योगायोग

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
4 Apr 2008 - 8:34 am

माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.

weekend

आम्ही दूध पितो.
मांजरही दूध पिते.
पण मांजराच्या ते अंगी लागते.

आम्ही मरेस्तोवर जगतो,
मांजरही मरेस्तोवर जगते पण
मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते.

आम्हाला देव माहित आहे.
मांजराला ते ही कळत नाही...
पण त्याचा आत्मा भटकत
राहिल्याचे कोणी ऐकले नाही.

पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी
माणूस असेलही
पण त्यानेही कधी तरी निवांतपणे
म्यँव म्हणायला हरकत नाही.

खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. म्हणूनच येणारा सप्ताहांत आणि नवे वर्ष निवांतपणे घालवा...

मौजमजासद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

4 Apr 2008 - 8:37 am | सर्किट (not verified)

सृ ला ताई

मी पण वीकान्तासाठी ह्या मार्जाराप्रमाणेच तयार आहे.

ह्यापी वीकान्त,

सर्किट

पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी
माणूस असेलही
पण त्यानेही कधी तरी निवांतपणे
म्यँव म्हणायला हरकत नाही.

ता. क. म्याऍव

प्राजु's picture

4 Apr 2008 - 8:40 am | प्राजु

मांजर अतिशय देखणा प्राणी.
कार्डही मस्त आहे. मला मांजराचा नेहमीच हेवा वाटतो. मालकाच्या गादीवर झोपणे, मालकाने दिलेले आणि चोरूनही दूध पीणे.. आणि काहीही काम न करता.. (कुत्र्याला निदान घराची राखणतरी करावे लागते) आरामत दिवस घालवणे. वा! काय लाईफ आहे..!
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

मला मनीमाउ ची पोझ लई आवडली बघा.

(साय सोडुन दुध पिणारा )
मदनबाण

ध्रुव's picture

4 Apr 2008 - 2:52 pm | ध्रुव

मला मनीमाउ ची पोझ लई आवडली बघा
विकांताला दोन ऑप्शन्स आहेत....
१. माउसारखे तंगड्या वर करुन अथवा छबो करून घरी पडुन आराम करायाचा...
किंवा,
२. परत एकदा भ्रमंती... :)

--
ध्रुव

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 3:57 pm | धमाल मुलगा

आहाहा...
उद्या झोपणार...झोपणार....झोपणार मी...उशीरापर्य॑त नाही उठणार...उठणार...उठणार मी !!!!

लय भारी!

अवा॑तरः ध्रुवभौ, छबो करून घरी पडुन आराम करायाचा... म्हणजे नक्की काय करुन रे?

-(आळशी) ध मा ल.

ध्रुव's picture

4 Apr 2008 - 4:06 pm | ध्रुव

मला वाटलच... तुला महित नसणार... छबो म्हणजे छताकडे बो* करुन पडणे ;)
--
ध्रुव

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 4:20 pm | धमाल मुलगा

ज ह ब ह र्‍ह्या !!!!

ह.ह.मु.व. आयला तूपण एकदम वल्लीच आहेस बॉ!

मला वाटलच... तुला महित नसणार..

कस॑ काय बॉ? आम्ही झोपत नसतो...डायरेक्ट मरतो ते दुसर्‍या दिवशी परत जिव॑त होतो ही 'सनसनीखेज' बातमी 'सबसे तेज' 'ब्रेकि॑ग न्युज' म्हणून झळकली की काय?

आवडला शब्दप्रयोग जोरात आवडला. छबो...छबो...छबो !!!!

- (छबो करुन पडणारा) ध मा ल.

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 11:57 am | मनस्वी

विकांताला असे अनेक ई-ढकल येतात :)

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 12:16 pm | आनंदयात्री

म्यँव .. म्यँव

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 12:40 pm | प्रभाकर पेठकर

माऊची 'पोझ' आणि 'मुड' दोन्ही लाजवाब.

शरुबाबा's picture

4 Apr 2008 - 3:14 pm | शरुबाबा

खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत.

अगदि १००% सहमत

व्यंकट's picture

4 Apr 2008 - 7:15 pm | व्यंकट

कुत्रं ( मालकाकडे कृतज्ञतेनी बघत ) : मी फार भाग्यवान आहे मला ह्याच्या सारखा मायाळू मालक मिळाला.
मांजर ( मालकाकडे तुच्छ्तेने बघत ) : ह्याच नशीब चांगलं की मी ह्याच्या घरी रहाते, पण ह्या मेल्याला बघा काही आहे का त्याचं.

व्यंकट