इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 5:26 pm

टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!

राजकारणप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

29 Jan 2013 - 9:31 pm | सुधीर काळे

माझ्या सहीचा भाग म्हणून मी 'ई-सकाळ'वर लिहिलेले दोन नवीन लेख कांहींनी वाचलेले दिसताहेत. त्या दोने लेखांपैकी काश्मीरबाबतच्या प्रा. याकूब झान बंगाश यांच्या लेखाचा अनुवाद व त्यावरील माझी मते खाली कॉपी-पेस्ट करीत आहे. लेख खूपच वाचण्यासारखा आहे.

आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?
(एका पाकिस्तानी प्राध्यापकाचा काश्मीर प्रश्नावरचा आगळा-वेगळा व अतिशय वाचनीय लेख)
मूळ लेखक - प्रा. याकूब खान बंगश, लाहोर,
अनुवाद - सुधीर काळे, जकार्ता
प्रा. याकूब खान बंगश हे लाहोरच्या 'फोरमॅन ख्रिश्चन कॉलेज'मध्ये इतिहासाचे प्राध्यापक असून, त्यांचा पहिलाच लेख मी अलीकडे वाचला. खरे तर 'आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?' हे लेखाचे शीर्षक वाचूनच मी त्यांच्या लेखाकडे आकर्षित झालो. वाटले होते की नेहमीप्रमाणे भारताला दोष देणारा लेख असेल. पण तो वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या लेखात लेखकाने पाकिस्तानची विशीतली पिढी काश्मीरबद्दल कशी उदासीन झाली आहे याची चर्चा केलेली आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न बाजूला ठेऊन इतर समस्यांकडे लक्ष देऊन आपले जीवनमान सुधारावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.

खाली मी या लेखाचा केलेला अनुवाद देत आहे. माझे स्वतःचे विचार लेखाच्या शेवटी दिलेले आहेत.

गेल्या वर्षी 'ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या एका लेखात 'पाकिस्तानने काश्मीरबाबतचा आपला पवित्रा, केवळ काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठीच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानच्या कल्याणासाठी, बदालायला हवा', असे प्रा. याकूबसाहेबांनी लिहिले होते [१]! एरवीसुद्धा आम पाकिस्तानी जनतेपेक्षा पाकव्याप्त काश्मिरी जनतेने जास्त प्रगती करून घेतलेली आहेच. जर काश्मीर-तंट्यात पाकिस्तान अडकले नसते तर ते जास्त सुरक्षित, स्थिर, लोकशाही राज्यपद्धतीने सरकार चालविणारे आणि सुधारलेले राष्ट्र बनले असते यात शंकाच नाही, असेही याकूबसाहेबांचे म्हणणे आहे!

फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात याकूबसाहेबांनी आयोजलेल्या चर्चासत्रांच्या शृंखलेत त्यांनी 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हा विषय निवडला होता. भरगच्च भरलेल्या सभागृहात घेतल्या गेलेल्या बलुचिस्तान आणि तालिबान, या दोन विषयांवरील या आधीच्या चर्चेनंतर तशाच तर्‍हेची आवेशपूर्ण चर्चा काश्मीरवरही होईल, अशी याकूबसाहेबांची अटकळ होती. या चर्चासत्राला आणखी रंगत यावी म्हणून आणि जास्तीचे प्रलोभन म्हणून त्यांनी एके काळी पाकिस्तानी लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आणि काश्मीरमधल्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आपल्या एका सहकार्‍यालाही आपले वैयक्तिक अनुभव आणि विचार सर्वांसमोर मांडण्यासाठी याकूबसाहेबांनी आमंत्रित केले होते. हे सहकारीही सध्या फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.

पण या चर्चासत्रात जे घडले ते बरेच काही नवे सांगून गेले. हा जो गट चर्चासत्राला आला होता त्याला सार्‍या पाकिस्तानचे प्रातिनिधित्व करणारा गट, असे काही म्हणता येणार नाही. पण हेही तितकेच खरे की पाकिस्तानच्या चारी मुख्य प्रांतांचे आणि गिलगिटचे [२] विद्यार्थी तिथे जमले होते. त्यात पुरुष होते आणि स्त्रियाही होत्या. बहुसंख्य ग्रामीण भागातले होते आणि समाजाच्या
सर्व सामाजिक आर्थिक स्तरातील विद्यार्थी तिथे जमले होते. चर्चासत्राची सुरुवात झाली तेव्हा खूप गर्दी होती पण या विषयात कुणाला फारसा रस नसावा असे याकूबसाहेबांना जाणवले.

पाकिस्तानच्या रूढ किंवा पारंपरिक पवित्र्याबाबत कुणाला काही बोलायचे आहे काय? असे याकूबसाहेबांनी तीन वेळा या विद्यार्थ्यांना विचारले, पण कुणीच तोंड उघडले नाही. आणखी जरा चुचकारल्यावर एका विद्यार्थ्याने एका उदासीन प्रयत्नात म्हटले, 'आपण काश्मीरला कधीच विसरता कामा नये. कारण आपले पाणी काश्मीरमधूनच वहात येते.' या एका प्रतिसादापलीकडे पाकिस्तानच्या पवित्र्याबाबत इतर कुठलाही उल्लेख कुणी केला नाही. कुणी भारतीयांच्या काश्मिरी जनतेवरच्या अत्याचारांचा उल्लेख केला नाही, कुणी फाळणीच्या वेळी न सुटलेल्या या समस्येचा उल्लेख केला नाही किंवा मुस्लिम बांधवांबद्दलही कुणी बोलला नाही. आधीच्या दोन चर्चासत्रांत बलुचिस्तान आणि तालिबान या दोन विषयांवर जशी आवेशपूर्ण चर्चा झाली त्या पार्श्वभूमीवर काश्मीर या विषयावरील चर्चा फारच कंटाळवाणी आणि जोशरहित झाली.

हळू-हळू विद्यार्थी सभेचे ठिकाण सोडून जाऊ लागले. जशी त्यांची संख्या घटू लागली तशी ही चर्चा याकूबसाहेबांना वेळेआधीच आवरती घ्यावी लागली! कारण कुणालाच या चर्चेत स्वारस्य वा आस्था दिसली नाही.

१९९० च्या दशकात वाढलेल्या याकूबसाहेबांचा पिंड तसा 'पाकिस्तान टीव्ही'वरच्या काश्मीरबद्दलच्या बातम्यांवर पोसलेला आहे, असे ते म्हणतात. म्हणून या चर्चासत्रात खूपच तावातावाने चर्चा होईल असे त्यांना वाटले होते. कदाचित हा वार्तालाप जर १९९२ साली आयोजला असता तर अगदी उत्कटपणे आणि कळकळीने या विषयावर चर्चा झाली असती. मग आता काय बदलले आहे?

याकूबसाहेबांच्या मते तीन गोष्टी बदलल्या आहेत!

पहिली गोष्ट ही, की पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा सरकारी प्रचाराद्वारा जिवंत ठेवला होता. भारतीय सैन्याच्या काश्मिरी जनतेवरील रोजच्या अत्याचाराच्या, जुलुमाच्या बातम्या-काही खर्‍या तर काही तिखट-मीठ लावून सांगितलेल्या-ऐकवून पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्ध भावनावेगाने भडकविणे हाच त्यामागचा मूळ हेतू असायचा. फक्त एकुलती एक दूरचित्रवाणी वाहिनी असल्यामुळे आणि जनतासुद्धा 'नियंत्रित' असल्यामुळे जनतेच्या मनात अशी भावना निर्माण करणे पाकिस्तानी सरकारला सोपे होते. सध्या प्रसारमाध्यमांना बरेच स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुधारल्यामुळे सत्य परिस्थिती आता लपून राहिलेली नाही, असे याकूबसाहेब म्हणतात.

दुसरी गोष्ट अशी, की अर्धी पाकिस्तानी जनता आता तिशीपेक्षा तरुण आहे आणि काश्मीरबरोबरच्या नात्यात त्यांना पहिल्यासारखी जवळीक वाटत नाही. काश्मीर समस्या पहिल्या पिढीच्या पाकिस्तान्यांना 'आपली' समस्या वाटत असे. पाकिस्तानच्या दुसर्‍या पिढीने त्या समस्येकडे एक 'वाडवडिलांकडून वारसाहक्काने आलेली' समस्या म्हणून पाहिले. पाकिस्तानच्या तिसर्‍या पिढीचे काश्मीरशी फारसे संबंध, फारशी जवळीक राहिलेली नाही. १९४७ साली पाकिस्तान कसर लागलेल्या आपल्या राष्ट्राचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सध्याची सरहद्द शाबूत ठेवणेच किती अवघड झालेले आहे, याची आताच्या तरुण पाकिस्तान्यांना चांगली कल्पना आहे. एक धर्म सोडला तर ज्या भागाचा आपल्या राष्ट्राशी इतर काहीच संबंध उरला नाही, त्या भागाचे आपल्या देशात विलीनीकरण करणे म्हणजे इजिप्तचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासारखे आहे असेच आताच्या तरुण पाकिस्तान्यांना वाटते. आजच्या तरुण पाकिस्तानी पिढीला एकाद्या उदात्त धर्माधिष्ठित कल्पनेच्या आहारी जाण्यात कुठलेच स्वारस्य उरलेले नाही. आपली प्रगती आणि आपले सुख एवढ्याच गोष्टींबाबत तो चिंतित आहे, ही या चर्चासत्राद्वारे बाहेर आलेली तिसरी गोष्ट. आजच्या पाकिस्तानी व्यक्तीला भारताविरुद्ध भांडखोर, आक्रमक प्रवृत्ती ठेवण्यापेक्षा भारतात एकादी चांगली नोकरी किंवा चांगले काम मिळविण्यात त्याला जास्त स्वारस्य उरले आहे, असेच याकूबसाहेबांना वाटते[३].

पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या उदासीनतेचे उत्तम उदाहरण सापडते ते दिफा-ए-पाकिस्तान परिषदेत! या परिषदेला प्रत्येक विषयावर टोकाची विचारसरणी असलेल्या वृद्ध पाकिस्तान्यांच्या एका विभिन्न आणि विजोड अशा टोळक्याचे स्वरूप आले आहे. ही परिषद आता दिवसेंदिवस असंबद्ध आणि कालबाह्य झालेल्या जनतेच्या जुन्या समस्या कशाबशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची मरणासन्न संघटना उरली आहे. जर पाकिस्तानी जनतेला काश्मीरबाबत खरोखर इतकी काळजी आणि आस्था असती, तर या परिषदेला मेळावे जमवून भारताचा तिरस्कार करण्याची आठवण सतत करून देण्याची आवश्यकताच वाटली नसती!

पाकिस्तान आता आपल्या भूतकाळाशी फारकत घेऊ लागला आहे आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आता एक फलनिष्पत्तीकडे आणि विकासाकडे डोळसपणे पहाणारे, परस्पर सहकारावर भर देणारे आणि शेजारी राष्ट्रांशी शांततेने, सौहार्द्राने रहाणारे राष्ट्र बनू इच्छित आहे. म्हणूनच काश्मीर समस्येवर दोन्ही बाजूंचा फायदा होईल असा समंजस तोडगा काढून आणि जुना अव्यवहारी आणि आदर्शवादी पवित्रा सोडून तसा करार करण्याची संधी घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असे याकूबसाहेब शेवटी सांगतात.

मूळ लेख वाचा या दुव्यावर -

http://tribune.com.pk/story/477777/maybe-we-have-forgotten-kashmir/

टिपा -

[१] Time to forget Kashmir या लेखात याकूबसाहेब यांनी फक्त मनमोहन सिंग यांच्या 'पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भर न देता आपल्या अंतर्गत समस्यांकडे जास्त निकडीने लक्ष द्यायला हवे', या विधानाचाच उल्लेख करून न थांबता, त्यांनी मौलाना फजलूर रहमान यांच्या पाकिस्तानच्या 'जमीयत उलेमा इस्लाम (फजल गट) या विरोधी पक्षाचे नेते मौलाना फज़ल उर रहमान 'अर्थातच पाकिस्तानला राजनैतिक तोडगा हवा आहे. पण परिस्थिती खूपच बदललेली आहे. आता 'पाकिस्तान कसे वाचवायचे' ही समस्या मोठी झाली असून त्यामुळे काश्मीर जिंकून घेण्याची संकल्पना मागे पडली आहे', या विधानाचाही उल्लेख केला आहे. याकूबसाहेब पुढे म्हणतात, की असे न परवडणारे भांडण करण्याचा मार्ग पाकिस्तानने निवडला नसता तर पाकिस्तानी लष्कर आपल्याच मुलकी सरकारला चार वेळा बरखास्त करण्याइतके मजबूत झालेच नसते. '१९८९पासून प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थिती असली तरी भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरने साक्षरता, आर्थिक प्रगती आणि दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत पाकिस्तानपेक्षाही जास्त प्रगती केलेली आहे. मग ते कशाला पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छितील? पाकिस्तानकडे त्यांना देण्यासारखे काय आहे?' असाही प्रश्न याकूबसाहेब या लेखात विचारतात!

पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते असेही ते लिहितात.

शेवटी ते म्हणतात, की जोवर पाकिस्तान आपले घर सावरत नाही, तोपर्यंत त्याने भारताच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याचे सोनेरी स्वप्न सोडून दिले पाहिजे. कारण जिथे आपल्या ताब्यात असलेल्या कित्येक भागावर आपल्या सरकारचे नियंत्रण नाहीं आणि जिथे पाकिस्तानी जनता आर्थिक आणि सुरक्षेसंबंधीच्या काळजीत व्यग्र आहे तिथे गेली सहा दशके प्रगतीच्या वेगळ्याच कक्षेत असलेला आणखी एक मोठा मुलुख काबीज करण्याची आशा बाळगणे अगदीच हास्यास्पद आहे.

शेवटी ते म्हणतात, की काश्मीरबाबतचा आपला आक्रमक पवित्रा आपण केवळ काश्मीरमधील दुःख भोगणार्‍या मुस्लिम बांधवांसाठीच नाहीं तर भारतामध्ये असेच दुःख भोगणार्‍या १४ कोटी मुस्लिम बांधवांच्या हितासाठी सोडला पाहिजे कारण जोवर पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण आक्रमक आणि प्रतिकूल आहे तोपर्यंत हिंदू बहुसंख्य भारतात या मुस्लिमांकडे संशयी नजरेनेच पाहिले जाईल.

४ जुलै २०११ रोजी प्रकाशित झालेला हा संपूर्ण लेख वाचा या दुव्यावर:

http://tribune.com.pk/story/202209/time-to-forget-kashmir/

[२] गिलगिट हा पूर्वीच्या काश्मीर राज्याचा भाग होता व १९४८ सालच्या युद्धबंदीनंतर या काश्मीर संस्थानाचा गिलगिट-बाल्टिस्तानसह ४० टक्के भाग पाकिस्तानकडे राहिला तर जम्मू आणि लडखसह ६० टक्के भारताकडे. (http://en.wikipedia.org/wiki/Gilgit)

[३] आज भारतात बॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणावर पाकिस्तानी कलाकार घुसले आहेत तिकडे पहाता हे खरेच वाटते.

मूळ लेख ७६० शब्दांचा असून त्याला आलेल्या १०४ प्रतिसादांतील शब्दसंख्या आहे ७००० पेक्षा जास्त आहे. सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या वाचकांनी-भारतीय आणि पाकिस्तानी-प्रतिसाद दिलेले आहेत. अनेक वाचकांनी टोपणनावाने प्रतिसाद लिहिलेले असून, त्यात भारतीय मुस्लिम वाचकांचा समावेश असल्यामुळे सरहद्दीच्या कुठल्या बाजूच्या वाचकाने कुठला प्रतिसाद दिला आहे हे ओळखणे कठीण होते. अपेक्षेनुसार कांहीं प्रतिसाद अगदी ’कट्टर’ असले तरी बरेच समंजसही आहेत. पण कुणी कट्टर लिहिले आहेत आणि कुणी समंजस हे वरील कारणांमुळे कठीण काम झाले आहे. लेखाइतकेच हे प्रतिसादसुद्धा वाचनीय आहेत. दुवा उघडून सर्वांनी जरूर वाचावेत.

माझेही ४ प्रतिसाद असून त्यातून माझी या लेखाबद्दलची मते स्पष्ट होतात. त्यातला पहिला आहे 'Hats off to the courage of the author Yaqoob Khan for writing such an article! The Kashmir issue is being kept alive only by Pakistani Armed Forces lest its very ‘raison d’etre’ vanishes & they can't continue enjoying good things their present Military job offers them."

दुसरा प्रतिसाद होता, 'Whatever be the magic, but whenever one writes an article discussing 'Kashmir' on both sides of the border between India & Pakistan, one gets maximum responses! I think both the countries are obsessed by Kashmir. Does Kashmir deserve so much obsession? NO!

माझा तिसरा प्रतिसाद विजय कौल या काश्मिरी हिंदू वाचकाच्या प्रतिसादाला होता. 'Kashmir is not a local aberration, it is as global as is Palestine, Chechnya, or for that matter the rising number of festering sores in the name of the game called Jihad.

Let’s make no mistake. Kashmiris continue to be brainwashed and have landed themselves in a hot soup of jihadi imbroglio, after ethnically cleansing their co-kashmiris who did not convert over centuries into Islam.'

या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता. त्यात मी लिहिले होते, 'Very well said, Mr Kaul, yourself a Kashmiri, probably displaced from his own homeland ethnical cleansed by fellow Kashmiris while Indian government just stood by watching! What a pity!'

आणि शेवटचा प्रतिसाद होता झीशान नावाच्या एका वाचकाला उत्तर म्हणून. या वाचकाला सर्वात जास्त लोकांनी लक्ष्य केलेले दिसले. माझ्या प्रति-उत्तरात मी लिहिले होते, "@Zeeshan: Please don’t get emotional!

(1) Just see how many Pakistani artists are working in so-called Bollywood and enjoying prosperity. Also don’t forget that Indians support their talent though they are not Indians.

(2) To your rhetorical question 'And, where do you get the idea of 'improvement of the situation in Indian-Occupied Kashmir'? From Kashmiris or Indians?" I say, "My dear friend, Kashmiris participated overwhelmingly in most of the elections held in J&K voted to a level of 80% turn out trashing the 'Boycott' calls by separatists leaders. What does it tell you?

(3) If Kashmiris are to be given an option of 'Independence', it must be given to every State in India and Pakistan from Kashmir to the North to Tamilnadu to the South & Balochistan to the West to Assam to the East! I am sure both India & Pakistan don’t want to test this option! After all Pakistan has not yet given 'independence' to what it wrongly calls as 'Azad' Kashmir!

Mr Yaqooob Khan Bangash has done a yeoman's service by writing this article and it is in Pakistan’s interest to rea d & study it dispassionately!

पाकिस्तानला आत्मनिरीक्षण-आत्मपरीक्षण करून भारताशी मैत्री केली पाहिजे असे माझे मत पूर्वीपासून आहे. हा (आणि असेच आयाज अमीर, कामरान शफी यांचे) लेख वाचल्यावर ते आणखीच दृढ झाले!

सुनील's picture

29 Jan 2013 - 9:54 pm | सुनील

अनुवाद दिल्याबद्दल धन्यवाद.

तसा मूळ लेखाचा दुवा मीच गेल्या महिन्यात इथे दिला होता, ते आठवले.

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2013 - 1:18 pm | पुण्याचे वटवाघूळ

या माहितीबद्दल शेकडो धन्यवाद काळेकाका.

बाकी कुठल्या धाग्याला नाही तरी या धाग्याला लागलेली वाळवी लवकरात लवकर दूर केली जावी अशी आग्रही मागणी संपादक मंडळाला करत आहे.हा मिसळपाववरील सर्वात लोकप्रिय धागा आहे आणि त्यातील एकेक प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आहेत.विशेषतः थत्तेचाचा,सुनील आणि इतरांचे.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

सुनील-जी, या लेखाच्या शेवटी मी माझी मतेही मांडली आहेत. खरे तर मी जेंव्हां या लेखात वाचले कीं आजच्या विशी-तिशीतल्या पाकिस्तानी तरुणांना काश्मीर प्रश्नाचा फारसा ध्यास उरलेला नाहीं तेंव्हां माझ्या मनात एक विचार येऊन गेला की आजच्या विशी-तिशीतल्या भारतीय तरुणांना काश्मीर प्रश्नाबाबत पहिल्यासारखी आस्था आहे काय?
दुसरा एक प्रश्न मनात डोकावून गेला कीं आपल्याकडे जसे काश्मीरच्या बाबतीत भारताचे चुकले असे मानणारे आणि त्याबाबत आपल्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लावून घेणारे लोक आहेत तसे पाकिस्तानातही असावेत. म्हणजे ते राष्ट्रही वाटले होते तितके एकसंध (monolithic) नाहीं.
खरे तर आपल्यातल्या दिलजमाईची पाकिस्तानी लष्कराला भलतीच धास्ती वाटत असावी. जरा कुठे शांततेच्या मार्गाने सुरळीत वाटचाल सुरू होते तोवर कधी कारगिलचे दुस्साहस घडवून आणले जाते, कधी २६/११सारखी भयानक घटना आपल्यावर लादली जाते तर कधी आपल्या सैनिकांच्या देहाची विटंबना केली जाते व हे पाकिस्तानी लष्कर (मुलकी सरकारला न सांगता) मुद्दाम करवून आणत असावे. आपणही त्यांच्या या कारस्थानाला बळी पडून सार्‍या चर्चा थांबवतो. असे झाले की पाकिस्तानी लष्करशहा आनंदाने "दे टाळी" करतानाचे दृष्य माझ्या डोळ्यासमोर येऊन जाते. नुकताच ज. शहीद (कीं शाहीद?) अजीज यांचा कारगिलवरचा लेख वाचला त्यातही लष्कराचा चोंबडेपणा स्पष्टपणे लिहिला आहे. त्यातही "नवाज शरीफ हे कारगिलबद्दल पूर्णपणे अंधारात नव्हते" असा "नरो वा कुंजरो वा" थाटाचा शेरा आहेच!
थोडक्यात भारत सरकारने मुलकी सरकारला भक्कम पाठिंबा देत लष्कराला "आप लोग हमसे बात मत करो| आपके साहब लोगोंको (मुलकी सरकार) भेजो|" असा जबाब द्यायला हवा!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 10:57 am | बिपिन कार्यकर्ते

इंचा इंचाने माघार घेत असताना, हा धागा आल्यापासून एकूण किती इंच माघार घेतल्या गेली आहे हे कळेल का? की आपण अजून आहो तिथेच आहोत? तसं असेल तर माघार घेत नाहीये हे सिद्ध होईल... नाही तर नक्की किती मागे आलोय हे तरी सांगा! ;)

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 11:07 am | नितिन थत्ते

तुमच्या सारखे नतद्रष्ट विचारजंत असेच प्रश्न विचारत राहणार.... जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2013 - 11:18 am | बिपिन कार्यकर्ते

अहो तुमच्यासारखे मित्र असल्यावर मूळात आम्हाला सुखाने झोपच कशी येईल... जाग यायचा प्रश्न नंतरचा!

बिपिन-जी, हा दुवा उघडून मजकूर वाचल्यास आपण माघार घेत नसून पुढे सरकत आहोत हे लक्षात येईल! जय हिंद!! http://timesofindia.indiatimes.com/india/Last-two-years-have-been-relati...
थोडी-फार जनजागृती/सरकार जागृती होत असावी?

सुधीर काळे's picture

30 Jan 2013 - 11:06 am | सुधीर काळे

बिपिन-जी, (माझ्यासारख्या) इतरांच्या लेखांमुळे माघार थांबून थोडीशी प्रगतीच झाली असावी अशी शंका येते. याचा खूप आनंदही होतो आहे! आपल्याला काय वाटते?

सुधीर काळे's picture

30 Jan 2013 - 11:06 am | सुधीर काळे

बिपिन-जी, (माझ्यासारख्या) इतरांच्या लेखांमुळे माघार थांबून थोडीशी प्रगतीच झाली असावी अशी शंका येते. याचा खूप आनंदही होतो आहे! आपल्याला काय वाटते?

नितिन थत्ते's picture

30 Jan 2013 - 11:09 am | नितिन थत्ते

मिपावर लेख वाचून आपल्या सरकारला सुबुद्धी सुचली हे कळल्याने परम संतोष जाहला.

सुधीर काळे's picture

30 Jan 2013 - 12:55 pm | सुधीर काळे

'मिपा'वरील लेखांमुळे नाहीं हो थत्तेसाहेब, तर काश्मीरवरील लेखांमुळे! आणि माझ्या लेखामुळे नव्हे तर इतरांच्या तत्सम लेखांमुळे! (आपुन किस झाडकी पत्ती???)

राही's picture

30 Jan 2013 - 12:00 pm | राही

या धाग्यातले अथवा धाग्याचे कश्मीर याबाबत कोणतेही मत मांडायचे नसले तरी आपला अनुवद उत्कृष्ट उतरला आहे हे मात्र आवर्जून सांगावेसे वाटते.आपल्या एरवीच्या लिखाणातलीदेखील मराठी भाषा सौष्ठवपूर्ण असते.आपले वृत्तपत्रीय लिखाण तुरळक वाचले आहे,तेही आवडले होते.

सुधीर काळे's picture

30 Jan 2013 - 4:43 pm | सुधीर काळे

राहीसाहेब (कीं राहीमॅडम),
धन्यवाद!

परवा टीव्हीवर बातम्यात सांगितले होते कि पाकिस्तान काश्मिरात आण्विक हल्ला करणार आहे. त्यामुळे आण्विक हल्ला झालेनतंर लोकानी काय काय करावे ह्याबद्दल काश्मिर पोलीसांनी जनतेला स्थानिक वृत्तपत्रात जाहीरात देवुन मार्गदर्शन केले आहे. बंकर खोदायला देखिल लोकाना सांगितले आहे. ह्याबाबत इतर कोणत्याही पेपरात छापुन आले नाही. ह्यात काही तथ्य आहे काय?

नंदन's picture

30 Jan 2013 - 1:55 pm | नंदन

फारच छान.

शिलेदार's picture

30 Jan 2013 - 4:24 pm | शिलेदार

मला वाटत की तुमी एका नजुक प्रश्नावर प्रकाश टाकताय. एक सामन्य नागरिक म्हणून मला अस वाटत की तुम्ही सादर केलेल्या अशा लेखानमधुनच आपण हे पोहोचवू शकतो. मी तुमी पाठवलेली लिन्क पण पाहिली.
आभारी आहोत

अनुराधा१९८०'s picture

31 Jan 2013 - 11:43 am | अनुराधा१९८०

काश्मीर आणि nefa राज्य भारतानी जबरदस्ती नी दाबुन ठेवली आहेत. तिथे सार्वमत घ्यावे आणि तिथल्या जनतेने ठरवावे ह्या देशात राहायचे का नाही ते. बिचार्‍या सैनिकांचे प्राण मात्र फुकटचे जात आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

31 Jan 2013 - 12:15 pm | श्री गावसेना प्रमुख

काश्मीर आणि nefa राज्य भारतानी जबरदस्ती नी दाबुन ठेवली आहेत.
1उपरोध की दुसरे काय काही कळेना

सुधीर काळे's picture

31 Jan 2013 - 12:17 pm | सुधीर काळे

अनुराधा मॅडम, काश्मीरच्या बाबतीत भारताचे चुकलेच असे मानणारे आणि त्याबाबत आपल्या सदसद्विवेकबुद्धीला सदैव टोचणी लावून घेणारे लोक फक्त भारतातच आहेत असा माझा समज होता पण अलीकडे पाकिस्तानी प्रसारमाध्यमातील बरेच लेख वाचल्यावर असे लोक पाकिस्तानातही आहेत हे कळले व अंमळ बरे वाटले!
पण शेवटी व्यक्ती तितकी मते हेच खरे!

अनुराधा१९८०'s picture

31 Jan 2013 - 12:43 pm | अनुराधा१९८०

सदसद्विवेकबुद्धीला सदैव टोचणी वगैरे काही नाही. आपण इतिहासाकडे चस्मा लावुन बघु नये म्हणुन मी जरा टोकाची वाक्य लिहिली होती.

भारतानी half heartedly जे केले काश्मिर आणि nefa राज्यात त्यानी हे issues निर्माण झाले आहेत.

एकतर भारतानी ही राज्य ताब्यात ठेवली तेंव्हा population transfer पण करायला हवी होती. काश्मीर जर ताब्यात ठेवायचे असेल तर तिथे हिन्दु , शिख ८०% च्या वर असणे जरुरीचे आहे, नाहीतर हा प्रश्न कधिही सुटणार नाही.

आणि जर population transfer सारखी टोकाची भुमिका घ्यायची नसेल तर काश्मीर भारतात ( फक्त नावापुरते ) नकाशात दाखवण्यापुरते असण्याला काही अर्थ नाही. सोडुन द्यावे, कमीत कमी खर्च तरी वाचेल.

जे करायचे ते ठामपणे करावे.

हैद्राबाद आणि जुनागढ हिंदु बहुलतेमुळे भारतात टिकुन राहीली. इथे पण काश्मीरसारखी मुस्लिम लोकसंख्या असती तर भारताच्या मध्यातच एक काश्मीर तयार झाले असते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

31 Jan 2013 - 12:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

याला म्हणतात सगळे रामायण ऐकून झाल्यानंतर रामाची सीता कोण हे विचारणे :)

कापूसकोन्ड्या's picture

31 Jan 2013 - 12:08 pm | कापूसकोन्ड्या

शिळ्या कढीला उत आणला जातो
आणि शिळ्या जिलब्याना वाढीव पाक ओतला जातो

सुबोध खरे's picture

31 Jan 2013 - 12:41 pm | सुबोध खरे

अनुराधा ताई NEFA म्हणजे कुठ्लेहो राज्य ? आम्ही आमच्या भूगोलात असे राज्य शिकल्याचे आठवत नाही पुर्वांचलात सात राज्ये असल्याचे आम्हाला वाटते (आसाम , मेघालय , त्रिपुरा ,मणिपूर , नागा प्रदेश अरुणाचल,सिक्कीम आणि मिझोराम) त्यात काही फुटीर लोक सोडले तर जनमत मुळीच भारतापासून वेगळे होण्याचे नाही असे आम्ही वाचल्यासारखे वाटते.
काश्मीर मध्ये पण तीन भाग आहेत (जम्मू , काश्मीर आणि लडाख) आज तेथे सार्वमत घेतले तरी जम्मू आणि लदाख मिळून सार्वमत भारताच्या बाजूने होईल असे आम्हाला वाटते
तज्ञ लोकांनी यावर मार्गदर्शन करावे.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 12:20 pm | अनुराधा१९८०

काश्मीर मध्ये पण तीन भाग आहेत (जम्मू , काश्मीर आणि लडाख) आज तेथे सार्वमत घेतले तरी जम्मू आणि लदाख मिळून सार्वमत भारताच्या बाजूने होईल असे आम्हाला वाटते>> होऊ दे की जे काय होयचे आहे ते. जम्मू ला वाटले भारतात रहावे तर रहातिल भारतात, काश्मीर ला वाटले स्वतंत्र व्हावे किंवा पाकिस्तानात जावे तर त्यांचे ते ठरवतील.

मी आधी जसे म्हणले तसे, भारतानी काय तो एकच पण ठाम पवित्रा घ्यावा. एकतर तिथे हिंदु ना स्थापित करावे जेणेकरुन ८०% लोकसंख्य हिंदु , शीखांची होईल. कींवा सोडुन द्यावे.

चीन नी तिबेट मधे population transfer केली , आता तिबेट मधे सार्वमत घेतले तर ते चीन च्या बाजुनीच जाईल

श्रीरंग_जोशी's picture

1 Feb 2013 - 7:19 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या अडीच दशकांत श्रीनगर व भोवतालच्या जिल्ह्यांमधील लक्षावधी काश्मिरी पंडितांना काश्मीरबाहेर हुसकावण्यात आले. हजारोंना जीवे मारण्यात आले. त्यांच्या मतदानाशिवाय सार्वमताला अर्थ काय राहणार?

बहुतांश काश्मिरींना आता आहे त्यापेक्षाही अधिक स्वायत्तता हवी आहे त्यामुळे ३७० ने मिळालेला विशेषाधिकार काढून घेणे म्हणजे आत्मघातकीपणा होईल. सध्या जे सुरू आहे तेच पुढे चालू ठेवणे हा उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय आहे. भारताच्या समृद्धीची व मोकळ्या वातावरणाची एकदा चटक लागली की काश्मीरमधील तरुण पिढी तेथील कट्टरवाद्यांना फशी पडणार नाही.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 12:24 pm | अनुराधा१९८०

पुर्वांचलात सात राज्ये असल्याचे आम्हाला वाटते (आसाम , मेघालय , त्रिपुरा ,मणिपूर , नागा प्रदेश अरुणाचल,सिक्कीम आणि मिझोराम) त्यात काही फुटीर लोक सोडले तर जनमत मुळीच भारतापासून वेगळे होण्याचे नाही असे आम्ही वाचल्यासारखे वाटते.>> हे तुम्हाला कोणी सांगीतले? कधी असे जनमत झाले आहे का? तुमचा हा भाबडा समज आहे.

अहो nefa states सोडा, जर बरोबर पद्धतीने प्रचार केला आणि चांगला नेता मिळाला तर तामिलनाडु किंवा अगदी गुजराथ, पंजाब सुद्धा भारतापासुन वेगळे होण्याचा कॉल देतील.

पिंपातला उंदीर's picture

1 Feb 2013 - 3:54 pm | पिंपातला उंदीर

अरे बापरे आता कसे होणार आपल्या देशाचे?

सुधीर काळे's picture

1 Feb 2013 - 4:48 pm | सुधीर काळे

अनुराधामॅडम, चार मुद्दे विचारात घ्या: (१) आपल्या देशात काय होईल कुणास ठाऊक, पण कॅनडात काय झाले हे पहाणे मनोरंजक ठरेल. फ्रेंच भाषिक क्यूबेक प्रांत कॅनडातून बाहेर पडायची मागणी जोरात करत होता. शेवटी या कटकटीला कंटाळून कॅनेडियन सरकारने जेंव्हां सार्वमत घेतले तेंव्हा क्यूबेकने संघराज्यात रहाण्याच्या बाजूने कौल देऊन "स्वतंत्र क्यूबेक"वाल्याना धक्का दिला. असे भारतातही होऊ शकते. पण विषाची परिक्षा कुणी घेईल काय? (२) तामिळनाडू, पंजाब, इत्यादी राज्ये फुटून वेगळी होण्याच्या धास्तीची भारताला वाटणारी तीव्रता "१" धरली तर पाकिस्तानला अशीच त्यांची राज्ये फुटून वेगळी होण्याच्या धास्तीची तीव्रता "५" असू शकते! (३) काश्मीरची जनता आज जरी "अललडुर्र" करत असली तरी जर सार्वमत कधी घेतलेच तर आजादीच्या बाजूने मते देईल असे मला तरी वाटत नाहीं कारण असे स्वातंत्र्य अल्पायुषी ठरण्याची आणि पाकिस्तानने त्यांना पुन्हा गुलाम बनविण्याची शक्यता खूप आहे. (४) पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मिरींचे सार्वमत कुठे घेतले आहे?

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 9:39 pm | अनुराधा१९८०

तुमच्या प्रत्येक मुद्द्या नुसार उत्तर

१. कॅनडा मधे क्युबेक नी रहण्याचा निर्णय घेतला पण तो ५१:४९ च्या फरकानी. प्रथमतः कॅनडा मधे असे होऊ शकते कारण तो एक civilised समाज आहे. भारतात असे सार्वमत घेतले तर तुम्हाला ते विषाची परिक्षा का वाटावी?
स्वतंत्र गुजराथ किंवा तामिळनाडु अत्यंत चांगली प्रगती करु शकतो स्वतंत्र देश म्हणुन.

२. तुम्ही पाकिस्तान ची फार काळजी करता. पाक कशाला सार्वमत घेईल त्यांच्या राज्यांमधे आणि त्याचा मी म्हणाले त्याच्याशी संबंध काय?
मी असे कुठे म्हणले नाही की भारतानी गुजराथ मधे सार्वमत घ्यावे,मी फक्त शक्यता वर्तवली कारण मिपा वरच्या लोकांना भारत फार एकसंध राष्ट्र आहे असे वाटते असे दिसले. मला फक्त undercurrents ची जाणिव करुन द्यायची होती

३. काश्मीर ची जनता काय मत देईल हे काही सांगता येत नाही. त्यांनी मुफ्ती च्या पक्षाला निवडुन दिलेच ना, तो तर फुटीरता वादी आहे. आणि समजा काश्मीर नी वेगळे होयचे ठरवले तर बाकीच्या राज्यांना वाईट वाटायचे कारण काय? खरे तर खर्च कमी होईल. कदाचित आपला आयकर कमी होईल.

४. पाकीस्तान नी सार्वमत घेतले नाही त्यांच्या काश्मीर मधे, पण त्यांनी लाड ही चालवले नाहीत तिथल्या लोकांचे. मुख्य म्हणजे पाकीस्तान ही तुमचा benchmark आहे का? तसे असले तर प्रश्न च नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Feb 2013 - 9:51 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूकीचे निकाल लागल्यावर दक्षिणेकडील ११ राज्यांमध्ये Secession याचिका दाखल करण्यात आल्या. अन असे पूर्वीही बरेचदा घडले आहे. काही असंतुष्ट घटक असे करत असतात म्हणून एकूण समाजाचेही तसे मत आहे असे नसते.

विकी

क्लिंटन's picture

1 Feb 2013 - 9:54 pm | क्लिंटन

सहमत.

काश्मीर गेले तर काय फरक पडतो अशा प्रवृत्तीला मिपावर अनुल्लेखाने मारणे योग्य.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 11:43 pm | अनुराधा१९८०

तुम्हाला नेट वर काहीतरी टंकायला काय होतय, तुमचे कोणी जवळचे सीमेवर असते तर तुमचे मत बदलले असते. मला सांगायचे नव्हते पण आता सांगते. माझा सख्खा भाऊ आर्मी मधे आहे. he is posted in punchh sector currently. रोज त्याचा रात्री फोन आला नाहीतर घरी कोणाला जेवण जात नाही, की झोप लागत नाही.
सैनिकांना विचारा युद्ध हवे आहे का ते. युद्ध फक्त राजकारण्यांना नाहीतर सीमेपासुन १००० मैला वरुन देशभक्ती दाखवणार्‍यांना हवे असते.
माझा भाऊ आहे म्हणुन च मला कल्पना आहे सैन्याचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे काय हाल असतात ते. आम्हाला कोणाला नको आहे युद्ध आणि युद्धाची परिस्थिती सुद्धा.

त्रास करुन घ्यायला कोणी सांगितले होते? अहो बाई आजकाल सैन्यात नोकरी मिळत नाही. भरतीच्या ठिकाणी काय गर्दी होते ते डोळ्याने पाहुन घ्या.सैन्यात भरती झाले कि हमखास काहीतरी होणार असे नसते.

कपिलमुनी's picture

21 Feb 2013 - 4:12 am | कपिलमुनी

>>त्रास करुन घ्यायला कोणी सांगितले होते?

कोणीतरी त्रास करून घेतो म्हणून आपण सुखासुखी टंकन करत आहात !!
कमीत कमी याची लाज तरी बाळगा !!
भरतीच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहून काय ठरवता आहात? त्यामधला कोणीही सीलेक्ट झाला तरी त्याच्या घरच्यांना काळजी वाटणारच की !!

वेताळ's picture

21 Feb 2013 - 5:24 pm | वेताळ

सैन्यात नोकरी करणेने ते देशातील इतर लोकांवर उपकार करतात अशी भावना असे त्यांनीसैन्यात नोकरी न केलेली उत्तम. तर माझ्या माहितीप्रमाणे सैन्यात भरती होणार्या लोकाना चांगला पगार व इतर भत्ते दिले जातात. नोकरीतील करार संपल्यानंतर देखिल त्याना पेन्शन व इतर सोयी पुरवल्या जातात.त्यामुळे सैन्यात लोक नोकरी व त्या सोयी मिळवण्यासाठी जातात.त्यात देशसेवेची देखिल भावना असते. ज्याला भिती वाटते किंवा ज्याच्या घरचे लोककाळजीने त्रस्त होतात अश्यानी फक्त इतर देशातील लोकांवर उपकार करतो म्हणुन सैन्यात नोकरी करणेचे काहीएक कारण नाही.अहो आपली जागा त्यानी इतर लोकाना रिकामी करुन द्यावी.तेवढीच बेरोजगारी कमी होईल.अजुन माझ्या बघण्यात विनापगार व कोणतीही सुखसोयी न स्विकारणार सैन्यातील माणुस बघण्यात आला नाही

आनन्दिता's picture

12 Feb 2013 - 10:43 am | आनन्दिता

अनुराधा ताई,
माझा भाऊ देखील सैन्यातच आहेत. उच्चशिक्षित असुनही त्याने स्वतःच्या मर्जीने करियर म्हणुन ही वाट स्विकारली आहे.. गेली अनेक वर्षे तो लडाख, थॉइस येथे काम करतोय. इतक्या वर्षात एकदाही कशाही बद्दल दुखः अथवा तक्रार व्यक्त केली नाहीय. आमच्या घरातली ही दुसरी पिढी सैन्यात कार्यरत आहे. माझे काका ७१ च्या युद्धात लढले होते.. ते युद्ध म्हणजे त्यांच्या आयुष्यातले असे क्षण आहेत ज्यात सगळं आयुष्याचं सार्थक झालंय असं ते आजही अभिमानाने सांगतात. त्यांनी घरातल्या कोणाही मुलाला सैन्यात जाण्यासाठी कधीही विरोध केला नाही. उलट प्रोत्साहन च दिलंय.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 11:36 pm | अनुराधा१९८०

अमेरिकेत कुठल्याही राज्याला युनिअन मधुन बाहेर पडायची मुभा आहे. तरी पण तिथे कोणी बाहेर पडत नाही. हे देश खरा एकसंध असण्याचे उदाहरण आहे.

मॅडम,
(१) "पाक कशाला सार्वमत घेईल त्यांच्या राज्यांमधे?" या वाक्यात सर्व आले. केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम नागरिक आहेत म्हणून ते तिथे सुखी असणारच आणि त्यांना पाकिस्तानमध्येच रहायचे आहे असे बर्‍याच लोकांना वाटत असेल, पण ते तसे असेलच असे नाहीं. आपल्याला "सार्वमत घ्या" असे म्हणणार्‍या पाकिस्तानने आपल्या ताब्यात असलेल्या भागात सार्वमत घेतलेले नाहीं. आधी ते घेऊन दाखवावे आणि मग आपल्याला “सार्वमत घ्या” असा आग्रह धरावा, तोपर्यंत त्यांना आपल्याला असे सांगण्याचा हक्कच नाही असे मला वाटते!! त्यांनाही त्यांच्या मुलुखातले काश्मिरी आजादीच्या बाजूने मत देतील आणि त्यांची पंचाईत करतील अशी भीती आहेच. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले या विषयावरील माझे पत्र या दुव्यावर जरूर वाचा: http://dawn.com/2011/08/11/ties-with-india-pakistans-option/
(२) आपण लाड फक्त काश्मिरी लोकांचेच करतो असे नाहीं तर सगळ्याच अल्पसंख्यांकांचे करतो! माझ्या मते हेही चूकच आहे पण त्यात “म्या पामर” किंवा तुम्हीही काय करणार? पाकिस्तान त्याच्या अल्पसंख्यांकांचे लाड करत नाहीं तसेच त्याच्या काश्मिरींचेही लाड करत नाहीं. आपण सरसकट सगळ्या अल्पसंख्यांकांचे कमी-अधीक लाड करतो मग काश्मिरींचे का करू नयेत? "विश्वरूपम" या सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत जो घोळ घातला गेला (आणि जातोय्) त्यात हेच पुन्हा दिसले ना?
(३) मी पाकिस्तानची मुळीच काळजी करत नाहीं पण भारताची नक्कीच करतो, खास करून आपल्या सैनिकांची. आज अण्वस्त्रधारी पाकिस्तानशी लढणे भारतालाच काय पण चीन-अमेरिकेलाही शक्य नाहीं. म्हणूनच सन्मानीय मैत्री ठेवली पाहिजे हे माझे मत आहे. पाकिस्तानची आजची खस्ता हालत पहाता ते आज जास्त सहजपणे शक्य आहे. पण याचा अर्थ कशीही तडजोड करायच्या बाजूने कुठलाच भारतीय नसेल. (पोलाद गरम आहे तोवर ठोकले पाहिजे.)
(४) "कॅनडा मधे क्युबेक नी रहण्याचा निर्णय घेतला पण तो ५१:४९ च्या फरकानी" हे खरेच आहे. पण त्यानंतर तिथे शांती आहे. आपल्याकडेही गोव्याबाबत असेच सार्वमत घेतले गेले व तिथेही शांतताच आहे. किती मतांनी विजय झाला याला काय महत्व? कॅनडा संघराज्याचा "विजय झाला" या पेक्षा त्याचा “पराजय झाला नाहीं” हे महत्वाचे!
(५) स्वतंत्र रहायचा विकल्प होता हे माझ्या वाचनात आलेले नाहीं. त्याबद्दलच्या माहितीची तुमच्याकडून आणि “मन१”साहेबांच्याकडून मी वाट पहात आहे. ती माझ्या वाचनात आल्यास मी यावर लिहेन!
(६) शेवटी मुद्दा उरतो भारताने अमेरिकेसारखे एकजूट असलेले "संघराज्य" म्हणून रहायचे कीं युरोपसारखे कायम आपापसात लढणारी छोटी-छोटी राष्ट्रे म्हणून रहायचे! काश्मीरला जर आजादीचा विकल्प द्यायचा असेल तर तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व बलुचिस्तानपासून आसामपर्यंतच्या सर्व राज्यांना भारताने व पाकिस्तानने दिला पाहिजे अथवा कुणालाच तो हक्क देऊ नये असे मला वाटते. उगीच स्वतःच्या मनाला सदसद्विवेकबुद्धीची टोचणी लावून घेऊ नये आणि अशा फुटू पहाणार्‍या राज्यांचा बाऊ करू नये. असेच करायचे असेल तर खलिस्तान का होऊ नाहीं दिला आपण? तिथेही आपले सैनिक व पोलीस मृत्युमुखी पडलेच ना? मग आता का वेगळा विचार?

अनुराधा मॅडम,
http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/051... हा दुवा उघडून "चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा. या अहवालानुसार काश्मीरमध्ये सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या लोकांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचेच नाहींय्. म्हणूनच हल्ली पाकिस्तानही काश्मीरच्या "आजादी"बद्दलच बोलतो. पण फाळणीच्यावेळी कुठल्याही संस्थानाला आजादी देण्याचा विकल्पच नव्हता. प्रत्येक संस्थानापुढे दोनच विकल्प होते: एक तर भारतात सामील व्हा किंवा पाकिस्तानात सामील व्हा. चॅदम हाऊस अहवालानुसार सरहद्दीच्या दोन्ही बाजूकडील काश्मिरींना जर पाकिस्तानात सामील व्हायचे नसेल तर मग प्रश्नच काय उरला?

प्रत्येक संस्थानापुढे दोनच विकल्प होते
तिसरा स्वतंत्र राहण्याचाही चॉइस इंग्रज सोडून गेले होते असे वाचल्याचे स्मरते.
त्याच क्लॉजचा वापर करुन जुनागड, काश्मीर, हैद्राबाद हे दिमाग खाउ लागले भारताचे.
तिकडे कालात संस्थान(आजच्या सिंध नि बलुचिस्थान मधला काही भाग) हाच खेळ पाक सोबत खेळत होते.
.
भारताने नि पाकने पाहिले पाहिले नि सरळ सरळ सात्मीकरण केले त्या ठिकाणांचे स्वतःच्या देशात.
.
सगळा वाद झाला तो केवळ ह्याच क्लॉजमुळे :-
"स्वतंत्र रहायचे की सामीएल व्हायचे हे ज्या त्या stateने ठरवावे."
.
आता "स्टेट " म्हणजे कोण? राज्यकर्ता(निवडून न आलेला संस्थानिक) की जनता?
सत्ता सार्वभौम की जनता? त्यावरून सगळी हाणामारी सुरु झाली. बाकीचे पुढचे तपशील ह्याच धाग्यात वरती खूप छन दिलेत तुम्ही लोकांनी.

सुधीर काळे's picture

31 Jan 2013 - 4:21 pm | सुधीर काळे

हा रेफरन्स वाचायला आवडेल.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 12:15 pm | अनुराधा१९८०

फाळणीच्यावेळी कुठल्याही संस्थानाला आजादी देण्याचा विकल्पच नव्हता.>>> आझाद राहण्याचा पूर्ण विकल्प होता. म्हणुन तर हैद्राबाद १५/०८/४७ नंतर बरेच दिवस स्वतंत्र होते. बर्‍याच संस्थानिकांना पण स्वतंत्र रहायचे होते पण जनमताच्या रेट्या पाई आणि सैनिक शक्ती शुन्य असल्यामुळे भारतात सामिल व्ह्यावे लागले

अनुराधामॅडम आणि मन१साहेब, या बाबत जर एकादा लेख आपल्या वाचनात आलेला असेल तर मला वाचायला हवा आहे. माझ्या माहितीनुसार असा विकल्प नव्हता. पण माझा चुकीचा समज असेल तर तो दुरुस्त करायला आवडेल.

सुनील's picture

4 Feb 2013 - 11:06 pm | सुनील

ब्रिटिशांनी विभागणी केली ती त्यांच्या थेट अधिपत्याखालील भूभागाची. जो भूभाग त्यांच्या थेट अधिपत्याखाली नव्हता (संस्थाने) त्याचा निर्णय त्यांनी त्या-त्या संस्थानिकांर सोपवला होता. त्यांना भारत, पाकिस्तान वा स्वतंत्र असे पर्याय होते. ह्याच पर्यायाचा वापर करून काश्मिर नरेशांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ह्याचे चर्वितचर्वण धाग्यावर झालेले आहेच! ते आता टाळतो ;)

पुढे जेव्हा UN च्या सार्वमताचा प्रश्न आला तेव्हा मात्र दोनच पर्याय - भारत आणि पाकिस्तान त्यांना उपलब्ध झाले. स्वतंत्र राहण्याचा पर्याय गेला.

धन्यवाद! म्हणजे आधी तीन्ही पर्याय होते पण आता दोनच पर्याय उरले आहेत?

सुनील's picture

5 Feb 2013 - 7:43 pm | सुनील

सध्या व्यवहार्य असा एकच पर्याय शिल्लक आहे आणि तो म्हणजे LOC ला रीतसर सीमारेषा म्हणून मानणे.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2013 - 8:49 pm | श्रावण मोडक

काही नाही. ४२० कोण आहे (म्हणजे, या क्रमांकाचा प्रतिसाद कोणाचा आहे) ते पहायला आलो होतो. ;-)

सुनील's picture

5 Feb 2013 - 9:42 pm | सुनील

काही नाही. ४२० कोण आहे (म्हणजे, या क्रमांकाचा प्रतिसाद कोणाचा आहे) ते पहायला आलो होतो.

कैच्या कै कारणं सांगू नका!

३१ मार्चच्या आत ५०० करायच्या नानाच्या कटात तुम्ही सामील आहात, ते कळ्तय आम्हाला ;)

सुनील-जी,
"सध्या व्यवहार्य असा एकच पर्याय शिल्लक आहे आणि तो म्हणजे LOC ला रीतसर सीमारेषा म्हणून मानणे." १०० टक्के सहमत! माझ्या वाचनात असेही आले होते कीं "सिमला करारा"च्यावेळी थोरले भुत्तो या अटीला तयारही झाले होते पण लेखी दिले तर त्यांना राज्यावरून हाकलून दिले जाईल ही भीती वाटत होती. म्हणून त्यांनी असे वचन दिले कीं हे understanding त्यांना मान्य आहे व ते हळू-हळू जनमत त्याबाजूने तयार करतील. पण पाकिस्तानात परतल्यावर त्यांनी पलटी खाल्ली आणि "जितं मया"चे शड्डू ठोकत ते सगळीकडे भाषणे देत सुटले.....
मोडकसाहेब, मला फार काळजी लागली होती कीं या धाग्यावरचे प्रतिसाद नेमके "४२०" वर थांबतील! पण तो आकडा पार झालेले पाहिल्यावर "हुश्श" झाले...
बिपिन-जी, मला 'सर्कॅझम' वगैरेबद्दल उमज जरा कमीच आहे!

नितिन थत्ते's picture

12 Feb 2013 - 2:55 pm | नितिन थत्ते

त्याच पर्यायांतर्गत सिक्किम हे संस्थान स्वतंत्र झाले. ते १९७५-७६ पर्यंत भारताचे प्रोटेक्टरेट म्हणून राहिले. त्या सुमारास ते पूर्ण राज्य म्हणून भारतात विलीन झाले. [मधला काही काळ ते असोसिएट स्टेट म्हणूनही होते].

http://en.wikipedia.org/wiki/Sikkim#After_Indian_independence

II श्रीमंत पेशवे II's picture

1 Feb 2013 - 4:00 pm | II श्रीमंत पेशवे II

आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका.
काहीतरी करायला च हवे.

सुबोध खरे's picture

1 Feb 2013 - 7:41 pm | सुबोध खरे

अहो प्रत्येकाचे लाड करीत राहिलो तर झालेच .
आमच्या गवाणपाड्याचे आगरी लोक सुद्धा स्वतंत्र व्हायचे आहे म्हणतील.आमचा पंत प्रधान आणि आमचेच मंत्री!!!
सती बंदी कायदा केला तेंव्हा तुम्ही जर जनतेचा कौल घेतला तर तो कायद्याच्या बाजूने गेला असता काय?
काही लोकहितार्थ निर्णय हे राबवावे लागतात.
शेवटी बळी तो कान पिळी आहेच.
तुम्ही काश्मिरी लोकांचे किती लाड करायचे ते एकदाच ठरवून टाका.
काश्मीर मध्ये किती पैसा ओतला गेला आणि त्यातील किती चा सुविनियोग झाला हा हिशेब केला तर एक लक्षात येईल कि पंडित नेहरू हे स्वतः काश्मिरी असल्याने ३७० कलम प्रथम मान्य केले नंतर ते कलम सर्रास रद्द करून लोकसंख्या बदली केली असती तर आज काश्मिरात बहुसंख्य मुसलमान राहिले नसते आणि हा प्रश्न आपोआप सुटला असता.
मला असे वाटते कि जर सरदार वल्लभ भाई पटेल अजून जगले असते किंवा पंतप्रधान झाले असते तर हि खरुज झालीच नसती.

सुबोध खरे's picture

1 Feb 2013 - 7:48 pm | सुबोध खरे

३७० कलम रद्द करण्यासाठी एवढ्या संधी येऊनही आपल्या मायबाप सरकारांनी काही केला नाही.
तुम्ही ३७० कलम रद्द करून टाकले आणि कितीही कोणी कावकाव केली तरी भिक घातली नसती तर हि सगळी लफडी कधीच मिटली असती.
चीन ने अमेरिकेला स्पष्ट सांगितले आमच्याशी धंदा करायचा असेल तर करा मानवाधिकार वगिरे आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे?
अमेरिकेने काय केले?
शेवटी बळी तो कान पिळी
कबुतरे उडवण्याची चटक लागलेल्या सरकार कडून काय अपेक्षा आहे.
चार दोन सैनिक मेले तर काय बिघडले?
(man power is expendable) हे आपल्या संरक्षण सचिवांचे मत मी चर्चेच्या वेळी आपल्या स्वतः च्या कानांनी ऐकले आहे.
दुर्दैवाने ते माझे द्वारकेवरून परत येताना सहप्रवासी होते.त्यामुळे दहा वीस सैनिक मेले तर एवढा आरडा ओरडा कशासाठी?

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 9:42 pm | अनुराधा१९८०

ज्या देशाला सैनिकांची किंमत नाही, त्या देशाला चांगले भविश्य नाही

@ वेताळ
परवा टीव्हीवर बातम्यात सांगितले होते कि पाकिस्तान काश्मिरात आण्विक हल्ला करणार आहे. त्यामुळे आण्विक हल्ला झालेनतंर लोकानी काय काय करावे ह्याबद्दल काश्मिर पोलीसांनी जनतेला स्थानिक वृत्तपत्रात जाहीरात देवुन मार्गदर्शन केले आहे. बंकर खोदायला देखिल लोकाना सांगितले आहे. ह्याबाबत इतर कोणत्याही पेपरात छापुन आले नाही. ह्यात काही तथ्य आहे काय?
ही ती बातमी :- http://news.yahoo.com/india-warns-kashmiris-possible-nuclear-attack-1315...

अगदी ताजी बातमी :- पाकची अण्वस्त्रे असुरक्षित हाती?

जाता जाता :-
२६/११ च्या हल्ल्या नंतर पाकिस्तानी शास्त्रज्ञांनी तिथल्या लष्ककराकडे मागणी केली होती की हिंदुस्थानवर अणवस्त्र हल्ला केला जावा.
संदर्भ :- http://alturl.com/bnke3

दुसर्‍याच दिवशी पाक सोबत क्रिकेट खळणं थांबवु, अनं हव तर कडक शब्दात समज देणारे निषेध खलितेही धाडू. तसही असा प्रॉक्सि अण्वस्त्रहल्ला झाल्यानंतर दोशींवर पाक न्यायालयात खटले दाखल होऊन शिक्षासुध्दा सुनावली जाऊ शकते हे काय मी सांगायला पाहिजे ?

हि बातमी प्रसिद्ध झाल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना खडसावल्याचीही बातमी आली होती.

अवांतर - या धाग्यावरचा हा ४००वा प्रतिसाद!

नाना चेंगट's picture

1 Feb 2013 - 11:39 pm | नाना चेंगट

३१ मार्चच्या आत ५०० आणि ३१ डिसेंबरच्या आत १००० प्रतिसाद व्हायला हवेत.

लोकहो ! कामाला लागा !! :)

सुनील's picture

2 Feb 2013 - 12:17 am | सुनील

खारीचा वाटा ;)

चांगला ११ किलोमीटर एलओसी च्या आत आला होता. व एक दिवस मुक्काम केला होता. त्याच वेळी आपल्या जागृत(?)सैनिकानी त्याला यमसदनी धाडला असता तर कारगिल झाले नसते.

अहो ऐका हो ऐका...
राहुलजी आले आहेत आता कार्भार बघावयांस..आणि शुशीलराव आहेत हो दिमतींस..अता जे होणार ते नीट्च..

नितिन थत्ते's picture

2 Feb 2013 - 10:47 pm | नितिन थत्ते

काय म्हणता ?

मला तर लोक सांगतात की मोदी येत आहेत.

सुधीर काळे's picture

3 Feb 2013 - 11:02 am | सुधीर काळे

नितिन, मोदी येणे शक्य नाहीं कारण आजच्या 'भाजपा पक्षा'त पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल एकमत होणे शक्य नाहीं आणि NDA ला बहुमत मिळाले आणि मोदींबद्दल एकमत झाले नाहीं तर पंतप्रधानपदाची जयमाला गळ्यात घालून घ्यायला "विंगे"त आडवानीजी 'तय्यार' उभेच आहेत मान झुकवून!
पण 'लाल'कृष्णजींच्या हस्ते एकदा तरी 'लाल' किल्ल्यावर तिरंगा फडकवला जावा असे मात्र मलाही वाटते....!

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2013 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते

चेष्टा, सर्कॅझम वगैरे कळत नाही का हो काका तुम्हाला? :(

श्रीरंग_जोशी's picture

5 Feb 2013 - 9:53 pm | श्रीरंग_जोशी

ती नितिनभाऊंच्या विनोदाची पुढची पायरी असावी असे वाटते ;-)

ए ऽ ऽ धत्तड तत्तड ४०० झाले रे प्रतिसाद!!!! ५०० आणि १००० करून या धाग्याला एकहजारी मनसबदारी बहाल केल्या जाऊन मिपाच्या हॉल ऑफ फेम मध्ये हा शानसे लागावा अशी अरजी मिपास्वामींचे चरणी दाखल करत आहोत.

- सेवेचे ठायी तत्पर.

वेनकुलोद्भव ब्रूसाजी बिन थॉमसाजी निरंतर.

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2013 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची गेल्या आठवड्यातील मुलाखत -

http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-01-28/interviews/365774...

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Feb 2013 - 10:27 pm | पुण्याचे वटवाघूळ

आजच टाईम्स नाऊ वर बघितले की हुरियत कॉन्फरन्सचा नेता यासीन मलिक पाकिस्तानात जाऊन २६/११ चा मास्टरमाईंड हाफिझ सईदला जाऊन भेटला.या कृत्याला देशद्रोही कृत्य का म्हणू नये आणि त्याच्यावर कारवाई का करू नये? याविषयी आपले मत काय?

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2013 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी

यासिन मलिक जम्मु काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक नेता आहे. त्याने (अंदाजे) दोन दशकांपूर्वी शस्त्रे ठेवली असली तरी त्यानंतरही अनेकदा त्याने तुरूंगाची हवा खाल्लेली आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने पाकिस्तानी स्त्रीबरोबर विवाह केला असल्याने पाकिस्तानी व्हिसावर तो तिकडल्या वार्‍या करत असतो.

त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Feb 2013 - 7:18 am | पुण्याचे वटवाघूळ

त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?

स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करत असेल तर (एक वेळ) समजण्यासारखे आहे पण २६/११ च्या सूत्रधाराबरोबर स्टेज शेअर करणे कसे समर्थनीय आहे? पण त्याच्या स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करायच्या अधिकाराबरोबरच हाफिज सईदच्या २६/११ करायचा अधिकारही मान्य केला नाही तर स्वतःला मानवतावादी म्हणवत नसावे अरूंधती रॉय आणि त्या पठडीतल्या इतरांना.

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2013 - 7:37 am | श्रीरंग_जोशी

कारवाई केल्याने यासीन मलिक बदलणार की त्याच्या समर्थकांना जरब बसणार? काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी यापूर्वीही पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानचे दौरे केले आहेत व त्यामध्ये भारतावर केल्या जाणाऱ्या सूत्रधारांना भेटले नाहीत असा दावा कुणीच करू शकत नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Feb 2013 - 8:14 am | पुण्याचे वटवाघूळ

यासीन मलिक नक्कीच बदलणार नाही. पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.मग अशाला भारतात का म्हणून ठेऊन घ्यायचे? १९४७ मध्ये एक फाळणी झाली ती चूक परत करता कामा नये.इतर कोणाला भारतात राहायचे नसेल तर अशांनी पाकिस्तानात खुशाल चालते व्हावे पण या देशाची टाचणीच्या टोकावर मावेल इतकीही जमीन तुम्हाला मिळणार नाही असे आपण ठणकावून सांगणार की नाही? की दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेले लोक कधीच न दिसणार्‍या पण कोर्टाने रितसर दोषी ठरविलेल्यांना फाशी दिले की मग नक्राश्रू ढाळणार्‍या ढोंगी मानवाधिकार वाल्यांचे पित्ते भारत सरकार आहे असे मानायचे का?

आणि कारवाई करून नक्की काय होणार हा प्रश्न २६/११ मध्ये बळी पडलेल्या कोणाच्या बायकामुलांपुढे जाऊन विचारायचे धैर्य आहे का तुमच्यामध्ये?

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2013 - 8:32 am | श्रीरंग_जोशी

अशा बाबतीत अतिउत्साह अडचणीत आणत असतो. आपल्याला जे साध्य करायचे आहे ते असे रुसवे फुगवे दाखवून होणार नाही. हे काही नळावरचे भांडण नाहीये.

या इथे मराठी आंतरजालावर अनेक जालकंटक मोठ्या मोठ्या डौलाने मिरवत असतात. त्यांना इशारे दिल्याने, कारवाई केल्याने त्यांचे कारनामे थांबले आहेत का?

नळावरची भांडणे अन भारत-पाक इश्श्यूची तुलना केल्याने डोळे पाणावले.

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2013 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी

भारत सरकारची कृती विचारपूर्वक व परिणामकारकच असावी. भारत सरकारकडून काही आगळीक व्हावी यासाठीच मलिक व हुरियतवाल्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात की जेणेकरून तेथील नव्या पिढीला भारताविरुद्ध भडकवता यावे.

सौ सुनारकी एक लोहारकी हे धोरणच योग्य ठरेल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

13 Feb 2013 - 8:16 am | पुण्याचे वटवाघूळ

काश्मीर खोरे हा (बहुदा) एकमेव प्रांत आहे जिथे हिंदू-मुस्लिम दंगली कधीच झाल्या नव्हत्या.काश्मीरी लोकांना जर वेळीच नोकर्‍या,शिक्षणव्यवस्था,रस्ते,पाणी,वीज इत्यादी दिले गेले असते तर काश्मीरी युवक कधीच चुकीच्या वाटेला गेला नसता. पण अब्दुल्ला कुटुंबियांनी (आणि इतरही राज्यकर्त्यांनी) अत्यंत ढिसाळ प्रशासनाचा नमुना दिला आणि त्यातून काश्मीरी युवक एलिनेट झाला. अजूनही काश्मीरात या मूलभूत गोष्टी दिल्या तर यासीन मलिकवर कितीही कारवाई केली तरी काश्मीरी लोक त्यामुळे काडीमात्र भडकावले जाणार नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

13 Feb 2013 - 8:38 am | श्रीरंग_जोशी

इतर ठिकाणांसारख्या दंगली झाल्या नसतील पण ८९-९० मध्ये मशीदीमधून निर्वाणीचे इशारे देऊन व अनेक हिंदूचे प्राण घेऊन त्यांना काश्मीरमधून हुसकावण्यात आले होते. त्यातले अनेक आजही जम्मूतील किंवा दिल्लीमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत.

फार पूर्वीचे माहीत नाही पण गेल्या काही वर्षांत तेथील पायाभूत सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झालेली आहे. काही महिन्यांपूर्वीच मी काश्मीरमध्ये जाऊन आलोय. लहानसहान खेड्यांमध्ये सुद्धा शाळेत जाणारे विद्यार्थी बहुसंख्येने दिसत होते. या सर्व सकारात्मक बाबी आहेतच त्यामुळे भारत सरकारने थोडा अधिक संयम दाखवून पुढची पायरी गाठावी हि अपेक्षा आहे.

पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.

मुशर्रफ साहेब राहुन गेले काश्मीरात LOC ओलांडुन आणि ती सुद्धा हेलिकॉप्टर ने.
मस्त एक दिवस राहिले आणि परत गेले. मग अतिरेक्यांना पाठवले कार्गील ची शिखरे ताब्यात घ्यायला.
अपनी मर्जी आये, अपनी मर्जी चले गये.
आणि इथे आपण इंच इंच माघारी बद्दल बोलत आहोत.

सुपरमॅन's picture

12 Feb 2013 - 8:06 pm | सुपरमॅन

या सगळ्या मागे आपल ढिसाळ सरकार आहे..एक अनुबॉम्ब टाकला तर गायब होतील पाकडे..
सीमेवर तर वाद आहेतच शिवाय भारतात राहून हिन्दू ना १५ मिनीटात सम्पवन्याच्या गोष्टी होतात हा कीती मोठा अपमान :(

आनंदी गोपाळ's picture

12 Feb 2013 - 11:53 pm | आनंदी गोपाळ

असा एक भाग असतो.
एक बाँब टाकला तर! तो काय दिवाळीचा अ‍ॅटम बाँब वाटला का तुम्हाला?
कराचीवर बाँब टाकला, तर मुंबई अन त्या आधी अहमदाबाद अन सुरत मधे रेडिओ अ‍ॅक्टिव्ह धूळ येऊन क्षक्ष लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? अभ्यास तरी करा हो किमान ७वीच्या भौतिक अन रसायन शास्त्राचा.
गेला बाजार गूगल आहे बोटाखाली?
राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, इ.इ. काही असते हे ठाऊक करून घ्यायची गरज आपल्याला नसतेच. "उठला" झोपेतून की चाल्ला बाँब टाकायला पाकिस्तानावर. चौथी ड च्या वर्गात 'मला पंतप्रधान केला तर' असा निभंद लिव्ताय काय हो तुम्ही??

मालोजीराव's picture

13 Feb 2013 - 1:09 pm | मालोजीराव

जाऊ द्या हो ...उत्साहाच्या भरात म्हणाले असतील ते ! तो अकबर्या ओवेसी जर उत्साहाच्या भरात १०० कोटी हिंदूंना मारायची भाषा करत असेल ते पण लाखभर लोकांसमोर तर हे मिपाकर मिपा च्या व्यासपीठावरून अणु बॉम्ब फोडायची भाषा करू देत कि, आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा प्रोत्साहन द्यायला हवे...कि अणुबॉम्ब कशाला आपण हायड्रोजन बॉम्ब पण वापरूया वगैरे वगैरे.

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Feb 2013 - 8:54 am | श्री गावसेना प्रमुख

गाडगे बाबा तरीच सांगत होते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
कराचीवर अणुबाँब टाकला तर त्याचे इफेक्ट हे अहमदाबाद मुंबै पर्यंत यायचे तर.त्याच न्यायाने हिरोशीमा नागासाकी वर अमेरीकेने टाकलेल्या अणुबॉम्ब ने तर दोघ कोरीया ने तर अकार्यक्षम व्हायला हवे

नाना चेंगट's picture

13 Feb 2013 - 4:41 pm | नाना चेंगट

४४४

श्रावण मोडक's picture

13 Feb 2013 - 5:16 pm | श्रावण मोडक

445!

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Feb 2013 - 5:41 pm | श्री गावसेना प्रमुख

भर टाकताय का?मी देउ का ट्रॅक्टर भर मुरुम

राही's picture

13 Feb 2013 - 7:43 pm | राही

इंच इंच हा आणि तो राष्ट्रपिता हे दोन्ही धागे वज्रचुडेमंडित अखंड सौभाग्यवती कॅटेगरीतले आहेत. यांचे सौभाग्य अक्षय्य आहे/असो.

राहीसाहेब/राहीमॅडम,
अगदी खरे आहे आपले म्हणणे! हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं त्याला 'मिपा'करांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिले यात नवल ते काय? हा धागा मी सुरू केला त्यावेळी माझ्या स्वप्नातही नव्हते कीं हा धागा प्रथम क्रमांकावर येईल.
या धग्यावर खूप लोकांनी मौल्यवान भर भर घातली त्यात सुनील-जींचा वाटा मोठा आहे! त्याबद्दल त्यांचे खास आभार!
या विक्रमी घाग्याच्या बाबतीत मी केवळ निमित्तमात्र आहे. त्याला विक्रमी बनविण्यात इतरांनीच खूप योगदान केलेले आहे! माझा वाटा अगदी खारीचाच आहे!