होईल कधी गे भेट ?

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in जे न देखे रवी...
18 Sep 2010 - 9:15 pm

होईल कधी गे भेट ?
कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट

ओझरते मी तुला पाहिले
थार्‍यावरचे चित्त उडाले
मनोरथांचे चढले इमले
क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत

ओठांवरती शब्द न येती
मनात पण पाझरते प्रीति
परतून जेव्हा पडेल गाठी
नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत

एकच आशा येशील गे तू
जुळतील धागे जुळतील हेतू
केव्हा होईल भेट परंतू
अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

शृंगारसंगीतप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

अथांग's picture

19 Sep 2010 - 10:27 pm | अथांग

ओठांवरती शब्द न येती
मनात पण पाझरते प्रीति
परतून जेव्हा पडेल गाठी
नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत

हे आवडले.

पैसा's picture

19 Sep 2010 - 10:42 pm | पैसा

छान गेय कविता आहे. आणि हळूवार भावना तशाच तरल शब्दात लिहिल्या आहेत.

शिल्पा ब's picture

20 Sep 2010 - 1:31 am | शिल्पा ब

छान कविता...
होइल हो लवकरच भेट...तुमची अन तिची..अन झाली कि सांगा कविता करुन. (ह.घे.)

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Sep 2010 - 8:51 am | ज्ञानोबाचे पैजार

असल्या गेय विषयावर आता कविताही पडायला लागल्या म्हणायच्या, मराठी कवीमन कशा कशा मुळे हळवे होत रहाणार आहे देव जाणे.

आपल्याला आपण हेरलेला साथीदार लवकर लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना,

"अशी झाली गे भेट" अशी पण कविता पाडा

स्वानंद मारुलकर's picture

21 Sep 2010 - 2:28 pm | स्वानंद मारुलकर

अथांग, पैसा, शिल्पा, पैजार
सर्वांचे मनापासून आभार.