२६ जुलै २०१० हा कारगिलच्या युद्धातील विजयाचा ११वा गौरवदिन. गेल्या वर्षी या विजयाचा दहावा गौरवदिन होता. त्यात आपल्या सध्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकीबद्दल खालील लेख माझ्या वाचनात आला. लेखक आहेत 'हिंदुस्तान टाइम्स'चे श्री नीलेश मिश्रा. त्यांची जन्मपत्री मला माहीत नाहीं, म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते झुकतात, कुठल्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे वगैरे.
इथे लिहिले आहे ते खरे आहे कीं नाहीं याचीही मला कल्पना नाहीं. पण 'हिंदुस्तान टाइम्स'सारखे जबाबदार वृत्तपत्र खोडसाळ वृत्ते छापेल असे वाटत नाहीं. भारतात रहाणार्या 'मिपा' सभासदांनी हा लेख गेल्या वर्षी वाचलाही असेल.
पण इथे दिलेली माहिती खरी असेल तर इथे उल्लेखलेल्या आपल्या नेत्यांची वागणूक फारच घृणास्पद आहे. हा लेख इथे पोस्ट करतोय् त्याची सत्यता पडताळण्यासाठी.
------------------------------------------------
कारगिल युद्ध - या युद्धाला देश विसरला?
लेखक: नीलेश मिश्रा, हिंदुस्तान टाइम्स (१५ सप्टेंबर २०१०)
http://www.hindustantimes.com/10-years-later-The-war-that-India-forgot/A...
एके काळी ती एक गूढ व भयप्रद अशी ठळक जागा होती. ब्रिगेडच्या जुन्या मुख्यालयाच्या जागी असलेले व सतत झालेल्या बॉंबहल्ल्यांमुळे काळवंडून लक्तरं झालेलं ते झाड मी १९९९च्या उन्हाळ्यात रोज पहात असे. त्या झाडाला आता हिरवीगार पाने फुटली होती.
पण इतर बर्याच गोष्टींचा र्हास झाला होता. आधुनिक युद्धांच्या इतिहासातील एक सर्वात अवघड असं समजलं जाणार्या या युद्धातील आपल्या सैनिकांच्या शौर्याच्या आठवणींचे अवमूल्यन भारतीय राजकीय नेत्यांनी यात राजकारण आणल्यामुळे झाले आहे.
२००४ साली सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने या भाजपा राजवटीत लढल्या गेलेल्या युद्धाच्या वार्षिक गौरवदिनाकडे पहाणेच टाळले आहे. आपल्या राष्ट्रपती व आपल्या सैन्याच्या Commander-in-Chief असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना द्रास या गावी या गौरवदिनानिमित्त्य उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण पाठवूनही त्या आल्या नाहींत असे लष्करी गोटातून सांगण्यात आले.
कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या कॅ. विजयांत थापरचे पिताश्री कर्नल व्ही. एन्. थापर यांनी स्वतः द्रासकडे जायला निघण्यापूर्वी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले कीं ही वागणूक लाजिरवाणी होती कारण या घटनेत विनाकारण राजकारण आणण्यात आले होते. द्रास ही जगातील सगळ्यात थंड असण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकाची अशी वसाहत आहे. द्रासपेक्षा जास्त थंड वसाहत आहे रशियातील ओयमियाकोन!
याचा अर्थ हा कीं १५ वर्षांपेक्षा लहान वयाच्या ३५ कोटी जनतेतील बर्याच जणांना हे युद्ध काय होते व ते कशासाठी लढले गेले आणि भारताला त्या युद्धाचे काय महत्व होते याची आठवणच रहाणार नाहीं. ही खरंच या युद्धाची शोकांतिकाच आहे.
२००० लोकवस्तीच्या द्रास गावाल एका भोजनगृहात जेवणानंतरच्या संभाषणात भाग घेताना पंजाबच्या अभोर गावात शारीरिक शिक्षणाचे विद्यार्थी असलेले १९ वर्षीय मनराज सिंग म्हणाले, "आमची अशी समजूत होती कीं लष्करातले जवान, त्यांचे अधिकारी आरामात रहातात, गाड्या उडवतात आणि पैसे वाया घालतात. त्यामुळे मला लष्कराबद्दल सहानुभूतीच नव्हती, पण इथे आल्यावर व कसल्या जागी कशा तर्हेने आपली सेना देशासाठी यशस्वीपणे लढली हे पाहिल्यानंतर मला खरंच आपल्या सैन्याबद्दल अभिमान वाटला."
या युद्धात ५२० वीर धारातीर्थी पडले.
लडाखमधील या डावपेचांच्या दृष्टीने महत्वाच्या ठाण्याला पुन्हा काबीज करण्यासाठी १९९९मध्ये भारतीय जवानांना अशक्य अशा खड्या कड्यांवर बंदुकीच्या गोळ्याच्या वर्षावात चढायला लागले. त्यांच्यावर शेकडो अचानक धाड घालणारे आणि काहीं पाकिस्तानी लष्करातील नेहमीचे सैनिकही गोळ्यांचा वर्षाव करत होते. हे लोक उंचीवर चढून दबा धरून बसले होते व वर चढणार्या आपल्या सैनिकांना टिपू शकत होते.
२००९च्या २६ जुलै शनिवारी या यशोगाथेच्या डावपेचांचे केंद्र असलेल्या द्रास या गावी योजलेल्या दशवार्षिक विजयोत्सवापासून स्वतःला दूर ठेवून आपल्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीतच हार अर्पण केला. खरं तर शनिवार असल्याने ऑफीसलाही सुटी होती. पण सार्या भारतातून जनरल सारख्या पदावर असलेले उच्च सेनाधिकारी आणि धारातीर्थी पदलेल्या अधिकार्यांच्या आणि सैनिकांचे कुटुंबीय मात्र आवर्जून हजर रहाणार होते.
कॉंग्रेसचे लोकसभेचे सभाअसद रशीद अली या म्नी या युद्धाची "भाजपाचे युद्ध" अशी संभावना केली तर कोळसामंत्री श्रीप्रकाश जस्वाल.यांनी त्यांना याबद्दल कांहीं माहीतच नसल्याचे सांगितले.
एका ज्येष्ठ सेनाधिकार्याने सांगितले कीं आम्ही स्वखुषीने हे आयुष्य निवडले. आम्हाला स्तुतीच्या मागे धावायचे नाहींय्. आम्ही आमच्या आम्हीच आमच्या वीरांचा सन्मान करू. मात्र त्याला मीडियाशी बोलायचा अधिकार नसल्याने त्याने आपले नाव उघड करू देण्यास नकार दिला.
पण Knoll नावाच्या ठिकाणी एका सैनिकी तुकडीला आघाडीकडे नेताना धारातीर्थी पडलेल्या विजयांत थापर या वीराचे पिताश्री कर्नल थापर म्हणाले कीं हे अतीच झाले. ते पुढे म्हणाले कीं अशा नेत्यांकडून आपण कसलीच अपेक्षा ठेवता कामा नये व लष्कराने व नागरिकांनीच अशा विजयांचा गौरवदिन साजरा करावा.
आणि झालेल्ही तसेच.
अनेक वर्षांपूर्वी द्रासला फक्त पाठीवर "बॅकपॅक" घेऊन हिंडणारे पाश्चात्य पर्यटकच येत असत. पण आता पर्यटकांत भारतियांचा भरणाच खूप असतो.
खरंच, बॉंबचा वर्षाव झेललेलं आणि धुळीनं माखलेलं हे छोटंसं गाव आता पर्यटकांच्या गळ्यातला ताईत बनलं आहे.
एके काळी लाकडी फळकुटांच्या झोपडीवजा ठेल्यांनी सजलेल्या व मुख्यत: चहाच्या टपर्या असलेल्या इथल्या ’बाजारा’त आज पाश्चात्य पद्धतीच्या प्रसाधन गृहांनी सुसज्ज अशी अनेक हॉटेले उभी आहेत.
"इथे इतके भारतीय पर्यटक येत आहेत की आम्ही अगदी आश्चर्यचकित झालो आहोत" असे ’अफझल’ हॉटेलचे ४५ वर्षीय मालक महम्मद सलीम म्हणतात. "द्रास, टयगर हिल व तोलोलिंग शिखरावर काय-काय घडले याबद्दल या पर्यटकांना खूप कुतुहल असते." असेही ते म्हणाले.
सलीम इक्बाल या २५ वर्षीय व्यवसायिकांना यात एक सुवर्णसंधी दिसते.
"आम्हाला जर पर्यटकांना घोड्यांच्या पाठीवर बसवून ’टायगर हि”ला नेण्याची परवानगी मिळाली तर इथे पर्यटनाचा व्यवसाय आणखीच भरभराटीस येईल." अशी त्यांना खात्री आहे. १९९९सालच्या भीतीपूर्ण उन्हाळ्याच्या आठवणींपेक्षा व्यवसायाच्या भरभराटीची ही उमेद खूपच वेगळी आहे!
प्रतिक्रिया
21 Sep 2010 - 3:31 pm | गांधीवादी
खरतर मी लिहिणारच होतो, पण नंतर मुळ लेख वाचला आणि लक्षात आले कि अगोदरच कोणीतरी लिहून ठेवलेले आहे.
मूळ लेखावराची प्रतिक्रियाच इथे देत आहे.
(प्रतिक्रियेत नमूद केलेले श्री shyam हे माझ्या सारखेच एक गांधीवादी आहेत काय ?)
21 Sep 2010 - 3:32 pm | पैसा
राजकारण गेलं चुलीत! कारगिल कोणीही कधी विसरणार नाही. आम्ही आमच्या मुलाना कारगिलच नव्हे, आधीची युद्धं पण का आणि कशी झाली ते सांगतो.
अर्थात त्या भागात पर्यटनाचा विकास होणं सुरक्षिततेच्या दॄष्टीने कितपत योग्य आहे यावर तज्ञ लोक मत देतीलच.
(अवांतरः राष्ट्रपती म्याडम प्रथम शिरडीला गेल्या तेव्हा हेलिपॅडचा खर्च देवस्थानाने करावा असं सांगण्यात आलं होतं म्हणे?)
21 Sep 2010 - 3:36 pm | गांधीवादी
>>राष्ट्रपती म्याडम प्रथम शिरडीला गेल्या तेव्हा हेलिपॅडचा खर्च देवस्थानाने करावा असं सांगण्यात आलं होतं म्हणे?
द्यायलाच पाहिजे, शिर्डीला जाऊन त्यांनी श्री साई बाबांवर उपकारच नाही केले का ?
21 Sep 2010 - 8:07 pm | सुधीर काळे
कारगिलच नव्हे पण बांगलादेशविमुक्तीचे शिल्पकार फी.मा. माणेकशांच्या अंत्ययात्रेला कुणीही ज्येष्ठ नेते गेले नाहींत असे वाचले होते. त्यात आपल्या कमांडर-इन-चीफ प्रतिभाताई किंवा संरक्षणमंत्री तर गेले नाहींतच पण विरोधी पक्षांचे नेतेही गेले नाहींत असे वाचले. (माझी आठवण चुकीची असल्यास अशी चूक माझ्या निदर्शनास आणून द्यावी ही विनंती.)
तसेच हिंदुस्तान टाइम्सच्या लेखात अटलजी, अडवाणी यांच्यासारखे नेतेही नांवे कारगिल युद्धाच्या गौरवदिनात सहभागी झाल्याचा उल्लेख दिसला नाहीं!
21 Sep 2010 - 4:19 pm | नितिन थत्ते
चालू द्या.
लष्कर आणि सरकार, ले- सुधीर काळे भाग १ ते १७६०.
:)
21 Sep 2010 - 7:50 pm | सुधीर काळे
पुन्हा एक रिकामा प्रतिसाद! त्यापेक्षा लष्कर, सरकार आणि पाकिस्तान या व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्वत:च्या आवडीच्या विषयावर स्वतः लिहा!
तन्गो आणि नरेश धाल यांच्यासारखाच मीही लष्करप्रिय माणूस आहे. म्हणून असे होते इतकेच. शिवाय हे विषय आपुलकीने वाचले जातात असे वाटते म्हणून मी लिहितो.
अपनी-अपनी पसंद!
21 Sep 2010 - 10:12 pm | अर्धवटराव
अहो काळे काका, तुम्ही उगाच आपल्या लश्काराचा अभिमान वगैरे दाखवता. आमच्या साबरमतीच्या संताने ""बिना खड्ग बिना ढाल" इंग्रजांना या देशातुन पळवुन लावले. ते खरे कर्तुत्व. त्या संताचे प्रभातफेरी काढणारे, सूत कातणारे, नि:शस्त्र आंदोलन करुन पोलिसी लाठ्या खाणारे आणि राजकीय कैदी म्हणुन तुरुंगवास भोगणारे अनुयायी खरे देशभक्त होते/आहेत. बाकि लश्करातले सैनीक आर नथिंग बट जस्ट नॉर्मल प्रोफेशनलस्. त्यांच्यात आणि इतर कुठल्याहि थोड्याफार रिस्की प्रोफेशन मध्ये काम करणार्या सामान्य कामगारांत काहि फरक नाहि. उगाच लश्कराचा उदो उदो करणे बंद करा बघु.
22 Sep 2010 - 8:53 am | सुधीर काळे
मला वाटतो अभिमान! पण म्हणजे इतरांबद्दल वाटत नाहीं असे नाहीं.
ज्यांनी लाठ्या खाल्ल्या व तुरुंगात गेले त्यांच्याबद्दलही खूप आस्था आहे, पण त्या गोष्टींचे भांडवल करून आज मजा मारणार्यांवर जास्त लक्ष आहे इतकेच.
दुर्दैवाने आज असली माणसे फारशी दिसत नाहींत. असतीलही पण दुर्दैवाने ती प्रकाशझोतात येत नाहींत. आपल्याला अशी माणसे माहीत असतील तर आपण जरूर त्याबद्दल लिहावे. माझ्याकडून स्वागत आहे.
पण मी करतो ते कौतुक फालतू कसे?
22 Sep 2010 - 10:30 am | अर्धवटराव
अहो ज्यांचं चित्र संसदेत लावता येतं त्यांचं जग कौतुक करतं... तुम्ही तर अश्यांचं कौतुक करताय कि ज्यांच्या समाधीवर ना चिराग ना पणती. याला दिवानगी म्हणतात गुरु. शहाण्यांच्या जगात याला स्थान नाहि.
(अर्धशहाणा) अर्धवटराव
22 Sep 2010 - 10:58 am | अर्धवट
कोण सरकार?
धन्यवाद.
काळेकाका..
सैनीकांना सरकार विसरलय की नाही ते माहीत नाही.. पण मी नक्कीच नाही विसरलो..
आणि सरकार माझ्यासाठी आहे मी सरकारसाठी नाही..
21 Sep 2010 - 11:04 pm | नितिन थत्ते
नरेश धाल यांचे विचार काळे काकांना फारच भावलेले दिसतात. मागच्या धाग्यातही मला धाल यांनी 'निरुत्तर' केल्याचे समाधान काळेकाकांना मिळाले.
एक सूचना मिपाकरांसाठी:
काळेकाकांच्या किंवा इतर कुणाच्याही सैनिक/लष्कर/राजकारणी विषयक धाग्यावर फक्त पुढील स्वरूपाचे प्रतिसादच स्वीकारार्ह आहेत.
सोज्वळ टाईप
-मन सुन्न झाले
-अंतःकरण तीळतीळ तुटते
-सैनिकांच्या आठवणीने घास घशात अडकतो
-राजकारण्यांच्या स्वार्थापायी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भडक टाईप
-राजकारण्यांना भर चौकात जाहीर फटके मारायला हवेत
-या हरामखोर राजकारण्यांना .....(पुढे निंदाव्यंजक काहीही लिहावे)
म्हणजे सुफल चर्चेचे समाधान सर्वांना मिळेल. :)
22 Sep 2010 - 7:47 am | Pain
हाच अॅनॅलिसिस तुमच्या आवडीच्या किंबहुना प्रत्येकच* (वैयक्तिक अनुभवकथन वगैरे सोडून) धाग्याचा करता येईल, आणि काय प्रतिक्रिया येतील, तेही आपल्याला माहिती आहेच. मग मिपा किंवा अशा सगळ्या गोष्टी बंद करायच्या का ? तुम्ही तर असे केल्याचे किंवा गेला बाजार तुमच्या परिने बहिष्कार टाकल्याचेही दिसत नाही. मग उगाच कशाला ?
हे कमी अधिक प्रमाणात का होईना, उपयोगी घागे आहेत. सध्या रद्दी, फुटकळ लेखनाचे (धागे, कौल इ.) पेव फुटले आहे. तुम्ही त्याला विरोध करताना का दिसत नाही ? ती खरी समस्या आहे.
22 Sep 2010 - 8:09 am | सुधीर काळे
असे नाहीं. तू लिही कीं त्याबद्दल! माझे observation रिकम्या प्रतिसादाबद्दल आहे. लेखातील माहितीवर अभिप्राय लिही, इतर गोष्टी टाळ. त्या महत्वाच्या नाहींत इतकेच.
22 Sep 2010 - 8:57 am | सुधीर काळे
नितिन,
मला त्यांचे विचार भावले कीं नाहीं हा मुद्दा दुय्यम आहे (ते भावलेच). पण की-बोर्डवर एरवी जोरात/उत्साहात चालणारी तुझी बोटे या प्रतिसादांबाबत उदासीन राहिल्याचे मात्र प्रकर्षाने जाणवले.
22 Sep 2010 - 9:44 am | नितिन थत्ते
'तंगडी तोडली असती' या प्रतिसादावर काय उत्तर देणे अपेक्षित होते?
23 Sep 2010 - 11:37 am | समंजस
>>>एक सूचना मिपाकरांसाठी:
काळेकाकांच्या किंवा इतर कुणाच्याही सैनिक/लष्कर/राजकारणी विषयक धाग्यावर फक्त पुढील स्वरूपाचे प्रतिसादच स्वीकारार्ह आहेत.
सोज्वळ टाईप
-मन सुन्न झाले
-अंतःकरण तीळतीळ तुटते
-सैनिकांच्या आठवणीने घास घशात अडकतो
-राजकारण्यांच्या स्वार्थापायी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
------- काही गोष्टी / पर्याय आपण विसरावे याबद्दल आश्चर्य वाटलं थत्तेसाहेब जसे की,
१) वर उल्लेखलेल्या विषयांवरच्या धाग्यावर प्रतिसाद टाकणे हे आवश्यक नाही (जर वाचकाला धाग्यातील विचार पटत असतील किंवा नसतील तरी)
२) कोणाही मिपाकराच्या कोणत्याही विषयांवरच्या धाग्यांवर वाचकांनी प्रतिसाद टाकणे आवश्यक नाही
३) जर प्रतिसाद टाकायचा झाल्यासच तो प्रतिसाद मिपाच्या धोरणांना/नियमांना धरून आहे फक्त ही काळजी प्रतिसादकर्त्यांनी घेणे आवश्यक.
३) एखाद्या धाग्यातील विषय आवडला किंवा नाही आवडला तर त्यावर प्रतिसाद न देणे हा पहिला पर्याय उपलब्ध असतोच त्या पर्यायाचा वापर करावा.
३) स्वतः ला जर प्रतिसाद देण्यापासून थांबवणे शक्य नसल्यास, प्रतिसाद टाकताना क्रमांक ३ मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे आवश्यक ती काळजी घ्यावी.
४) न आवडलेल्या धाग्यावर (विषयामुळे) जर प्रतिसाद टाकावा लागला तर तो मुद्देसूद टाकण्याचा प्रयत्न करावा, धागाकर्त्याचा विचार / मुद्दा आवडला नसल्यास किंवा चुकीचा वाटल्यास त्यावर टीका करताना धागाकर्त्याची न करता त्याच्या मुद्यांची करावी आणि आपल्या कडून सुद्धा काही विरोधी मुद्दे मांडावेत [तार्किक किंवा माहिती पुर्ण किंवा पुराव्यानीशी (जर असतील तर) ] .
फक्त विरोधाला विरोध म्हणून करू नये किंवा एखादा धागा कर्ता नाही आवडला, त्याच्या धाग्याचा विषय नाही आवडला म्हणून त्यावर टीका करू नये (मुद्देसूद न करता). असे काही करणे हे परिपक्वतेचे लक्षण नाही तसेच लोकशाहीचा, विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्यांकडून अपेक्षीत नाही.
थत्तेसाहेब, तुमच्या कडून जर या धाग्यावर काळे काकांच्या माहितीचा, विचारांचा, मुद्यांचा विरोध म्हणून जर स्वत: ची काही माहिती, काही मुद्दे, काही उदाहरणे, काही पुरावे जर मांडण्यात आले असते तर ते जास्त प्रशंसनीय ठरलं असतं परंतु तुम्ही तसं काही न करता सरळ त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणे [लष्कर आणि सरकार, ले- सुधीर काळे भाग १ ते १७६०] हे तुमच्या सारख्या अनुभवी मिपाकरांकडून मला तरी अपेक्षीत नव्हतं आणि त्यामुळे खुप आश्चर्य वाटलं.
21 Sep 2010 - 7:28 pm | संदीप चित्रे
श्री. अविनाश धरमाधिकारींच्या व्याख्यानमालेतील कारगिल युद्धाबद्दलच्या २ सीडीज ऐकतोय.
खूप गोष्टी नव्याने कळतायत आणि प्रत्येक वेळी राजकारण्यांचा नव्याने राग येतोय !
21 Sep 2010 - 7:41 pm | Dhananjay Borgaonkar
कारगील ही खरच एक शोकांतिकच म्हणावी लागेल. जे जवान युद्धात धारातीर्थी पडले त्यांच्या कुटुंबियांना जी अपमानास्पद वागणुक मिळाली हे वाचुन तर संताप येतो.(संताप येण्याशिवाय काहीच करु शकत नाही)
अनुज नायर यांना मरणोपरांत एक पेट्रोल पंप देण्यात आला. ते फक्त कागदोपत्रीच. नंतर त्यांच्या वडीलांना विचारण्यात आल सिद्ध करा की गेलेले अनुज नायर तुमचाच मुलगा आहे. खुप चिड आणणार आहे हे सारं.
नंतर कॉफीन चा जो घोटाळा झाला त्यातुन सुद्धा सर्वजण सहीसलामत सुटले.
मागील वर्षी काही मित्र कारगील, द्रास, तोलोलिंग येथे जाऊन आले. त्यांनी सर्वांनी हेच सांगितल की तो डोंगरळ प्रदेश पाहेल्यावर विश्वासच बसत नाही की आपले सैनिक तो अवघड प्रदेश काबीज करुन पाकड्यांना पळावुन आले. केवळ अशक्यप्राय गोष्ट होती ती. आपल्याला ती एक सुवर्णसंधी होती पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची. सरकारने ही संधी का सोडली याच उत्तर अजुन पर्यंत कळाल नाही.
असो सध्या काश्मीरची परीस्थीती पहाता लवकरच पुर्ण काश्मीर पाकव्याप्त होईल की काय अशीच भिती वाटते.
९९ च्या कारगील युद्धात ज्यांनी प्राणाची आहुती दिली खरच वेडे होते असच म्हणाव लागेल आता.
21 Sep 2010 - 9:29 pm | सुधीर काळे
कृतघ्नपणाची कमाल! स्वतःचे पगार तिप्पट करायला एकमताने तयार पण सैनिकांना कांहीं देताना मात्र हात अडखळतो!
21 Sep 2010 - 7:52 pm | मदनबाण
कारगिल नाव जरी कानावर पडले तरी मनात पहिला विचार येतो ते कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्यांचा.
संभाजी महाराजांनंतर कोणाला जर तशाच किंवा त्याहुन भयानक पद्धतीने ठार केले गेले असेल तर हेच ते शुर योद्धे होय.
http://en.wikipedia.org/wiki/Saurabh_Kalia
http://www.petitiononline.com/LtKalia/petition.html
http://himachal.us/2008/03/21/seven-years-captain-kalias-family-waits-fo...
या परमवीरांचे इतके हाल व्हावेत? :(
शहिद हा शब्द फारच स्वस्त झालाय आपल्या देशात... :(
21 Sep 2010 - 7:54 pm | सुधीर काळे
माझ्या लेखाला ही छायचित्रे जोडायची राहिलीच!
21 Sep 2010 - 9:54 pm | इन्द्र्राज पवार
श्री.सुधीर काळे यांचा 'कारगील' हा धागाविषय ज्या क्षणी वाचला त्यावेळीच आपल्या जिवाची बाजी लावणार्या सैनिकांच्या बलिदानाची (जी एक बेजबाबदार अधिकारी वर्गामुळे...मुलकी आणि लष्करी दोन्ही...झालेली) शोकांतिका होती याची आठवण झाली. किती लिहिले/वाचले/अभ्यासले गेले आहे गेल्या १० वर्षात या विषयावर, पण प्रत्येक वेळी राजकारण्यांच्याबरोबरच उच्च पदावर असलेले जनरल्सदेखील त्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेऊ शकत नाहीत हेच चित्र समोर येते.
"१९ वर्षीय मनराज सिंग म्हणाले, "आमची अशी समजूत होती कीं लष्करातले जवान, त्यांचे अधिकारी आरामात रहातात, गाड्या उडवतात आणि पैसे वाया घालतात. त्यामुळे मला लष्कराबद्दल सहानुभूतीच नव्हती."
~~ सातारा जिल्ह्यात "टाकळी" नावाचे एक खेडेगाव आहे, त्याला जिल्ह्यातील लोक मोठ्या आदराने 'सैनिक टाकळी' या नावाने ओळखतात, कारण जवळपास या गावातील घरटी एक युवक लष्करात सैनिक आहे. तीच गोष्ट गुरुदासपूरसारख्या पंजाबमधील एका जिल्ह्यातील काही गावांची कहाणी आहे, जिथे सैनिक टाकळीचीच प्रतिमा आहे. पण असे असूनही वरील कोटेशनमधील एक शिख युवक म्हणतो की 'लष्करातले जवान, त्यांचे अधिकारी आरामात रहातात, गाड्या उडवतात आणि पैसे वाया घालतात'... मग त्या कारगील युद्धात सर्वसामान्य सैनिकांचे बलिदान कशासाठी झाले, का झाले, कोण जबाबदार...या बाबी सार्वत्रिकरित्या [निदान त्या वेळी तरी....] सोयीस्कररित्या दुर्लक्षिल्या गेल्या यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, आणि नेमकी हीच बाब सत्ताधार्यांना हवी असते. संताप येतो तो 'जनरल' पदावर कामे करणार्या अधिकारी वर्गाच्या या संदर्भात दाखविल्या गेलेल्या बेफिकिरपणाच्या वृत्तीचा.
१ जून १९९९ रोजी कारगील युध्द टोकाला पोचले असताना त्या दिवशी गोळीबारात मरण पावलेल्यांचे शव आणि त्याचबरोबर गंभीर जखमी झालेल्या सैनिकांना घेऊन इस्पितळाकडे इमर्जन्सी हेलिकॉप्टर्स वेगाने नेली जात होती त्याचवेळी श्रीनगरच्या बदामी बाग कॅन्टोनमेन्टचे कमांडर ले.जनरल क्रिशन पाल याना त्या सैनिकांची हालत पाहायला जाण्यास बिल्कुल वेळ नव्हता....कारण? कारण त्याचवेळी इस्पितळापासून थोड्याच अंतरावर आयोजित करण्यात आलेल्या 'गोल्फ टूर्नामेंट्स'चे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार होते...आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्यांना महत्वाचे वाटले...परत कारण? कारण त्यांचा त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेला मुलगा त्या 'गोल्फ स्पर्धेतील' एक खेळाडू होता.
कशी आणि काय होणार असल्या अधिकार्यांच्या वृत्तीमुळे आपल्या सैनिकाच्या मनोधैर्यात वाढ? कारगील युध्दात जितके सैनिक प्राणाला मुकले त्यामध्ये पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या वर्षावात [आर्टिलरी बॅटरी....असे काहीसे नाव असते त्या चिलखती दलाचे.....मला वाटते इथले एक ज्येष्ठ सदस्य श्री.जयंत कुलकर्णी हे या दलाच्या रचनेवर अधिकारवाणीने अधिक सांगू शकतील] ८०% मेले असा मिलिटरीचाच रिपोर्ट सांगतो. पण नेमकी त्याचवेळी अशीही धक्कादायक बातमी पुढे आली की, या अशा तोफगोळा दलाची वाटचाल वा आक्रमकता दर्शविणारी रडार यंत्रणा आपल्या सैन्यदलाच्या ताफ्यात असणे आवश्यक असल्याचे वाट्ल्याने तत्सम खरेदीसाठी तज्ज्ञांची एक समिती अमेरिकेलाही गेली होती; पण परत दिल्लीतील राजकारण्यात कुठे तरी एक माशी शिंकली, जिने सांगितले, 'नको अमेरिकेची मदत, त्या पेक्षा भारतीय तंत्रज्ञानानेच ती रडार यंत्रणा बसवू या...!"
कधी बसणार? बसली नाहीच...मीटिंगावर मीटिंगा, प्लॅन्सवर प्लॅन्स, पण एकही प्रत्यक्षात येऊ शकला नाही...आणि द्रास परिसारात त्या तोफगोळ्यांच्या वर्षावात बिचारा सैनिक आणि गाव मात्र होरपळून जात होते...गेलेदेखील.
श्री.काळे लिहितात : "माहिती खरी असेल तर इथे उल्लेखलेल्या आपल्या नेत्यांची वागणूक फारच घृणास्पद आहे." ~~ फक्त नेत्यानाच ताजव्यात घेऊ नका, हाय पोस्ट मिलिटरी कमांडर्सनाही आपली कातडी बचावता येणार नाही, इतकेच म्हणतो.
(जाता जाता....~~ श्री.काळे यांच्या एका प्रतिसादात फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या मृत्युबद्दलचा उल्लेख आहे. त्याबद्दल स्वतंत्रच लिहावे लागेल... तोही विषय तितकाच संतापजनक आहे.)
इन्द्रा
21 Sep 2010 - 10:28 pm | नितिन थत्ते
>>फक्त नेत्यानाच ताजव्यात घेऊ नका, हाय पोस्ट मिलिटरी कमांडर्सनाही आपली कातडी बचावता येणार नाही, इतकेच म्हणतो.
छे बुवा. काहीतरीच तुमचं आपलं. हायपोस्ट मिलिटरी कमांडर्स लष्करातले असल्यांने ते शिव्यांमधून exempt आहेत. शिव्या फक्त राजकारण्यांना. :)
22 Sep 2010 - 8:42 am | सुधीर काळे
नितिन, तुला आठवत नसेल पण एका ले.ज. पदावरील श्रेष्ठ सेनाधिकार्यांबरोबरच्या माझ्या संभाषणाबद्दल इथे लिहिले होते. मी त्यांना विचारले होतेच कीं "वरिष्ठ अधिकारी इतके भ्रष्ट असतांना तुम्ही सामान्य सैनिकांना जीव द्यायला कसे उद्युक्त करता?"
राजकारणी आज सर्वात जास्त चुका करत आहेत. भ्रष्टाचार आहेच, पण देशासाठी प्राणाहुती देणार्यांचा गौरव करण्याच्या बाबतीत त्यांनी राजकारण आणणे ही घोडचूक आहे. त्यांचे असे वागणे बदलले पाहिजेच व आपण टीका न केल्यास ते बदलणार कसे?
आपल्या सहकार्यांबरोबर कसे वागावे याचे अत्यंत model उदाहरण टाटांनी घालून दिले आहे. ताजवरील हल्ल्यात आपले कर्तव्य निभावणार्यांना गौरवपूर्ण वागणूक देऊन सार्या देशाने गिरवण्यासारखा धडा त्यांनी आपल्या वागणुकीने घालून दिला.
दुसरे म्हणजे सरकारवर टीका करताना "इतरही तसेच करतात" असे समर्थन चूक आहे. माझ्या लक्षात एकादी गोष्ट आली त्याबद्दल मी लिहिले, इंद्रराजसाहेबांच्या लक्षात एका सेनाधिकार्याची चूक आली म्हणजे फिटांफीट होत नाही तर दोन्ही वागणुकी निंदनीय आहेत. माणेकशांबद्दलही नंतर कांही लोकापवाद मीही ऐकले होते. कुठल्याशा कंपनीच्या निर्देशक मंडळात त्यांना घेतले होते व ती कंपनी वाईट निघाली. त्यानुसार ते माणेकशांचे ते पद घेण्यात bad judgment होते असेही वाचल्याचेही आठवते. मला नीट माहिती नाहीं, पण इंद्रराजना माहीत असल्यास त्यांनी त्याबद्दल जरूर लिहावे.
आपल्या देशाचे प्राथमिक नेतृत्व राजकीय नेत्यांकडे आहे. सैन्यही त्यांच्या अधिकाराखालीच आहे. म्हणून त्यांचे उत्तरदायित्व प्रथम आहे. राजकीय नेत्यांनी model असायला हवे. पण ते जर असे चुकीच्या वागणुकीचे model होऊ लागले तर ते टीकापात्र होणारच!
सुधारणेची सुरुवात राजकीय नेतृत्वातूनच झाली पाहिजे असे मला तरी वाटते. "यथा राजा तथा प्रजा" हे सुभाषितही तेच सांगते व प्राथमिक उत्तरदायित्व राजकीय नेतृत्वाकडेच आहे असेही मला वाटते!
मी कुठल्याच पक्षाचा नाहीं. त्यामुळे काँग्रेसचे सारे बरोबर किंवा भाजपाचे सारे बरोबर असा माझा दृषिकोनही नाहीं. जो सत्तेवर असतो तो स्वाभाविकपणे टीकेचे लक्ष बनतो हे लक्षात ठेव.
22 Sep 2010 - 9:28 am | Pain
कारगील युध्दात जितके सैनिक प्राणाला मुकले त्यामध्ये पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या वर्षावात [आर्टिलरी बॅटरी....असे काहीसे नाव असते त्या चिलखती दलाचे.....मला वाटते इथले एक ज्येष्ठ सदस्य श्री.जयंत कुलकर्णी हे या दलाच्या रचनेवर अधिकारवाणीने अधिक सांगू शकतील] ८०% मेले असा मिलिटरीचाच रिपोर्ट सांगतो. पण नेमकी त्याचवेळी अशीही धक्कादायक बातमी पुढे आली की, या अशा तोफगोळा दलाची वाटचाल वा आक्रमकता दर्शविणारी रडार यंत्रणा आपल्या सैन्यदलाच्या ताफ्यात असणे आवश्यक असल्याचे वाट्ल्याने तत्सम खरेदीसाठी तज्ज्ञांची एक समिती अमेरिकेलाही गेली होती; पण परत दिल्लीतील राजकारण्यात कुठे तरी एक माशी शिंकली, जिने सांगितले, 'नको अमेरिकेची मदत, त्या पेक्षा भारतीय तंत्रज्ञानानेच ती रडार यंत्रणा बसवू या...!"
ही यंत्रणा तर मोठी गोष्ट आहे पण स्नो मोबाईल्स, बर्फात घालायचे बूट, गॉगल्स यासारख्या साध्या गोष्टीही आपल्या सैनिकांना दिल्या नव्हत्या, आधीपासून मागणी करून. उलट वर बसलेले घुसखोर अगदी ड्रायफ्रूट्स सकट सुसज्ज होते.
सगळ्यात वाईट: आपल्या सैनिकांना सध्या इन्सास रायफल दिली जाते. युद्धानंतर एका सैनिकाचा अनुभव वाचला, त्यात तो आणि एक शत्रूसैनिक* एकमेकांवर गोळ्या चालवत असताना याची बंदूकच अडकल्याचे वाचले ! किती फ्रस्ट्रेट झाला असेल तो. एके ४७ अशी किती महाग असते ? सगळ्या अतिरेक्यांना, नक्षलवाद्यांना परवडते तर आपल्या सैनिकांना का देत नाहीत ? समजा सगळ्या सनिकांना पुरेल इतक्या नसतील तर कारगिल युद्धात पाठवलेल्या सनिकांना तरी (आपल्या सैन्याचा छोटासा भाग) का दिल्या नाहीत ?
22 Sep 2010 - 9:50 am | सहज
इराक व अफगणीस्तानमधे अमेरीकन सैन्याला पुरेशी साधन सामग्री किंवा निकृष्ट दर्जाची सामग्री पुरवणे. पुरेश्या गाड्यांना चिलखती पत्रे नसणे व अनेक अमेरिकन सैनीक भूसुरुंगामुळे जायबंदी झाले अश्या बातम्या, प्रकार प्रकाशात आलेही आहेत.
पण असे कधी पाकीस्तानी, चीनी, नॉर्थ कोरीया सैन्याचे ऐकीवात नाही बरोबर ना? त्यांच्या सर्वच्या सर्व सैनिकांकडे अत्यानुधीक साधने-शस्त्र भरती झाल्या झाल्या दिल्या जातात. दोन दोन सेट्स?
का बरे असे असावे? अमेरीका, भारत हे लोकशाहीवादी, वृत्तपत्र स्वातंत्र्य असलेले देश की पाकीस्तान, चीन मधे असे मुळी होतच नाही? तसे असल्यास बहुदा भ्रष्ट राजकारणी (पक्षी लोकशाही) हाच आपला प्रॉब्लेम आहे ह्यावर शिक्कामोर्तब! सैन्यदलात भ्रष्टाचार तर अजिबातच नसणार नाही का?
ते काही नाही बास झाले ते राजकारणी लोकांचे उपद्व्याप, भारताला लष्करशाही शिवाय तरणोपाय नाही असेच वाटते.
भले इंग्रज सत्तेविरुद्ध आपले स्वातंत्र्य सैनिक अपुर्या साधनांनी, जीवाची बाजी लावून लढले.
भारतीय लष्कर, स्वतंत्र भारतात असुनही गेले ६०-६५ वर्षे मुलकी सरकारची वेठबिगारीच करत आहे नै? आपल्या महापराक्रमी सैन्याचे नेतृत्व काय आपल्या घाबरट, भ्रष्ट्र राजकारण्यांपुढे अवाक्षरही काढू शकत नाही. बिचारे नाही काही दिले तरी लाठीने लढतील हो.
22 Sep 2010 - 12:09 pm | Pain
का बरे असे असावे? अमेरीका, भारत हे लोकशाहीवादी, वृत्तपत्र स्वातंत्र्य असलेले देश की पाकीस्तान, चीन मधे असे मुळी होतच नाही? तसे असल्यास बहुदा भ्रष्ट राजकारणी (पक्षी लोकशाही) हाच आपला प्रॉब्लेम आहे ह्यावर शिक्कामोर्तब! सैन्यदलात भ्रष्टाचार तर अजिबातच नसणार नाही का?
ते काही नाही बास झाले ते राजकारणी लोकांचे उपद्व्याप, भारताला लष्करशाही शिवाय तरणोपाय नाही असेच वाटते.
तुम्हाला उपहास अभिप्रेत असेल तर तो अनाठायी आहे. (नसेल तर माझा हा प्रतिसाद दुर्लक्षित करा/ संपादकांनी उडवावा)
सैन्यातही वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार चालतो (holy cow) हे माहिती आहे, पण काहीच अधिकारी भ्रष्ट/ देशद्रोही आहेत, सर्व नाही. राजकारण्यांमधे मात्र सगळे भ्रष्ट आहेत.
22 Sep 2010 - 9:06 pm | सुधीर काळे
अहो सहज साहेब,
तुम्ही लाखमोलाचं बोललात पण असं बोलू नका!
मला आपल्या लष्कराबद्दल खूप अभिमान आहे, पण जे पाकिस्तानचे लष्कर "नेमेचि येतो मग पावसाळा" या न्यायाने करू शकते (सत्ता काबीज करणे) तसे आपले लष्कर कां करू शकत नाहीं असे मी विचारल्यावर बरेच लोक माझ्यावर नाराज झाले!
आजच बातमी वाचली कीं पाकिस्तानच्या Parliamentary Accounts Committeeने ISIने ५५० कोटी डॉलर्सचे काय केले असा प्रश्न विचारला असता अर्थमंत्रालयाचे सचीव उत्तरले कीं ही माहिती फार संवेदनाशील असल्यामुळे ते याबद्दल उघड व्यासपीठावर बोलू शकत नाहींत. म्हणजे आनंदी-आनंद!
पाकिस्तान व चीनमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य नाहींच, त्यामुळे नेहमी होणार्या भ्रष्टाचाराला वाचा कोण फोडणार? पण चीनमध्ये दर वर्षी ३००-४०० भ्रष्टाचारी लोकांना/नेत्यांना गोळ्या घालून ठार मारले जाते. असे आपण जर भारतात केले तर आपल्याकडील राष्ट्रीय भ्रष्टाचार खल्लास होईल! आपल्या नेत्यांना शिक्षेची भीतीच नाहीं - नव्हे शिक्षा होणार नाहीं याची खात्री आहे - म्हणून आपल्याकडे 'चारा घोटाळ्या'सारखे घोटाळे होतात पण ते करणारे नेते रेल्वे मंत्री होतात!
काश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यात १०४ माणसे सुरक्षादलाच्या गोळीबारात ठार झाली. हे व्हायला नको होते यात शंकाच नाहीं. पण त्याचा शंखनाद केवढा आणि करतो कोण? तर पाकिस्तान! पाकिस्तानच्या स्वात खोर्यातल्या मोहिमेत व वझीरिस्तानमध्ये इतकी माणसे आठवड्यात मरत असतील. पण त्याबद्दल कुणाला माहिती आहे व त्याबद्दल कोण बोलणार?
आपण काश्मीरमध्ये मारतो ते एक तर मुजाहिदीन तरी असतात किंवा (दगड मारत असले तरी) निष्पाप नागरिक असतात! पण पाकिस्तानी सैन्य मारते ते सारेच्या सारे अतिरेकी असतात. हे कसले वृत्तपत्र स्वातंत्र्य?
आपले सरकार (पुन्हा सरकारवर घसरल्याबद्दल माफ करावे) आपली प्रतिमा चांगली असूनही चांगली ठेवूच शकलेली नाहीं. उदा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकशाही नसतांना व दडपशाही असतांना वर आपल्या 'जुलमी राजवटी'बद्दल पांचजन्य करणार्या पाकिस्तानला आपण सडेतोड उत्तर कां देऊ शकत नाहीं. उदा: Pakpassion या संस्थळावर मी टोपण नावाने लिहितो. एका MCMLXXXII नावाच्या माणसाने लिहिलेल्या ""How do you expect the Pakistani troops to withdraw when India goes ahead and makes Jammu and Kashmir a state and hold elections in the portion they control? How can you expect Pakistan that fair plebiscite and autonomy issues can be discussed when India takes a step like this intgerating Kashmir with the rest of India? This was still disputed territory and India took unilateral steps to usurp the territory.
The OP article is such blatant propaganda. Chinese and Pakistani co-operation has gone a long way in the past. They have helped Pakistan by building the port in Gawdar and the Karakorum Highway. All of these assistance has been beneficial to Pakistan. Ask the people of Gilgit-Baltistan what their quality of life was like before the KKH was built." या खोडसाळ प्रश्नाला मी असे उत्तर दिले आहे.(1) I have given the exact words in UNSC resolution of 1948 which says, as a first step, that Pakistan MUST withdraw its troops and also the tribesmen and other people who are not normal residents there. Please read the resolution. The resolution does not make similar demand on Indian troops. Please take a note, Mr/Ms MCMLXXXII!
Pakistan didn't oblige. So it broke its own commitment it to the UNSC. So why blame India?
(2) When democracy in Pakistan pops up as punctuation marks between series of military dictatorships, with what face Pakistanis can talk of a vote in J&K, something that they deny to their own citizen?
(3) Has Pakistan given a democratic set up to PoK? India routinely holds elections in J&K which is not matched by any Pakistani election.
(4) With forcible displacement of Hindus from the valley, how can anybody plan a plebiscite when all the Hindu voters have gone helter-skelter thanks to the goondas in their neighbourhood!
(5) Pakistan (as usual) broke the Simla Agreement. Actually, I see no point in making any deals with Pakistan because Pakistanis will never keep their word-whether to India or to USA. The Military brass likes the smell of greenbacks while the bulk of Pakistani people hate USA. So why take aid from USA and stab her in the back? That is what Pakistan did to India.
(6) Even Musharraf accepted that militancy was fathered in Pakistan!
That is the real story and it was clearly brought out by Wikileaks and then by British PM David cameron!
माझ्यासारखा अपुरी माहिती असलेला जर असे उत्तर देऊ शकतो तर आपले मुरब्बी नेते तसे उत्तर कां देऊ शकत नाहींत? हा मुखदुर्बळपणा काय कामाचा? पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव पाळत नाहीं, सिमला करार पाळत नाहीं, पण वर चोराच्या उलट्या बोंबा मारते मग आपण असे शुंभासारखे सहन कां करतो?
याचा मला खरोखर संताप आहे.
23 Sep 2010 - 9:10 am | सहज
प्रत्येकाची सहनशीलता वेगवेगळी असते. अजुनही त्यांच्याकडे धादांत खोटे बोलणारे लोक आहेत तर आपल्याकडेही अनेक माथेफिरु त्यांना कापा, ते तसलेच असा सर्वत्र कंठशोष करणारे लोक तुम्ही, आम्ही सहन करतोच ना?
बरं पाकीस्तानच्या प्रत्येक अधिकृत आक्षेपाला आपल्या संबधित मंत्रालयाकडून उत्तर जातेच की. भले इतर लोक कधीही काहीही बोलो, काय फरक पडतो? त्यांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही. उलट अश्या लोकांना उत्तरे देउन मोठे कशाला करायचे? बर जर त्या भरकटलेल्या अजाण पाकीस्तानच्या जनतेला नावे ठेवणे व त्यांच्या अश्या वागण्याचा संताप करुन घेण्यापेक्षा, आपले मुस्लीम बांधव जे भारताचे नागरीक आहेत त्यांना आपल्या बरोबर घेणे किती महत्वाचे आहे हे जर समजले नाही तर शत्रु कायम आपल्याच भूमीवर आपल्याच नागरीकांकडून आपल्याला शह देईल व वेळीच आपली तटबंदी आपण मजबूत केली नाही याचा तेव्हा परत संताप होईल. काश्मीर हा भारत-पाकीस्तान (व काश्मीर) यांच्यातील वादाचा मुद्दा आहे, हिंदू व मुस्लीम यांच्यातील नाही हा फरक ध्यानात घेतला पाहीजे. मुद्दा हा की आपली शक्ती व संताप कोण पाकीस्तानी काय म्हणतो यावर खर्च करण्यापेक्षा आपल्या देशात दुफळी माजु न देणे यावर श्रम घेणे आपल्या दृष्टीने फायद्याचे.
चीन मधे ठरावीक चमूला इतरांना गोळ्या घालायचे अधिकार आहेत, ते जसे भ्रष्ट लोकांना गोळा घालतात तसे चांगल्या लोकांनाही गोळ्या घालुन ते भ्रष्ट असल्याचे सांगतात. त्यामुळे तसल्या व्यवस्थेला कोणी किती महत्व द्यायचे हे परत ज्याची त्याची जाण यावर अवलंबून.
कोणी मुखदुर्बळ नाही ना भारत, ना पाकीस्तान, ना चीन ना अन्य कोण. व कोणी कोणाला शुंभासारखे सहन करत नाही. अधिकृत व्यक्तव्य महत्वाची व तिथे खोडसाळपणा अगदी झालाच तरी त्याला उत्तर दिले जाते.
रोज उठून कोणी काही बोलला त्याला लगेच सडेतोड उत्तर देत बसणे ही नव्या जमान्यात वेब फोरमची परंपरा असेलही पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची नसावी असे दिसते. तुम्ही दिलेली सडेतोड उत्तरे आपल्या सरकारनेही वेळोवेळी दिली असणारच. आता प्रत्येक मिटींगचे खुलासे जसे पाकीस्तान व चीन आम जनतेला देत नसावेत तसे आपल्या सरकारकडे देखील सतत मागणे कशाला?
१) प्रत्यक्ष युद्ध २) मेडीया मधुन युद्ध / वादविवाद ३) आंतरराष्ट्रीय संबध बाजु घेणे - यात भले तुम्हाला मेडीयामधुन युद्ध मधे भारत तुम्हाला हवा तसा लढत नाही असे दिसत असेल पण म्हणजे युद्धात हार असे थोडीच आहे?
प्रत्यक्ष युद्धात काय झाले हे तुम्हाला माहीत आहेच. आंतरराष्ट्रीय संबधात पाकीस्तानची प्रतिमा आता जगजाहीर आहे. अर्थात काश्मिर संबधी त्यांचे रास्त मुद्दे आपले काही मुद्दे हे आपल्याला ६० वर्ष सोडवता आले नाही आहेत व येतील असेही काही दिसत नाही आहे. त्यामुळे दोन्ही बाजुनी समजुतदारपणा दाखवुन सुटला तरच हा पेच सुटणार. नाहीतर भारत व पाकीस्तान दोन्ही देश 'मोठे व्हायची' वाट बघायची अन्यथा कोण्या एकाची वाट लागते का ते बघायचे अर्थात एकाची वाट लागली तरी दहशतवादाच्या जमान्यात प्रश्न पूर्णता सुटेलच याची काय शाश्वती? काश्मीर प्रश्न बाजुला ठेवला तरी देशांतर्गत इतर नक्षलवाद कुठे संपलाय?
21 Sep 2010 - 10:19 pm | पैसा
या विषयावर जरूर लिहा. तीच त्याना योग्य श्रद्धांजली ठरेल.
कॅ सौरभ कालिया आणि इतर वीराना आम्ही नागरिक आपल्या मनात सांभाळून ठेवू. पण या उमद्या तरुणांचा हकनाक बळी गेला हे कसं विसरणार?
राजकारणी लोकांची असंवेदनशीलता आणि असंस्कृत मनं यांचं वेळोवेळी दर्शन घडतंच. मग ते ताज मधे मुख्यमंत्र्यांबरोबर सिनेमावाल्यानी जाणं असो (मुंबई २६/११ नंतर) किंवा मे. संदीप उन्नीकृष्णन च्या मातापित्यांचा आक्रोश ....
आणखी काय लिहू? मनात फक्त संताप आहे.....
21 Sep 2010 - 10:49 pm | अर्धवटराव
लढणारे लढले, मरणारे मेले. त्यात फायदा करुन घेणार्यांनी निर्लज्जपणाचा कळस करुन तो करुनही घेतला. मूळ प्रश्न असा कि आपल्या लश्कराबद्दल सामन्य जनात इतकी उदासिनता का असावी ? उत्तर नाना पाटेकर देतो "प्रहार" चित्रपटात शेवटी कोर्ट रूम मधे... "मुफ्तमे मिली आझादी कि किमत नही है किसीको." (असलाच काहितरी संवाद आहे... एक्झॅट हाच नाहि). देशाच्या सर्वभौमत्वाच्या/स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लश्कराचे महत्व, संरक्षण व्यवस्थेचे नागरी व्यवस्थेशी असलेले नाते, आपसातील संवाद आणि सर्वात महत्वाचे आपण या विराट आणि अत्यावश्यक सिस्टीमचे आपण एक घटक आहोत या जाणिवेचा अभाव... कुठे कुठे म्हणुन सुधारणा करणार ? आपल्या स्वातंत्र्य लढ्यात लश्कराने काहिच भुमीका घेतली नाहि (सरकार दफ्तरी त्याची नोंद असावी. पण लोकांपर्यंत ती पोचली नाहि/पोहोचु दिली नाहि. आझाद हिंद सेनेने ब्रीटीश राज्यव्यवस्थेच्या वर्मी घातलेला घाव "चलेजाव" सारख्या आंदोलनाच्या धामधुमीत दबुन गेला वा दाबला गेला). या मुद्द्यावर खुप वाद्-विवाद झालेत, पुढेही होतील. त्यापलीकडे काय होईल कोण जाणे.
(प्रतीक्षेत) अर्धवटराव
22 Sep 2010 - 8:08 am | Pain
आपल्या स्वातंत्र्य लढ्यात लश्कराने काहिच भुमीका घेतली नाहि
??? हे काय लिहिलत? नौसैनिक (तलवार युद्धनौका) आणि इतर लष्करी अधिकार्यांचे बंड विसरलात का ? आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही आहे ते. दोनदा.
ते, दुसरे महायुद्ध, सुभाषबाबू ही महत्त्वाची कारणे आहेत स्वातंत्र्य मिळण्याची.
शिवाय पहिला उठाव (१८५७) हा तर सैनिकांनीच केला होता. त्या स्वातंत्र्यसमराची इंग्रजांनी "शिपायांचे बंड" म्हणून अवहेलना केली होती पण त्यात तर त्यांचा सहभाग स्पष्ट दिसतो!
बाकी सगळ्या प्रतिसादाशी सहमत.
22 Sep 2010 - 10:38 am | अर्धवटराव
एकदा परत शांतपणे माझा रिप्लाय वाचाना साहेब !!
(कृपाभिलाशी) अर्धवटराव
22 Sep 2010 - 8:01 am | Pain
भले राष्ट्रपतीपद हे मानद असल, तरी कलाम हे मी पाहिलेले खूपच टॅलंटेड आणि righteous राष्ट्रपती होते. ( त्यांच पूर्ण करियर आणि राष्ट्रपतीपदाचे जे काही तुटपुंजे अधिकार आहेत ते योग्य प्रकारे वापरणे उदा. संसदेवर हल्ला करणारर्या महान धर्माच्या अतिरेक्याची माफीची फाईल दोनदा परत पाठवणे) . बहुदा या असहकारामुळेच त्यांना लवकर निवृत्त करण्यात आले. असो.
त्या तुलनेत ही महिला तर फक्त एक तुच्छ राजकारणी आहे. आत्ताच्या सत्ताधारी पक्षाच्या हो ला हो करणारी कठपुतळी यापलिकडे विशेष काही नाही. त्यामुळे त्या कर्यक्रमाला न गेल्याने सर्व सैनिकांवर उपकारच झाले आहेत.
22 Sep 2010 - 9:12 am | सुधीर काळे
पेनसाहेब,
तुच्छ राजकारणी आहे
हे मात्र खरे! पण हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतर याच राजकीय नेत्यांना किती आदर होता जनतेत! त्यानीच आपल्या वर्तनाने घालविला.
कांहीं प्रतिसादात लिहिलेले खरे असेल तर आपल्या लष्करी नेतृत्वाने राजकारण्यांचा कित्ता गिरवू नये असे वाटते.
22 Sep 2010 - 10:19 am | इन्द्र्राज पवार
"कांहीं प्रतिसादात लिहिलेले खरे असेल तर आपल्या लष्करी नेतृत्वाने राजकारण्यांचा कित्ता गिरवू नये असे वाटते......"
~~ श्री.काळेसरांना विनंती की त्यांनी 'काही प्रतिसादात लिहिलेले खरे असेल तर..." असे मोघम लिहून (किमान माझ्या मनात...) गोंधळ निर्माण करू नये. तुम्ही हलका का होईना एक आरोप केला आहे की बरेच सदस्य येथे पुराव्याच्या नावाखाली 'फेकतात'. मी इथेच नव्हे तर ज्या ज्या प्रतिसादात [अगदी इंग्रजी संस्थळावरदेखील] काही विधाने करतो, ती भरभक्कम पुराव्याच्या आधारेच. 'कारगील' वर मी बर्यापैकी वाचन केले आहे...काही नोंदीदेखील त्या त्या वेळी संबंधिताकडून चेक करून घेतल्या होत्या. [दिल्लीत असल्याने बर्याच प्रकारच्या लायब्ररीज, रिसर्च सेन्टर्स, पीटीआय, जेएनयू आदी स्थळे माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सहज उपलब्ध असतात. एखाद्या खासदाराच्या ओळखीने - त्याच्या कार्डवर - लोकसभा/राज्यसभा येथील ग्रंथालय आणि डॉक्युमेन्टेशन डिव्हीजन्सची अगदी २४ तास दालने खुली मिळतात. सातत्याने तिथे ये-जा केली तर तेथील स्टाफची ओळख होते व ते लोकदेखील 'रेफरन्सेस'साठी आनंदाने सहकार्य करीत असतात.] सांगायचा मुद्दा हा की, इतरांच्या प्रतिसादाबद्दल मला बोलायचा/लिहायचा अधिकार नाही (असूही शकत नाही); पण माझ्या मुद्यातील मजकुराच्या सत्यतेविषयी मी आग्रही आहे. वरील वाक्यात आपणास नेमके काय म्हणायचे आहे ते कृपय रोखठोक लिहिल्यास (म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असे वाटते का... ले.जनरल क्रिशन पाल 'त्या' दिवशी गोल्फचे उदघाटन करायला गेले नसतील?)
ललित लेखनातून (कथा कादंबर्या आदी) त्या त्या लेखकाने व्यक्त केलेले मत हे त्याच्या पोतडीतून आलेले रसायन असते. उदा. शिवाजी सावंतांचा कर्ण वाचताना असे पावलोपावली [किंवा पानोपानी] वाटत राहते की महाभारतात सर्वात वाईट कोण होते ते फक्त पांडवच. अर्थात असे रंगविले तरच 'मृत्युंजय' यशस्वी होणार [अजूनही कैक उदाहरणे देऊ शकेन, पण विनाकारण हा धागा भरकटणार.]. दुसरीकडे ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेताना पुराव्याची आवश्यकता - त्यातही लष्करासंदर्भात असेल तर जास्तच - असते. त्यामुळे प्रतिसादात तशी माहिती देताना मी त्याचा पुरावा असेल तरच देतो, किमान एवढी बाब तरी आपण लक्षात घ्यावी.
धन्यवाद
इन्द्रा
(ता.क. : किंवा असेही असेल की तुमचे ते वाक्य वाचताना माझाही काही गैरसमज झाला असेल. तसे असेल तर हा प्रतिसाद लागलीच काढून टाकता येईल.)
22 Sep 2010 - 4:41 pm | सुधीर काळे
इंद्रराज-जी,
(१) तुमच्यावरचा अविश्वास त्या वाक्याच्या मुळाशी मुळीच नव्हता, पण माझ्या स्वतःच्या वाचनात ही घटना आलेली नव्हती म्हणून मी तसे लिहिले. मी सुद्धा तुमचेच तत्व शक्यतों पाळतो इतरांच्या प्रतिसादाबद्दल मला बोलायचा/लिहायचा अधिकार नाही (असूही शकत नाही); पण माझ्या मुद्यातील मजकुराच्या सत्यतेविषयी मी आग्रही आहे
शिवाय 'हिं.टा.'च्या लेखातले हे वाक्यही जरासे तुमच्या वाक्याशी जुळत नव्हते (पण सार्या भारतातून जनरल सारख्या पदावर असलेले उच्च सेनाधिकारी आणि धारातीर्थी पदलेल्या अधिकार्यांच्या आणि सैनिकांचे कुटुंबीय मात्र आवर्जून हजर रहाणार होते.)
(२) आपल्या वरिष्ठ लष्करातले अधिकारी धुतल्या तांदळासारखे नाहींत. त्यांचा भ्रष्टाचार उघड्यावर आणण्याचे काम पूर्वी 'टेहेलका'ने केले होते ज्यात भाजपाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचा पत्ता तर काटला गेलाच पण इतरही अनेक लष्करी अधिकार्यांची कुलंगडी बाहेर आली. याच घटनेनंतरच मी त्या ले.ज. यांना माझा प्रश्न विचारला होता.
खूप वर्षांपूर्वी माझ्या धाकट्या भावाचा रूम पार्टनर हैदराबादच्या एका ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स बनवायच्या कारखान्यात काम करत होता. तोही मला एकदा म्हणाला कीं लष्कराचे लोक माल तपासायला येत व माल चांगला असला तरी परतीच्या तिकिटाचे पैसे त्या कंपनीकडूनच घेत. पण आनंदाची एकच गोष्ट त्याने सांगितली होती कीं कमी प्रतीचा (sub-standard) माल ते कधीही स्वीकारत नसत!
अवांतरः आपण दिल्लीला असता का?