पुस्तकविश्वचा दिवाळी अंक

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 10:53 am

नमस्कार,

पुस्तकविश्वचा दिवाळी अंक निघावा असा मानस आहे. पुस्तकविश्व हे संस्थळ 'पुस्तक' या एकाच विषयाला वाहिलेले असल्याने आपल्यात विषयाचे बंधन जरी असले, तरी त्यातही अधिकाधिक वैविध्य साधायचा मानस आहे. पण अर्थातच हे तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. वेळ थोडका आणि मनोवारू तर चांगलंच उधळतंय, तेव्हा आपण सर्वांनी मिळून छोटा आणि नेटका अंक निघण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूयात.
सध्याच्या संकल्पनेनुसार, पुस्तक परिचय हा प्रकार पुस्तकविश्ववर नवा नाही, त्यात अद्याप न चोखाळलेले प्रकार नक्कीच इथे मांडता येतील.

१) पुस्तकांशी आपले नाते: या प्रकारात सदस्यांनी आपल्या विशेष आवडीची, ज्यांच्याशी आपले नाते जोडल्यासारखे आहे अशा पुस्तकांबद्दल लिहावे. या प्रकारच्या लेखात एखाद्या पुस्तकाचे तुमच्या आयुष्यातले स्थान कसे असावे, त्याह्चे तुमच्याशी नाते कसे असावे या संबंधीचे लिखाण अपेक्षित आहे.

२) अज्ञात पुस्तकं :- यात चांगली पण लोकांना सहसा माहित नसणार्‍या पुस्तकांचे परिचय यावेत. यात एखाद्या प्रसिद्ध लेखकाची अप्रसिद्ध पुस्तके असेही लेखन चालेल. अनवट पुस्तकांचे परिचय या प्रकारात अपेक्षित आहेत.

३) अप्रमाणभाषेतील साहित्य (जसे कोकणी, वर्‍हाडी, खानदेशी, आगरी वगैरेची ओळख).अशा पुस्तकांची किमान ओळख करून दिल्यास विषय आणि भाषासौंदर्य याचीही माहिती होईल.

४) कवितासंग्रह :- यात कवितासंग्रहाचे रसग्रहण अपेक्षित आहे.

५) माझे ग्रंथालय. ते ग्रंथालय, तिथला साठा, तिथले अनुभव, त्याच्याशी आपला ऋणानुबंध वगैरे असा लेख छान वाटेल. अथवा ज्यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह पुष्कळ आहे, ते लोकही ही पुस्तके कधी आणि कशी जमा केली, त्यांची निवड, जोपासना, निगा कशी केली इत्यादींबद्दलही लिहिता येईल.

६) अनुवाद :- मराठीतले अनुवाद आणि त्या अनुवादातले बलस्थाने. कोणत्याही एखाद्या उत्तम अनुवादाबद्दल इथे लिहिता येईल. त्या अनुवादामधे तुम्हाला काय आवडले??? अनुवादकाची शैली इत्यादी विषयी लिहिता येईल.

७) पानपुरके: कोडी, खेळ, विनोद, व्यंगचित्रे इ.

आवाका बराच मोठा आहे. यातूनही गाळणी लावून काही विषयप्रकार कमीजास्त करता येतील. वर दिलेले विषय आणि गाईडलाइन्स यांचे काटोकर पालन करावेच असे काही नाही. तुम्हाला लिहाव्याशा विषयावर आपण लिहूच शकता. तर आता वेळ खुप कमी उरला आहे तर लवकरात लवकर घ्या लिहायला आणि तुमचे लिखाण admin@pustakvishwa.com या आयडीला व्यनी द्वारे पाठवा. लेखन पाठवण्याची शेवटची तारिख २५ ऑक्टोबर २०१० ही आहे.

संस्कृतीवावरसमाजबातमी

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2010 - 11:10 am | बिपिन कार्यकर्ते

मस्त. शुभेच्छा!!!

गणपा's picture

12 Oct 2010 - 1:10 pm | गणपा

असच म्हणतो.
शुभेच्छा !!!

प्रियाली's picture

21 Oct 2010 - 1:26 am | प्रियाली

शुभेच्छा!

छोटा डॉन's picture

12 Oct 2010 - 11:40 am | छोटा डॉन

सुंदर संकल्पना.
वेळात वेळ काढुन ह्यासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन.

आमच्या मनापासुन शुभेच्छा आहेतच :)

- छोटा डॉन

यशोधरा's picture

12 Oct 2010 - 11:44 am | यशोधरा

पुविला शुभेच्छा! :)
आणि पुविसारखे संस्थळ दिल्याबद्दल नीलकांताचे आभार.

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Oct 2010 - 11:51 am | ब्रिटिश टिंग्या

शुभेच्छा!

पर्नल नेने मराठे's picture

12 Oct 2010 - 12:10 pm | पर्नल नेने मराठे

मनापासुन शुभेच्छा!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2010 - 12:19 pm | llपुण्याचे पेशवेll

पुस्तक विश्वाच्या दिवाळी अंकाला शुभेच्छा. त्यानिमित्ताने बर्‍याच दिवसांनी यात्रीसाहेबांचे दर्शन झाले.

ऋषिकेश's picture

12 Oct 2010 - 12:48 pm | ऋषिकेश

पुस्तकविश्वच्या अंकाला सक्रिय पाठिंबा :)

विसोबा खेचर's picture

12 Oct 2010 - 12:49 pm | विसोबा खेचर

शुभेच्छा..!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

पुस्तक विश्वाच्या दिवाळी अंकाला शुभेच्छा मालक. सर्वतोपरी मदत निश्चीत करु.

इन्द्र्राज पवार's picture

12 Oct 2010 - 1:23 pm | इन्द्र्राज पवार

'.....३) अप्रमाणभाषेतील साहित्य (जसे कोकणी, वर्‍हाडी, खानदेशी, आगरी वगैरेची ओळख)...."

~~ या गटातील "कोकणी" ला अप्रमाण भाषा म्हणू नये. सुमारे ४० लाख लोकांमध्ये या भाषेत बोली/लेखी व्यवहार होतात. घटनेने या भाषेला मान्यता दिली असून देवनागरी लिपीतील कोकणी भाषा आता 'चलनी नोटे'वरदेखील आली आहे. इतकेच नव्हे तर 'साहित्य अकादमी' च्या वार्षिक 'सर्वोत्कृष्ट भाषा कलाकृती' अंतर्गत 'कोकणी' साहित्यिकांनादेखील अकादमीचा पुरस्कार मिळतो.

बाकी दिवाळी अंकासाठी केलेल्या आवाहनातील अन्य मुद्याशी सहमतच आहे.

इन्द्रा

जागु's picture

12 Oct 2010 - 1:26 pm | जागु

माझ्याकडूनही शुभेच्छा.
पाककृती चालतील का ?

गणेशा's picture

12 Oct 2010 - 1:57 pm | गणेशा

पुस्तकांबद्दल मी खुप लिहिले आहे .
परिक्षण तसेच कविता रसग्रहन वगैरे ही ..

परंतु मिसळपाव मधुन पुस्तकविश्वाला मला कधी जाताच येत नाही.
कुठलीच लिंक ओपन होत नाही ..
अतिशय वाईट वाटते .. बर्याचदा.

ऋषिकेश's picture

12 Oct 2010 - 3:01 pm | ऋषिकेश

पुस्तकविश्व उघडण्यासाठी [हा दुवा ] वापरता ना?

हो .
हाच वापरतो .. पण ओपन होत नाही.

ऋषिकेश's picture

13 Oct 2010 - 1:29 pm | ऋषिकेश

ह्म्म्म.. आश्चर्य आहे!
ऑफीसातल्या फायरवॉल मुळे अडचण नाही ना? मिसळपाव वगैरे ओपन होतात का?
पुविच्या व्यवस्थापनाच्याही कानावर घालून बघतो हे

स्वाती२'s picture

12 Oct 2010 - 4:23 pm | स्वाती२

शुभेच्छा!

अवलिया's picture

12 Oct 2010 - 6:26 pm | अवलिया

शुभेच्छा !

ऋषिकेश's picture

20 Oct 2010 - 9:56 pm | ऋषिकेश

वाचकहो, लेखन पाठवलं का? २५ तारीख जवळ आलीये

विकास's picture

20 Oct 2010 - 10:28 pm | विकास

हा धागा माझ्याकडून बघायचाच राहीला होता! :( उत्तम कल्पना. सक्रीय सहभागाचा नक्कीच प्रयत्न करेन.

मनःपुर्वक शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकेण्डला लिहीणं जमणार नाही. त्यामुळे उद्या आणि सोमवारी मिळून काही लिहीण्याचा प्रयत्न करते.

ऋषिकेश's picture

21 Oct 2010 - 9:05 am | ऋषिकेश

हा धागा माझ्याकडून बघायचाच राहीला होता!

वाटलंच होतं...
हा धागा इतक्या वेगाने खाली गेला होता की अशी बरीच मंडळी असतील ज्यांनी धागा वाचला नसेल. म्हणून तर प्रतिसाद देऊन वर काढला :)

इन्द्र्राज पवार's picture

21 Oct 2010 - 12:17 am | इन्द्र्राज पवार

लेख कसा पाठवायचा हे नीट समजले नव्हते म्हणून राहिला होता...पण आताच ई-मेलने पाठविला आहे.

इन्द्रा

श्रीराजे's picture

21 Oct 2010 - 12:05 pm | श्रीराजे

अनेक शुभेच्छा..!

मराठमोळा's picture

21 Oct 2010 - 12:28 pm | मराठमोळा

आंदु शेट,
खुप खुप शुभेच्छा!!!

:)