अनुप्रियाची तथास्तु !! वाचुन विडंबन करावे असे वाटले नाही (खर तर तसा कवितेचा विषय विडंबावा असा बिल्कुल नाही आहे )
तरिपण रिकामा वेळ असल्याने थोडासा हा नराधमपणा....
थांब संपादका !! तुला शांती नाही
हा धागा कदाचित तु साफ करशिलही
पण या विषयाशिवाय काही बाकी नाही ॥
कोवळ्या कवितांना, उसळत्या विचारांना
संपादनारा तू......
लेखांचा, लेखकाचा
चोथामोथा करणारा तू......
२०० प्रतिसाद घ्यावे अशी प्रतिभा ज्याची
त्याला खरडफळा बनवणारा तू....
डु.आयडीचा वापर करुन
डोळ्यात धूळ फेकणारा असा तू.........
पायाचा फोटो आदराने मागवुन
पायात पाय घालुन, पाडणारा तू
मायाजाल हे सोडणार नाही तुला
ध्यानी धर संपादका........
तू हात लावलायस
एका धगधगत्या चितेला
द्वेशाने रंगलेल्या दुधारी तलवारीला
चर्चाकर्त्यांच्या लाडक्या विषयाला
आता भोग कर्माची फळे तू
अधिकारांपेक्षा जबाबदार्याच भयंकर
तूच ते भोग आता.......तूच ते भोग आता
अवांतरः सर्व संपादकहो ह.घ्या.
लक्ष ठेवण्यासारख्या बर्याच चर्चा येथे होत असल्याने तुम्हाला वेळ नसेलच :;)
प्रतिक्रिया
20 Sep 2010 - 3:06 pm | प्रीत-मोहर
हॅहॅहॅ....
20 Sep 2010 - 3:13 pm | अवलिया
ज ब रा हो चेतनराव.... गेले आता तुम्ही "गुड" बुकात संपादकांच्या... ;)
20 Sep 2010 - 3:21 pm | सहज
हा हा हा तुम्ही आता श्री. चेतन जालकंटक नावाने ओळखले जाणार.
विडंबनास्त्र तिकडून पण येइल बघा!
20 Sep 2010 - 3:27 pm | अवलिया
नुसतेच जालकंटक नाही.. "खोडसाळ", "काड्याघालु", "गणंग", "बेअक्कल", "मूर्ख", "भिकारचोट", "तसलेच" इत्यादी विशेषणे सुद्धा लागु होतील असे वाटते ;)
* वरती वाक्यात लिहिलेली विशेषणे संपादकांनी संपादित करण्याची गरज नाही कारण "काही" संपादकांनी वेळी अवेळी खरडव्यनीतुन वेगवेगळ्या वेळी आम्हाला याच शब्दांनी गौरवलेले आहे. धन्यवाद. *
20 Sep 2010 - 5:38 pm | चेतन
अरेरे बाण चुकीच्या ठिकाणि लागला वाटतं ;) (ती डोक> खाजवणारी स्मायली कशी टाकायची?
बाळाला जर पद दिले, अधिकार दिले भयंकरी,
संपादक कधी झालास तरी, झडप लाव डोळ्यांवरती
हे नाना तू काय तरी||१||
शुची ताईंची कविता वाचुन असलं काहीतरी लिहणार होतो पण राहु दे (हलकटपणाचा कहर अशी प्रतिक्रिया यायची)
21 Sep 2010 - 8:09 am | पैसा
आणखी एक शक्यता: शिक्षा म्हणून तुम्हाला संपादक का करण्यात येऊ नये?
20 Sep 2010 - 4:52 pm | अनुप्रिया
तीव्र हलकट्पणा
21 Sep 2010 - 3:08 am | शेखर
खपला तुमचा आय डी आता...
21 Sep 2010 - 3:48 am | शुचि
>> आता भोग कर्माची फळे तू
अधिकारांपेक्षा जबाबदार्याच भयंकर >>
खी: खी: लै बेक्कार हसले
21 Sep 2010 - 11:08 am | चेतन
प्रीत-मोहर , अवलिया, सहज, शुचि,पैसा, शेखर धन्यवाद
@अनुप्रिया: मुळ कवितेचा विषय हा गंभीर आणि विचार करण्याला लावण्याजोगा होता (पण विडंबन मूळ विषयावर नव्हते)
@संपादक: ह्.घेतल्याबद्द्ल धन्यवाद
चेतन