(रूळ)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
24 Jun 2010 - 11:25 pm

नाव खरं तर तितकंसं योग्य नाही कारण खालच्या रचनेत रूळ कुठेच येत नाहीत. पण प्रेरणा रूळ या कवितेवरून घेतली आहे ना (इतर वीसेक लोकांप्रमाणे!), म्हणून कंसात त्याच कवितेचं नाव दिलंय. काय म्हणता, मूळ रचनेचा दुवा कुठे आहे? बस्स काय, इतक्या विडंबनांत तुम्हाला सापडत नाही का? सालं सगळंच आयतं हवं आजकाल...

डोक्याला डोकं
लावून आम्ही बसायचो
ती माझ्या उवा घ्यायची
मी तिच्या उवांनी केस भरायचो

डोकं खाजवत
गप्पा मारत असताना
कधी विचारही करायचो
एकमेकांचं डोकं खाजवून द्यायचो

लायसॉल लावून
कधीतरी तिची केस सुधरून गेली
मी मात्र बनलो आहे एकदम अभिजात
विचारजंत...डोकं खाजवून खाजवून

भयानकहास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

24 Jun 2010 - 11:37 pm | मस्त कलंदर

डोक्याला डोकं मिळतं जिथे.. उवांना नवे घर मिळते तिथे.... =))

बाकी, तुम्ही गल्ली अंमळ चुकलात काका.. डॉन्याच्या डोक्याला डोकं लावलं असतंत तर उवांना मोठ्ठा बंगला मिळाला असता ना राहायला!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राजेश घासकडवी's picture

24 Jun 2010 - 11:42 pm | राजेश घासकडवी

अहो आजोबा म्हणा, पितामह म्हणा, गुर्जी म्हणा, दादा म्हणा, भाऊ म्हणा...
पण तेवढं काका म्हणू नका...

आणि हो, ते डान्रावांच्या डोक्याला डोकं लावून बसणं... तेसुद्धा नकोच, बरंका...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 6:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राका (राजेश काका), लायसॉल नव्हे, लायसील!! :p

अदिती

भडकमकर मास्तर's picture

24 Jun 2010 - 11:38 pm | भडकमकर मास्तर

हेहेहेहे...
आज मज्जा आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 1:45 am | बिपिन कार्यकर्ते

तेच म्हणतो... आज मज्जा आहे...

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

25 Jun 2010 - 12:02 am | टारझन

डोकं खाजवत
गप्पा मारत असताना
कधी विचारही करायचो
एकमेकांचं डोकं खाजवून द्यायचो

सन्जोपरावाचा धागा आठवला ,

-(खुजलीग्रस्त)

-वैयक्तिक टिप्पणी नको.
-संपादक.

निरन्जन वहालेकर's picture

25 Jun 2010 - 9:39 am | निरन्जन वहालेकर

वा ! झकास ! ! !
खरच बेस् विडम्बन ! ! लय म्हन्जे लय मजा आलि वाचुन ! ! !

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:14 pm | अवलिया

हा हा हा मस्त

--अवलिया