भैरव गुनि गावत नित..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Oct 2010 - 9:27 pm

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

या पूर्वी -

सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..)
सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन)

सकाळची वेळ..

भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..!

राग भैरव..

आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग.. भक्तिरसातला परंतु गंभीर प्रवृत्तीचा.. याला थट्टामस्करी मंजूर नाही.. ना हा आमच्या यमनसारखा प्रसन्न, ना नंद - केदारासारखा अवखळ! स्वभावाने गंभीर असला तरी प्रासादिक!

हिंदुस्थानी रागसंगीताच्या घराण्यातला हा एक वडीलधारी बुजुर्ग राग..!

याचं सरगमगीत येथे ऐका -

याचा कोमल रिखब विचार करायला लावणारा.. क्षणात अंतर्मुख करणारा..! यातल्या गमधप संगतीबद्दल काय बोलायचं? किती अन् काय काय सांगून जाते ही संगती! याचा कोमल धैवत अन् तार षड्ज ही एक तपस्या आहे..! ही तपस्या स्वरभास्कर भीमसेन जोशींची, ही तपस्या महामानव बाबा आमटे यांची, ही तपस्या डॉ तात्याराव लहाने यांची, ही तपस्या तात्याराव सावरकरांच्या घरातल्या स्त्रियांनी पोटाची आग विझवण्याकरता स्मशानातले पिंड खाल्ले त्याची..!

ही तपस्या कुणा साध्वीची..!

राग भैरव.. हे हिंदुस्थानी रागसंगीताचं देणं आणि लेणं..! एक अजोड शिल्प..!

आंदोलनांचा आणि बेहलाव्याचा आणि सोनाराच्या भट्टीत घाव खाऊन अस्सल बावनकशी ठरलेला कोमल धैवत या रागाची वादी स्वर..! हा स्वर अनुभवा या लक्षणगीतात..!

जागो मोहन प्यारे ही भैरवाची प्रसिद्ध बंदिश येथे ऐका..

सावरी सूरत मोरे मन भावे.. या ओळीतली भक्ति पाहा..! 'सावरी सूरत' मधली पंचमाची निरागसता पाहा, 'भावे' शब्दातला कोमल रिखब जगा..!

'दरसन के सब भुखे-प्यासे..' मधल्या 'के' या अक्षरावरची तार षड्जाचं समर्पण पाहा, त्यातली आस पाहा..!

ही आस भैरवाची, ही लगन ईश्वरभक्तिची..!

भैरवाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतोय खरा.. पण भैरव शब्दातीत आहे, शब्दांच्या परे आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

तात्या रागदारीतल्या या खाचा-खोचा आपल्याला काय समजत नाय.
जागो मोहन प्यारे ऐकल कानाला गोड वाटल. :)
दुवा जबरा आहे.

(संगीतातल चांगल ते सर्व काही ऐकणारा कानसेन) - गणा

विसोबा खेचर's picture

14 Oct 2010 - 9:42 pm | विसोबा खेचर

जागो मोहन प्यारे ऐकल कानाला गोड वाटल.

तेच महत्वाचं..!

रागातल्या खाचाखोचांची मुळीच काळजी करू नका.. ती माझ्यासारखे 'ढ' विद्यार्थी करतील..! :)

मात्र आपलं रागसंगीत नेहमी ऐकता जावा इतकीच हात जोडून प्रार्थना..!

तात्या अभ्यंकर,
विद्यार्थी, प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागसंगीत.

कंपणीत सगळे ब्लॉक असल्याने काही ऐकता येत नाहीये.

तरीही छानश्या धाग्या बद्दल धन्यवाद.... .

सुधीर मोघेंचे 'पक्षांचे ठसे' या पुस्तकाची आठवण झाली यामुळे

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 10:17 pm | रन्गराव

कानाला खूप गोड वाटलं. :)

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 10:30 pm | पाषाणभेद

गणपा म्हणतोय तेच खरं. आमाला काय समजत नाय रागदारीतल. तरीबी आमच्या कानांना लय ग्वाड वाटतं.

जयंत कुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 9:26 am | जयंत कुलकर्णी

तात्या,

सुंदर!

मी एका वेगळ्या धाग्यावर अमीरखाँ साहेबांचा मारवा अपलोड करतो. त्याच्यावर मी काही लिहीत नाही. आपण लिहाल का ? मारवा माझा अत्यंत आवडता राग आहे. एका संध्याकाळी हरीश्चंद्र गडावर संध्याकाळी कोकण कड्यावर पाय सोडून मी असाच एकटा हा राग लावून बसलो होतो, तेव्हा आयुष्यभरच्या वेदना आठवून मी एकटाच बसलो होतो त्याची आठवण झाली.

या रागाची ताकद आपल्या मिपाकरांना सांगावी हे बरेच दिवस मनात आहे, पण वो मेरे बसकी बात नही है. अगर आप मानेंगे तो कहिये..... तो मै ये राग upload कर दू ?

मला वाटते, आपले लिखाण आणि तो राग मिपाकरांसाठी अविस्मरणीय ठरेल.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2010 - 12:48 pm | विसोबा खेचर

जयंतराव,

मी एका वेगळ्या धाग्यावर अमीरखाँ साहेबांचा मारवा अपलोड करतो. त्याच्यावर मी काही लिहीत नाही. आपण लिहाल का ?

बापरे..! मोठी अवघड गोष्ट आहे ही राव..! :)

तरीही करा प्लीज अपलोड..कधी मूड लागला तर त्या तिरमिरीत लिहीन काहितरी.. पण नक्की सांगत नाही..

एका संध्याकाळी हरीश्चंद्र गडावर संध्याकाळी कोकण कड्यावर पाय सोडून मी असाच एकटा हा राग लावून बसलो होतो, तेव्हा आयुष्यभरच्या वेदना आठवून मी एकटाच बसलो होतो त्याची आठवण झाली.

शब्दातीत अनुभव..!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

तात्या.

वाह ! मज्जा आली ऐकताना आणि वाचताना .
एका गावात "पहाटे च्या " किर्तनाला जाण्याचा योग आला. कथेचे निरूपण झाल्यावर "बुवा" नी एकदम " रत्न्जडित सिंहासन , वरि शोभे रघुनंदन " म्हणून "भैरवा" मध्ये शिरले.

ते छोटे गांव / ते देवुळ / ती थंड गार शुध्द हवेची पहाट / देवळाबाहेर्च्या प्राजक्ताचा मंद सुवास्.......आणि हा भैरव.

तात्या , परत आठव करून दिलात त्याचा....जियो.

कौशी's picture

14 Oct 2010 - 11:24 pm | कौशी

कर्णप्रिय....छान...

जयंत कुलकर्णी's picture

14 Oct 2010 - 11:55 pm | जयंत कुलकर्णी

//ते छोटे गांव / ते देवुळ / ती थंड गार शुध्द हवेची पहाट / देवळाबाहेर्च्या प्राजक्ताचा मंद सुवास्.......आणि हा भैरव.//

फार पूर्वी मी भोर ते रायरेश्वर पठार चालत गेलो होतो. (१९६८) त्या वेळी तसेच जायला लागायचे. तेव्हा तेथे मधे कुठेतरी काकड आरती चालू होती त्याची आठवण झाली. कसे विसरणार ते क्षण ? फारच सुंदर आठवण.

Nostalgic Today.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2010 - 12:58 pm | विसोबा खेचर

ते छोटे गांव / ते देवुळ / ती थंड गार शुध्द हवेची पहाट / देवळाबाहेर्च्या प्राजक्ताचा मंद सुवास्.......आणि हा भैरव.

सुंदर..!

तात्या.

विंजिनेर's picture

15 Oct 2010 - 5:04 am | विंजिनेर

याचा कोमल धैवत अन् तार षड्ज ही एक तपस्या आहे..! ही तपस्या

का बरं? कुणी समजावलं तर आनंद होईल :)

बहुतेक वेळा तात्यांच्या अश्या लिखाणाला प्रतिसाद देण्या इतकी आपली लायकी नाही या विचारान मी कायम गप्प बसते.
पन इतका अभ्यास , अस पछाडलेपण पाहुन दाद द्यावीशी वाटली म्हणुन लिहायचे धारिष्ट्य करते आहे.

अतिशय प्रसन्न वाटल हे सारे सुर ऐकुन. अन लिहिण तर काय्मच ह्रदयाला हात घालत.

यशोधरा's picture

15 Oct 2010 - 12:50 pm | यशोधरा

ऑफिसातून काहीही ऐकता येत नाही.. :(

वाटाड्या...'s picture

16 Oct 2010 - 1:14 am | वाटाड्या...

भैरव म्हणजे पु.लं. च्या भाषेत काय सांगायचं महाराजा !! एखादा ऋषी / मुनी सकाळी सकाळी प्रसन्न ध्यान लावुन बसला आहे नी त्याच्या धीरगंभीर चेहेर्‍यावर सुर्याचे कोवळे किरण पडले आहेत असा भास होतो.

गंभीर राग पण कोमल धैवत आणि कोमल रिखब (रिषभ)..असा काही तरी शब्दातीत संयोग...मानसिक रोग्यालाही हा सरळ करेल असा राग.

"जागो मोहन प्यारे" बंदिशीच्या प्यारेची जागा छानचं.

- वाट्या...

विसोबा खेचर's picture

18 Oct 2010 - 10:35 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकजनांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारिक आभार मानतो..

तात्या.

वा तात्या,सुरेखच.
मोहे भूल गये सांवरीया ...कसे विसरता येईल ?