आज मराठवाडा मुक्तिदिन

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
17 Sep 2010 - 1:31 pm

आज मराठवाडा मुक्तिदिन !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता.

त्यावेळी काँग्रेस पुढार्‍यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला.

माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

इतिहाससद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

औरंगाबादचे आमचे मित्र यावर प्रकाश टाकतील.

सदर लढ्यासाठी सर्वस्व वेचणार्‍या तसेच सहभागी असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना शतशः प्रणाम !

निखिल देशपांडे's picture

17 Sep 2010 - 2:42 pm | निखिल देशपांडे

औरंगाबादचे आमचे मित्र यावर प्रकाश टाकतील.
आमचे एक मित्र याबद्दल लेख लिहिणार होते. ते सविस्तर लिहितीलच :-)
बाकी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा शेवट १९४८ च्या मिलिटरी अ‍ॅक्शन ने झाला असला तरी त्याआधी सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढा चालु होताच.
राजवट वेगळी असल्यामुळे जनतेसमोर असलेले प्रश्न सुद्धा काही प्रमाणात वेगळे होते. रझाकारांचा सामना करणे सामान्य जनतेसाठी सोपे नव्हतेच. असो याबद्दल आजोबांच्या काही आठवणी सविस्तर लिहिनच

अवलिया's picture

17 Sep 2010 - 3:22 pm | अवलिया

>>>आजोबांच्या काही आठवणी सविस्तर लिहिनच

तुमच्या आजोबांच्या आठवणी नव्या पिढिला नक्कीच स्फुर्तीदायी ठरतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आमचे एक मित्र याबद्दल लेख लिहिणार होते. ते सविस्तर लिहितीलच
कोण लिहिणार होते जरा माहिती कळेल काय ? :)

>>>>आजोबांच्या काही आठवणी सविस्तर लिहिनच
आने दो....!!!

-दिलीप बिरुटे

सोम्यागोम्या's picture

18 Sep 2010 - 2:24 am | सोम्यागोम्या

चांगला लेख सर्वांना वाचता यावा म्हणून अवलियांना प्रतिसाद देत आहे.

http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100917/506382863917291630...

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 1:55 pm | धमाल मुलगा

>>सदर लढ्यासाठी सर्वस्व वेचणार्‍या तसेच सहभागी असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना शतशः प्रणाम !
आमचाही प्रणाम.

बाकी, ह्या विषयावरची माहिती वाचायला मिळाली तर उत्तमच. फक्त ती छापील आणि विकी-फिकीवरची माहिती मिळण्यापेक्षा जर कोणाच्या घरातील जुन्या अनुभवांतून वगैरे आलेली असेल तर जास्त उत्तम असं माझं वैयक्तिक मत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>विकी-फिकीवरची माहिती....
चहाच्या घोटाला, कुंकवाच्या बोटाला आणि आंतरजालावर विकीच्या दुव्याला नाही म्हणायचं नाही.
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास मराठी विकिपीडियावर वाचा. आणि नवीन माहिती असेल तर जरुर भर घाला....!

-दिलीप बिरुटे
[विकिपीडिया सदस्य]

अवलिया's picture

17 Sep 2010 - 7:54 pm | अवलिया

"चिलमीच्या झुरक्याला" हे राहिले...

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 8:15 pm | धमाल मुलगा

गुर्जी तुमचं म्हणणं येकदम मान्य.
पण 'फेस ऑफ'मधला एक ड्वायलॉग है जॉन ट्रॅव्हल्टाचा.. "यू.. यू रिलाय ऑन युअर मिलियन डॉलर्स सॅटलाईट & आय'ल बलिव्ह द टेन डॉलर्स पिंप..."

सहज's picture

17 Sep 2010 - 2:29 pm | सहज

भारत रक्षक या भारतीय फौजांबद्दल असणार्‍या संकेतस्थळाचा दुवा देत आहे.

ऑपरेशन पोलो १९४८ - काही फोटो

१५ ऑगस्ट १९४७ ते १७ सप्टें १९४८ भारताच्या आत जणु एक वेगळा स्वतंत्र देश होता हैद्राबाद. ज्याची स्व:ताची फौज, परराष्ट्रीय धोरण होते. नशीब आपले की तेव्हाच भारतात विलीनीकरण झाले. नाहीतर अजुन एक डोकेदुखी :-)

३० सेकंदापासुन तीन मिनिटे ३० सेकंद

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Sep 2010 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते

काही ग्रेट नाही... राहिले असते निजामाच्या राज्यात तर काय बिघडले असते? उगाच लफडी करायची आणि स्वातंत्र्य वगैरे म्हणायचे...

स्पष्टीकरणाची पाळी येऊ नये असे वाटते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या स्वातंत्र्यापेक्षा गुलामी परवडली. अत्याचार परवडला, अन्याय परवडला. असे म्हणता येते.
पण त्यातल्या त्यात आजचे बरे दिवस आहेत असे वाटते. आपल्या स्पष्टीकरणाची वाट पाहतो..!

निजाम सरकारात जनतेला स्वातंत्र्य नव्हते. उदा. जाहीर सभा घेणे. भाषण करणे, मिरवणूक काढणे. शिक्षण संस्था काढणे, शिक्षणाचा प्रसार करणे. याला बंदी होती. हिंदूना देवपूजा करायची असेल तर घरातल्या घरात केलेल्या पूजेचा आवाज गल्लीत येऊ नये. पूजा करत असतांना वाद्य वाजवायची नाहीत. फटाके फोडायचे नाहीत. दस-याची मिरवणूक काढायची नाही. सार्वजनिक मंदिराची दुरुस्ती करायची नाही.नवीन मंदिरे बांधायची नाहीत. मात्र मशिदी बांधणे, मंदिर बांधण्यासाठी शासकीय रक्कम दिली जाईल. धर्मखात्याच्या परवानगीशिवाय हिंदूचे कोणतेही उत्सव साजरे होणार नाहीत. जबरदस्तीने हिंदूंना मुस्लीम धर्माची दिक्षा दिली जात असे. धर्मांतरास विरोध करणार्‍यांना तुरुंगात डांबले जात असे किंवा ठारही मारण्यात येत असे. हैदराबाद हे मुस्लीम राज्य असल्यामुळे हे राज्य इस्लाम धर्म आणि मुस्लीमांबद्दल सहानुभूती बाळगेल. वगैरे...! असो, अजून लिहिले असते पण समाजातील तेढ वाढतील असे लिहू नये म्हणून थांबतो.....!

-दिलीप बिरुटे

रझाकार आणि निर्घृण कत्तली हे समीकरण माझ्या कुटुंबियांनी - विषेशतः माझ्या आजीच्या (माहेरच्या) कुटुंबियांनी फार जवळून अनुभवले. माझ्या मामेआजोबांना (आजीचे वडिल भाऊ) रझाकारांनी खूप वाईटरीत्या हाल करुन मारले. आजी शेवटपर्यंत तो प्रसंग विसरु शकली नाही.

सदर लढ्यासाठी सर्वस्व वेचणार्‍या तसेच सहभागी असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना शतशः प्रणाम !

कवितानागेश's picture

17 Sep 2010 - 11:37 pm | कवितानागेश

माझ्या आजीच्यापण अशाच भयानक आठवणी आहेत.

जिप्सी's picture

17 Sep 2010 - 3:28 pm | जिप्सी

नाही चिरा ! नाही पणती !
अशा अनेक स्वातंत्र्यवीरांना,हुतात्म्यांना आदरांजली !

मन१'s picture

17 Sep 2010 - 5:29 pm | मन१

काही गोष्टी तुटक तुटक आठवणार्‍या:-
१.भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळ जवळ १वर्ष,१ महिना,२ दिवस निझाम स्टेट स्वतंत्र होतं.
२.हैद्राबादचा निजाम आणि १६ शतकातली निजामशाही ह्यांचा काहिही संबंध नाही.
३.आख्खा वर्षभर समजुन्तीनं घेउन, बोलणी करुनही निजाम ऐकेना.(त्याला ऐकाय्चं होतं, रझाकारांनी बोलणी फिसकटवायला भाग पाडलं असं म्हणतात.)
३.हैद्राबाद स्वतंत्र ठेवावं किंवा थेट नवनिर्मित पाकिस्तानात सामील(किंवा त्याच्याशी) संलग्न करावं असं राज्यकर्त्यांचं म्हणणं तर बहुतांश जनता भारतात जाण्यास उत्सुक.(अगदी मुस्लिम बांधव सुद्धा)
४.पाकीस्तानात सामील होण्यासाठी अधिकाधिक भाग मुस्लिम बहुल दाखवुन /बनवुन जाणं सोपं होतं.
लोकसंख्येचा हा तोल बिघडवायचं काम रझाकारांनी सुरु केलं.
सक्तीच्या धर्मांतराचे प्रयत्न झाले. गोर गरिबांवर अत्याचार करण्यात आले.(सौम्य आणि सांसदीय भाषा वापरतोय.)
बाहेरील मुस्लिमांना जाहिर आमंत्रणं गेली. त्यांनी इथे येउन वसण्याचं आवाहन करण्यात आलं.
५. याला भुलुन जे काही मुस्लिम बाहेरुन आले, त्यांची संपत्ती आणि स्त्रिया इथं पोचताच बेधडक लुटलं जाउ लागलं.
६.स्वातंत्र्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ह्याच्या नेतृत्वाखालील "स्टेट काँग्रेस"चा लढा सुरुच होता.(सशस्त्र देखील)
६.ही स्थिती बघुन, आणि निजाम व्यर्थ टाइम्पास करतोय ह्याला वैतागुन नाइलाजानं भारतीय लष्कर आत शिरलं.
गंमत म्हणजे ह्याला नाव "लष्करी कारवाई" च्या ऐवजी "police action" असं दिलं, जेणे करुन आंतरराष्ट्रिय समुदायाच्या डोळ्यावर न येता, त्यांना कांगावा करता येउ नये.
७.स्व.गोविंदभाई श्रॉफ्,हुतात्मा गोविंद पानसरे आणी इतर कित्येकांनी राज्याच्या आतच रहात लढा तीव्र केला.(दुर्दैवानं नावं आत्त आठवत नाहित.)
८.क्रांतिकारकांना रझाकारांनी गोळ्या घालुन ठार मारल. आख्खा गुलमंडी विभाग लाल झाला.(गुलमंडी म्हणजे औ.बाद चा लक्ष्मिरोड, ऐन मार्केट्ची जागा.)
९.कित्येकांना कुख्यात "काला चबुतरा"वर फाशी लटाकावल.
(आज तिथं शिवाजी पुतळा आहे,त्याला "क्रांती चौक " म्हणतात.(क्रांती चौक म्हणजे औ बाद चा कर्वे पुतळा चौक समजा)
त्या शहिदांची आख्ख्या चौकात कुठही स्मृती जपलेली नाही,हा आपला नालायक पणा.)
१०. ३च दिवसात निजाम शरण आला. दिल्लीवर आसफजाही ध्वज (निजाम स्टेटचा) फडाकावण्याच्या वल्गना करणार्‍या स्टेटवर ३च दिवसात भारताचा तिरंगा लागला.निजाम शरण आला.
११.रझाकारांचा प्रमुख मारला गेला की पक्डुन फाशी दिला गेला हे आत्ता आठवत नाहिये.
१२.भारतानं राज्य ताब्यात घेताच्,निजामानं सर्व हिंसा,लुटालुट जाळपोळ ही रझाकारांनी केली आहे असं सांगुन त्यांच्यावर खापर फोडलं.
१३.भारत सरकारनी सुद्धा,तो बोलतोय हे खरं मानुन नवनिर्वाचित भारतिय अधिपत्याखालील स्टेट्चा प्रमुख म्हणजे राज्यपाल पदासारखं काहितरी निर्माण करुन पुन्हा त्यालाच caretaker बनवलं.
१४.निजामाची खाजगी बँक भारताच्या मालकीची झाली. तिचं नाव स्टेट बँक ऑफ हैद्रबाद.
(अशाच स्टेट बँक्स पतियाळा,त्रावणकोर्,इंदूर ह्या संस्थानांच्याही आहेत. ) ती पुढं SBI शी संलग्न झाली.
१५.सर्वात मुख्य म्हणजे, भारतानं तिथली प्रशासन यंत्रणा उध्वस्त न करता तशीच आपल्या सेवेत आमावुन घेतली.
त्यामुळं भारताला बहुमूल्य असं प्रशासकीय अनुभव असलेलं टॅलेंट मिळालं.

उदा:- तत्कालीन जिल्हाधिकारी श्री भुजंगराव कुलकर्णी . पुढं ह्यांनी राज्य प्रशासन व अनेक केंद्रिय प्रकल्प निरिक्षक ह्यामध्ये आपली छाप पाडली. बहुदा सारसबाग व बालगंधर्व रंगमंदीराची उभारणी ह्यांच्या पुण्यातील कार्यकाळातीलच.
१६. ह्या लढ्यात कित्येक मुस्लिम क्रांतिकारकही होते. (एरवी मवाळ समजले जाणारे)कित्येक सधन घरातील मारवाडी,जैन हे ही शहीद झाले.
१७.(सुदैवानं)फारसं रक्त सांडल गेलं नाही, तरी भारतीय सामर्थ्याची एक चुणुक पाकनं पाहिली.

strange fact:-
स्वतः निजाम दर लक्ष्मीपूजनाला नियमित सोवळं नेसुन लक्स्मीएपूजन करायचा.
त्याच्या उच्च सत्ता वर्तुळात कित्येक हिंदु ही होते.

आज स्टेट नाही, पण कुठशी एखादी प्पुसटशी खूण दिसुनच जाते.
भारतीय रेल्वे, भारतीय अर्थ संकल्प, राज्याच्या योजना बघुन आजही निजाम्-नॉन निजाम स्टेट चा ठसा दिसला की गंमत वाटते. ६ दशकांनंतरही कुठतरी सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक फरक दिसत राहतोच.

विस्कळित पणाबद्दल क्षमस्व.
सुचेल ते, सुचेल तसं टंकलय.

सुनील's picture

17 Sep 2010 - 5:41 pm | सुनील

चांगली माहिती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुचेल तसे टंकल्याबद्दल धन्यु...!
प्रतिसाद आवडला....!

अवांतर : मना आहेस कुठे ? तुम्हाला जमेल तेव्हा जरा मोबीवर बोलूया....!

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 10:10 pm | नितिन थत्ते

मन१ यांचा सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
प्रतिसादावरून वैयक्तिक आठवणी लिहिल्या आहेत असे वाटले पण बिरुटे सरांचा प्रतिसाद पाहून गोंधळ उडालाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>पण बिरुटे सरांचा प्रतिसाद पाहून गोंधळ उडालाय.
का गोंधळ उडालाय ?

स्वगत : गोंधळ तर माझाच झाला आहे. 'मन' नावाचा आमच्या औरंगाबादचा सदस्य मित्र आहे.
आणि इथे तर मन १ दिसतोय आणि यांचा सदस्य कालावधी फक्त पाच आठवडे आणि काही दिवस.
आहे. आणि वरीजनल 'मन' तर काही एक वर्षापासून आहे.

-दिलीप बिरुटे
[गोंधळलेला ]

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 10:31 pm | इन्द्र्राज पवार

"तर बहुतांश जनता भारतात जाण्यास उत्सुक.(अगदी मुस्लिम बांधव सुद्धा)"

~~ ही माहिती दिल्याबद्दल तुमचे विशेष आभार. फार गरज आहे अशा माहितीची, दोन धर्मीयांतील काही गैरसमज दूर करण्यासाठी. आशा करतो की हिंदू-मुसलमान संबंधाबद्दल येथील विविध धाग्यावर लिहिणार्‍यांनी श्री.मन१ यांचा हा लेख वाचावा....(जरी ते याला 'विस्कळितपणे केलेले लेखन' म्हणत असले तरी...)

स्व.गोविंदभाई श्रॉफ्,हुतात्मा गोविंद पानसरे आणी इतर कित्येकांनी राज्याच्या आतच रहात लढा तीव्र केला...

~~ यातील "हुतात्मा गोविंद पानसरे" कोण? ~~ कारण अशा लढ्यात सहभागी असणारे एक गोविंद पानसरे यांनी मी चांगला ओळखतो, व ते हयात आहेत. तुम्ही "हुतात्मा" टाईप केले आहे, म्हणून थोडा गोंधळलो आहे.

रझाकारांचा प्रमुख मारला गेला की पक्डुन फाशी दिला गेला हे आत्ता आठवत नाहिये.

~~ याबद्दल थोडीफार माहिती आहे [जी 'सरदार पटेल' दप्तरात उपलब्ध आहे]. कासिम रिझवी हा प्रमुख रझाकार. यानेच दिल्लीत सरदारासमोर प्रखर भाषेत निझामाची बाजू मांडली होती पण सरदारांनी त्याला चूप केले होते. पुढे निझाम शरण आल्यावर रिझवीवर भारतीय दंडविधान संहितेनुसार जातीय दंगल भडकविण्याच्या आरोपाखाली १९५७ पर्यन्त कैदेत ठेवले व नंतर त्याच्यातील जोर ओसरल्यावर त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या विनंतीनुसार कायमचे पाकिस्तानला पाठवून देण्यात आले. त्याचे निधन तिथेच झाले.

असो....एकूणच मराठवाडा स्थापनेच्या इतिहासाबद्दल छान माहिती मिळाली.

इन्द्रा

मितान's picture

17 Sep 2010 - 5:39 pm | मितान

सहज, मन १ ,
मौलिक माहितीबद्दल धन्यवाद. तसा इतिहास हा माझ्या रुचीचा विषय नाही. पण मायभूमीशी संबंधित अनेक विषय रुची-अरुचीच्या पलिकडचे असतात. त्यातलाच हा एक विषय.
आज सकाळी तारीख मनात म्हणताना मुक्तिसंग्राम दिन आठवला. आणि शाळा-कॉलेजांना या दिवशी सुट्टी असते हे आठवले. मग स्वतःचीच लाज वाटली.
नेट वर खूपच विस्कळित माहिती मिळाले म्हणून हा धागा टाकला. तुम्ही दिलेल्या प्रतिसादांमुळे माहितीत भर पडली. आभारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2010 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा खूप मोठा आहे. या मुक्ती संग्रमात सहभागी झालेले अजून हयात असलेले त्या संग्रमाच्या आठवणी सांगतात. आम्ही मराठवाड्यातील या दिनाला आता मराठवाडा मुक्तीदिन असे म्हणतो. मराठवाडा दिन म्हणायचा की हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणायचा यावर मोठा काथ्याकूट होऊन. आम्ही मराठवाड्यातील जनता आजचा दिवस हा 'मराठवाडा मुक्तीदिन' म्हणून साजरा करतो. तर ऐतिहासिक दृष्टा इतर ठिकाणी तो 'हैदराबाद मुक्तीसंग्राम' दिन म्हणून साजरा होतो. आजच्या दिवशी शाळा महाविद्यालयात ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पाडले जातात. मुक्ती संग्रामातल्या सगळ्या हुतात्म्यांची आठवण काढण्यासाठी औरंगाबाद येथील बस स्थानकाजवळ सिद्धार्थ उद्यानात स्मृतीस्तंभाजवळ शासकीय ध्वजारोहण होते.

मराठवाड्यातील जनतेला एक वर्ष उशिराने स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे म्हणा की आणखी कोणत्या कारणाने म्हणा. मराठवाड्याचा विकासही मंदगतीने होत गेला. अर्थात आता सर्वच क्षेत्रात बर्‍यापैकी प्रगती होत आहे ही एक गोष्ट चांगली वाटते.

आमचं आजोळ औरंगाबाद जिल्ह्यातील असल्यामुळे आमचे आजोबा-आजी निजाम राजवटीचे अनेक प्रसंग सांगायचे. निजामाचे पोलीस दिसले की आम्ही कसे लपून बसायचो, निजामांचे पोलीस कसे अत्याचारी होते वगैरे. पण शाळकरी वयात ते सर्व गोष्टीसारखे वाटायचे आणि तिथेच विसरले जायचे. भारतात असलेली संस्थाने त्यांची राज्ये, इतिहास अशा वेगवेगळ्या गोष्टी आता कळू लागल्यामुळे हैदराबादेतील हुकुमशाहीचा शेवट कसा आवश्यक होता ते आता इतिहास वाचून कळते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाड्यात मुक्तीसंग्रामाचा लढा लढला गेला. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी हयात असलेल्या स्वातंत्र्यविरांना माझा सलाम. ज्यांना या लढ्यात आपले प्राण गमवावे लागले अशा ज्ञात अज्ञात विरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.....!!!

-दिलीप बिरुटे

शालेय इतिहासात वाचलं होतं पण नंतर कधी स्मरण झालं नाही :( आठवण करुन दिल्याबद्दल आभार.

तेलंगणात हाच दिवस 'तेलंगणा लिबरेशन डे' म्हणून साजरा केला जातो, पण तिथल्या मुस्लिमांचा याला विरोध आहे! हा दुवा बघा - http://www.dnaindia.com/india/report_telangana-liberation-day-faces-oppo...

प्रभो's picture

17 Sep 2010 - 7:22 pm | प्रभो

असेच म्हणतो.. :)

पुष्करिणी's picture

17 Sep 2010 - 8:24 pm | पुष्करिणी

१५ ऑगस्टही साजरा करण्यास बंदी घालावी आणि सगळ्यांनी फक्त १४ ऑगस्टच साजरा करावा.
इतर धर्मियांचे शुक्रवारी येणारे सण साजरे करू नयेत .

निजाम जर विलीन करायला तयार नव्हता तर त्याला तनखा का दिला ?