हणतात ते बरोबर की चूक हे सामान्यजनाना ठरवू दे. त्याबद्दल असामान्यान्चा त्रागा कशाला?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Nov 2010 - 8:53 am | llपुण्याचे पेशवेll

मूकवाचक यांच्याशी सहमत आहे.

शुचि's picture

2 Nov 2010 - 5:51 pm | शुचि

तात्या, तुमचा मुद्दा अचूक आहे. संगीत हे साक्षात निराकार नादब्रम्हच. यातून सामान्यांना कैवल्यानंदाची प्राप्ती होते. क्षणभराकरता, सर्व इंद्रिये कासवासारखी अंतर्मुख होऊन, चित्तवृत्ती साक्षात नादब्रम्हाशी तादात्म्य पावते. तेव्हा संगीताची उपासना म्हणजे निराकाराची उपासनाच.

माझा पहीली मुद्दा "संगीत ऐकण आणि ते अतिशय आवडणं" म्हणजे या भक्तीचा परमोच्च बिंदू जी की समाधीवस्था आहे ती गाठणं नाही असं मला वाटतं.

माझा दुसरा मुद्दा ज्यांनी संगीताची कठोर उपासना केली ते सामान्य होते का?

तिसरा मुद्दा हे लोक सामान्य नव्हतेच आणि तरी देखील त्यांना समाधीपर्यंत जाता आलं का? तर नाही. किंवा क्वचितच.

यावरून लक्षत येइल निराकाराची उपासना किती अवघड आहे, असामान्यांकरता इतकी अवघड आहे मग सामान्यांची काय कथा?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2010 - 4:59 pm | बिपिन कार्यकर्ते

या धाग्यावर मूकवाचक यांच्या प्रतिसादांशी बाडिस असेन असे वाटते. त्यांनी तात्यांना आणि चंद्रशेखर यांना दिलेले प्रतिसाद पाहून तसेच वाटते.

@ तात्या : निर्गुण निराकार या विशेषणातच व्याख्या आहे. संगितात सूर असतात आणि त्याद्वारे गायकाला आणि श्रोत्याला विशिष्ट समाधान मिळते. पंचेंद्रियांच्या सहाय्याने ज्या जाणिवा होतात त्या सगळ्या सगुणातच मोडतात.

@ चंद्रशेखर : जगातला एक धर्म अथवा तत्वज्ञान विचारसरणी (बहुधा भारतीय सांख्य की चार्वाक सोडल्यास, ते ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. तसेच आधुनिक निरीश्वरवादी किंवा अज्ञेयवादी पण सोडून द्या.) दाखवा की जे त्यांच्या स्पिरिच्युअल अंगामधे कोणतेही प्रतिक न वापरता उपासना पद्धत अंगिकारतात. कोणाला मूर्ति लागते तर कोणाला काबा तर अजून कोणाला क्रॉस आणि अजून काही बुद्धमूर्ति किंवा अग्नि समोर नतमस्तक होतात.

बाकी चालू द्या. पॉपकॉर्न घ्यायला जावे का असाही विचार करतोय. पण मजा येणार हे निश्चित.

स्वाती२'s picture

2 Nov 2010 - 5:53 pm | स्वाती२

+१

अवलिया's picture

2 Nov 2010 - 6:16 pm | अवलिया

+२

नितिन थत्ते's picture

2 Nov 2010 - 6:00 pm | नितिन थत्ते

निर्गुण उपासना ही सगुण उपासनेपेक्षा वरची हे मान्य नाही.

मूर्तीपुजा हजारो* वर्षांपासून नसावी. बुद्धाच्या नंतरचीच** असावी. प्रियाली वगैरे यावर प्रकाश टाकतीलच.

बाकी चालू द्या

* येथे ५००० ते २५००० यापैकी कोणताही आकडा धरावा. :)
** बुद्धाच्या नंतरची असे म्हटले असले तरी बुद्ध याला कारणीभूत होता असा दावा नाही.

प्रियाली's picture

2 Nov 2010 - 6:02 pm | प्रियाली

प्रियाली वगैरे यावर प्रकाश टाकतीलच.

सॉरी! हे उपक्रम नाही. ;)

बायदवे, इसविसन सुरु होऊन दोन "हजार" वर्षे उलटून गेली आहेत. ;)

नितिन थत्ते's picture

2 Nov 2010 - 6:08 pm | नितिन थत्ते

ओके

मिसळभोक्ता's picture

3 Nov 2010 - 1:42 am | मिसळभोक्ता

अहो, पण मूर्तीपूजा "हजारो" दिवसांपासून होती, ह्याचे प्रूफ म्हणून तुलसीदासाचे दोहे आणि प. पू. टेंबेस्वामी (म्हणजे काय कोण जाणे) ह्यांचा श्लोक दिलाय !

कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती साधारण ५ ते ६००० वर्ष जुनी आहे. *

स्त्रोत - जाल

नितिन थत्ते's picture

2 Nov 2010 - 6:17 pm | नितिन थत्ते

बॉऽऽऽर

काहीतरी चुकीचे सांगत आहात असे वाटते.

जालावर http://www.ambabai.com/index.html या संकेत स्थळावर खालील माहिती आहे.

Ambabai (Mahalaxmi) temple has a rich & glorious history. The construction begun before 12 th century & existing temple was built during late 12 th century. The maximum construction of this temple is been built by Shilahar King during 12 th century.

The architecture of the temple is purely Chalukyan & not Dravidian.

The Sanskrit inscription on a stone tablet in the wall of the house of Annacharya Panditrao, now in the town hall museum says, “The great Kind Bhojadeva was reigning peacefully with pleasing conversation at Panhala; in 1190. He with a view to ensure the prosperity of his kingdom, and for the maintenance of the people residing in the monastery built by his dependent Loka-nayaka, for performing five kinds of worships of the deities Amruteshwara & Uma-Maheshwara, for offering to the goddess Mahalaxmi three times a day. And for the maintenance of his dependant Brahmins, and for the repairs of the monastery, granted in charity to four persons residing at the monastery.”

शुचि's picture

2 Nov 2010 - 7:35 pm | शुचि

http://www.ourkolhapur.com/Kolhapur_Mahalaxmi.php?hisp=1

Mahalaxmi is mentioned in many Puranas. The idol of the Devi is made of precious stone, weighing about 40 Kgs. It contains mater mixed with Hirak bits. This throws lighton its ancientness. The form resembles the out-side of Shiva-Ling. It is standing on a stone square, in which Hirak & Sand are found. A lion stands behind. At the middle, there is a natural "Padma-Ragini" (Lotus). The idol is four handed bearing a cane sword & shield. Down the right hand holds "Mhalung" (A kind of fruit) and the left holds dish of "Pan". There is a crown on head, which is overshadowed by Sheshani (Mythological Cobra with hood, the bed of lord Vishnu). According to research it is 5-6 thousand years old.

मग तो ५ ते ६००० वर्षाचा उल्लेख कशाचा आहे बरं मुगुटाचा का नागाचा आहे का?

रिसर्चनुसार असे नुसते म्हणुन उपयोग नाही. कूणी केला रिसर्च? आणि आधार कितपत विश्वासार्ह आहे हे पहावे लागेल. पाच सहा हजार वर्षांपूर्वी कोल्हापुरात मानव वस्ती आणि ती सुद्धा वैदिक/हिंदू मान्यता असलेले लोक होते का? ह्यावर मानववंशाचे अभ्यासक प्रकाश टाकतील. :)

केवळ पुराणात महालक्ष्मीचा उल्लेख आहे म्हणुन ती अनादी अनंत कालापासुन आहे असे मानता येणार नाही.

चित्रा's picture

3 Nov 2010 - 1:10 am | चित्रा

संदर्भ कुठचे, कोणाचे आहेत हेसुद्धा महत्त्वाचे असते.

महालक्ष्मीची मूर्ती पाच हजार वर्षे जुनी असणे शक्य नाही.
गजलक्ष्मी सारखी मूर्ती ही दोन-एक हजार वर्षे जुनी आढळते. त्यामुळे आपण लक्ष्मी म्हणतो ती देवता अस्तित्वातच याहून नंतर आली, तेव्हा तिची पाचहजार वर्षे जुनी मूर्ती असणे शक्य नाही.

परंतु स्त्री स्वरूपाच्या मूर्तींचा (मातृके) वापर ही परंपरा मात्र अनेक देशांत आढळते आणि फार प्राचीन आहे.

नंतर एका साईट्वर वाचलं की ज्या रत्नांपासून महालक्ष्मीची मूर्ती बनवली आहे ती रत्ने ५ ते ६००० वर्षापूर्वीची आहेत. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेते.

मिसळभोक्ता's picture

3 Nov 2010 - 1:43 am | मिसळभोक्ता

ज्या दगडांपासून मुर्ती बनवली, ते तर लाखो वर्षांपासून असतील. तसेच काही दगड माझ्या घरासाठी वापरले आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2010 - 6:19 pm | बिपिन कार्यकर्ते

मूर्तीपुजा हजारो* वर्षांपासून नसावी.

आपल्याला असे का वाटले हे समजून घ्यायला आवडेल. शिवाय, सगुणोपासना म्हणजे केवळ मुर्तीपूजा असेही नव्हे.

अवलिया's picture

2 Nov 2010 - 6:24 pm | अवलिया

>>>निर्गुण उपासना ही सगुण उपासनेपेक्षा वरची हे मान्य नाही.

निर्गुण म्हणजे काय? त्याची उपासना म्हणजे नक्की काय? सगुण म्हणजे काय ? त्याची उपासना म्हणजे काय? त्या दोघांमधले साम्य काय? फरक काय? निर्गुण उपासना सगुणोपासनेपेक्षा वरची नाही म्हणजे नक्की काय? मग बरोबरीची आहे का निम्न आहे? कशी आहे? का आहे? याचे विवेचन वाचायला आवडेल. कृपया प्रकाश टाकावा.

>>>मूर्तीपुजा हजारो* वर्षांपासून नसावी. बुद्धाच्या नंतरचीच** असावी.

हे आकलन कसे केले? संदर्भ द्या ! मूर्तीपूजेचा पहिला उल्लेख कुठे सापडतो? त्याचे स्पष्टीकरण द्या !!

क्या बात है! आपण साला नानांची फ्यान आजपासून ;)

मुर्ती ५/६ हजार वर्षापुर्वीची आहे. खुप नवीन माहिती बर मग ती स्थापन कुणी केली?

तुम्हाला प्रश्न पडलाय ना मग उत्तरही तुम्हीच शोधा हं वेताळ्काका.
मी वरती अवलियांच्या धाग्यात सांगीतलं आहे की मला कुठे ही माहीती मिळाली ते.

वेताळ's picture

2 Nov 2010 - 7:51 pm | वेताळ

सरळ साधी माणसे आम्हाला देव कधी जागेपणी सोडा पण स्वप्नात देखिल दिसला नाही.
कोल्हापुरात राहुन देखिल कोल्हापुरचा इतिहास २००/३०० वर्षापुर्वीचा माहित नाही म्हणुन तुमच्या कडे खुप अपक्षेने बघतो आहे.तुमची अध्यात्मातील ऊर्जा प्रचंड आहे.

शुचि's picture

2 Nov 2010 - 8:10 pm | शुचि

वोके! ( हे फक्त तुमच्या प्रतिसादाला पाचर मारण्यासाठी ;))

वेताळ's picture

2 Nov 2010 - 7:41 pm | वेताळ

ऋषीमुनींच्या बापानी किंवा त्याच्या पणजोबानी ईश्वराला कोणत्या स्वरुपात भजले होते?
ईस्वराची उपासना कोणत्या स्वरुपात प्रथम झाली?

शुचि's picture

2 Nov 2010 - 8:11 pm | शुचि

मला माहीत नाही.

मदनबाण's picture

2 Nov 2010 - 8:25 pm | मदनबाण

ह्म्म्म...

अवांतर :--- मूर्तींच्या डोळ्यामधून अश्रूधारा वाहू लागतात.
हे वाचुन मला हे गाणं आठवलं... :)

जरा हे देखील वाचा :--- http://chinusden.blogspot.com/2010/06/blog-post_23.html

च्यायला, तर्कसंगत विचार करणार्‍यानां विचारवंत असे हिणवणारे अध्यात्माच्या बाबतीत काय काय तर्क लावुन धन्यता मानतात राव! आपल्यालाला तर ब्वॉ झोप आली ही चर्चा पाहुन.

मुक्तसुनीत's picture

2 Nov 2010 - 8:55 pm | मुक्तसुनीत

विचारवंत या शब्दाऐवजी त्याची आणखी भ्रष्ट आवृत्ती वापरली जाते.
नाईल यांचा अभ्यास कमी पडतो असे खेदाने नमूद करतो. या अनभ्यस्तपणाची मला शरम वाटते.

श्री मुसु यांना आमचे सहृद (आणि संपादक) या नात्याने माझ्या वरील प्रतिसादात योग्य तो बदल करण्याची विनंती करतो. ;-)

बाकी आमची श्रद्धा होतीच की आमच्या चुका दुरुस्त करणारा कोणीतरी वर* आहे म्हणून

*वर म्हणजे पदतालिकेत बरं का. ;)

विचारजंत हा शब्द मी आयुष्यात कधीही वापरला नाहीये मग माझ्या धाग्यावर हे अवाम्तर कशासाठी?

अर्धवटराव's picture

2 Nov 2010 - 9:42 pm | अर्धवटराव

शुचितै,
तुम्ही मुकवाचकांच्या अश्याच एका धाग्यावर त्यांना सल्ला दिला होता ना... त्याच प्रमाणे तुम्ही देखील प्रत्येकाची प्रत्येक शंका का मनावर घेताय ? जे ज्येनुइन वाटतात त्यांनाच उत्तर द्या ना. उगाच धाग्याचं खोबरं होईल नाहितर. इथे ज्ञानदेवांसारख्यांची, ते हयात असताना-नसताना, लोकांनी हेटाळणी केली... बाकिच्यांची मग काय बात...

(अज्ञानी) अर्धवटराव

सहमत आहे फुकाच्या गप्पा मारताना कुणाची पर्वा का करा?

इथे रस्त्यावरच्या वैद्यांकडे लोक अगदी श्रद्धा भक्तीभावाने जातात. स्वामी नित्यानंद वगैरे लोकांकडे सुद्धा लोक अगदी श्रद्धेने जातात (नंतर त्यांच्या मुर्तीपुजेचे व्हिडो जगभर होतात ही बाब निराळी). तो पुट्टपर्तीचा साईबाबा खोट्या हातचलाख्या करतो तिथे सुद्धा लाखो लोक अगदी श्रद्धेने जातात. थोडक्यात काय, मुर्ख बनणारे जगात अनेक आहेत तुम्ही बनवत रहा. काही बाही लिहित रहा, पर्वा कोण करतो?

मजकूर संपादित. आपला मुद्दा पटवून देताना लोकांना शेलक्या विशेषणांनी आणि अपमानास्पद शब्दांनी संबोधित करू नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2010 - 10:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही बाही लिहित रहा, पर्वा कोण करतो?

मिपावरच्या इतर जाहीर नास्तिकांबद्दल माहित नाही, पण तुम्ही मात्र फारच पर्वा करता आहात असं लक्षात येत आहे.

ज्ञानेश्वर झाले, आता रामदास सांगुन गेले आहेत नं, विसरलात काय तुम्ही?

मूकवाचक's picture

2 Nov 2010 - 10:15 pm | मूकवाचक

बाजारात नकली नाणी, नोटा असतात म्हणून चलन रद्दी ठरत नाही, की रद्द होत नाही.
तुम्ही दोन चार बुवा, बापू आणि वैदू यान्चे सन्दर्भ नसलेले दाखले देत सरसकट विधाने करत सुटला आहात. लाखो लोक कुठे खड्ड्यात जातात ते जाऊ द्यात. इथे नेमक्या कुणी फुकाच्या गप्पा मारल्या आणि कुणी कुणाला मूर्ख बनवले हे सान्गाल तर बरे होईल.

येणार्‍या विपरीत प्रतिसादाने लगेच ज्ञानेश्वरांशी तुलना करुन सर्व विपरीत प्रतिसाद देणारे जेव्हा एकाच तराजुत तोलले जातात तेव्हा काय चुकते हे दाखवलेले आहे. कोण काय फुकाच्या गप्पा मारतो आहे हे लिहलेच आहे, दरवेळी लिहेनच असे नाही, जमेल तेव्हा लिहेन.

सिन्धू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या काही मूर्ती (उदा. लिन्गसदृष) या पूजेकरता असाव्यात असा अंदाज आहे. तसे असेल तर मूर्तीपूजा किमान ५००० वर्षे तरी अस्तित्वात आहे.
शरद

नितिन थत्ते's picture

3 Nov 2010 - 9:39 am | नितिन थत्ते

ओक्के.

खरे तर माझ्या मनात मूर्तीपूजा म्हणजे "देवळे बांधणे आणि त्यांमध्ये पूर्ती स्थापून पूजा करणे" असे होते.

मूर्तीपूजा / टोटेम पूजा तर खूप जुनी असेल. माझ्या लिहिण्यात गडबड झाली त्यामुळे माझा आधीचा प्रतिसाद रद्द समजावा.

अवलिया's picture

3 Nov 2010 - 12:35 pm | अवलिया

>>खरे तर माझ्या मनात मूर्तीपूजा म्हणजे "देवळे बांधणे आणि त्यांमध्ये पूर्ती स्थापून पूजा करणे" असे होते.

देवळांमधे मूर्ती स्थापून पूजा करतात. पूर्ती नाही. पूर्ती म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे की नेहमीप्रमाणे लिहिण्यात गडबड झाली हे समजत नाही. ;)

देवळांबद्दल असेल तर बराचसा मुद्दा मान्य तो असा की बौद्धकालानंतर स्तुप विहार तसेच मोठमोठी देवळे यांच्या बांधकामाला राजाश्रय मिळाल्याने तसे बांधकाम करणे (द्रव्य उपलब्धता) शक्य झाले. त्याआधी राजाश्रय जास्त करुन यज्ञ वगैरे क्रियांना होता. असो.

>>>मूर्तीपूजा / टोटेम पूजा तर खूप जुनी असेल. माझ्या लिहिण्यात गडबड झाली त्यामुळे माझा आधीचा प्रतिसाद रद्द समजावा.

ऋग्वेदात प्रतिमा पूजनाचे (सगुण मूर्तीचे जूने रुप) उल्लेख आढळतात. तसेच अनेक उल्लेख जे बौद्धपुर्व काली आहेत त्यांच्यावरुन सुद्धा मूर्तीपूजा कधी नक्की सुरु झाली हे सांगता येत नाही हा निष्कर्ष काढता येतो. अगदी ऋग्वेदाचा नक्की काल जसे ठरवता येत नाही त्याच धर्तीवर.

याच कारणाने सर्वसाधारण बुद्धीमत्तेचा (विशेषण कृपया लक्षात घ्यावे) माझ्यासारखा मनुष्य मूर्तीपूजा अनादी कालापासुन आहे असे धार्मिक मत मानतो आणि त्याप्रमाणे अशा मूर्तींसमोर श्रद्धेने नतमस्तक होतांना बौद्धिक मत आड येत नाही. धार्मिक मत आणि बौद्धिक मत वेगळे असणे हे आमच्यासारख्या हिंदूना कोणत्याही प्रकारच्या मानसिक यातना देत नाही.

असो.

नितिन थत्ते's picture

3 Nov 2010 - 12:52 pm | नितिन थत्ते

खरेतर बुद्धिमत्तेचा प्रश्न मी कुठेच काढला नव्हता. पण 'तुमच्यासारखे' सामान्य बुद्धीमत्तेचे लोक काय मानतात हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

>>देवळांमधे मूर्ती स्थापून पूजा करतात. पूर्ती नाही. पूर्ती म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे की नेहमीप्रमाणे लिहिण्यात गडबड झाली हे समजत नाही.

धार्मिक मत आणि बौद्धिक मत वेगळे असणे याविषयी जास्त काही लिहीत नाही. :)

गडबड झाली हे मान्य. नेहमीप्रमाणे का कसे ते आपणच ठरवावे. ;)

असो.

तुम्ही बुद्धिमत्तेचा प्रश्न काढला नव्हता पण तुमच्यासारखे अनेक बुद्धीमान लोक आहेत त्यांच्यासाठी तो खुलासा होता. :)

आता गडबड तुमची का आणि कशी झाली हे आम्हाला माहित आहे तसेच ते तुम्हाला पण माहित आहे. आपल्यातच राहु दे ! ;)

ए.चंद्रशेखर's picture

3 Nov 2010 - 2:55 pm | ए.चंद्रशेखर

मूर्तीपूजा मानव कधीपासून करू लागला हे सांगणे कठिण असले तरी भारतीय द्वीपकल्पात इ.स.पूर्व ६००० वर्षे या कालापासून मूर्तीपुजा केली जात होती असे म्हणता येते. या कालात प्रजनक्षमतेचे स्वरूप असलेल्या एका स्त्री रूपी मूर्तीची पूजा केली जात असे. हिचे नाव अदिती होते असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
(या मूर्तीचे छायाचित्र माझ्या संगणकातल्या संग्रहात आहे परंतु मिपा वरच्या प्रतिसादात ते कसे समाविष्ट करायचे ते मला न समजल्यामुळे मी ते येथे डकवू शकत नाही याबाबत क्षमस्व.)
श्री सहज यांच्या सूचनेप्रमाणे केलेला प्रयत्न

अखेरीस जमले. ६००० वर्षापूर्वीच्या प्रजननशक्तीच्या देवतेला किंवा अदितीला मिसळपाव दिसला

विसोबा खेचर's picture

3 Nov 2010 - 11:36 am | विसोबा खेचर

लै गरगरायला लागलं राव..! :)

तात्या.

--

नावाडी म्हणतो - " काय हो पंडितजी, तुम्हाला पोहता येतं का? नाही येत? मग तुमचं सारं आयुष्य आत्ताच फुकट गेलं समजा..! " (- एक जुनी कथा) :)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2010 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या आपण एक अनुष्काचे मंदिर बांधुया काय ? ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Nov 2010 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll

+१
सहमत आहे. आणि त्यावर आतापर्यंतच्या सगळ्या दाक्षिणात्य नट्यांची व्यवस्थित साडी वगैरे नेसलेल्या मूर्ती कोरून घेऊ.