(समजून)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
16 Apr 2008 - 9:22 pm

विक्षिप्त यांची सुंदर गज़ल'समजूत' ही आमची प्रेरणा
--------------------------------
कुठल्या दिशेस दडले समजून ओतणारे?
ग्लासात पेय 'तसले', समजून ओतणारे

'सोडा'च द्या बरोबर, त्यांना किती विनवले
नाही मुळीच बधले समजून ओतणारे

रिचवून पेग बसलो ओठात कोरडा मी
आणी तहानलेले समजून ओतणारे

सर्वांसमक्ष देऊ धूम्रास ओठ कैसे?
गेले धुरात गेले समजून ओतणारे

येताच चिकन पुढती मजला कसे कळेना
झडपून संपविती समजून ओतणारे?

पेल्यास टेकवूनी, पेले पिती किती ते
शिवराळ भांडतीका समजून ओतणारे

जेव्हा मला म्हणाले 'घेऊ' नको आता तू
पुढच्याच पेगि रमले समजून ओतणारे

'रंग्या'स हसति तेही जाताच तोल त्याचा
आधार तोच घेती समजून ओतणारे ...

चतुरंग

कवितागझलविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

तळीराम's picture

16 Apr 2008 - 10:20 pm | तळीराम

माझ्या
मदिरेचे हाणतो पेले या विडंबनाच्या निमित्ताने झालेली इंटलेक्चुअल चर्चा वाचली नाहीत का चतुरंग? तरी मद्य विषयाला धरुन विडंबन? तुम्ही चतुरंग आहात, चतुररंग नाही.

ही चर्चा `नीट' वाचा मिस्टर चतुरंग. विडंबन करताना पाळायचे काही नियम आहेत. ते `समजून' घ्या. गात्या गाण्यांची विडंबने करायची नाहीत. कुणाच्याही वैयक्तिक आदरस्थानांना दु़खवायचे नाही. मी माझी रचना मुद्दामच कविता म्हणून सादर केली होती. पण या सार्‍या तथाकथित विचारवंतांना त्या रचनेचा एक स्वतंत्र रचना म्हणून आस्वाद घेता आला नाही. कशाला आठवायची मूळ कविता? पण गळे काढलेच. असो. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे एखादे दिवशी विडंबन वाचायला लागेल म्हणून मंडळी धास्तावली आहेत. पण एका फार प्रसिद्ध गाण्यांच्या कार्यक्रमात पसायदानाचे कसायदान करुन `आता पैशात्मके देवे' असे विडंबन ऑलरेडी सादर झाले आहे. असो. असो.