आयला!! हे अवघड आहे बुवा !!!

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 9:36 pm

डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे.

नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्‍या मनस्तापाविषयी तो धागा आहे.

आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते. त्या वेळी एकमेकांना थोडेफार समजून घेणे, आवडीनिवडी जाणणे, विचार जाणून घेणे हे अपेक्षित असते.

सहसा या आजमावण्याच्या काळातले विषय म्हणजे देवधर्मविषयक, साहित्य, संगीत, नाटक सिनेमा, मुले, कुटुंब नियोजन, मुलगी नोकरी करणार की नाही, पैसा कमावणे/खर्चणे, भविष्यातील स्वप्ने, एकत्र/विभक्त कुटुंब (आणि स्वयंपाक) वगैरे.

पण काहीकाही साधे साधे विषय जे या आजमावण्यात कधीच येत नाहीत. पण ते नंतर त्रासदायक ठरू शकतात. ते अगदी रोज दाढी करणे/न करणे वगैरे ट्रिविअल पण असू शकतात.

उदाहरणार्थ:
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला ढणाढणा पंखा लावून बसण्या/झोपण्याची सवय असणे आणि दुसर्‍याला जरासा पंखा असला तरी लगेच सर्दी, डोकेदुखी होणे.

आता लग्नापूर्वी एकमेकाला "झोपताना पंखा लागतो का/चालतो का?" असे कोणी विचारणार नाही. पण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी एकाला तडजोड भाग पडणे आणि त्रास होणे* हे नक्कीच.
*त्रास दोघांना होणार की एकाला हे त्या व्यक्तींवर अवलंबून आहे. आपल्यासाठी दुसरा त्रास झेलतोय या विचाराने पहिल्याला त्रास होऊ शकतो.
(आता लोक म्हणतील की एसी लावायचा. पण तो पर्याय खारिज. ब्रेड मिळत नाही तर केक खा हे चालणार नाही)

एकाला तिखटजाळ जेवायची सवय आणि दुसर्‍याला सपक जेवणाची सवय.

चला तर अनुभवी पतींनो आणि पत्नींनो !!! आपण अशा विषयांची यादी करू या. म्हणजे आपल्या लग्नोत्सुक मिपाकरांना आणि मिपाकरणींना मानसिक तयारी करायला बरे पडेल.

नितिन थत्ते

संस्कृतीमुक्तकजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

विलासराव's picture

31 Jul 2010 - 9:48 pm | विलासराव

एखद्याला जोराने घोरण्याची सवय असते,त्याचा दुसर्याला बराच त्रास होतो
चला तर अनुभवी पतींनो आणि पत्नींनो !!!
असा अनुभवी नाही पण तरिही त्रास तर होतोच

नावातकायआहे's picture

31 Jul 2010 - 9:51 pm | नावातकायआहे

प्र.का.टा.आ.

(माझा ह्यो प्रतिसाद थत्ते साहेबांना अडचणीत तर आणणार नाय ना?)

राजेश घासकडवी's picture

31 Jul 2010 - 10:04 pm | राजेश घासकडवी

पण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी एकाला तडजोड भाग पडणे आणि त्रास होणे हे नक्कीच.

नक्कीच. झोपायच्या वेळी नवराबायको नक्की कुठच्या पोझिशनमध्ये झोपतात हाही वादाचा किंवा वाद टाळायचे असतील तर तडजोडीचा मुद्दा होऊ शकतो.

ब्रेड मिळत नाही तर केक खा हे चालणार नाही

ब्रेड खाताना केक खातोय अशी कल्पना करणं फक्त आपल्या हाती असतं.

एकाला तिखटजाळ जेवायची सवय आणि दुसर्‍याला सपक जेवणाची सवय.

व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला वेगळी चव प्रिय असते. काहींना तिखट तर्रीचा झणका हवा असतो, तर काहींना रोज तोच तो वरणभात. अशी चवींची सांगड घालणं विरळाच. त्यात संकोच म्हणा की समाजरीत म्हणा, पण लग्नाआधी हे प्रश्न विचारले जात नाहीत... लग्नाआधीच आवडीनिवडींबद्दल भरपूर सुसंवाद करावा या मताचा मी आहे.

विनायक प्रभू's picture

31 Jul 2010 - 10:11 pm | विनायक प्रभू

झोपायच्या पोझीशन आधीच चर्चा झाली होती त्यामुळे काहीही त्रास नाही.
इतर गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर प.प.प.झा. अगदी दोघांनाही.

शानबा५१२'s picture

31 Jul 2010 - 10:46 pm | शानबा५१२

च्यायला नखरे नुस्ते!!
आमच लग्न नाही झाल,पण झोपायच्या बाबतीत आपले नखरे फार!

मी तर फारच 'नको ते' प्रश्न विचारतो अस सर्वच बोलतात.जेव्हा श्रीमती शानबी येईल तेव्हा आम्ही असे फालतु प्रश्न डीस्कस नाही करणार.
जर आपल खर प्रेम असेल तर 'दीसण्यात'ही तडजोड करता येते,पंखा वगैरेच काय बोलता!

आता माझी नजर सारखी ह्या लेखावर राहील्,पण 'ऐकाव जानाचे,करावे मनाचे' असच वागणार आपण!

आता 'स्त्रीद्वेष्टयां'नी 'लग्नाच्याआधी घटस्फोटाची तयारी' असा लेख लिहा.

दोन्ही जोडीदारांपैकी एकाला ढणाढणा पंखा लावून बसण्या/झोपण्याची सवय असणे आणि दुसर्‍याला जरासा पंखा असला तरी लगेच सर्दी, डोकेदुखी होणे. <<<
आमचीच कहाणी सांगताय राव. दिवसभरात वाजलं नाही तर रात्री या वरून तरी नक्की वाजणार अशी परिस्थिती असायची सुरूवातीला. आता कुछ कदम हम चले कुछ कदम तुम चलो करत सुवर्णमध्याच्या जवळ पोचण्याची प्रक्रिया आहे. :)

>>आमचीच कहाणी सांगताय राव.
हा हा हा अगदी असच म्हणतो.
शेवटी भेट म्हणुन बायकोला क्विल्ट आणुन दिल. =))

तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय राव!
मी क्विल्ट मध्येच झोपते, पण एक सांगु ? जर पंखा बंद झाला वा ए सी चा आवाज नाही आला तर सगळ्यात पहिला मी जागी होते.
सवय होते यार एक मेकाची अगदी त्याच्या न आवडणार्‍या गोष्टींचीही.
त्याला ही तसच होत असाव.

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 9:35 am | ऋषिकेश

आयला हा पंख्याचा प्रश्न अखिल भारतीय दिसतोय :प
**मला वाटायचं की आमच्याकडेच आहे की काय ;)**

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही पंख्याच्याबाबतीत मात्रा मुंबईकर (!) आहोत. पंख्याचा आवाज ऐकल्याशिवाय झोप लागत नाही नीट!

आमची "भांडणं" सुरूवातीला भाजीत, पदार्थात गूळ/साखर घालण्यावरून व्हायची! मला काहीही बनवता येत नसेलच असं त्याचं गृहीतक होतं आणि याला काय चवीढवीतलं कळतंय असं माझं ... अजूनही त्यावरून दोघंही एकमेकांची टांग खेचत बसतो!

विकास's picture

1 Aug 2010 - 6:31 am | विकास

काय लिहीणार?... :(

लिहलं असतं देखील, पण तात्काळ प्रतिसाद संपादीत होण्याची भिती असल्याने टाळत आहे. ;)

Nile's picture

1 Aug 2010 - 9:22 am | Nile

=)) =)) =)) =))

लै भारी विकासराव. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 8:55 am | प्रकाश घाटपांडे

जेव्हा एकाचे 'अन्न' हे दुसर्‍याचे 'विष' असते त्यावेळी तडजोड संपुष्टात येते. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच केल्याशिवाय तडजोडीपर्यंत जाता येत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश हा व्यक्ति, मूड, संस्कृती इ सापेक्ष असल्याने तो कमी जास्त होत राहतो.
एकमेकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

सहसा या आजमावण्याच्या काळातले विषय म्हणजे देवधर्मविषयक, साहित्य, संगीत, नाटक सिनेमा, मुले, कुटुंब नियोजन, मुलगी नोकरी करणार की नाही, पैसा कमावणे/खर्चणे, भविष्यातील स्वप्ने, एकत्र/विभक्त कुटुंब (आणि स्वयंपाक) वगैरे.

विवाह अभ्यास मंडळ म्हणुन अनिल भागवत यांनी चालवलेला उपक्रम, साथ साथ विवाह संस्थेचे उपक्रम हे फॉर्म भरुन घेतानाच ही माहिती घेतात.
विवाह हीच एक तडजोड आहे हे ज्यांना मान्य नसेल त्यांना विवाह हे जाचक बंधन वाटते.

प्रतिसाद देणार होतो पण अवांतर म्हणुन उडला जायचा.
सध्या भेंडीची भाजी मिसळीपेक्षा जास्त चमचमीत असते. तीच खातो.

बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या प्रश्नावर एक जालिम उपाय सुचलाय.. ज्याला पंखा हवाय त्याने ब्रेड खावा अन् ज्याला नकोय त्याने केक खावा..;)

नितिन थत्ते's picture

1 Aug 2010 - 12:11 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ.

आम्ही एसीत पण पंखा लावून झोपतो बॉ. म्हणजे केक पण पावात घालून खातो.