वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती
हाव पारध्याची उफाळलेली होती
नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगार्याची चाळवलेली होती
गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती
तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती
पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती
बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
प्रतिक्रिया
30 Jun 2010 - 10:06 am | रामदास
पारध्यांची वस्ती ही एक स्वतंत्र कविता लिहीणार आहे.
30 Jun 2010 - 3:58 pm | अवलिया
लवकर लिहा ! लवकर लिहा !!
--अवलिया
30 Jun 2010 - 11:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणाची 'शिकार' आता? आणि कोण 'नवी कबूतरं'?? ;-)
अदिती
30 Jun 2010 - 11:29 am | अवलिया
छान ! पाखरं पारध करतांना पाहुन डो़ळे पाणावले
--अवलिया
30 Jun 2010 - 12:32 pm | टारझन
कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली
आदाब अर्ज है ..
कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली
गौर फर्माईयेगा हजुर ..
कुंथ कुंथ के ... दिल से एक आवाज निकली
सहज राव के कमर से आज अचानक तलवार निकली
व्वा व्वा !! व्वा व्वा !!
- (कवतिक भुर्जी) टारेश आदाबार्जवी
30 Jun 2010 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll
सहज कविता छान आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
30 Jun 2010 - 1:58 pm | शरदिनी
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
ओळी विशेष आवडल्या....
:)
30 Jun 2010 - 3:01 pm | आंबोळी
छान आहे.
बहेलिया म्हणजे काय ?
आंबोळी
30 Jun 2010 - 3:50 pm | अवलिया
छान !
--अवलिया
30 Jun 2010 - 4:43 pm | II विकास II
स्क्रिप्ट का?
30 Jun 2010 - 3:56 pm | टारझन
खुपंच छाण !!
- टारझन
30 Jun 2010 - 4:24 pm | छोटा डॉन
एक प्रतिसाद किती वेळा टाकणार ?
एकदा उडालेला प्रतिसाद पुन्हा किती वेळा पेस्ट कारणार ?
नक्की प्रॉब्लेम काय आहे ?
इथे संपादकांना इतर काही कामे नाहीत म्हणुन ते उडवाउडवी करत बसतात असा समज आहे का वारंवार एकच प्रतिसाद चिटकवणार्यांचा ?
हे प्रकार त्वरित थांबवा अशी विनंती.
------
छोटा डॉन
30 Jun 2010 - 4:25 pm | विसोबा खेचर
सुंदर रे..!
30 Jun 2010 - 10:15 pm | मीनल
आशय चांगला आहे.
शेवट तर फारच वास्तव आहे.
हे प्रासंगिक काव्य ते चित्र डोळ्यासमोर आणते आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
30 Jun 2010 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजा, कवितेतला आशय वास्तवाची जाण करुन देणारा आहे. कविता आवडलीच हे वेगळे सांगणे न लगे.
अनंत काणेकरांच्या 'सांबर' नावाच्या एकांकिकेची आठवण झाली. पारध संस्कृती विरुद्ध कला संस्कृती असा तो संघर्ष होता. 'सांबराला' मारायला गेलेला अदिवासी तरुण सांबराच्या डोळ्यात पाहता पाहता प्रेयसीला त्या सांबरात पाहतो आपलं अस्तित्त्व हरवतो सांबर अखेर आपली शिंगे मारुन त्याला मारतो. या एकांकीकेतला आशय वेगळा असला तरी सारांश सांगायचे असे की, शिकारी नेहमीच यशस्वी होईल असे काही नाही.
अवांतर : सहजराव आपण नेहमी चांगले लिहिता हे अनेकांना माहित आहे. बालकांच्यासाठी अनुवादित केलेल्या कविता, काही माहितीपूर्ण लेखन, विविध आशयाच्या कविता, असा बराच खजिना आपल्याकडे आहे, तो येऊ द्या....! :)
-दिलीप बिरुटे
30 Jun 2010 - 6:08 pm | llपुण्याचे पेशवेll
बालकांच्यासाठी अनुवादित केलेल्या कविता
सहमत आहे. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
30 Jun 2010 - 6:11 pm | आंबोळी
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
मला वाटतय ही कविता पण बालकांसाठीच आहे...
काय सहजराव?
आंबोळी
30 Jun 2010 - 6:47 pm | राजेश घासकडवी
बिरुटेसर, ती एकांकिका मलाही आठवते आहे. तीतला कॅनव्हास थोडा मोठा होता. पारंपारिक समाजरीती न पाळणार्या कलाकाराची समाजात कशी कुचंबणा होते, व त्यात त्याचा आत्मा कसा मरतो याचं चित्रण होतं. त्यातलं पारधी हे रूपक खूपच वेगळ्या अर्थाने आलं होतं असं वाटतं. अधिक व्यापक व सहज बोट न ठेवता येण्यासारखं.
या कवितेतला पारधी हा अधिक वैयक्तिक अनुभूतींतून आल्यासारखा वाटतो. जास्त लोकलाइज्ड वाटतो.
30 Jun 2010 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पारंपारिक समाजरीती न पाळणार्या कलाकाराची समाजात कशी कुचंबणा होते, व त्यात त्याचा आत्मा कसा मरतो याचं चित्रण होतं. त्यातलं पारधी हे रूपक खूपच वेगळ्या अर्थाने आलं होतं असं वाटतं.
अगदी बरोबर...!
मुग्लीमाय,झिप्री, कुंजा या सर्वांची मला आठवण आहे. दोन वर्षापूर्वी अभ्यासक्रमात ही एकांकिका पोरांना शिकवायला होती. सांबर मारला तर कुंजा परिपूर्ण पुरुष बनणार असतो. पण, याचे कलाप्रेम आडवे येते. असो, तो विषयच वेगळा होता.
कवितेतील 'पारधी' भोवतीच प्रतिसाद रेंगाळतील की काय असे वाटले आणि नेमके मला वेगळ्या अर्थाने वरील एकांकिकेची आठवण झाली. कलेवर प्रेम करणारा माणूस. समाज परंपरेनुसार त्याला शिकारीसाठी जावे लागते तरी तो केवळ कलेच्या प्रेमापोटी शिकारी असूनही शिकार करीत नाही. ही गोष्ट मला उगाच महत्त्वाची वाटली आणि एकांकिकेची आठवण झाली. असो, थांबतो.
-दिलीप बिरुटे
30 Jun 2010 - 6:16 pm | प्रभो
आवडली....
30 Jun 2010 - 6:52 pm | स्वाती दिनेश
कविता आवडली,
स्वाती
30 Jun 2010 - 7:19 pm | वाहीदा
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
आशेतून निराशे कडे पण वरिल ओळी खुपच आवड्ल्या !
अवांतर : बहेलिया हा हिंदी शब्द येथे घेतला आहे
बहेलिया = FOWLER - someone who hunts wild birds for food
~ वाहीदा
30 Jun 2010 - 11:21 pm | Nile
कविता आवडली पण शेवटच्या ओळीतील आत्मस्तुती खटकली. ;)
-Nile
1 Jul 2010 - 2:53 am | पाषाणभेद
छान कविता.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही